स्लॅमाबादप्रमाणे यंदाच्या विंबल्डनबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा.
ज्योकोला तुलनेने सोपा ड्रॉ आहे. अंतिम फेरीपर्यंत त्याची नदाल, फेडरर किंवा मरेशी गाठ पडणार नाही.
नदालला ह्याही स्पर्धेत अवघड ड्रॉ आहे. चौथ्या फेरीत फेरर, उपांत्य पूर्व फेरीत मरे, उपांत्य फेरीत फेडरर तर अंतिम फेरीत ज्योको अश्या लढती तो खेळण्याची शक्यता आहे.
महिलांच्या ड्रॉमध्ये विल्यम्स भगिनी एकाच हाफमध्ये आहे. बाकी सगळं नेहमीप्रमाणे बेभरवशी.
महिला दुहेरीत मार्टीना हिंगीस आणि सानिया मिर्झा ह्यांना अग्रमानांकन आहे. त्यांची कामगिरी कशी होते हे बघण्याची उत्सुकता आहे.
तर मंडळी..........
सालाप्रमाणे पावसाळा आला.. आणि पावसाबरोबर विंबल्डनही आलं..
यंदाची विंबल्डन स्पर्धा सोमवार २३ जून २०१४ पासून सुरु होते आहे..
नेहेमीचे यशस्वी जिंकणार की नवे विजेते येणार, फायनल रविवारीच होणार की सोमवारवर ढकलली जाणार अश्या विषयांबरोबर 'नेहमीच्या यशस्वी विषयांवर' चर्चा करण्यासाठी हा धागा..
यंदा पुरूष एकेरीत ज्योको, नदाल, मरे आणि फेडरर ह्यांना पहिली चार मानांकने तर महिला एकेरीत सेरेना विल्यम्स, ना ली, सिमोना हॅलेप, राडाव्हान्स्का ह्यांना पहिली चार मानांकने मिळाली आहेत.
उंपात्यपूर्व फेरीच्या संभाव्य लढती अश्या:
२०१३ च्या विंबल्डन स्पर्धेबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा. यंदाची १२७वी स्पर्धा.
पुरुष एकेरीत माजी विजेता ज्योको तर महिला एकेरीत गतविजेती सेरेना विल्यम्स ह्यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे.
मानांकित खेळाडू सामने जिंकत गेल्यास उपांत्य फेर्या अश्या होतील.
पुरुष एकेरी :
ज्योको वि बर्डीच
फेरर वि डेल पोट्रो
राफा वि फेडरर
त्सोंगा वि मरे.
दुखापतीने सात महिने बाहेर राहिल्याने नदालला यंदा पाचवे मानांकन मिळाले आहे. त्यामुळे त्याची आणि फेडररची गाठ उपांत्यफेरीतच पडणार आहे.
महिला एकेरी :
सेरेना विल्यम्स वि कर्बर
राडावान्स्का वि ना ली
इर्रानी वि शारापोव्हा
यंदाची विंबल्डन टेनिस स्पर्धा येत्या सोमवार पासून म्हणजे २५ जून पासून सुरु होते आहे. मारिया शारापोव्हा आणि नोव्हाक ज्योकोविक ह्यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे.
जाहिर झालेल्या ड्रॉ नुसार मानांकनाप्रमाणे खेळाडू जिंकत गेल्यास उपांत्यपूर्व फेरीचे सामने असे होतील.
पुरुष एकेरी :
ज्योको वि ---- (बर्डीच पहिल्याच फेरीत हरल्याने कोण येतय ते बघायचं)
फेडरर वि टिपसार्विच
मरे वि फेरर
राफा वि त्सोंगा
उपांत्य फेरी ज्योको वि फेडरर आणि राफा वि मरे अशी व्हायची शक्यता आहे.
महिला एकेरी:
शारापोव्हा वि कर्बर
राडाव्हान्सा वि स्टोसुर
सेरेना वि क्विटोवा
वोझनियाकी वि अझारेंका.
विंबल्डन खुल्या टेनिस स्पर्धेचे यंदाचे १२५ वे वर्ष. यंदा ही स्पर्धा २० जून ते ३ जुलै दरम्यान रंगणार आहे.
आज जाहिर झालेल्या मानांकनानुसार पुरूष एकेरीत नदाल, जोको, फेडरर आणि मरे तर महिला एकेरीत वॉझनियाकी, किम, झ्वोनारेव्हा, ना ली ह्यांना अनुक्रमे पहिले, दुसरे, तिसरे आणि चौथे मानांकन मिळाले आहे. भारताच्या महेश भुपती आणि लिएंडर पेस ह्यांना पुरूष दुहेरीत तिसरे तर रोहन बोपण्णा आणि पाकिस्तानच्या एसान कुरेशी ह्या जोडीला चौथे मानांकन मिळाले आहे.
ह्या वर्षीचीविंबल्डन टेनीस स्पर्धा येत्या सोमवार पासून म्हणजे २१ जून २०१० पासून सुरु होते आहे. स्पर्धेची मानांकनं आज जाहिर झाली. पुरुष एकेरीत गतविजेत्या रॉजर फेडररला अव्वल मानांकन मिळालय, तर महिला टेनीस वर विल्यम्स भगिनींनी निर्विवाद वर्चस्व सिध्द केलय. महिला एकेरी मध्ये सेरेना आणि व्हिनसला अनुक्रमे पहिलं आणि दुसरं तर महिला दुहेरीत ह्या जोडीला पहिलं मानांकन मिळालय.
हा धागा यंदाच्या विंबल्डन टेनीस स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी...