तर मंडळी, नवीन वर्षाचा टेनीसचा नवीन सिझन सुरू झालाय आणि त्यातली पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा येत्या सोमवार पासून म्हणजे १३ तारखेपासून सुरु होते आहे.
पुरूष एकेरीत यंदा बेकर वि. एडबर्ग वि. लेंडल (!) असा सामना रंगणार आहे. (राफा के लिये अंकल टोनी काफी हय!)
अग्रमानांकीत नदालला तुलनेले अवघड ड्रॉ आला आहे (म्हणे!). पहिल्या फेरीत बर्नाड टॉमिक, मग तिसर्या फेरीत मॉन्फिल्स, चौथ्या फेरीत केई निशिकोरी, उपांत्य फेरीत डेल पोट्री आणि उपांत्य फेरीत अँडी मरे अशी फौज त्याच्या मार्गात आहे. १८ वी ऑस्ट्रेलियन ओपन खेळणारा ऑस्ट्रेलियन लिटन हेविट पण ह्याच क्वार्टरमध्ये असणार आहे.
यंदाच्या वर्षीची पहिली ग्रँड स्लॅम अर्थात ऑस्ट्रेलियन ओपन येत्या सोमवारपासून म्हणजे १४ जानेवारी पासून सुरु होते आहे. महिला आणि पुरुष एकेरीत अनुक्रमे व्हिक्टोरिया अझारेंका आणि नोव्हाक जोकोविक अग्रमानांकित आहेत. नदाल दुखापतीमुळे ह्याही स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाहीये.
पुरुष एकेरीत जोको, फेडरर आणि मरे ह्यांना विजेतेपदाचे दावेदार मानले जात आहे. द्वितीय मानांकित फेडरर साठी खडतर ड्रॉ आला आहे. फेडररचे डेव्हिडेंको, टॉमिक, रॉनिक, त्सोंगा आणि मरे ह्यांच्याशी सामने होण्याची शक्यता आहे.
यंदाच्या वर्षीची पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा, अर्थात ऑस्ट्रेलियन ओपन, येत्या सोमवार पासून (१६ जानेवारीपासून) सुरू होणार आहे. सर्बियाचा नोव्हाक ज्योकोविक आणि डेन्मार्कची कॅरोलाईन वॉझनियाकी ह्यांना अनुक्रमे पुरूष आणि महिला एकेरीत अग्रमानांकन मिळालं आहे.
ड्रॉ येत्या शुक्रवारी जाहीर होणार आहेत. मानांकन यादी इथे पहाता येईल.
ह्या स्पर्धेसंबंधी चर्चा करण्यासाठी हा धागा.
जिंकून जिंकून जिंकणार कोण ?
ऑस्ट्रेलियन ओपन टेनीस स्पर्धा येत्या सोमवारी म्हणजे १८ तारखेला सुरु होत्ये. हा लेखनाचा धागा ह्या स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी. (टेनीस बद्दलची इतर चर्चा टेनीसच्या पानावर करता येईल.)
जस्टीनी हेनीनचे ह्या स्पर्धेद्वारे पुनरागमन होत असल्याने तिच्या खेळाकडे सगळ्यांचे लक्ष असेल. तसेल नदाल, फेडरर, नोल, विल्यम्स भगिनी, मरे, शारापोवा, डेल-पोर्टो, क्लाइज्टर्स, यांकोविच, आयवानोविच, आपल्या बाई, पेस, भुपती अश्या नेहमीच्या यशस्वी खेळाडूंच्या कामगिरीवरही सगळ्यांचे लक्ष असेलच.