मराठी म्हणी

Submitted by माणूस on 14 January, 2009 - 19:44

म्हणी साठीचे पान...

हमारे लिये काला अक्षर भैस बराबर है, इसलीय हमारे काले अक्षर मे चुका रहीगे तो कानपर्दा कर लो

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही अलिकडच्या म्हणी

१. कॅशियरचा खिसा रिकामा
२. एकादशीच्या घरी अमावस्या पाहुणी
३. खात्यात नाही तर एटीएममधे कुठून येणार ?

माझी आजी खालील म्हणी खूप वेळा वापरायची

बोच्यात नाही गु आणि हगाक चल्ला जुहू

मी किंवा माझ्या भावाने खाण्यात टंगळ मंगळ केली की आम्हाला ऐकवल जायचं
कोंडो मांडो खाय त्याचो दांडो उबो रहाय, नाकुतनिवाला खाय त्याचा आत भूक्ना जाय

अजून एक ग्राम्य म्हण आठवते: मुकी झवली, हाक ना बोंब

हे वाचलच न्हवतं.

आता थांबा मी पण खास म्हणी लिहिते. हो कोणाचा सेल्फ रीस्पेक्ट जात असेल तर काय करणार बापुडे. त्या खास भाषेतील गावच्या म्हणी आहेत हो... Wink

गां** नाही दम आणि नाव मुकादम,
शिंक्याचे तुटले अन बोक्याचं फावलं
पळसाला पानं तीन(ह्याचाही अर्थ विसरले) -म्हणणारी व्यक्ती आजी
झा** नाही पत आणि नाव गणपत
आला वारा , गेला वारा तो कुणाचा सोयरा गोयरा
खायला काळ आणि भुईला भार
कुल्यावर तीळ आनि उगा मिशिला पीळ
नाव सोनाबाई, हाती कथलाचा वाळा( मला नीट आठवत नाहीये)
रिकामा न्हावी भिंतीला तुंबडया लावी
माय मरो मावशी जगो
हाती लागला बैल आणि दूध म्हणे येइना (मला नीट आठवत नाही)
लागल्या मघा, चुलीमागे जावून हगा
मिळता मिळेना धगड, लय झाला डोइजड

.........आठवेल तश्या लिहिते

कोंडो मांडो खाय त्याचो दांडो उबो रहाय, नाकुतनिवाला खाय त्याचा आत भूक्ना जाय >> या म्हणीचा अर्थ लागला नाही. भाषाच मूळात ओळखिची वाटली नाही.

नेसीन तर पैठणी, नाहीतर नागवी बसीन. (खाईन तर तुपाशी.. टाईप्स.!)
भं पादे भयं नास्ति, पिच-पिच पादे प्राणस्य घातं...!

मजा आली सगळ्या म्हणी वाचून. दक्षिणाचा संग्रह अफाट आहे! माझ्याकडून थोडी भर.

आबय सांगे सुबयला आणि आपण जाई जीव द्यायला (अर्थ - लोकां सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण)

चित नाही थारी आणि बो* कीर्तन करी (अर्थ - एखाद्या कामात नीट लक्ष नसणे)

'आठ्ठाकांय नवा सुंका' अशी काही म्हण चित्पावनीत असल्याचं कुणाला माहीत आहे का? असल्यास तिचा अर्थ काय?

अंधारात केला पण उजेडात इला
अडाणी बायलेशी पडली गाठ, म्हणता ऊठ मेल्या चटणी वाट
अमवासेचो जल्म, आणि तसलाच कर्म
अरदो मिरग सारण गेलो आणि म्हारणीच्या झिलान उतव बांदलो

खरं तर मालवणी म्हणींचा सगळा संग्रह आहे माझ्याकडे.. Happy

गाढ्वापुढे वाचली गीता, कालचा गोन्धळ बरा होता......
गाढ्वाला गुळाची चव काय.........
दिवस गेला रेटारेटी , चान्द्ण्यारात्री कापूस काती
सुसरबाई तुझी पाठ मऊ
घोड खाई भाड आणि जीन खान्द्यावर

'घर पाहवं बांधून आणि लग्न पहावं करुन' ह्या म्हणीत, 'लग्न पहावं करुन' ह्याचा नक्की काय अर्थ आहे? शादी के लड्डु सारखा कि अजुन काही?

अरदो मिरग सारण गेलो आणि म्हारणीच्या झिलान उतव बांदलो >> याचा विस्तार करून सांगाल का जरा?
नीट अर्थ कळला नाही. बहुतेक बैल गेला आणि झोपा केलाच्या चालिवर असावी असं वाटतय

मिरग - मृग नक्षत्र ... ते पाऊस घेऊन येते....
त्यावेळी लोक काकडी, पडवळ इत्यादी भाज्या लावतात आणि त्यासाठी एक माटव (मांडव) तयार करतात.. (ह्या फळभाज्या जमिनीवर राहिल्या तर कु़जतात, म्हणून अधांतरी लटकत असतात).

सारण = सरान = संपून
म्हारणी = महारीण (जातीवाचक शब्द)..

अर्थ बरोबर आहे..

एक हिंदी म्हण आहे : अकल बडी की भैंस.

यामध्ये ' म्ह्शी' चा संदर्भ काय ? तसेच अशा अर्थाची मराठी म्हण कोणती?
यासारखी इंग्लीश म्हण आहे : An ounce of common sense is worth a pound of theory.

"खाण तशी माती" ही म्हण वाईट अर्थाने वापरतात की चांगल्या सुद्धा?
.... 'जशी आई तसे तिचे मूल ' हे मला दोन्ही अर्थांनी म्हणायचे असेल तर ही म्हण वापरावी का ?

कुमारकाका,
आपण बहुतेकदा अर्धवट म्हणी वापरतो.
सुमती क्षेत्रमाडेंचं एक पुस्तक आहे, 'एक होता राजा' त्यात म्हणींच्या गोष्टि आहेत दिलेल्या. कधी मिळालं तर चाळून पहा.

असो.

तर म्हण आहे, "खाण तशी माती, अन कुंभार तशी लोटी"

शब्दशः बोलायचं, तर जेनेटिक, अन एन्विरॉन्मेण्टल फॅक्टर्स दोन्ही यात घेतले गेलेले आहेत. खाणीतली माती, हा जेनेटिक संदर्भ. अन कुंभार हा घडवणारा.

म्हणी व वाक्प्रचार, is inculcation of hundreds of years of human experience and knowledge. फार छोट्या शब्दांत मोठा अर्थ असतो.

तर, बाकी फाफटपसारा जौद्या, तुमच्या प्रश्नाचे उत्तर = हो.

मी अनेकदा ही म्हण मुलगा/मुलगी बाप्/आईसारखी हुशार आहेत असे साम्गायला वापरतो, तसेच मायनर हेरिडिटरी प्रॉब्लेम्स डिस्क्राईब करायलाही.

ता.क.
मेडिकली बोलताना नुसतं खाण तशी माती बोलायचं नाही, पूर्ण म्हण सांगायची असं शिकलो आहे. "ती" खाण. "तो" कुंभार. नुसतं खाण तशी माती म्हटलं तर नवी सून धारेवर धरली गेल्याचे उदाहरण पाहिले आहे, समजवून साम्गता नाकी नऊ आले होते. डॉक्टरचे नुसते शब्द नाहीत, तर शब्दांचा टोन अन चेहर्‍यावरचे भावही लोक फार सिरियसली घेतात, हे फार कष्टाने शिकलोय..

खरंतर 'बाप तसा बेटा, कुंभार तसा लोटा" अशी पुर्ण म्हण वापरतात.
आणि "खाण तशी माती, जाती तशी पोती" अशी...

बरं झालं हा धागा वर आला ते. अगदी परवाच मैत्रिणीकडे जेवायला गेले होते, तिची धाकटी बहिण आहार व्यवस्थित असूनही अत्यंत बारिक आहे. जेवताना स्वतःला उद्देशून म्हणाली माझं "खाणं बोकडाचं आणि अंग लाकडाचं " आहे.

.. जाती तशी पोती" अशी...
<<
हे व्हेरिएशन आधी ऐकले नाही.
याचा अर्थ काय याबद्दल माहिती असल्यास कृपया देणे @ दक्षिणा.

सुमती क्षेत्रमाडेंचं एक पुस्तक आहे, 'एक होता राजा'
<<
my bad. सरोजिनी बाबर.
मागे मीच दिलेला रेफरन्स आहे. तो धागा दक्षिणाने वर आणल्यावर लक्षात आलं.

Pages