ऑस्ट्रेलियन ओपन टेनीस - २०१०

Submitted by पराग on 15 January, 2010 - 22:15

जिंकून जिंकून जिंकणार कोण ?

ऑस्ट्रेलियन ओपन टेनीस स्पर्धा येत्या सोमवारी म्हणजे १८ तारखेला सुरु होत्ये. हा लेखनाचा धागा ह्या स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी. (टेनीस बद्दलची इतर चर्चा टेनीसच्या पानावर करता येईल.)
जस्टीनी हेनीनचे ह्या स्पर्धेद्वारे पुनरागमन होत असल्याने तिच्या खेळाकडे सगळ्यांचे लक्ष असेल. तसेल नदाल, फेडरर, नोल, विल्यम्स भगिनी, मरे, शारापोवा, डेल-पोर्टो, क्लाइज्टर्स, यांकोविच, आयवानोविच, आपल्या बाई, पेस, भुपती अश्या नेहमीच्या यशस्वी खेळाडूंच्या कामगिरीवरही सगळ्यांचे लक्ष असेलच.

तेव्हा टेनीसप्रेमींनो सुरु व्हा.. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फेडरर जिंकावा अशी फार फार इच्छा आहे पण सध्याचा त्याचा फॉर्म पहाता शक्यता कमी दिसतेय.. खूप चुका केल्या आहेत खेळताना त्याने ऑस्ट्रेलियन आधीच्या दोन स्पर्धांमध्ये..

नदाललाच जास्त संधी आहे पुन्हा जिंकण्याची... त्याचा जुना फॉर्मही परत येताना दिसतोय..

>>नदाललाच जास्त संधी आहे पुन्हा जिंकण्याची... <<
जर तो संपुर्ण टुर्नामेंट फिट राहीला तर; गुढघे दुखी त्याची डोकेदुखी ठरु शकेल...

नादालने डोकेदुखीच्या गोळ्या घेतल्या तर गुढगे दुखायचे थांबतील Proud

पग्या, धन्यवाद धागा सुरु केल्याबद्दल.

ड्रीम फायन्ल्स: किम वि जस्टिन आणि फेडी वि नादाल Happy

गो फेडी !!! गो जस्टिन !!!

यस... परवापासून सुरूवात!!
वादविवाद आणि भांडणाला तयार रहा मंडळी! Proud Light 1

रस्त्याच्या कडेने, त्या पोट्रोचे काय झाले? तो नाहीये का विजेत्यांच्या रेसमध्ये?

रस्त्याच्या कडेने, त्या पोट्रोचे काय झाले? तो नाहीये का विजेत्यांच्या रेसमध्ये?...>>> तुच सांग बघु Happy

वादविवाद आणि भांडणाला तयार रहा मंडळी! ....>> तू डेल पोट्रो म्हणालास की मी तयारच आहे इथे भांडायला Proud

किम वि जस्टिन अशी फायनल होणं शक्य नहिये.. कारण ड्रॉ प्रमाणे त्या एकाच गटात आहेत..
http://www.australianopen.com/en_AU/scores/draws/ws/r1s3.html

आणि त्यामुळे त्यांची गाठ क्वार्टर फायनललाच पडेल.. आणि हो अंक्या त्यात "गो किम" म्हणजे किम बाहेर जाईल आणि जस्टीन पुढे स्पर्धा जिंकेल.. Wink

शॅरापोव्हा हरली. Sad तिने बॅकहँडवर खूप चूका केल्या.. पहिल्या सेटचा टाउ ब्रेकर हातातून घालवणं ही मोठी चूक होती.. जी शेवटी तिला महाग पडली...

मॅच भारी झाली एकदम.. !!!! दुसर्‍या सेटच्या उत्तरार्धापासून खूप चुरशीची झाली..

शॅरापोव्हाने कमीत दहा तरी सेर्विस चुका केल्या....
आपल्या बाई (सानिया मिर्झा) फारतर फार एक राउन्ड पार करतील..

अहो आपल्या बाई आता लग्न करून संसारी होणार आहेत. लग्न झाल्यावर आपण आपले टेनिस वगैरे सगळे लाड बंद करणार आहोत असे परवाच त्यांनी सांगितले.

त्यामुळे त्या पहिलीच राऊंड हरलेल्या आहेत.

वा वा! कुठे चाल्लेय हे सगळे!

काल १०-१२ जणांचे एक टोळके पोलीसांनी पकडले. मॅच मध्ये रंगत आणत होते! Happy

सँटी.. ठिके ना.. तसही काही विषेश करत नव्हत्याच त्या.. Happy

कालची डेल पोट्रोची मॅच पण चांगली झाली. ४ सेटर... पाहिला सेट बघितला.

सेरेनाची आत्ता चालू आहे.. काही काही रॅलीज चांगल्या रंगतायत... सेरेनाच्या पायाला काही झालय का काय माहित...

दुसरा आणि तिसरा सेट जिंकला फेडी...

चौथ सेट ६-० ने जिंकुन फेडीचा दुसर्‍या फेरीत प्रवेश...

आयला,तो बिगरमानांकित स्पॅनिश सोडर्लिंगला चांगलीच टफ देतोय.. पहिले दोन्ही सेट हरूनदेखील पुढचे दोन्ही सेट जिंकलाय.. आणि पाचव्या सेटमध्ये २-० ने पुढे आहे.. Happy

मॅचेस बघताय का कोणी ?

वोझनियाकी मस्त जिंकली... पासेस चांगले मारले.. कुझनेत्सोवा पण मस्त जिंकली.. दुसरा सेट तर अगदीच किरकोळीत.. किम ची आत्ता चालू आहे.. सुरुवात दणदणीत केली पण नंतर ती तानासुगार्न बरी खेळायला लागली.. पहिला सेट किम ने घेतला.. पण माझ्या अपेक्षेपेक्षा जरा जास्त वेळ चालला तो..

तिकडे रॉडिक आणि कोणतरी नविन बच्चा आहे... आत्तापर्यंत दोघांनीही सर्व्हिसेस राखल्यात...
आज चांगल्या मॅचेस आहेत.. किम नंतर रॉड लिव्हर अरेना वर नदाल आणि संध्याकाळी हेनीन... !!! आणि रॉडिक नंतर सॅफिना आणि मग डेल पोट्रो.. !

नदाल जिंकला पण..
आता हेनिन आणि डिमेंटीयेवा मॅच चालू आहे... आणि डेल पोर्टो - ब्लेक ही मॅच चालू आहे. आणि मरेची पण मॅच चालू आहे...

डेल पोर्टो - ब्लेक मॅच जबरी झाली दिसतेय्..अखेर डेलपोट्रो ६-४,६-७,५-७,६-३,१०-८ असा जिंकला..
हेनिन आणि डिमेंटीयेवा मॅच पण चांगली चालु आहे.. हेनीनने ७-५.७-६ अशी बाजी मारली

परवाची हेनिन आणि डिमेंटीवा ची मॅच काल पाहिली.. जबरी झाली एकदम.. हेनिन एकदम पूर्वीच्या फॉर्मने खेळली.. मला एकदम तिची आणि सेरेनाची २००३ मधली फ्रेंच सेमी फायनल आठवली. Happy

कालची इव्हानोविकची मॅच पण चांगली झाली.. तिने शेवटपर्यंत बरीच फाईट मारली पण नो युज...

पहिला सेट घालवल्यानंतर नोव्हाक मस्त खेळून जिंकला..

आज पण चांगल्या मॅचेस आहेत...

अरे,किम हरली की सहज पेट्रोवाकडुन ६-०,६-१... हेनिन ३ सेटमध्ये जिंकली मॅच..

किम हरली का ??????
अरेरे.. ती मॅच काल लेट नाईट होती सो नाही पाहिली..

हेनीन आणि रॉडीकच्या मॅचेस मस्त झाल्या एकदम..

Pages