मराठी म्हणी

Submitted by माणूस on 14 January, 2009 - 19:44

म्हणी साठीचे पान...

हमारे लिये काला अक्षर भैस बराबर है, इसलीय हमारे काले अक्षर मे चुका रहीगे तो कानपर्दा कर लो

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण बर्‍याच म्हणी अनैतिक आहेत ना ! Proud

ऐंशी तिथे पंच्याऐंशी, कर गं xx पुरणाची पोळी

हे ही ऐकलेले आहे. खरी म्हण आहे का नाही माहीत नाही.

दक्षिणा, तुझा म्हणी संग्रह अ..फा..ट आहे ! Lol
(मला माझ्या आज्जीची आठवण आली! Happy )

आजा मेला नातू झाला, घरची माणसं बरोबर
असं कधी घडे अन सासूले जावई रडे
दिवस गेला ईथंतिथं अन रात्र झाली निजु कुठं?
मले पहा अन फुलं वहा
आवसभाऊचा मावसभाऊ अन चाल कुत्र्या खीर खाऊ
मुठभर घुगर्‍या अन सारी रात मचंमचं
छटाकभर नाही माप अन रात्री येई हिवताप
.............................................................................
किती पायी लागू तुझ्या
किती आठवू गा तुते
किती शब्द बनवू गा
अब्द अब्द मनी येते (मर्ढेकर)

>>दिवस गेला ईथंतिथं अन रात्र झाली निजु कुठं? << उमेश Rofl
दिवस गेला रेटारेटी चांदण्या रात्री कापूस वेचीची आठवण झाली.

अफाट म्हणी आहेत सगळ्यांच्याच, विशेषत: दक्षिणा.. Happy
माझे पण चाराणे.. Happy
खाई त्याला खवखवे
हातच्या कंकणाला आरसा कशाला
दोन्ही घरचा पाहुणा उपाशी
खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी
कोल्हा काकडीला राजी
तळे राखील तो पाणी चाखील
तेल गेलं, तूप गेलं हाती धुपाटणं आलं
उंच वाढला एरंड, तरी का होई इक्षुदंड
काखेत कळसा अन गावाला वळसा
मी हसे लोकाला न शेंबूड माझ्या नाकाला
नकटीच्या लग्नाला सतराशेसाठ विघ्ने
अती तिथं माती
सरड्याची धाव कुंपणापर्यंत
सटवाईला नव्हता नवरा, अन म्हसोबाला बायको
ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी..

बर्‍याच म्हणी नव्या कळल्या. दक्षिणा Lol
srk - ओळखीचा चोर जिवे न सोडी असतं ना?>> असेल गं नीट आठवत नाही. अर्थ बदलला नाही तोवर चालावं.

असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी.
अडला हरी/नारायण, गाढवाचे पाय धरी.
आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी.
डोळ्यात केस, कानात फुंकर.
येरे माझ्या मागल्या.
वासरांत लंगडी गाय शहाणी.
एक ना धड, भाराभर चिंध्या.
कशात काय, फाटक्यात पाय.
खाण तशी माती.
आडात नाही तर पोहोर्‍यात कुठुन.
लेकी बोले, सुने लागे.
खायला काळ, भुईला भार.
दुरुन डोंगर साजरे.
आवा निघाली पंढरपुरा, वेशीपासुन आली माघारा.

येये ना मये अन घमीलं घिवुन पये. सोर्सः- मैत्रिणीची आजी.

सगळ्या म्हणी जोरदार!
दक्षिणेच्या लय भारी.. खास कोल्हापुरी स्टॉक दिसतोय Happy

साप म्हणू नये मापला, अन नवरा म्हणू नये आपला
घेणं ना देणं, अन फुक्कटचं कंदील लावण( वर्‍हाड निघालय मधून)
जवाई आमचे साधे भोये पन साळीवर त्याईचे डोये
रातभर पाखडलं अन काही नाही सापडलं
निकसू निकसू खाये, त्याच्या घाटीत कचरं जाये

.............................................................................
किती पायी लागू तुझ्या
किती आठवू गा तुते
किती शब्द बनवू गा
अब्द अब्द मनी येते (मर्ढेकर)

आव बे लड्डू, जाव बे लड्डू
दोन्ही घरचा पाव्हणा उपाशी

.............................................................................
किती पायी लागू तुझ्या
किती आठवू गा तुते
किती शब्द बनवू गा
अब्द अब्द मनी येते (मर्ढेकर)

अठरा विश्व दारिद्र्य त्याला छ्त्तीस कोटी उपाय.

आधीच कामाचा कंटाळा त्यात माहेरचा सांगावा.
मी आले नांदायला, मडकं नाही रांधायला
कशात ना मशात, माकड तमाशात.
खायला फुटाणे आन टांग्याला आठाणे
चव ना ढव म्हणे खंडाळ्या पोटभर जेव.
झाडाजवळ छाया, बुवाजवळ बाया
तुळशी तुळशी, तिला पाणी कळशी कळशी, पण वेळ मिळेल त्या दिवशी
धाक ना दरारा फुटका नगारा
भाकरी पहावी काठात आणि मुलगी पहावी ओठात.
पेरलं येडं, उगवलं खुळं
ये गं साळू आपण दोघी लोळू.
रुखवत आले म्हणून दणाणली आळी, पाहीलं तर नुसती अर्धीच पोळी
लढाईमे बढाई आणि खजिनेमे गवर्‍या

ये गं साळू आपण दोघी लोळू. >>>>> Lol

दक्स निस्ती सुटली आहेस !! मस्त कलेक्शन आहे तुझे .मजा आली Happy

दक्षिणा, मान गये उस्ताद!!
--------------
नंदिनी
--------------

दक्षिणे.. Lol अफाट संग्रह!

दक्षिणे,
तू आता म्हणींचा कोश लिहायला घे. Happy

खालिल म्हणींसाठी (आगाऊ) माफी मागते.

ढुंगणाखाली आरी अन चांभार पोरं मारी.
अंगाला सुटली खाज हाताले नाही लाज.
उघड्याकडं नागडं केलं रात्रभर कुडकुडुन मेलं.
मातीचे कुल्ले वाळले की पडायचेच.
खायची बोंब अन हXयचा तरफडा.

दक्षिणा..नाद्खुळा....
एकदम
टांगा पलटी...अन घोड फरार Proud

ही एका मराठी सिनेमातली म्हण आहे. अभिनेत्री रंजना याच्या तोण्ड्ची...मला फ़ार आवडते ही ओळ
"असेल तेव्हा भसा भसा .. नाहीतर रडत बसा... "
प्रणती

ही म्हण आज्जीच्या तोंडुन ऐकली होती अजोबांना उद्देशुन (ते पाहुण्यांच्या समारंभात तिला घाई करत होते!)

तुमचं काय हो मधीच " राजाचं काराण आन कुत्र झालं हैराण "

आजोबा Uhoh

एक अजुन "दिवस गेला इट्टी मिट्टी अर्ध्या रात्री तांदुळ कुटी"

दक्षिणा माफी कसली? आम्हाला तूफान हसवल्याबद्दल? Happy जबरी आहेत या म्हणी.

बहीण नेहेमी जेवताना कुरकुर करायची हेच नको तेच नको.
तेव्हा बाबा नेहेमी म्हणायचे.
"ती नाही घरी अन गमजा करी. "

मी लहान असताना नको त्या उचापती करत असतेवेळी आई मला नेहमी म्हणायची...
"काम नाही घरी, अन सांडुन भरी." (धान्य वगैरे) Happy

"काम नाही घरी, अन सांडुन भरी.">>>
ह्याच अर्थाची अजून एक म्हण
काय काम करू लुगडं फाडू दंड भरू ( म्हणजे साडीचे दोन तुकडे करायचे आणि पुन्हा एकमेकांना जोडायचे)

गाढवाचं नाव गोपाळशेठ Happy
(गागो करणे- गाढवाला गोपाळशेठ म्हणून कार्यसिद्धी करून घेणे)
घरमे नाही दाना ह्याला हवालदार म्हणा Lol

Pages