टेनिस (रिओ ऑलिंपिक)
रिओ ऑलिंपिक्समधल्या टेनीसच्या सामन्यांबद्दल चर्चा करण्यासाठी... ... .. ...
रिओ ऑलिंपिक्समधल्या टेनीसच्या सामन्यांबद्दल चर्चा करण्यासाठी... ... .. ...
ह्या वर्षीचीविंबल्डन टेनीस स्पर्धा येत्या सोमवार पासून म्हणजे २१ जून २०१० पासून सुरु होते आहे. स्पर्धेची मानांकनं आज जाहिर झाली. पुरुष एकेरीत गतविजेत्या रॉजर फेडररला अव्वल मानांकन मिळालय, तर महिला टेनीस वर विल्यम्स भगिनींनी निर्विवाद वर्चस्व सिध्द केलय. महिला एकेरी मध्ये सेरेना आणि व्हिनसला अनुक्रमे पहिलं आणि दुसरं तर महिला दुहेरीत ह्या जोडीला पहिलं मानांकन मिळालय.
हा धागा यंदाच्या विंबल्डन टेनीस स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी...
फ्रेंच ओपन टेनीस स्पर्धा पुढच्या सोमवार पासून म्हणजे २४ मे पासून सुरु होत आहे. हा धागा यंदाच्या फ्रेंच टेनीस स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी.
यंदाच्या स्पर्धेवर खेळाडूंच्या दुखापतीचं सावट आहे. आत्तापर्यंत किम क्लायज्टर्स, सानिया मिर्झा, राडावांस्का ह्या माहिला खेळाडूंनी तर निकोलाय डेव्हिडेंको, डेल पोर्टो, जेम्स ब्लेक, टॉमी हास ह्या पुरुष खेळाडूंनी माघार घेतली आहे.
जिंकून जिंकून जिंकणार कोण ?
ऑस्ट्रेलियन ओपन टेनीस स्पर्धा येत्या सोमवारी म्हणजे १८ तारखेला सुरु होत्ये. हा लेखनाचा धागा ह्या स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी. (टेनीस बद्दलची इतर चर्चा टेनीसच्या पानावर करता येईल.)
जस्टीनी हेनीनचे ह्या स्पर्धेद्वारे पुनरागमन होत असल्याने तिच्या खेळाकडे सगळ्यांचे लक्ष असेल. तसेल नदाल, फेडरर, नोल, विल्यम्स भगिनी, मरे, शारापोवा, डेल-पोर्टो, क्लाइज्टर्स, यांकोविच, आयवानोविच, आपल्या बाई, पेस, भुपती अश्या नेहमीच्या यशस्वी खेळाडूंच्या कामगिरीवरही सगळ्यांचे लक्ष असेलच.