Submitted by पराग on 15 January, 2010 - 22:15
जिंकून जिंकून जिंकणार कोण ?
ऑस्ट्रेलियन ओपन टेनीस स्पर्धा येत्या सोमवारी म्हणजे १८ तारखेला सुरु होत्ये. हा लेखनाचा धागा ह्या स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी. (टेनीस बद्दलची इतर चर्चा टेनीसच्या पानावर करता येईल.)
जस्टीनी हेनीनचे ह्या स्पर्धेद्वारे पुनरागमन होत असल्याने तिच्या खेळाकडे सगळ्यांचे लक्ष असेल. तसेल नदाल, फेडरर, नोल, विल्यम्स भगिनी, मरे, शारापोवा, डेल-पोर्टो, क्लाइज्टर्स, यांकोविच, आयवानोविच, आपल्या बाई, पेस, भुपती अश्या नेहमीच्या यशस्वी खेळाडूंच्या कामगिरीवरही सगळ्यांचे लक्ष असेलच.
तेव्हा टेनीसप्रेमींनो सुरु व्हा..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे ती ना ली गेले ११ वर्ष
अरे ती ना ली गेले ११ वर्ष खेळत्ये.. आणि पहिल्यांदा सेमीला पोचली आहे.. वय बघता अजून किती काळ तग धरेल माहित नाही... व्हिनस सुरुवातीला चांगली खेळून मग ढेपाळली बहूतेक..
शेवटच्या सेट मधे खूप ब्रेक्स झाले एकूण..
हट्स टु ली...खुप छान
हट्स टु ली...खुप छान बचावात्मक खेळली... व्हिनस खरच ढेपाळली..खुप चुका करत होती. दुसरा सेट मधे ५-४ ने आघाडी घेवुन सेर्वीस राखु नाही शकली...
फेडरर पहीला सेट हारला
फेडरर पहीला सेट हारला
२५ unforced errors
२५ unforced errors
फेडेक्स.. दुसर्या आणि
फेडेक्स.. दुसर्या आणि तिसर्या सेट मध्ये फार्मात आलाय.. दुसरा सेट ६-३ जिंकून तिसर्यात ३-० आघाडी...
आणि सेरेना अखेर जिंकली... पार हारता हारता जिंकली... नंबर १ असल्याचे दाखवून दिले.. आझारेंका दुसर्या सेट पर्यंत ठिक खेळली पण नंतर मात्र सेरेनानी जोर लावत मॅच जिंकली...
फेडी तिसरा सेट ६-० ने जिंकलाय
फेडी तिसरा सेट ६-० ने जिंकलाय
येस येस.. एकदम जोरात..
येस येस.. एकदम जोरात.. फॉर्मात आलाय.... लवकरच संपवणार मॅच असं दिसतय... पुढची मॅच बघण्यासारखी आहे. पण नेट वरच फॉलो करायला लागणार...
हुर्रे... फेडेक्स जिंकला...
हुर्रे... फेडेक्स जिंकला... आता.. त्सोंगा की जोकोविच ते बघायचे.... जोको आला तर जरा जड जाईल पण त्सोंगा आला तर बर्यापैकी सहज जिंकेल सेमी पण..
फेडी आणि मरे फायनल होणार
फेडी आणि मरे फायनल होणार
>>फेडी आणि मरे फायनल
>>फेडी आणि मरे फायनल होणार
मलाही तसेच वाटते....US Open2008 ची पुनराव्रुती होणार....
सिद्धार्थ म्हणजे विक्रम का ?
सिद्धार्थ म्हणजे विक्रम का ?
नाही...
नाही...
काल सेरेनाची मॅच दुसर्या सेट
काल सेरेनाची मॅच दुसर्या सेट पर्यंत पाहिली... सेरेना भारी खेळली.. १-४ ने मागे असताना तिने जोरदार फाईट देत दुसरा सेट अक्षरश: खेचून आणला.. त्यावेळी तिचे फोरहँडस पण मस्त बसायला लागले.. काल तिच्या सर्व्हचा दाखवलेला अॅनालिसिस मस्त होता.. अनेक वेळा स्पिड नसतानाही केवळ प्लेसमेंटच्या जोरवर ती बिनतोड सर्व्ह करते..
जोको हरला..
जोको टफ मॅच झाली. मी दोन सेट
जोको टफ मॅच झाली. मी दोन सेट बघितले.
जोको-त्सोंगा मॅच मधले पहीले २
जोको-त्सोंगा मॅच मधले पहीले २ सेट मस्त टफ झाले. जोको दोन्ही सेट बर्यापैकी डीफेन्सीव्ह खेळत होता. तिसर्या सेट मधे त्सोंगाचा खेळ अचानक खालावला, बर्याच चुका केल्या त्याने. चौथ्या सेटच्या सुरवातीलाच जोकोला पोटदुखी /मळमळ सुरू झाली. त्याचे फूटवर्क, स्पिड, जोर सगळेच बिनसले. पाचव्या सेट मधे पण तो रीकव्हर होऊ शकला नाही.
काल अॅलमांग्रो पण म्हणे मनगट दुखावलेलं असताना ५ सेट खेळला.
एकूणातच ऑस्ट्रेलियन ओपन ही नेहमी खेळाडूंच्या फिटनेसचा कस बघणारी ठरते.
जोको हरला का... मी पहिला सेट
जोको हरला का...
मी पहिला सेट पाहिला फेडररच्या मॅचचा..
आता त्सोंगा काय करतोय बघायचं...
खरंच तो विक्रम लिहीत नाहीये ह्यावेळी... त्याने 'नदाल म्हणजे दुसरा मायकेल चॅंग आहे' असे लिहीले होते तेव्हा पग्या चिडला होता त्याच्यावर..
>>चौथ्या सेटच्या सुरवातीलाच
>>चौथ्या सेटच्या सुरवातीलाच जोकोला पोटदुखी /मळमळ सुरू झाली.
रडका आहे जोको...
त्सोंगा अप्रतिम खेळला..
सेरेना जिंकली... किती चिवट
सेरेना जिंकली... किती चिवट आहे ती... खेचते मॅचेस अक्षरशः !!! नंबर १ म्हणजे काय हे तिच्या कालच्या आणि आजच्या मॅच वरून कळतं !
हेनीन ५१ मिनिटांमधे ६-१ ६-०
हेनीन ५१ मिनिटांमधे ६-१ ६-० जिंकली !!!!! खूपच सही खेळली...
बॅकहँड रॉक्ड..
हेनीन वि सेरेना फायनल... खूप मजा येणार.. ! ड्रीम फायनल म्हणता येईल अगदी..
दोन्ही सेमीज बघितल्या नाहीत..
दोन्ही सेमीज बघितल्या नाहीत.. आज दुपारी रीपिट टेलिकास्ट्ला बघेन. त्या झेंग जी ला काय झालं? आज अजिब्बातच झुंज दिली नाही.
हेनीन वि सेरेना फायनल>> येस्स!! खरच खूप मजा येईल!
अँडी मरेने चिलिचला ४ सेट्स मधे हरवून धडाक्यात फायनलमधे प्रवेश केलाय!! पहीला सेट चिलिच अॅग्रेसिव्ह खेळला. दुसर्या सेट मधे दोघांनी एकमेकांची सर्व्ह ब्रेक केली. नंतर पुढच्या एका ब्रेक पॉईंटला विक्केड शॉट मारून तो सेट मरेने पटकावला. तिसर्या सेट पासून चिलिच थकल्याचे जाणवत होते.
मॅचच्या शेवटच्या गेम मधे पण पूर्ण कोर्ट धावत कव्हर करून २ डबल अॅलीच्या बाहेरचा बॉल विनर मधे कन्व्हर्ट केला.. फोरहँड डाऊन द लाईन... सिंपली अमेझिंग!!
दुपारी किती वाजता ? कुठे ?
दुपारी किती वाजता ? कुठे ?
espn2 वर ३
espn2 वर ३ वाजता.
http://espn.go.com/broadband/espn360/index इकडे पण बघू शकतेस
आपल्या बाईंनी बहुतेक हरल्याचा
आपल्या बाईंनी बहुतेक हरल्याचा राग त्या होतकरू नवर्यावर काढला आणि सगाई तोडली...
हो का... मायबोलीवरील टीका सहन
हो का... मायबोलीवरील टीका सहन झाली नाही वाटतं तिला..
मर्या गेला फायनलमध्ये... हा लेकाचा वर्षानुवर्षे खेळतोय तरी त्याचं वय वाढतच नाही.. आत्ताशी २२ वर्षांचा आहे तो..
हा लेकाचा वर्षानुवर्षे खेळतोय
हा लेकाचा वर्षानुवर्षे खेळतोय तरी त्याचं वय वाढतच नाही..
>>
अफ्रीदी कसा ४-५ वर्ष १७ वर्षांचा होता...
अफ्रीदी कसा ४-५ वर्ष १७
अफ्रीदी कसा ४-५ वर्ष १७ वर्षांचा होता... >>>
आपल्या बाईंनी बहुतेक हरल्याचा
आपल्या बाईंनी बहुतेक हरल्याचा राग त्या होतकरू नवर्यावर काढला आणि सगाई तोडली...>>> अँक्या,चान्स आहे म्हणजे तुला
आज फेडी आणि त्सोंगा मॅच... :)... मजा येणार मॅच पहायला...
अँक्या,चान्स आहे म्हणजे
अँक्या,चान्स आहे म्हणजे तुला
>>
मला इंटरेस्ट नाही...
इच्छुकांनी लाभ घ्यावा...
फेडी चान्गलाच घेतो आहे
फेडी चान्गलाच घेतो आहे त्सोंगाला..६-२,६-३,३-१ ...
US Open2008 ची पुनराव्रुती...
जिंकला रे फेडी
जिंकला रे फेडी
Pages