ऑस्ट्रेलियन ओपन टेनीस - २०१०

Submitted by पराग on 15 January, 2010 - 22:15

जिंकून जिंकून जिंकणार कोण ?

ऑस्ट्रेलियन ओपन टेनीस स्पर्धा येत्या सोमवारी म्हणजे १८ तारखेला सुरु होत्ये. हा लेखनाचा धागा ह्या स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी. (टेनीस बद्दलची इतर चर्चा टेनीसच्या पानावर करता येईल.)
जस्टीनी हेनीनचे ह्या स्पर्धेद्वारे पुनरागमन होत असल्याने तिच्या खेळाकडे सगळ्यांचे लक्ष असेल. तसेल नदाल, फेडरर, नोल, विल्यम्स भगिनी, मरे, शारापोवा, डेल-पोर्टो, क्लाइज्टर्स, यांकोविच, आयवानोविच, आपल्या बाई, पेस, भुपती अश्या नेहमीच्या यशस्वी खेळाडूंच्या कामगिरीवरही सगळ्यांचे लक्ष असेलच.

तेव्हा टेनीसप्रेमींनो सुरु व्हा.. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वीट सिक्स्टीन Happy

मरेच्या गेममधे प्रिसिजन नाहीये अजिबात. लै बोर खेळला.

आता सगळा ब्रिटिश मिडिआ मरे स्कॉटिश आहे हे अधोरेखित करेल Wink

फेडरर ही पूर्ण स्पर्धा अतिशय रिलॅक्स मुड्मध्ये खेळताना दिसला.. कोणतही अनावश्यक टेन्शन नव्हतं.. कसल्या अपेक्षांचं ओझं नव्हतं त्याच्या मनावर आणि त्याचा त्याला खूप फायदाही झाला.. आनंदाची गोष्ट म्हणजे त्याचे (मध्ये बिघड्लेले )सिंगल बॅकहँड स्ट्रोक्स मस्त लागत होते यावेळी.. आणि सर्व्हिसही मस्त होती.. त्यामुळेच योग्य वेळी तो समोरच्या प्रतिस्पर्ध्याला कंट्रोल करू शकत होता.. वेल डन फेडी.. Happy
काल अँडी मुलाखतीच्या वेळी कसंबसं रडु आवरत होता.. खर तर त्याला काही वेळा संधी मिळाल्या होत्या फेडररला ब्रेक करायच्या पण त्याने विस्कळीत खेळ करून त्या घालवल्या.. तिसर्‍या सेटमध्ये तर फारच..

Pages