फ्रेंच ओपन टेनीस - २०१०

Submitted by Adm on 15 May, 2010 - 17:31

फ्रेंच ओपन टेनीस स्पर्धा पुढच्या सोमवार पासून म्हणजे २४ मे पासून सुरु होत आहे. हा धागा यंदाच्या फ्रेंच टेनीस स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी.
यंदाच्या स्पर्धेवर खेळाडूंच्या दुखापतीचं सावट आहे. आत्तापर्यंत किम क्लायज्टर्स, सानिया मिर्झा, राडावांस्का ह्या माहिला खेळाडूंनी तर निकोलाय डेव्हिडेंको, डेल पोर्टो, जेम्स ब्लेक, टॉमी हास ह्या पुरुष खेळाडूंनी माघार घेतली आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल मरेला पण असाच प्रचंड घाम गाळल्यावर गास्केट विरुद्ध विजय मिळवता आला...
४-६, ६-७, ६-४, ६-२, ६-१
पहिले दोन सेट हारल्यावर बहुतेक तो जागा झाला की अरे आपल्याला मॅच जिंकायची आहे.. आणि आपण जगातल्या पहिल्या पाच खेळाडुंमध्ये आहोत..

मरेचं गास्केट विरूध्दचं ह्या मॅचच्या आधीचं रेकॉर्ड १-२ असं होतं. गास्केट्नी मरेला नेहमीच त्रास दिलाय.

डाटे बाई चिवट दिसतायत!

आज सॉडर्लिंग व सिलिच (cilic) तर महिलांच्यात व्हिनस, पेट्रोवा यांनी विजय मिळवत आगेकूच केलीये. फेडी पहिल्या सेट पासूनच घाम गाळतोय.

"कुझनेत्सोवा आहे की अजून तीन सेट मधे जिंकली ना???"
मी पोस्टायला घाई केली. ती पहिला सेट हरली होती,आणि दुसर्‍या सेट मधे ४-५ ने मागे आणि समोरच्या खेळाडूची सर्व्हिस...पण तिच्या प्रतिस्पर्धी खेळाडूला आपण गतविजेतीला हरवतोय हे पचले नाही बहुधा.

>>पण तिच्या प्रतिस्पर्धी खेळाडूला आपण गतविजेतीला हरवतोय हे पचले नाही बहुधा.<< Lol

बाकी मोठे उलटफेर झाले नाहीत अजून, जर नदाल व हेवीट यांनी आपापले सामने जिंकले तर ४थ्या फेरीत नदाल व हेवीट यांच्यात सामना होईल. बिचारा हेवीट Sad

रंगासेठ... बहुतेक सगळ्या अमेरिकन टेनिसपटुंना(एक अ‍ॅगॅसी वगळता) रोलँड गॅरसवरती खेळताना पाहुन वाइट वाटते.. अहो जिथे मॅकेन्रो हा एकच अमेरिकन खेळाडु त्याच्या संपुर्ण कारकिर्द्रीत फक्त एकदाच फायनल पर्यंत मजल मारु शकला होता व सॅन्प्रास एकदाच ....आणी कॉनर्स ४ वेळा.. फक्त सेमी फायनलपर्यंतच मजल मारु शकले होते.. तिथे रॉडिक अजुन काय दिवे लावणार? गेल्या वर्षी विंबल्डन फायनलमधे फेडररला ऑलमोस्ट हरवणारा रॉडिक हाच का असा प्रश्न बर्‍याच जणांना..त्याच्या इथल्या पहिल्या राउंडनंतर.. पडला असेल. त्याला कारण अमेरिकेत आजही सगळीकडे ग्रास व हार्ड कोर्ट टेनिस खेळले जाते त्यामुळे क्ले कोर्टवर त्यांची अवस्था पाण्याबाहेर काढलेल्या माश्यासारखी होते.

इथल्या १९८४ च्या लेंडल- मॅकेन्रो फायनलबद्दल मी जुन्या मायबोलीवर लिहीले होतेच की लेंडलने मॅकेन्रोला त्या फायनलमधे क्ले कोर्टवर कसे खेळायचे याचे कसे प्रात्यक्षिकच दिले होते... १९९६ च्या सेमिफायनलमधे युव्ह्जेनी कॅफेल्निकॉव्हनेही सॅन्प्रासचा ३ स्ट्रेट सेटमधेच खुर्दा केला होता व लेट ७० व अर्ली ८० मधे ४ वेळा सेमीफायनलमधे..बोर्ग व गिलेर्मो विलासने... कॉनर्सच्या इथल्या आव्हानाला.. प्रत्येक वेळी लिलया परतवुन ..त्याला इथल्या लाल मातीत लोळवले होते.

त्यामुळे रॉडि़कला त्याच्या इथल्या खेळाबद्दल अगदीच काही वाइट वाटुन घ्यायला नको.. वर सांगीतलेले भले भले अमेरिकन खेळाडु इथल्या लाल मातीमधे आपले तोंड (काळे!)लाल करुन गेले आहेत..:)

सहीये.. मला क्ले आणि ग्रास वर खेळून बघायचय एकदा..
रच्याकने.. ह्या वर्षी फ्रेंच ओपन मधे बॉल जरा जास्तच स्पीन होतायत का ?
व्हॉली जवळ खूप स्पीन्स बघायला मिळतायत..

मिश्र दुहेरीत महेश भूपती आणि पेस आपापल्या जोडीदारणी सवे पहिले आणि दुसरे सीडिंग. तर पुरुष दुहेरीत ३ आणि ५. दोन्हीतही भेटले तर फायनललाच.
भूपती २००९ ऑस्ट्रेलियन ओपन - सानिया बरोबर मिश्र दुहेरीच्या विजेतेपदापासून कोरडाच आहे. आनि जोडीदार ही बदलतोय सारखे.

मरेने सामना जिंकलाय ४ सेट मध्ये. तिकडे महिलांच्यात शारापोवा आणि हेनीन यांच्यात मॅच आहे. Happy
फेडरर, नदाल, जोकोविक यांनी आपापले सामने जिंकत आगेकूच केलीय.

अमेरिकन टेनिसपटु व रोलँड गॅरसच्या संबंधांवर चर्चा करताना खालील मुद्दा वगळ्ल्यासारखा वाटतो........

९० च्या दशकाच्या पुर्वार्धात लागोपाठ २ वर्ष(नक्की कुठची ती आठवत नाहीत) 'जिम कुरियर'ने फ्रेंच ओपन जेतेपद मिळ्वले होतं. माझ्या मते तरी तो चँगपेक्षा चांगला प्लेयर होता.
याशिवाय कुरियर मला वाटतं विंबल्डनच्या फायनलला पण पोचला होता एकदा. ८९ नंतर चँगने ईतरत्र फारशी चमक दाखविल्याचे आठवत नाही.

९१,९२. त्याला फ्रेन्च बोलता यायचे आणि जिंकल्यावर फ्रेन्चमध्ये बोलला असे काहीतरी आठवते.

रोलँड लिहू नका. रोलाँ ग्यॅरोस..

>>>रोलँड लिहू नका. रोलाँ ग्यॅरोस..
सहमत
आधिच्या प्रतिसादांमधे तसेच बघितले म्हणून टाईप केले.
आमचा एक मित्र Benson & Hedges चे सामने पहाताना बेन्सन अँड हेडगे़ज असे म्हणाला होता त्याची आठवण झाली.

चूक दाखवल्याबद्दल धन्यवाद

अर्र महेश भूपति मिश्र दुहरी आणि पुरुष दुहेरीत पराभूत. ब्रायन बंधू पराभूत.

रोहन बोपन्ना पुरुष दुहेरीत दुसर्‍या फेरीत. लिअँडर पुरुष दुहेरीत तिसर्‍या फेरीत.

शारापोव्हा, व्हिनस, बार्टोली, स्वेतलाना बाद.

फेडरर व सॉडर्लिंग यांच्यात आता लढत आहे. Happy हेनीनने मॅच मस्त जिंकली.
पेट्रोवाने व्हीनसला सरळ सेट्स मध्ये पराभूत केले.

लालु तुझे उच्च्चाराबाबत बरोबर आहे पण इथे तुझ्यासारखे फ्रेंचवर प्रभुत्व फारच थोड्यांचे आहे.. निदान माझे तरी नाही.. त्याबद्दल क्षमस्व.

व्हिनस-पेट्रोव्हा च्या मॅचमधल्या चेअर अंपायरचे फ्रेंचवरचे प्रभुत्व मात्र जबरी होते.. अगदी व्हिनसला मॅडिमोझॅल विलिअम्स अस काहीतरी संबोधत होता..:)

हेनन व शॅरापोव्हा (यांचेही बेल्जिअम व रशियन उच्चार कोणाला माहीत असतील तर ते इथे टाकुन आमच्या अज्ञानात भर टाकावी ही नम्र विनंती!) यांच्यातली मॅच मस्त झाली.. दोघीजणी जास्त डिफेन्सिव्ह न होता आउटराइट विनर्ससाठी प्रयत्न करत होत्या. टु बॅड एकीला कोणाला तरी ती मॅच हरायला लागली. पण त्या मॅचमधे मॅकेन्रो म्हणाला त्याप्रमाणे शॅरापोव्हाचा खेळ क्ले कोर्ट सरफेसला सुट होणारा नसला तरी ती काल चांगली खेळली व विंबल्डनमधे पण अशीच खेळली तर तिथे ती अजुन चांगली कामगीरी करेल असे वाटते.

फेडरर बद्दल काय बोलणार? परत एकदा आज तो स्ट्रेट सेट मधे जिंकला. हा माणुस खेळताना इतका सहज खेळतो की कोणाही बघणार्‍याला वाटावे की टेनीस एकदम सोप्पा खेळ आहे.. Happy तिकडे नादालही फॉर्ममधे आहे.. त्याची बॉडी लँगवेज एकदम अग्रेसिव्ह व पॉझिटिव्ह वाटते या वर्षी.. हेविटला थोडासुद्धा चांस दिला नाही नादालने काल.. म्हणजे एकंदरीत इथला पहिला आठवडा संपल्यावर फेडरर्-नादाल यांच्यातच परत एकदा इथे फायनलमधे झुंज होइल असेच चित्र दिसत आहे.. फायनलचे टायमींग कोणाला माहीत असेल तर आताच इथे पोस्ट करुन सांगुन ठेवा म्हणजे व्यवस्थित प्लानिंग करुन पुढच्या विकेंडला टिव्हीसमोर मॅच बघायला बसता येइल..:)

फेडरर बद्दल काय बोलणार? परत एकदा आज तो स्ट्रेट सेट मधे जिंकला. हा माणुस खेळताना इतका सहज खेळतो की कोणाही बघणार्‍याला वाटावे की टेनीस एकदम सोप्पा खेळ आहे....>>>तुला एकशे एक टक्के अनुमोदन मुकुंद :).. मुख्य म्हणजे सध्या त्याच्यावर कुठल्याही विक्रमाचे दडपण सध्या नसल्याने तो खेळाचा आनंद लुटत खेळताना दिसतो.. त्यामुळे त्याचा खेळ पहायला खूप छान वाटते..

तिकडे नादालही फॉर्ममधे आहे.. त्याची बॉडी लँगवेज एकदम अग्रेसिव्ह व पॉझिटिव्ह वाटते या वर्षी.. हेविटला थोडासुद्धा चांस दिला नाही नादालने काल.. म्हणजे एकंदरीत इथला पहिला आठवडा संपल्यावर फेडरर्-नादाल यांच्यातच परत एकदा इथे फायनलमधे झुंज होइल असेच चित्र दिसत आहे.. >>>हो नदाल मस्त खेळतोय.. जरी २००७-२००८ मधील फ्रेंच ओपन्सइतका अग्रेसिव्ह आणि चपळ नदाल दिसत नसला तरी मागच्यावर्षीपेक्षा खूपच अग्रेसिव्ह आणि पॉझिटिव्ह दिसतोय तो... हेविट तसाही नदाल,फेडररसारख्या मातब्बरांसमोर निष्प्रभच होतो कायम तरी नदालविरुध्द परवा त्याने मिळवलेले काही पॉईंट्स चांगले होते..मुख्य म्हणजे नदालची सर्व्हिस मॅचच्या पहिल्याच गेममध्ये ब्रेक केली त्याने चक्क.. पण आपली सर्व्हीसही नंतर लगेच ब्रेक होऊ दिली.. Happy

फायनलचे टायमींग कोणाला माहीत असेल तर आताच इथे पोस्ट करुन सांगुन ठेवा म्हणजे व्यवस्थित प्लानिंग करुन पुढच्या विकेंडला टिव्हीसमोर मॅच बघायला बसता येइल.. >>>> जर पावसाने काही नाटक केले नाही आणि वेळापत्रकानुसार सामने झाले तर भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी सहाच्या सुमारास फायनल असेल....

http://www.rolandgarros.com/en_FR/about/schedule.html

गुरुवार महिला एकेरी सेमि फायनल मिश्र दुहेरी फायनल
शुक्रवार पुरुष सेमि फायनल महिला दुहेरी फायनल
शनिवार महिला एकेरी आणि पुरुष दुहेरी फायनल
रविवार पुरुष एकेरी फायनल पॅरिसच्या दुपारी ३ वाजता.

बर्डिचने मरेला बाहेर घालवले.
wawrinka ला आपण फेडररला कसे हरवणार असे वाटत असेल का? दुसरा सेट एक सर्विस ब्रेककरून्ही टाय ब्रेकर मधे हरल्यावर त्याची प्रतिक्रिया आपण एक तरी सेट जिंकायला हवा अशी होती.
क्रोएशियाचा मारिओ अँचिच ancic कुठे हरवलाय?

मुकुंद, अगदी सहमत. शारापोवा चांगली खेळली.
आत्ता हेनीन व सेरेना यांनी आपापले सामने जिंकले तर क्वार्टरफायनल्स मध्ये या दोघींच्यात मुकाबला होईल.

>>रविवार पुरुष एकेरी फायनल पॅरिसच्या दुपारी ३ वाजता.<< म्हणजे भारतात फायनल संध्याकाळी ६:३० ला असेल.

मी तीन दिवसात बरच काय काय मिसलं की
हेनीन काय हरली !!! Sad हेनीन शारापोव्हा मॅचचे हायलाईट्स भारी आहेत.. !
तो मरे गेला ते बरं झालं.. तसेची आधीचे राऊंड बरेच अवघड गेले होते त्याला..

Pages