Submitted by Adm on 21 June, 2013 - 13:28
२०१३ च्या विंबल्डन स्पर्धेबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा. यंदाची १२७वी स्पर्धा.
पुरुष एकेरीत माजी विजेता ज्योको तर महिला एकेरीत गतविजेती सेरेना विल्यम्स ह्यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे.
मानांकित खेळाडू सामने जिंकत गेल्यास उपांत्य फेर्या अश्या होतील.
पुरुष एकेरी :
ज्योको वि बर्डीच
फेरर वि डेल पोट्रो
राफा वि फेडरर
त्सोंगा वि मरे.
दुखापतीने सात महिने बाहेर राहिल्याने नदालला यंदा पाचवे मानांकन मिळाले आहे. त्यामुळे त्याची आणि फेडररची गाठ उपांत्यफेरीतच पडणार आहे.
महिला एकेरी :
सेरेना विल्यम्स वि कर्बर
राडावान्स्का वि ना ली
इर्रानी वि शारापोव्हा
क्विटोव्हा वि अझारेंका
ही स्पर्धेची लिंक.. http://www.wimbledon.com/index.html
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा! म्हणजे मरे वि. नादाल
अरे वा!
म्हणजे मरे वि. नादाल / फेडरर आणि ज्योको वि. फेरर असे सेमीज् असतील काय?
चला हारणार आहे हे माहीत असून
चला हारणार आहे हे माहीत असून पण फेडी ला सपोर्ट करण आला पुन्हा. ेकनिष्ठता हा शाप आहे
फेडरर किंवा यावेळेस डेल
फेडरर किंवा यावेळेस डेल पोत्रो.
मरे ला विसरून चालणार नाही.
फेडी व राफा उपांत्यपूर्व
फेडी व राफा उपांत्यपूर्व फेरीतच भेटतील.

)
जोकर / मरे / नदाल यांच्यापैकीच जिंकणार कुणीतरी. फेडी जिंकला तर बुलेटवरून साखर वाटेन
(हत्ती मिळत नाही , परवडत नाही/ बुलेट घ्यायचीय / साखर कारखान्यात आहे
महिला गटात शारापोव्हा/ सेरेना यांच्यातच चुरस असेल.
अझारेंका जखमी होउनसुध्दा
अझारेंका जखमी होउनसुध्दा जिंकली.. मानलं तिच्या जिद्दीला..
म्लादेनोविच नवी सेन्सेशन ठरणार बहुतेक
शारापोव्हाला चांगलंच झुंजवत आहे
राफा हुकलाय..
राफा हुकलाय..
सेरेना विल्यम्स वि
सेरेना विल्यम्स वि शारापोव्हा झाले तर मजा येईल त्या दोघींचे कोर्टाबाहेर जे सध्या काय सुरू आहे त्यावरून
आपल्या आयुष्यात पाहिलेल्या
आपल्या आयुष्यात पाहिलेल्या विंबल्डन चा सर्वात मोठा अपसेट पाहतोय का?
राफा २ -० ने पहिल्याच राऊंड्मध्ये हरतोय!!
नाही हो..तुम्ही स्टेफी
नाही हो..तुम्ही स्टेफी ग्राफला पहिल्या राऊंडमध्ये हरलेलं पाहिलं असेलच की..
मागच्या वेळीही दुसर्या
मागच्या वेळीही दुसर्या राउंडलाच हरला होता ना?
राफा आता उरला फक्त फ्रेंच ओपन पुरता ..
राफा आऊट.... कडक मॅच झाली...
राफा आऊट.... कडक मॅच झाली...
राफाला काय झालं कोण जाणे..
राफाला काय झालं कोण जाणे.. अति चुका... ढिसाळ बॅकहॅंड.. तो आजकाल सिंगल हॅडेड बॅकहँड आणि स्लाइस का मारतो काय माहित.. आज तर फोरहँड पण नेट्मध्ये घातले... बॉलपर्यंत पोहोचताही येत नव्हतं काही वेळा..
त्या दुसर्या मॅनची सर्व्हिस जबरी होती..
बेल्जियमच्या स्टीव डार्सिसची
बेल्जियमच्या स्टीव डार्सिसची आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी विम्बल्डनची दुसरी फेरी गाठणे हीच आहे. पण ती आता विजेतेपदाच्या बरोबरीची असेल त्याच्यासाठी
राफा गेला. फेडीसाठी आनंद
राफा गेला. फेडीसाठी आनंद झालाय पण राफासाठी वाईट वाटतय. तो त्याची दुखापत फक्त फ्रेंच ओपनपुरता मॅनेज करू शकतोय असं दिसतय. फ्रेंच ओपन झाली की ती परत उफाळुन येते. अर्थात आज त्याचा खेळही ढेपाळला होताच.
डार्सिस सही खेळला.तेही सिंगल हँडेड.फक्त तो किती फेर्यांपर्यंत मजल मारतो आता ते पहायचे.
टॉप फोर, अगदी पहिल्याच फेरीत
टॉप फोर, अगदी पहिल्याच फेरीत जाणे अस्वस्थ करते.
अरेच्चा! असं झालं काय... सतत
अरेच्चा! असं झालं काय...
सतत इतकी वर्षं खेळणं, जिंकणं, क्वार्टर्स-सेमिपर्यंत जाणं ही खायची गोष्ट नाही. सगळ्यांना जमत नाही ते!
बघते आता रेकॉर्डिंग..
लोला, फेडीचे चांसेस वाढले.
लोला, फेडीचे चांसेस वाढले.
अमेरिकेत अर्ली राऊंड्स सकाळी
अमेरिकेत अर्ली राऊंड्स सकाळी ७ वाजल्यापासून ते संध्याकाळी ५ पर्यंत ESPN वर.
संध्याकाळी ५ पासून पुढे महत्त्वाच्या मॅचेस पूर्ण रीप्ले - टेनिस चॅनल.
धन्यवाद.
ESPN schedule इथे पहा
कालचा फेडीचा खेळ बघता
कालचा फेडीचा खेळ बघता ह्यावेळेस फेडीच जिंकणार. राफा साफच ढेपाळला होता.
कालचा फेडीचा खेळ बघता
कालचा फेडीचा खेळ बघता ह्यावेळेस फेडीच जिंकणार..>>>आशुतोष,तसं झालं तर सोनेपे सुहागा. पण इतकं सोपं नाहीये रे ते. कालचा त्याचा फॉर्म त्याला सेमी आणि फायनलपर्यंत कायम ठेवावा लागेल. आशा आहे की तो राहील कायम.. :).
कालचा राफाचा पराभव दु:खद
कालचा राफाचा पराभव दु:खद होता. राफाचं फूटवर्क गुड्घ्याच्या दुखापतीमुळे म्हणाव तस होत नव्हतं.त्याने knee bend करून फोरहॅन्ड मारताना तर एक्दा उजव्या हाताने सपोर्ट देताना बघुन मॅच लांबली तरी राफाला कठीण जाणार हे दिसत होत. फूटवर्क नाही त्यामुळे फट्क्यांमधे टाइंमिंग नाही.राफा आणि अंकल टोनी दोघानी हे तीसया सेट मधे अॅक्सेप्ट केल होत.
ग्रास आणि हार्ड कोर्ट चा वेगवाने सरफेस राफाला मानवत नाही बहुतेक त्याला त्याचा इनसाइड आउट फोरहॅन्ड मारायला तेवढा वेळ मि़ळत नाही. त्याच्या दुखावलेल्या दुड्घ्याला त्रास होतो फास्ट कोर्ट वर कवरेज करताना.
राफा दुखापतीमुळे बाहेर होणे हे कोणत्याही टेनीसप्रेमीं साठी दु:खद आहे असे मला वाटते.आर्थात डार्सिचं क्रेडीट कोणी अमन्य करु शकत नाही. त्याने जबरदस्त खेळ केला. राफाला दुखपत होती म्हणून राफाला त्याने आरामात हरवल अस अजीबात नाही. डर्सि बरोबर स्ट्रेटेजी ने खेळत होता. ५३ विनर हे काही सगळे असेच आले नाहीत.
राफा ची खेळण्याची शैली बघीतल्यावर त्याला तज्ञांनी , इतर खेळाडुंनी सल्ला दिला होता की; तुझी शैली फीटनेसला घातक ठरु शकते. शरीरावर अतिरीक्त ताण निर्माण करणारी आहे. त्या वेळी त्याने आणि अंकल टोनीने तो उडवुन लावला होता. या वरुन टॉप गन सिनेमातला एक संवाद आठवतो.
Son your EGO is writing a cheque, your body can't cash!
That's the worst I have seen
That's the worst I have seen Nadal play
So many unforced errors ! Not chasing the impossible balls .
Looks like knee injury is back
Really sad
Wish he recovers soon and is 100% fit for other 2 Majors !
But give credit where it's due , Darcis played match of his life , he deserved it .
यूरो, मस्त पोस्ट.
यूरो, मस्त पोस्ट. शब्दाशब्दाला अनुमोदन.
राफा फ्रेन्च ओपनपुरताच राहू नये अशी तहे दिलसे इच्छा आहे.
तरीही वाईट वाटते आहेच
@ राफा- फार्फार वाईट वाटलं
@ राफा- फार्फार वाईट वाटलं काल. दुखापत अजुनहि नीट झालेली वाटली नाही. लंगडतानाच दिसला. फ्रेंच ओपन तर त्यानी wheel chair वर बसुनसुधा जिंकली असती.
>> फ्रेंच ओपन तर त्यानी wheel
>> फ्रेंच ओपन तर त्यानी wheel chair वर बसुनसुधा जिंकली असती.
व्हॉट नॉन्सेन्स! त्याची आणि जोकोची मॅच आठव जरा!
>> आर्थात डार्सिचं क्रेडीट कोणी अमन्य करु शकत नाही. त्याने जबरदस्त खेळ केला. राफाला दुखपत होती म्हणून राफाला त्याने आरामात हरवल अस अजीबात नाही.
अगदी बरोबर! त्याचे बरेच फटके अप्रतिम होते.
यूरो मस्त पोस्ट. लोला आभार्स
यूरो मस्त पोस्ट.
लोला आभार्स
यूरो, राफा आणि टोनी अंकलना
यूरो, राफा आणि टोनी अंकलना भावना पोचवा बरं का.
इतर खेळाडूंना 'हाय' सांगा.
ज्योको मस्त खेळला काल.. ती
ज्योको मस्त खेळला काल..
ती इर्रानी हरली.. लॉरा रॉबसन म्हणजे नेक्स्ट नवरातिलोव्हा किंवा ग्राफ किंवा व्हिनस अश्या बोंबा ब्रिटीश मिडीया मारणार आता..
वावरिंका हरला ! हेविटला म्हणे ७ डॉक्टरांनी खेळू नको असं सांगितलं होतं पण तो खेळला आणि जिंकला..
>> फ्रेंच ओपन तर त्यानी wheel
>> फ्रेंच ओपन तर त्यानी wheel chair वर बसुनसुधा जिंकली असती.
व्हॉट नॉन्सेन्स! त्याची आणि जोकोची मॅच आठव जरा! >>>
तरीसुद्धा जिंकलीच होती ना! आणि तेव्हापण तो लंगडतच होता. जोकोविचचा गेम एवढा चांगला असुनसुधा तो हरला.
ती इर्रानी हरली.. >>> अरे आणि
ती इर्रानी हरली.. >>> अरे आणि तिला ५वं सीडिंग होतं !! ती टॉप टेन मधे कधी आली कळलंच नाही...
ब्रिटिश मिडियाच्या बोंबा
Pages