Submitted by माणूस on 14 January, 2009 - 19:44
म्हणी साठीचे पान...
हमारे लिये काला अक्षर भैस बराबर है, इसलीय हमारे काले अक्षर मे चुका रहीगे तो कानपर्दा कर लो
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खोडसाळ माझं नाव अन् रस्त्यानं
खोडील माझं नाव अन् रस्त्यानं कसं जाव.
हुरळली मेंढी अन् लागली
हुरळली मेंढी अन् लागली लांडग्याच्या मागे.
मला म्हणीबद्दल नाही, तर एका
मला म्हणीबद्दल नाही, तर एका वाक्याबद्दल माहिती हवी आहे. परंतु केवळ त्यासाठी वेगळा धागा न काढता येथेच विचारतो आहे.
'अन्याय करणाऱ्याप्रमाणेच अन्याय सहन करणाराही तितकाच दोषी असतो'
हे वाक्य कोणी म्हटले आहे?
उठ रं चिंधा नि तेव्हढाच धंदा!
उठ रं चिंधा नि तेव्हढाच धंदा!
https://koshtee.com/2019/03
सासूबाईंचे टोमणे +म्हणी
https://koshtee.com/2019/03/1211/
मी बाई संगतीन अन् माझ्या
मी बाई संगतीन अन् माझ्या मागं दोनतीन..
खाली मुंडी पाताळधुंडी..
त्याचा बा त्योच..
उठा, रेटा, गांडीला गोटा :
उठा, रेटा, गांडीला गोटा : गावभर रिकामे उपदव्याप करत फिरणे.
खाई त्याला खवखवे,आंधळं दळतं
खाई त्याला खवखवे,आंधळं दळतं कुत्र पिठ खातं,नाचता येईना अंगण वाकडे.
ह्या धाग्यावरच्या म्हणी हल्ली
ह्या धाग्यावरच्या म्हणी हल्ली कलर्स मराठी च्या राज राणीची गं जोडी ह्या सिरीयल मध्ये ऐकल्या, येगं ये गं साळू आपण दोघी लोळू
पेरलं वेडं उगवलं खुळं
दक्षिणाने ४ थ्या पानावर दिल्या आहेत
एका म्हणीबाबत विचारायचं होतं
एका म्हणीबाबत विचारायचं होतं.
उसपोटी कापूस ही म्हण.
गुणवंतांच्या पोटी दुर्गुणी संतती असा अर्थ आहे. अर्थात अशी घटना आपल्या आजूबाजूला आढळते. पण कापूस दुर्गुणी का? किंवा उसापुढे तो नगण्य असंही नाही ना होऊ शकत. कुणाला माहीत असेल तर सांगा.
बाजारात तुरी आणि भट भटणीला
बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी
याच अर्थाची गुजराथी म्हण -
छांछ छागोळे भैस भागोळे , घरमा धमाधम
- म्हैस तर अजुन बाजारातून विकत आणायची आहे, पण घरात लोणी-ताक कोण करणार यावरुन भांडाभांडी लागली आहे.
उसपोटी कापूस <<< लहानपणी उस
उसपोटी कापूस <<< लहानपणी उस तोडून खाताना काही वेळा कापूस असल्यासारखा भाग निघायचा, ज्यात अर्थातच साखर्/गोडवा नसायचा.
अपेक्षित आहे गोडवा, निघाला कापूस.. असा अर्थ असावा..
उसपोटी कापूस : खुलासा
उसपोटी कापूस : खुलासा
खालील संदर्भानुसार या म्हणीत ‘कापूस’ नसून ‘काऊस’ आहे !
* उसापोटीं काऊस = सूर्यापोटीं शनैश्वर.
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%8A%E0%A4%B8
काऊस
पु. १ (व.) उंसाच्या शेंड्याचा नीरस भाग; वाढें. २ (ल.) कुचकामाचा माणूस. म्ह॰ उंसाच्या पोटीं काऊस जन्मला = हिर्याच्या पोटीं गारगोटी. [सं. कु + इक्षु]
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8
धन्यवाद परदेसाई, असच काहीसं
धन्यवाद परदेसाई, असच काहीसं वाटलेलं गोड नाही , खाता येत नाही म्हणून की काय पण डॉ कुमार1 यांनी व्यवस्थित स्पष्टीकरणासह लिहिले आहे.
खूप खूप धन्यवाद डॉ कुमार1.
Pages