क्रिकेट - ९

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सलग 13 टॉस हरलो आहोत.
आज जिंकणार का?

The last time India won an ODI toss dates back to the 2023 Wankhede semifinal.
Since then, Rohit has lost 10 tosses, while KL Rahul has had no luck with the coin three times, making this prolonged streak a talking point among fans and analysts alike.
The statistical probability of losing 13 consecutive tosses stands at a minuscule 0.0122% - 1 in 8192

इथे पण आकडेवारी आहेच !! Whatever way the toss goes, we should, and we will , win today !! - Wink

टॉसचं बोलूच नको, नुसतं " सामना जिंकूदे " एवढंच माग. उगीच पैशांचा पाऊस नको पडायला, नाणेफेक म्हटलस तर !!!IMG_20250304_122727_0.jpg

*चिंतेने कामात लक्ष लागत नाहिये* - धीर धरी रे धीरापोटी , असती मोठी फळे गोमटी!!
आपल्याही फलंदाजीवर व गोलंदाजीवर विश्वास ठेवावा !!

262 सर्व बाद ! तेवढी तर अपेक्षा आहेच ना ऑसीज कडून ! आवाक्यातला स्कोअर आहे आपल्या फलंदाजीच्या !!!
बघू कसा होतो खेळ !!

चांगलाच आवर घातला. 300 होइल असं वाटतं होते.

ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी कमजोर आहे. पण मूर्खासारखं शॉट मारून बाद होण्याची गरज नाही. विशेषतः रोहित शर्मा.
फक्त 5 ची धावगती. शांत डोक्याने खेळून सामना संपवावा.

विश्वास तर आहेच भाऊ
उगाच का सगळ्यांशी पंगे घेत इथे कौतुक करतो.
पण काळजी सुद्धा आहे.
जितके जवळ येऊन हरू तितके बेकार वाईट वाटते.
या संघाने अपेक्षा फार वाढवल्या आहेत.

डावखुर्‍या जलद गोलंदाजा समोर पहिले तीन कसे खेळतात त्यावर सामन्याचे भवितव्य ठरेल.

आधी 20-20 वर्ल्डकप
आणि आज चॅम्पियन ट्रॉफी
दोन वेळा ऑस्ट्रेलियाला नॉकआउट करून
2023 चा बदला पूर्ण

सलग तिसरी आयसीसी ट्रॉफी
सर्वच्या सर्व सामने जिंकून
भारतीय संघ पुन्हा एकदा
रोहीत शर्माच्या नेतृत्वाखाली
वर्ल्ड चॅम्पियन बनायला
फायनलमध्ये दाखल

जिंकले !!!!
मुख्य श्रेय कोहली - श्रेयस या भगिदारीला; कसलंही heroics नाहीं, शांतपणे एक - दोन धांवा घेत इतकी सुंदर धावसंख्या रचली ! छान खेळूनही मुख्य दोषी ठरले असते - अक्षर व पंड्या - अतिशय बेजबाबदार शॉट खेळून दडपण वाढवल्याबद्दल !!
ऑसीजनी अपेक्षित झुंज दिली पण कोहलीपुढे त्यांचं कांहीं चाललं नाहीं ! वेल प्लेड!!
भारतातर्फे गोलंदाजांनी देखील छान कामगिरी केली. ,अभिनंदन व शुभेच्छा !

मुख्य श्रेय कोहली - श्रेयस या भगिदारीला; कसलंही heroics नाहीं, शांतपणे एक - दोन धांवा घेत इतकी सुंदर धावसंख्या रचली !
+786
ते दोघेच क्लोज करतील सामना असे वाटले होते.

मुख्य श्रेय कोहली - श्रेयस या भगिदारीला >> +१ जबरदस्त इनिंङ बिल्ड केली. किती गॅपमधे टाकलेल्या सिंगल्स होत्या. पंड्या चा बाद होतानाचा शॉट बेजबाबदार होता. कदाचित दुखापतीमूळे सिंगल्स टाळण्याचा मोह झाला का ?

कोहली आज बाद जसा झाला ते जरा क्लेशकारक होते. राहुलने फोर सिक्स मारताच याला आपले शतक धोक्यात दिसले. त्या विचारात हाफ हार्टेड शॉट खेळला. सुदैवाने ते अंगाशी आले नाही.

कोहली माईलस्टोन्स डोक्यात ठेवून खेळतो असे तुला वाटत असेल तर 'देव तुला माफ करो' ह्यापेक्षा काहीही बोलू शकत नाही. त्याने क्लियरली तो राँग वन रीड केला नि शॉट मारला होता हे दिसत होते.

जगातला प्रत्येक स्क्वेअर पेग, आपल्या राऊंड होलमधे बसलाच पाहिजे हा अट्टहास कौतुकास्पद आहे. Happy

मस्तच खेळली आज टीम इंडिया. ह्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची बॉलिंग दुबळीच होती, पण त्यांची बॅटिंग आणि विजिगिषु वृत्ती त्यांची बलस्थानं होती. पण इंडियाने तुफान लढत दिली.

माईलस्टोन डोक्यात ठेवून खेळणे इट्स ओके.
शतकांचे रेकॉर्ड ठेवले जातात तर ते खेळाडूंच्या डोक्यात येणे स्वाभाविक आहे. खेळाडू सुद्धा माणसेच आहेत.
शतक जवळ आले की प्रत्येकाचा खेळ बदलतो. तसेच शतक झाल्यानंतर देखील अचानक बदलतो. हे आजवर कुणाला कळलं नसेल जाणवले नसेल तर आपल्या जगात खुश रहा. मी माझ्या जगात राहतो. कदाचित मीच काहीतरी वेगळे क्रिकेट बघत असेन.
पण प्रतिस्पर्धी कर्णधार सुद्धा त्यानुसार माइंड गेम प्लान करत असतात. त्यामुळे त्याचा फटका बसू नये इतकेच.

असो,

ODI World Cup
WTC
ट्वेंटी World Cup
Champion Trophy
या चारही फायनल खेळणारा जगातला पहिला आणि एकमेव कर्णधार झाला रोहीत शर्मा.

गेले तिन्ही आयसीसी ट्रॉफी मिळून आपण साधारण 23 सामन्यात फक्त एकच सामना हरलो आहे.

हा संघ निर्विवादपणे भारताचा आजवरचा सर्वोत्तम संघ आहे!
इतके सातत्याने यश मी आजवर पाहिले नाहीये. रोहित शर्माने धोनीला सुद्धा मागे टाकले आहे.

जगातला प्रत्येक स्क्वेअर पेग, आपल्या राऊंड होलमधे बसलाच पाहिजे हा अट्टहास कौतुकास्पद आहे. >> कौतुकास्पद पेक्षाही केविलवाणा शब्द जास्त चपखल वाटतो रे. तसेच ते विक्रमांचे आहे. एव्हढा हास्यास्पद करून ठेवला आहे रोहितला कि बस्स !

या धाग्यावर बॉडी शेमिंगबद्दल चकार शब्द नाही. ते बरे चालवून घेता. उलट टायपिंग मिस्टेक म्हणत पांघरून घालता.
पण तेच एखादा खेळाडू शतकाचा विचार करतो म्हटले की भावना दुखावून घेता.
त्यामुळे आता तुमच्या सिलेक्टीव्ह आक्षेपांबद्दल मला काही वाटेनासे झाले आहे Happy

असो, मला माझी मते मांडू द्या. तुम्ही तुम्हाला पटतील ती मांडा. वाटू द्या एकमेकांना एकमेकांची मते हास्यास्पद.

पण येत्या रविवारी रोहितच्या नेतृत्वाखाली आपण चॅम्पियन ट्रॉफी देखील सर्वच्या सर्व सामने जिंकून मिळवणार आहोत या आनंदात आज मस्त झोपू द्या.
शुभरात्री!

या धाग्यावर बॉडी शेमिंगबद्दल चकार शब्द नाही. ते बरे चालवून घेता. >> मी तुला मागेच सांगितले होते, माझ्या खांद्यावरून बंदूक ताणू नकोस. तूला प्रॉब्लेम वाटतो तर तू बोलू शकतोस. तुला मी कधीच थांबवलेले नाहिये. प्रत्येकाने प्रत्येक बाबतीमधे बोलले पाहिजे हा आग्रह शुद्ध मूर्खपणाचा आहे.

पण येत्या रविवारी रोहितच्या नेतृत्वाखाली आपण चॅम्पियन ट्रॉफी देखील सर्वच्या सर्व सामने जिंकून मिळवणार आहोत या आनंदात आज मस्त झोपू द्या. >> अशा कर्मदरिद्री विचारांपेक्षाही " आपण चॅम्पियन ट्रॉफी देखील सर्वच्या सर्व सामने जिंकून मिळवणार आहोत " ह्याचा मला अधिक आनंद होईल.

Pages