Submitted by Adm on 15 May, 2010 - 17:31
फ्रेंच ओपन टेनीस स्पर्धा पुढच्या सोमवार पासून म्हणजे २४ मे पासून सुरु होत आहे. हा धागा यंदाच्या फ्रेंच टेनीस स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी.
यंदाच्या स्पर्धेवर खेळाडूंच्या दुखापतीचं सावट आहे. आत्तापर्यंत किम क्लायज्टर्स, सानिया मिर्झा, राडावांस्का ह्या माहिला खेळाडूंनी तर निकोलाय डेव्हिडेंको, डेल पोर्टो, जेम्स ब्लेक, टॉमी हास ह्या पुरुष खेळाडूंनी माघार घेतली आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अडम.. बर केलस हा धागा उघडुन..
अडम.. बर केलस हा धागा उघडुन..
सालाबाद्प्रमाणे मे महिना सुरु झाला की मला फ्रेंच ओपनचे वेध लागायला सुरु होतात. सत्तरीच्या दशकात बोर्ग, गुलेर्मो विलास व ख्रिस एव्हर्ट यांचा खेळ बघायला मी खुप आतुर व्हायचो.. मग मीड ८० पासुन ते मिड ९० पर्यंत इव्हान लेंडल-अरांचा सँकेज्-स्टेफि ग्राफ-मॉनिका सेलेस यांच्या मॅचेस खुप आनंद देउन गेल्या व आता या दशकात रॉजर फेडरर्-राफा यांच्यातल्या इथल्या लढतींचे वर्णन.... क्लासिक!... या एकाच शब्दात करता येइल.
गेल्या वर्षी राफाचा फिटनेस वर्षभर त्याला दगा देउन गेल्यामुळे आपण सगळे गेल्या वर्षीच्या फ्रेंच ओपन फायनलमधे फेडरर-राफाच्या रंजक लढतीला मुकलो पण यंदा मात्र राफा क्ले कोर्टवर परत एकदा आपले निर्विवाद वर्चस्व गाजवायला तयार आहे हे त्याचा या वर्षीचा १५-० हा क्ले कोर्टवरचा रेकॉर्ड सांगत आहे. आज माद्रिद ओपनमधे त्याने फेडररला फायनलमधे स्ट्रेट सेटमधे हरवुन.. २०१० फ्रेंच ओपनचे विजेतेपद त्याला हरवल्याशिवाय मिळणार नाही... हे फेडररला व सर्व जगाला त्याने दाखवुन दिले आहे.
त्यामुळे यंदा परत एकदा आपण टेनीसप्रेमींना फेडरर-राफा ही फ्रेंच ओपन ड्रिम फायनल (परत एकदा!) बघायला मिळेल अशी आशा करायला काही हरकत नाही..:)
मला लवकरात लवकर नडाल आणि
मला लवकरात लवकर नडाल आणि जस्टिन एना यांनी ग्रँड स्लॅम जिंकलेलं पाहायचंय. पण किम क्लायस्टर्स ला काय झालं?
अरे वा यंदा स्पर्धा सुरु
अरे वा यंदा स्पर्धा सुरु व्हायच्या आधीच मुकुंदची पोस्ट. स्पर्धा संपेपर्यंत नियमीत येत रहा आता
अॅडमा, धागा सुरु केल्याबद्दल धन्यवाद.
गो फेडी
हो क्ले कोर्टवर नदाल पुन्हा
हो क्ले कोर्टवर नदाल पुन्हा भरात येत आहे.. फ्रेंच ओपनमध्ये तोच यावेळी हॉट फेवरेट असेल.. तरीही आपला पाठिंबा फेडीलाच :)... आणि फेडी नदाल फायनल पहाण्याची तीव्र इच्छा... :)...
>>> फ्रेंच ओपनमध्ये तोच
>>> फ्रेंच ओपनमध्ये तोच यावेळी हॉट फेवरेट असेल.. तरीही आपला पाठिंबा फेडीलाच ... आणि फेडी नदाल फायनल पहाण्याची तीव्र इच्छा... ...
--- एक्झॅक्टली :). फेडरर आणि जस्टिन हेना ह्यांना पाठिंबा!
वा ह्या बाफवरच पहिलं पोस्ट
वा ह्या बाफवरच पहिलं पोस्ट मुकुंदच !!!
आता रेग्युलरली ये मात्र.. नाहितर एकदम फायनलचं वर्णन लिहायला येशील..
परवा CNNI मधे माद्रिदचे हायलाईट्स दाखवले. भारी झाली ती मॅच !
जस्टीनची ही आवडती स्पर्धा.. त्यामुळे पुनरागमनानंतरच पहिलं ग्रँडस्लॅम इथे जिंकलं तर चार चांद लागतील अगदी.
sport.co.uk या वेबसाइटच्या
sport.co.uk या वेबसाइटच्या ब्लॉगवर फ्रेंच ओपन मधील पुरुष स्पर्धकांमधील संभाव्य विजेता कोण ठरू शकतो याचा अंदाज वर्तवण्याचा प्रयत्न केलाय. नदाल, फेडरर, जोकोविक, फेरर, अँडी मरे व नवोदित अर्न्स्ट गल्बिस या खेळाडूंवर लिहीलय. २०१० मधे विविध टेनीस स्पर्धांमधील कामगिरी लक्षात ठेवून हा लेख लिहीलाय.
http://www.sport.co.uk/features/Tennis/1026/French_Open_2010_preview_-_T...
फेडी नदाल फायनल पहाण्याची
फेडी नदाल फायनल पहाण्याची तीव्र इच्छा... ...
>>
आणि त्यात फेडी नी नादालचा धुव्वा उडवताना बघायचंय...
अरे नादालच्या बाजूनी मी एकटाच
अरे नादालच्या बाजूनी मी एकटाच आहे का?
हरकत नाही, मेरे पास राफा है.
नंदनला अनुमोदन. फेडरर आणि
नंदनला अनुमोदन. फेडरर आणि जस्टिन ह्यांना पाठिंबा!
एकंदरीतच नादालचा खेळ(खासकरुन
एकंदरीतच नादालचा खेळ(खासकरुन क्ले कोर्टवर) व त्याची विनम्रता व खिलाडुवृत्ती बघुन नादालचा द्वेष करणे मला तरी जमत नाही -जमणार नाही त्यामुळे फेडरर जिंकला तर एक फेडरर चाहता म्हणुन मलाही आनंद होइल पण त्यापेक्षाही जास्त आनंद फेडी- राफा यांच्यातच फायनल झाली तर होइल. आतापर्यंतच्या त्यांच्या ग्रँड स्लॅम फायनल्सच्या लढतींचा ट्रॅक रेकॉर्ड बघता या फायनलमधेही ते दोघे जण आले तर ही फायनलसुद्धा अविस्मरणिय होइल यात वादच नाही.
बोर्ग्-कॉनर्स्-मॅकेन्रो-लेंडल्-बेकर्-एडबर्ग्-सॅन्प्रास व अॅगॅसि एक काळ आपल्या टेनिसने गाजवुन गेले व टेनिसमधुन निवृत्त झाले पण त्यांच्यातल्या अविस्मरणिय लढती मात्र आपण टेनिसप्रेमींच्या मनात घर करुन गेल्या अहेत. तसेच उद्या फेडरर व राफाही निवृत्त होतील पण त्यांच्यातल्या या जबरी ग्रँड स्लॅम फायनलच्या लढती मात्र आपल्या स्मृतीत कायमच्या कोरल्या जातील.
महिलांमधे माझाही पाठिंबा जस्टिनलाच..
मुकुंद, नदालचा द्वेष असं नाही
मुकुंद, नदालचा द्वेष असं नाही म्हणता येणार. नदाल क्ले कोर्टवर सुरेखच खेळतो. पण फेडररला कणभर जास्त झुकतं माप आहे. बाकी कुणामधेही नदाल आवडेल, पण फेडेररपुढे नाय!
भरत , मीही आहे हो नदाल
भरत ,
मीही आहे हो नदाल फॅन
२००७ ची विम्बल्डन जिन्कल्यावर फेडरर म्हणाला होता की एके दिवशी हा (नदाल ) सगळ (सगळ्या स्पर्धा) जिन्कणार आहे . त्या दिवसाची वाट पाहतोय
मी शाळकरी वयात नव्या नव्या
मी शाळकरी वयात नव्या नव्या टीव्हीवर(दिल्ली अशियाडची कृपा) बोर्ग मॅकेन्रोची फायनल पाहिली होती ती एकाने (बोर्ग?)मॅच पॉईंट वाचवून जिंकली. त्यानंतर गेल्या २ वर्षातल्या बिंबल्डन फायनल्स अविस्मरणीय..राफा-फेडरर २००८ पाहिल्यावर वाटले की यापेक्षा अटीतटीचे काय असेल तर पुढल्या वर्षी फेडरर रॉडिक. फायनलची मॅच एकतर्फी झाली की कसे अळणी वाटते.
मागील वर्षी विंबल्डन अंतिम
मागील वर्षी विंबल्डन अंतिम सामन्यात रॉडिकची दया आली होती, बिचारा दात्-ओठ खाऊन सर्व्ह करीत होता पण यश मिळत नव्हते. त्या दोघांच्या संयमाला दाद देताना आम्ही मात्र कुणी का असेना पण जिंका आणि सामना संपवा अशी प्रार्थना करत होतो, एवढी उत्कंठता निर्माण झाली होती.
यंदा सोमदेव देववर्मन पात्रताफेरीच्या अंतिम , तिसर्या फेरीत, पोचलाय.
एकंदरीतच नादालचा खेळ(खासकरुन
एकंदरीतच नादालचा खेळ(खासकरुन क्ले कोर्टवर) व त्याची विनम्रता व खिलाडुवृत्ती बघुन नादालचा द्वेष करणे मला तरी जमत नाही -जमणार नाही त्यामुळे फेडरर जिंकला तर एक फेडरर चाहता म्हणुन मलाही आनंद होइल पण त्यापेक्षाही जास्त आनंद फेडी- राफा यांच्यातच फायनल झाली तर होइल. >>> सगळ्या पॅराला अनुमोदन
अरे नादालच्या बाजूनी मी एकटाच
अरे नादालच्या बाजूनी मी एकटाच आहे का? >>>> मै.. हू ना.. !
सोमदेव देववर्मनने फ्रेंच
सोमदेव देववर्मनने फ्रेंच ओपनच्या मुख्य स्पर्धेत स्थान मिळवले. १९९७ (लिएंडर ) नंतर पुरुष एकेरीत खेळणारा पहिला भारतीय.
>>सोमदेव देववर्मनने फ्रेंच
>>सोमदेव देववर्मनने फ्रेंच ओपनच्या मुख्य स्पर्धेत स्थान मिळवले. १९९७ (लिएंडर ) नंतर पुरुष एकेरीत खेळणारा पहिला भारतीय.<< सोमदेवला शुभेच्छा, १३ वर्षानंतर, लिएंडर पेसनंतर, क्ले कोर्ट वर पात्र होणारा पहिला भारतीय. आपला सपोर्ट फेडी व सोमदेवला
जस्टीन ला कठीण
जस्टीन ला कठीण ड्रॉ...तिसर्या फेरीत शारापोवा, क्वार्टर मधे सेरेना.
फेडरर -सॉडरलिंग क्वार्टर फायनल गेल्या फायनलची रिपीट
आपला सपोर्ट नादालला. फायनल
आपला सपोर्ट नादालला. फायनल फेडी राफामधेच होणार!!!!
(यंदा घरी असल्याने सर्व मॅचेस बघता येतील.)
सोमदेव चे अभिनंदन... मॅचेस
सोमदेव चे अभिनंदन...
मॅचेस उद्यापासूनच सुरु होणार आहेत.
मानांकनाप्रमाणे खेडाळूंनी आपापले सामने जिंकले तर राऊंड ऑफ 16 चं चित्र असं दिसेल.
फेडरर वि. मॉन्फिल्स , सिलीक वि सॉडरलिंग
अँडी मरे वि बर्डीच , योझनी वि त्सोंगा
रॉडीक वि फेरर , ज्युआन कार्लोस फरेरो वि जोकोविक
वर्डास्को वि गोंझालिझ, ल्युबिसिक वि नदाल.
सेरेना वि बार्टोली , शारापोव्हा वि स्टोसुर
यांकोविक वि विकमेयर ,साफिना वि राडाव्हांस्का
कुझनेत्सोवा वि ना ली, पॅनेट्टा वि वोझनियाकी
डिमेंटिव्हा वि अझारेंका, रेझाई वि व्हिनस
हेनीनला ह्या राऊंड मधे पोचण्यासाठी शारापोव्हा वर विजय मिळवावा लागेल. तसे झाल्यास सेरेना वि हेनीन अशी क्वार्टर फायनल पहायला मिळेल.
पुरुषांमधे माझा पाठिंबा नदाल, जोकोव्हीक आणि थोड्याफार प्रमाणात रॉडीकला. त्सोंगा, ज्युआन कार्लोस फरेरो ह्यांनी काही करामती करून वरच्या फेर्यांमधे धडक मारली तर आनंदच होईल.. पाठींबा अजिबात नाही तो अँडी मरे आणि ल्युबिसि़कला. नदाल वि फेडरर फायनल होऊन नदाल जिंकलेला बघायला फार्फार आवडेल.
महिलांमधे पहिला पाठींबा हेनीनला, मग व्हिनस (जी जिंकण्याची शक्यता फारच कमी वाटते) आणि मग वोझनियाकीला. यांकोविक, कुझनेत्सोवा, शारापोव्हा, सेरेना ह्यांनाही वरच्या फेर्यांमधे खेळताना बघायला आवडेल.
सोमदेव पहिल्या फेरीत पाच सेट
सोमदेव पहिल्या फेरीत पाच सेट लढतोय. पण टीव्हीवर आहे त्सोंगाची ५ सेट वाली मॅच.
त्सोंगाची मॅच भारी झाली
त्सोंगाची मॅच भारी झाली एकदम!!
सोमदेव हरला..
पण सोमदेव हरला. फ्रेंच ओपन
पण सोमदेव हरला. फ्रेंच ओपन कडे त्याचे छायाचित्रही नाही.
नेमिनेन व रॉडिकची मॅच मस्त
नेमिनेन व रॉडिकची मॅच मस्त चाललीये, नेमिनेन चांगलाच दमवतोय रॉडिकला.
रॉडिक जिंकला एकदाचा. ६-२,
रॉडिक जिंकला एकदाचा. ६-२, ४-६, ४-६, ७-६ (७-४) आणि ६-३ अशा ५ सेट मध्ये विजय मिळवला.
हेनीनने आगेकूच कायम ठेवलीय तर दिनारा साफिना पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडली.
मिर्झा-मलिक बाई नाहीयेत काय? का कुठल्या देशाकडून खेळायचे यावर शिखर्-परिषद भरवायच्या विचारात आहेत???
मिर्झा-मलिक बाई नाहीयेत काय?
मिर्झा-मलिक बाई नाहीयेत काय? का कुठल्या देशाकडून खेळायचे यावर शिखर्-परिषद भरवायच्या विचारात आहेत???>>>>
सध्या त्या दुसराच खेळ खेळण्यात बिझ्झी असतील.. तेव्हा टेनिस कडे दुर्लक्ष होणारच.. त्या खेळातून वेळ मिळाला की मग बहुतेक जाग्या होतील आणि त्यांच्या लक्षात येईल.. की अरे आपण कधी काळी टेनिस पण खेळायचो..
हिम्स साफिना हरली पण? काय
हिम्स
साफिना हरली पण? काय खेळते ही बया...
काल espn2 वर मॅचेस का दाखवत नव्हते म्हणे? आज दुपारी १२ पासून दाखवणार आहेत.
दिनारा साफिना >>>>> दिनारा
दिनारा साफिना >>>>> दिनारा साफिनाची मॅच किमिको डाटे नावाच्या बाईशी होती ना ? ही तीच ती जुनी किमिको डाटे आहे का ?? early 90's मधे खेळायची ती ??? असेल तर अजून म्हातारी नाही का झाली ??
Pages