Submitted by पराग on 15 January, 2010 - 22:15
जिंकून जिंकून जिंकणार कोण ?
ऑस्ट्रेलियन ओपन टेनीस स्पर्धा येत्या सोमवारी म्हणजे १८ तारखेला सुरु होत्ये. हा लेखनाचा धागा ह्या स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी. (टेनीस बद्दलची इतर चर्चा टेनीसच्या पानावर करता येईल.)
जस्टीनी हेनीनचे ह्या स्पर्धेद्वारे पुनरागमन होत असल्याने तिच्या खेळाकडे सगळ्यांचे लक्ष असेल. तसेल नदाल, फेडरर, नोल, विल्यम्स भगिनी, मरे, शारापोवा, डेल-पोर्टो, क्लाइज्टर्स, यांकोविच, आयवानोविच, आपल्या बाई, पेस, भुपती अश्या नेहमीच्या यशस्वी खेळाडूंच्या कामगिरीवरही सगळ्यांचे लक्ष असेलच.
तेव्हा टेनीसप्रेमींनो सुरु व्हा..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फेडरर जिंकावा अशी फार फार
फेडरर जिंकावा अशी फार फार इच्छा आहे पण सध्याचा त्याचा फॉर्म पहाता शक्यता कमी दिसतेय.. खूप चुका केल्या आहेत खेळताना त्याने ऑस्ट्रेलियन आधीच्या दोन स्पर्धांमध्ये..
नदाललाच जास्त संधी आहे पुन्हा जिंकण्याची... त्याचा जुना फॉर्मही परत येताना दिसतोय..
>>नदाललाच जास्त संधी आहे
>>नदाललाच जास्त संधी आहे पुन्हा जिंकण्याची... <<
जर तो संपुर्ण टुर्नामेंट फिट राहीला तर; गुढघे दुखी त्याची डोकेदुखी ठरु शकेल...
नादालने डोकेदुखीच्या गोळ्या
नादालने डोकेदुखीच्या गोळ्या घेतल्या तर गुढगे दुखायचे थांबतील
पग्या, धन्यवाद धागा सुरु केल्याबद्दल.
ड्रीम फायन्ल्स: किम वि जस्टिन आणि फेडी वि नादाल
गो फेडी !!! गो जस्टिन !!!
यस... परवापासून
यस... परवापासून सुरूवात!!
वादविवाद आणि भांडणाला तयार रहा मंडळी!
रस्त्याच्या कडेने, त्या पोट्रोचे काय झाले? तो नाहीये का विजेत्यांच्या रेसमध्ये?
रस्त्याच्या कडेने, त्या
रस्त्याच्या कडेने, त्या पोट्रोचे काय झाले? तो नाहीये का विजेत्यांच्या रेसमध्ये?...>>> तुच सांग बघु
वादविवाद आणि भांडणाला तयार रहा मंडळी! ....>> तू डेल पोट्रो म्हणालास की मी तयारच आहे इथे भांडायला
सिंडे... ड्रीम फिक्स्चर्स
सिंडे...
ड्रीम फिक्स्चर्स साठी २१ मोदक...
फक्त गो जस्टिन ऐवजी गो किम पाहिजे...
किम वि जस्टिन अशी फायनल होणं
किम वि जस्टिन अशी फायनल होणं शक्य नहिये.. कारण ड्रॉ प्रमाणे त्या एकाच गटात आहेत..
http://www.australianopen.com/en_AU/scores/draws/ws/r1s3.html
आणि त्यामुळे त्यांची गाठ क्वार्टर फायनललाच पडेल.. आणि हो अंक्या त्यात "गो किम" म्हणजे किम बाहेर जाईल आणि जस्टीन पुढे स्पर्धा जिंकेल..
ओह मी ड्रॉ बघितलेच नाहीत. असो
ओह मी ड्रॉ बघितलेच नाहीत. असो त्या दोघी समोरासमोर आल्याशी मतलब
त्या दोघी समोरासमोर आल्याशी
त्या दोघी समोरासमोर आल्याशी मतलब
>>
आणि किम कडून जस्टिन हरल्याशी
शॅरापोव्हा हरली. तिने
शॅरापोव्हा हरली. तिने बॅकहँडवर खूप चूका केल्या.. पहिल्या सेटचा टाउ ब्रेकर हातातून घालवणं ही मोठी चूक होती.. जी शेवटी तिला महाग पडली...
मॅच भारी झाली एकदम.. !!!! दुसर्या सेटच्या उत्तरार्धापासून खूप चुरशीची झाली..
आपल्या बाई म्हणजे कोण? सानिया
आपल्या बाई म्हणजे कोण? सानिया मिर्झा का?
शॅरापोव्हाने कमीत दहा तरी
शॅरापोव्हाने कमीत दहा तरी सेर्विस चुका केल्या....
आपल्या बाई (सानिया मिर्झा) फारतर फार एक राउन्ड पार करतील..
अहो आपल्या बाई आता लग्न करून
अहो आपल्या बाई आता लग्न करून संसारी होणार आहेत. लग्न झाल्यावर आपण आपले टेनिस वगैरे सगळे लाड बंद करणार आहोत असे परवाच त्यांनी सांगितले.
त्यामुळे त्या पहिलीच राऊंड हरलेल्या आहेत.
वा वा! कुठे चाल्लेय हे
वा वा! कुठे चाल्लेय हे सगळे!
काल १०-१२ जणांचे एक टोळके पोलीसांनी पकडले. मॅच मध्ये रंगत आणत होते!
सँटी.. ठिके ना.. तसही काही
सँटी.. ठिके ना.. तसही काही विषेश करत नव्हत्याच त्या..
कालची डेल पोट्रोची मॅच पण चांगली झाली. ४ सेटर... पाहिला सेट बघितला.
सेरेनाची आत्ता चालू आहे.. काही काही रॅलीज चांगल्या रंगतायत... सेरेनाच्या पायाला काही झालय का काय माहित...
फेडररने पहिला सेट गमावला..
फेडररने पहिला सेट गमावला.. !!!
दुसरा आणि तिसरा सेट जिंकला
दुसरा आणि तिसरा सेट जिंकला फेडी...
चौथ सेट ६-० ने जिंकुन फेडीचा दुसर्या फेरीत प्रवेश...
आयला,तो बिगरमानांकित स्पॅनिश सोडर्लिंगला चांगलीच टफ देतोय.. पहिले दोन्ही सेट हरूनदेखील पुढचे दोन्ही सेट जिंकलाय.. आणि पाचव्या सेटमध्ये २-० ने पुढे आहे..
फेडरर जिंकला ! त्याचा रनिंग
फेडरर जिंकला ! त्याचा रनिंग फोरहँड कसला सही होता !
नंद्या,मी हापिसात बसुन नेटवर
नंद्या,मी हापिसात बसुन नेटवर फक्त स्कोअर पाहु शकतोय रे ..
सोडर्लिंग बाहेर...
सोडर्लिंग बाहेर...
चौथ सेट ६-० ने जिंकुन >>>>>
चौथ सेट ६-० ने जिंकुन >>>>> सह्ही!!
मॅचेस बघताय का कोणी
मॅचेस बघताय का कोणी ?
वोझनियाकी मस्त जिंकली... पासेस चांगले मारले.. कुझनेत्सोवा पण मस्त जिंकली.. दुसरा सेट तर अगदीच किरकोळीत.. किम ची आत्ता चालू आहे.. सुरुवात दणदणीत केली पण नंतर ती तानासुगार्न बरी खेळायला लागली.. पहिला सेट किम ने घेतला.. पण माझ्या अपेक्षेपेक्षा जरा जास्त वेळ चालला तो..
तिकडे रॉडिक आणि कोणतरी नविन बच्चा आहे... आत्तापर्यंत दोघांनीही सर्व्हिसेस राखल्यात...
आज चांगल्या मॅचेस आहेत.. किम नंतर रॉड लिव्हर अरेना वर नदाल आणि संध्याकाळी हेनीन... !!! आणि रॉडिक नंतर सॅफिना आणि मग डेल पोट्रो.. !
नदाल जिंकला पण.. आता हेनिन
नदाल जिंकला पण..
आता हेनिन आणि डिमेंटीयेवा मॅच चालू आहे... आणि डेल पोर्टो - ब्लेक ही मॅच चालू आहे. आणि मरेची पण मॅच चालू आहे...
डेल पोर्टो - ब्लेक मॅच जबरी
डेल पोर्टो - ब्लेक मॅच जबरी झाली दिसतेय्..अखेर डेलपोट्रो ६-४,६-७,५-७,६-३,१०-८ असा जिंकला..
हेनिन आणि डिमेंटीयेवा मॅच पण चांगली चालु आहे.. हेनीनने ७-५.७-६ अशी बाजी मारली
परवाची हेनिन आणि डिमेंटीवा ची
परवाची हेनिन आणि डिमेंटीवा ची मॅच काल पाहिली.. जबरी झाली एकदम.. हेनिन एकदम पूर्वीच्या फॉर्मने खेळली.. मला एकदम तिची आणि सेरेनाची २००३ मधली फ्रेंच सेमी फायनल आठवली.
कालची इव्हानोविकची मॅच पण चांगली झाली.. तिने शेवटपर्यंत बरीच फाईट मारली पण नो युज...
पहिला सेट घालवल्यानंतर नोव्हाक मस्त खेळून जिंकला..
आज पण चांगल्या मॅचेस आहेत...
फेडी दुसर्या फेरीतील मॅच सहज
फेडी दुसर्या फेरीतील मॅच सहज जिंकला तीने सेट्मध्ये....
अरे,किम हरली की सहज
अरे,किम हरली की सहज पेट्रोवाकडुन ६-०,६-१... हेनिन ३ सेटमध्ये जिंकली मॅच..
किम हरली का ?????? अरेरे.. ती
किम हरली का ??????
अरेरे.. ती मॅच काल लेट नाईट होती सो नाही पाहिली..
हेनीन आणि रॉडीकच्या मॅचेस मस्त झाल्या एकदम..
कोण रे तिला "गो" म्हंणे ?
कोण रे तिला "गो" म्हंणे ?
फेडी चौथ्या फेरीत पोहोचला..
फेडी चौथ्या फेरीत पोहोचला.. आता हेविट किंवा बगदातीस यांच्यात जिंकणार्याशी लढत..
Pages