Submitted by पराग on 15 January, 2010 - 22:15
जिंकून जिंकून जिंकणार कोण ?
ऑस्ट्रेलियन ओपन टेनीस स्पर्धा येत्या सोमवारी म्हणजे १८ तारखेला सुरु होत्ये. हा लेखनाचा धागा ह्या स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी. (टेनीस बद्दलची इतर चर्चा टेनीसच्या पानावर करता येईल.)
जस्टीनी हेनीनचे ह्या स्पर्धेद्वारे पुनरागमन होत असल्याने तिच्या खेळाकडे सगळ्यांचे लक्ष असेल. तसेल नदाल, फेडरर, नोल, विल्यम्स भगिनी, मरे, शारापोवा, डेल-पोर्टो, क्लाइज्टर्स, यांकोविच, आयवानोविच, आपल्या बाई, पेस, भुपती अश्या नेहमीच्या यशस्वी खेळाडूंच्या कामगिरीवरही सगळ्यांचे लक्ष असेलच.
तेव्हा टेनीसप्रेमींनो सुरु व्हा..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फेडरर हेविटला सहज हरवतो
फेडरर हेविटला सहज हरवतो नेहमी... त्यामुळे तो जिंकेल. क्वार्टर फायनल पासून मॅचेस भारी होतील.. व्हर्डास्को, डॅविडेंको, सोंगा, जोकोविच हे सगळे आहेत आता त्याच्या लायनीत..
तिकडे नदाल आणि मरे यांची क्वार्टर फायनल मध्येच टक्कर होणार असं दिसतंय.. रॉडिक-पोट्रो मॅच बघायला मजा येईल (झालीतर).
नदालची मॅच मस्त झाली..
नदालची मॅच मस्त झाली.. बर्यापैकी नेक टू नेक होती..
जिंकला चार सेट मधे..
रच्याकने ती पॅट्रोवा कुठून उपटली अचानक ? परवा किम.. आज कुझनेत्सोवा..
डेलपोट्रो आणि चिलिच मॅच
डेलपोट्रो आणि चिलिच मॅच चांगली चालली आहे .. दोघांनीही एक एक सेट जिंकलाय आणि तिसरा सेटही नेक टु नेक चाललाय...
फेडी आणि हेविट चौथ्या फेरीची लढत,राफा आणि मरे उपांत्यपूर्व लढत... चला आता अधिक मजा यायला सुरूवात होणार..
चिलिच पाच सेटमध्ये जिंकला
चिलिच पाच सेटमध्ये जिंकला डेलपोट्रोविरुध्द.. हेनिन पण जिंकली.. साफिनाने मॅच अर्धवट सोडुन दिली...
रॉडिक आणि गोंझालेझ मॅच पाहिली का?मस्त झाली ...गोंझालेझ कमाल खेळला... पण अखेर रॉडिक पाच सेटमध्ये जिंकला..
डेल पोट्रो जिंकला असता तर
डेल पोट्रो जिंकला असता तर त्याची आणि रॉडिक ची झाली असती त्यात पण मजा आली असती.. मी डेल पोट्रॉची तिसर्या सेट पर्यंत पाहिली आणि मग झोपलो.. हेनीन् ची सगळ्या मॅचेस मधे दमछाक होत्ये...
व्हिनस वि वोझनियाकी अशी क्वार्टर झाली तर मजा येईल...
पोट्रो हरला का... अरेरे.. आता
पोट्रो हरला का... अरेरे..
आता रॉडिक हरवेल त्या सिलिक(चिलिच) ला...
नदाल-मरे बघायला पाहिजे. मागे एकदा मरे ने हरवले होते नदालला..
वोझनियाकी हरली (((((((((((
वोझनियाकी हरली :((((((((((((
मागे एकदा मरे ने हरवले होते
मागे एकदा मरे ने हरवले होते नदालला..>>> मरे कालच्या मॅचमध्ये तरी फुल फॉर्ममध्ये खेळत होता.. नदाल जर मरेविरुध्द जिंकला तर त्याला सेमिफायनलमध्ये रॉडिक किंवा चिलिचला हरवणे फारसे कठीण जाणार नाही..
आयला,यावेळी त्या दोन चिनी पोरी एकदम फॉर्ममध्ये आहेत की.. त्या लीने वोझनियाकीला दोन सेट्मध्ये सहज हरवलं.. आता मात्र तिचा खरा कस लागेल व्हिनसविरुध्द...आणि ती दुसरी झेंग किरिलेंकोविरुध्द आहे..
व्हिनस आणि सेरेना सेमिफायनमध्येच समोरासमोर येणार वाटतं...
डॅविडेंको-व्हर्डास्को चालु
डॅविडेंको-व्हर्डास्को चालु आहे आता.....व्हर्डास्को खुप चुका करतो आहे. २ सेट डॅविडेंकोने घेतल्यावर व्हर्डास्कोने तिसरा सेट घेतला(६-४)...व्हर्डास्को हारणार अस दिसतय....डॅविडेंको खुप चिवट आहे...
तिसरा सेट व्हर्डास्कोने
तिसरा सेट व्हर्डास्कोने घेतला.. चौथा टायब्रेकरमध्ये गेलाय..
व्हर्डास्को जिंकला चौथा सेट
व्हर्डास्को जिंकला चौथा सेट टायब्रेकरमध्ये.. मॅच मस्त चालली आहे..
जिंकला डॅविडेंको... पाचवा सेट
जिंकला डॅविडेंको... पाचवा सेट सहज जिंकला ६-३ ने...
मधले २ सेट्स व्हर्डास्कोने
मधले २ सेट्स व्हर्डास्कोने घेतल्याने मॅच मस्त झाली.
डॅविडेंको खरच खुप चिवट आहे....
त्सोंगा आणि अल्माग्रो मॅचही
त्सोंगा आणि अल्माग्रो मॅचही टफ चालु आहे..पाचवा सेट चालु आहे.. थोड्या वेळात फेडी आणि हेविट मॅच चालु होईल..
त्सोंगा जिंकला.. फेडी
त्सोंगा जिंकला..
फेडी हेविटविरूध्द पहिले दोन सेट सहज जिंकलाय..
पुरूष गटातल्या उपांत्यपूर्व
पुरूष गटातल्या उपांत्यपूर्व लढती पुढीलप्रमाणे
फेडी आणि डॅविडेंको
जोकोविक आणि त्सोंगा
रॉडिक आणि चिलिच
नदाल आणि मरे...
कोण रे ते गो नादाल म्हणाले ?
कोण रे ते गो नादाल म्हणाले ?
२००८मधला नदाल हरवलाय..
२००८मधला नदाल हरवलाय.. त्याच्या गुडघेदुखीने जर असा त्याला सतत त्रास दिला तर कठीण आहे..
चिलिच आणि रॉडिक मॅच पाहिली का? चिलिच मस्त खेळतोय... पण आजचा मरेचा खेळ पहाता मरेच जिंकेल सेमिफायन असं वाटतय...
उद्या फेडीची गाठ डॅविडेंकोशी... फेडी जिंकणार :)...
चिलिच आणि रॉडिक मॅच पाहिली
चिलिच आणि रॉडिक मॅच पाहिली का? >>> हो.. रॉडिक बर्यापैकी मोनोटोनस खेळत होता... विनर्स मारण्यापेक्षा तो चिलिचची चूक व्हायची वाट पहात रॅली लांबवतोय असं वाटत होतं.. आणि रॉडिक एकदम सिंगले हँडेड स्लाईस बॅकहँड का मारायला लागला ? ते फटके एकतर खूप हळू जात होते.. स्पिन होत नव्हते आणि कधी कधी चुकत पण होते..
नदाल..
तिकडे हेनीन गेली पुढे ते बरं झालं.. विल्यम्स भगिनी सेमीज ला भेटणार असं वाटत्य..
हरले नदाल साहेब... २००८मधला
हरले नदाल साहेब...
२००८मधला नदाल हरवलाय..
>>
स्पॅनिश खेळाडू हे सगळे बहुतेक असेच असतात... सुरुवातीला धाव धाव धावतात आणि नंतर दुखापतीने ग्रस्त वगैरे होतात.
आता जोकोविच-मरे किंवा फेडरर-मरे अशी फायनल होणार असं मला वाटतंय...
हरले नदाल साहेब... >>>>
हरले नदाल साहेब... >>>> सँट्या माईंड योर वर्ड्स... तो हरला नाहिये.. सामना सोडला दुखापती मुळे..
जोकोविच-मरे किंवा फेडरर-मरे अशी फायनल >>>> अरे वा.. म्हणजे सिंडी आणि पन्नाला अगदी आनंदी आनंद होणार..
हारला नाही रे तो. कुणी
हारला नाही रे तो. कुणी नादालची प्रेस कॉन्फरंस बघितली का ?
परवा व्हीनसची मॅच सुरु होती. दुसर्या सेटच्या पहिल्या गेमला मी म्हणाले oh she already broke Venus. इशान म्हणतो she is not a good girl
अरे अगदी हरतच आला होता.. ३-०
अरे अगदी हरतच आला होता.. ३-० झाला होता शेवटच्या सेटमध्ये. तो स्वतःच म्हणाला की आणि..
"Anyway, like I know I (was) going to lose like I did in Rotterdam like last year"
म्हणून मी तसं म्हणालो..
तो टकल्या डॅविडेंको पण चांगला खेळतो कधीकधी... ती मॅचपण चांगली होईल.
पराग, तू कुठे पाहतोस मॅचेस?
अरे इएसपीएन ३६० वर आहेत
अरे इएसपीएन ३६० वर आहेत सगळ्या मॅचेस लाईव्ह.. आणि अगदी लिगल बर्का.. त्यामुळे इथे लिंका पोस्ट केल्या तरी चालतील..
अरे, काय चाललय ह्या ऑसी ओपन
अरे, काय चाललय ह्या ऑसी ओपन मधे.. श्या.. किम, पोट्रो, रॉडीक (विंब्लडन पास्नं आवडत्या १० मधे टाकला होता ह्याला) आणि आज राफा
मरे सही खेळला. सर्विस चांगला हात देतेय त्याला.. आजच्या मॅचमधे विनर्स ही जास्त होते त्याचे.
राफाने फेडीकडून फिटनेसबद्दल टीप्स घ्यायला हव्यात.
जोकोच्या मॅचेस बघितल्यात का कोणी? कसा खेळतोय? मला अजून पर्यंत एकही बघायला मिळाली नाहीये.
जोकोविच-मरे किंवा फेडरर-मरे अशी फायनल >> फेडी-मरे झाली तर फेडी जिंकेल, अन जोको- मरे झाली तर मरेला चान्स आहे. (IMO)
पग्या
जोकोची लेटेस्ट मॅच पाहिली
जोकोची लेटेस्ट मॅच पाहिली होती.. मस्त खेळला एकदम.. !!! सुरेख क्रॉस कोर्ट आणि पासेस मारले..
सर्व्ह पण भारी पडत होती एकदम.. मोक्याच्या वेळी खेळ उंचावत महत्त्वाचे पॉईंट जिंकले.. टचवूड असाच खेळला पाहिजे आता त्सोंगाशी आणि पुढे पण...
कधीकधी त्याच्या भरोसा वाटत नाही पण अजिबात.. कधी ढेपाळेल अचानक सांगता येत नाही... माझ्या आवडत्या १०त आहे तो..
२००७ च्या जोको वि फेडरर आणि जोको वि त्सोंगा दोन्ही मॅचेस भारी झाल्या होत्या एकदम !!
जोको एरवी नको तेव्हा कच
जोको एरवी नको तेव्हा कच खातो...आणि फेडी प्रतिस्पर्धी असेल तर हाय खातो
नकला सही करतो पण
फेडी प्रतिस्पर्धी असेल तर हाय
फेडी प्रतिस्पर्धी असेल तर हाय खातो >>
सहीच..त्या चिनी पोरीने लीने
सहीच..त्या चिनी पोरीने लीने पहिला सेट ६-२ ने हरुनसुध्दा व्हिनसला हरवलं.. या चिनी पोरी या वर्षातलं महिला टेनीसमधलं सरप्राईझ पॅकेज दिसतय..
मीपण पाहिली व्हिनसची मॅच...
मीपण पाहिली व्हिनसची मॅच... शेवटी शेवटी व्हिनस एकदम थकली होती. चिंकी चांगलं खेळत होती मात्र.
या चिनी पोरी या वर्षातलं महिला टेनीसमधलं सरप्राईझ पॅकेज दिसतय..
>>
आणि भारतीय पोरी बघा! लग्न करुन टेनिस सोडून देणार म्हणे! असली हुच्च ध्येयं ठेवल्यावर पहिल्या राऊंडमध्ये हरणार नाहीतर काय होणार..
Pages