Submitted by माणूस on 14 January, 2009 - 19:44
म्हणी साठीचे पान...
हमारे लिये काला अक्षर भैस बराबर है, इसलीय हमारे काले अक्षर मे चुका रहीगे तो कानपर्दा कर लो
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
झक्या प्रयत्न केला आहे
झक्या प्रयत्न केला आहे वरती.
अरे मी आणि माझी मैत्रिण बर्याच वेळेला रात्री झोप नाही आली की आठवतील त्या म्हणी वहीत लिहून ठेवत होतो.
दिवस गेला रेटा रेटी अन
दिवस गेला रेटा रेटी अन चांदण्यात कापूस काती.
नशिबच गांडू तर कोणासोबत भांडू ?
"खाईन तर तुपाशी नाहीतर
"खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी"
ह्याच अर्थाची दुसरी म्हण -
"नेसेन तर शालू नेसेन नाहीतर नागडी बसेन"
पाटलाच घोड आण खासदार
पाटलाच घोड आण खासदार उड
---------------------------
बाई पडली भिडची न गाव आहे टग्याचं
---------------------------
घेण न देण आण खंदील लावुन पाहण
-------------------------------------
एक बाउ आण सारा गाव
कौतुकाची सुन त्याच्यात
कौतुकाची सुन त्याच्यात पहिलटकरिन
------------------------------
नागड्यांच्या गावात पितांबराची पेठ.
दक्षिणा, मी काल परवा
दक्षिणा,
मी काल परवा तुझ्यासाठी प्रतिसाद पोस्ट केला होता. बहुतेक आला नसावा:
तुला खरेच म्हणी-सम्राज्ञी म्हणायला हवे.
तू खरेच महान आहेस.
शरद
बाबुकी बाई दरवेशी आणि उभ केल
बाबुकी बाई दरवेशी आणि उभ केल वारवशी
बाचा बा गेला आणि बोबलता व्होट गेला
गरा गरा फिरे आणि आपोआप कन्ड जिरे
दिवसभर इन्जि आणि रात्री दाढी पिन्जि
काग बाई रोड तर म्हणे गावाची पडली ओढ
पादा पण नान्दा वाळूत मुतले
पादा पण नान्दा
वाळूत मुतले फेस ना पाणी
स्वप्ना, अश्लील म्हणींचा छान
स्वप्ना, अश्लील म्हणींचा छान साठा आहे की तुमच्याकडे
दीपा ह्या अश्लील म्हणी नाहीत
दीपा ह्या अश्लील म्हणी नाहीत ...खूप जुन्या काळातल्या realistic म्हणी आहेतः)
दक्षिणा, सही म्हणी आहेत त्या
दक्षिणा, सही म्हणी आहेत त्या
झकास - तू त्यांच्या वर कोणत्या म्हणी सांगायची वेळ आणतोयस ते लिही
स्वप्ना दिपुर्झा मुलगा आहे.
स्वप्ना दिपुर्झा मुलगा आहे.
शेजार्याच्या लग्नात सुनेला
शेजार्याच्या लग्नात सुनेला आग्रह
बाप तसा लेक, मसाला एक
बाप तसा बेटा, कुंभार तसा लोटा
संडास मालकाचा, रूबाब भंग्याचा (या म्हणीसाठी कृपया माफ करा.)
बोलण्याची बढाई आणि चिलटांची लढाई
जेवण जेवावं पंगतीत आणि मरण यावं उमतीत.
केर डोळ्यात, फुंकर कानात
दु:ख रेड्याला, डाग पखालीला
डोळा आली लाली, चष्म्याला औषध लावी
सारा दिवस घरी अन दिवा लावून दळण करी
ज्याच्यासाठी लुगडं तेच सगळं उघडं
गावच्या गाव जेऊन निजे, अजूनही चिपडीचे वरण शिजे
भटजी म्हणे ती दिशा, न्हावी राखे त्या मिश्या
शेठ गेले कंटाळ्याने, घर गेले विटाळाने
आधीच हळू त्यात गळू
आधीचं रडवं त्यात माहेर आडवं
पाहुण्याचा पाहुणा, कोंडिबाचा मेहुणा
दीपा >>> हे हे हे....
दीपा >>> हे हे हे....
दक्षे कशाला सांगितलेस ?
उपरसे टामटुम अंदरसे
उपरसे टामटुम अंदरसे रामजाने...
----------------------------------------------
सर सलामत तो पगडी पचास...
----------------------------------------------
दोन्ही हाती पुर्या, नवसाबाई खर्या...
----------------------------------------------
एलपाडी राधा नवर्याला म्हणे दादा..
----------------------------------------------
सारा गाव मामाचा एक नाही कामाचा
----------------------------------------------
ताई नाही कामाची बाई नाही कामाची ढुबर्या माझा कामाचा
----------------------------------------------
निम हकिम खतरे जान..
---------------------------------------------
ह्या सासु कडुन ऐकलेल्या
ह्या सासु कडुन ऐकलेल्या म्हणी.
काय करतो कर्मा तर तुझ्या पुढ उभा!
थोडक्यात नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न ह्याच अर्थाची समांतर म्हण.
पाण्यात म्हस (म्हैस) बाहेर सौदा.
अजुन म्हैस पाहिली देखील नाही पण सौदा (व्यवहारची बोलणी) सुरु करण्याची घाइ.
आंधळ्याची वरात बहिर्याच्या घरात.
विसंगतीसाठी वापरली होती ही म्हण.
अशा अजुन बर्याच असतील. पण त्याना आठवत नाहिये.
मी दोन तीन वेळा बोल्लो त्याना की मला म्हणी सांगा. पण आठवत नाहियेत त्याना.
झक्या सासुसमोर वही पेन घेऊन
झक्या सासुसमोर वही पेन घेऊन बसतोस की काय?
जर म्हणी मिळणार असत्या तर वही
जर म्हणी मिळणार असत्या तर वही पेन घेवुन बसलो असतो.
खरच.
दुसर्याची कढी न धावू धावू
दुसर्याची कढी न धावू धावू वाढी...
होईना कोणाच काय, अन मोडी झुरळाचं पाय...
केळीवर नारळी अन घर
केळीवर नारळी अन घर चंद्रमोळी.
अग माझे बायले, सर्व तुला वाटिले.
उसना पसारा देवाचा आसरा.
दुधात साखर आणि आंघोळीत लघवी.
आला अडाण्याचा गाड़ा, वाटेवरची शेते काढा.
घर ना दार अन वार्यावर बिर्हाड
तोबर्याला पुढे, लगामाला मागे.
कुणाला कशाचे बलुत्याला पशाचे.
आपण शेण खायचं नि दुसर्याचं तोंड हुंगायच.
उश्याचं केलं पाय तरी बुड मध्येच.
घोड्यावर हौदा, हत्तीवर खोगीर.
कावळा घातला कारभारी गु आणला दरबारी.
चुलीपुढं हागायचं आनं नशिबात होत म्हणायच.
जावा-जावा, हेवा-दावा.
डोंगरा एव्हढी हाव, तिळाएव्हढी धाव.
तोंड करी बाता अन ढुंगण खाई लाथा.
दारात नाही आड, आणि म्हणे लावतो झाड.
नगार्याची घाय, तिथं टिमकिचं काय?
अगसली ती मागासली.
मागाहून आली ती गरोदर राहीली.
फुका दिले झोका म्हणून पांग फेडलेस का लेका?
माझा ह्यां असा, बायकोचा तां तसा, गणपतीचा होऊचा कसा?
अंगात नाही बळ नी नुसती
अंगात नाही बळ नी नुसती पळापळ
*****************
आधी गुतू नये नी मग कुथू नये
*****************
दक्षे दक्षे !! कुठुन शोधुन
दक्षे दक्षे !! कुठुन शोधुन आणतेस एवढ्या इरसाल म्हणी !
दक्षिणा , च्यायला हसुन हसुन
दक्षिणा , च्यायला हसुन हसुन वाट लागली माझी .
तोंड करी बाता अन ढुंगण खाई लाथा.
जर म्हणीच ऑस्कर अस्तं तर ते तुलाच मिळालं असतं
दक्षे - काय म्हणी आहेत - एकसे
दक्षे - काय म्हणी आहेत - एकसे एक.
>>दिवसभर इन्जि आणि रात्री दाढी पिन्जि
जुन्या काळच्या लोकांना इन्जी म्हणजे इन्झमाम-उल-हक कसा काय माहिती होता?
दक्षे अर्थ काय ह्या
दक्षे अर्थ काय ह्या म्हणीचा
दिवसभर इन्जि आणि रात्री दाढी पिन्जि >>>
>>जुन्या काळच्या लोकांना
>>जुन्या काळच्या लोकांना इन्जी म्हणजे इन्झमाम-उल-हक कसा काय माहिती होता? >>
(No subject)
जखम मांडीला मलम शेंडीला.
जखम मांडीला
मलम शेंडीला.
काही दिवसांपुर्वी एका
काही दिवसांपुर्वी एका माबोकराने आम्हाला म्हणींचा संग्रह पाठवला होता,
त्यातल्या काही इथे चिकटवतेय
अगं अगं बायकू तुझं किती ऐकू.
अकलेचे आमीर, सांगितल्या मिरच्या आणली कोथिंबीर.
आपलाच दाम खोटा आणि वाण्याशी तंटा.
काम करायला आली, पण खायला मी नी माझी बाळी.
कोंबडीशिवाय ऊरूस नाही, भानगडीशिवाय पुरूष नाही.
कुल्ले धुवुन कढी, उरलेल्याची वडी.
कनवटीला नाही पैसा, लोका म्हणे या बैसा.
खावे-प्यावे-ल्यावे, हिशोब विठ्ठलाच्या नावे.
घरच्या देवा शेण-गोळे, बाहेरच्या देवा गंध-टिळे.
ज्याला लागली हागाला, तो न भी वाघाला.
तीन दिवस पाव्हणा, चौथ्या दिवशी रावणा.
तोंड नाही तोबरा, पोट नाही नगारा.
तरूणपणी आलं झुलं, म्हातारपणी शेंडीला फुलं.
दादला झाला गोसावी, पोरं कुणी पोसावी.
अजून. नमस्कार फुकाचा,
अजून.
नमस्कार फुकाचा, आशिर्वाद लाखाचा.
नवरा जातो नवरीसाठी, वर्हाड जाते खायासाठी.
नखरेल मैना, गावाची दैना.
बामणाचं काम, आन सा मैनं थांब.
भित्री भागुबाई, चुलिपाशी हागुबाई.
लावलं बोट आन आलं पोट.
वर वर माया, उपाशी नीज बया.
वेड्यांचा बाजार, मुर्खांचा शेजार.
वास देवाला, घास गुरवाला.
वरच्यास हात, खालच्यास लाथ.
शहाण्याचा होऊ नये धनी, मुर्खाचा होऊ नये चाकर.
सासु मेली उन्हाळ्यात, सून रडते पावसाळ्यात.
स्मशानात गेलं सरपण, हाती घेतलं दर्पण.
सांगोसांगी, वडाला वांगी.
हातात नाही चवली, लग्न करायला धावली.
हातावर साखर, गळ्यावर कातर.
Pages