क्रिकेट - ९

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गेल्या तीन आयसीसी स्पर्धात आपण शर्माच्या कप्तानीत काय धुमाकूळ घातला आहे बघा.
२१ सामने २० विजय
याचे कौतुक आनंद आणि अभिमान आहे >>
गेल्या तीन टेस्ट सिरीज मधे आपण शर्माच्या कप्तानीत काय धुमाकूळ घातला आहे बघा.
९ सामने २ विजय, ६ पराजय
याचे काय लोणचे घालायचे आता ?

आणि माझे किंवा फे फ वगैरेच जाऊ दे पण जेव्हढे भाऊंसारखे जाणते लोक सांगतात कि बस्स तर मुद्दामहून अडाणी व्यक्तीसारखे अजून उत आल्यासारखे करायचे ? किती तो किस पाडायचा माणसाने ? बाफ बंद करूनच चैन पडणार का तुला ? कि इतरांनी इथे येऊच नये अशी इच्छा आहे ? तसे असेल तर सरळ सांग. शहाणी लोक येणेच सोडून देतील.

एक रोहित साठी सेपरेट बाफ आहे ना त्यात डकवतोच आहेस ना हे विक्रम ? बस्स कि मग.

आता ह्या उप्परही तू काहीतरी कोलांट्या मारशील ह्याची ७८६% खात्री आहे.

"किती तो किस पाडायचा माणसाने" - युनिक अ‍ॅप्रोच आहे.. एखादा आपल्याला आवडणारा/री खेळाडू/कलाकार घ्यायचा. मग आपण त्याला own करतो अशी भुमिका घ्यायची (जमलं तर त्याला एखादं लाडाचं नावही ठेवायचं). मग विषय असो - नसो, त्या सेलेब्रिटीविषयी असंबद्ध पोस्ट्स टाकत रहायच्या. कुणी आपल्या आचरटपणावर आक्षेप घेतला कि तो आपल्या आवडत्या सेलिब्रिटीवर केलेला आरोप आहे असं समजून, ती व्यक्ती आपल्या आवडत्या सेलेब्रिटीची शत्रू आहे अशी भुमिका घेऊन कांगावा करायचा... ह्या विषयात काही जणांची चौफेर तयारी असते.

इथे कोणी विदर्भाचा नाहीये का?
रणजी फायनल गेलेत आणि एक पोस्ट नाही इथे.

तिथे आमचा व्हॉट्सॲप ग्रूपवर सध्या विदर्भ रणजी फायनल खेळतो त्याचीच हवा आहे.
अर्थात एक दोन अपवाद सोडले तर सारेच विदर्भाच्या बाजूने आहेत.

सामना सुद्धा धमाल चालू आहे.
विदर्भ २४-३ वरून २३९-३
करून नायर धावबाद आणि डाव ३७९ ला थांबला.
दुसऱ्या दिवस अखेरीस केरळ १३१/३
आजचा तिसरा दिवस फार महत्वाचा आहे.
कारण पहिल्या डावाचा लीड किती महत्वाचा असतो हे आपण सेमीला पाहिले आहे.
ज्यांना ठाऊक नसेल त्यांच्यासाठी, केरळच्या ४५७ धावसंख्येला उत्तर देताना गुजरात ४५५ वर जाऊन थांबली. दोन धावा कमी पडल्या. आणि अखेरची विकेट देखील अत्यंत नाट्यमय पद्धतीने पडली. फॉ शॉर्ट लेग खेळाडूच्या हेल्मेटला बॉल लागून कॅच पकडली गेली. त्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता, कदाचित पाहिला असेल.

मी रणजी फॉलो करतो पण रणजीमधल्या ए़कूण खेळाडूंना मिळणारी ट्रीटमेंट बघता त्यात काय हशिल उरला नाही असे वाटते.

विदर्भ-केरळ फायनल इंटरेस्टिंग आहे. मुंबईचं आव्हान संपुष्टात आलं ते एका अर्थानं बरं झालं. दुसर्या सेशनमधे काही अपवाद वगळता प्रत्येक वेळी मुलाणी-कोटियन-ठाकूरच्या बॅटिंगने त्यांची लाज राखली होती.

केदार जाधव बाहेर पडणं महाराष्ट्र क्रिकेटसाठी गुड न्यूज आहे, त्यामुळे त्रिपाठीची वणवण थांबली. महाराष्ट्राने विदर्भाचा कित्ता गिरवून कोच आणि बाहेरच्या प्लेयर्समधे इन्व्हेस्ट करावं.

"पक्या आज कुणाची मॅच आहेरे."
"काय माहित..."
"बघ बघ. आज आपली आणि न्यूझीलंडची मॅच असायला पाहिजे."
"दादा नाही. आज आस्ट्रेलिया आणि अफ़गाणीस्तान ची आहे "
"ऑ, कमाल आहे. असं कसं रे."
"चालायचच, का म्हणून विचारायचं नाही. आपण फक्त पाणी टाकायचे "

भारताची मॅच रविवारी ठेवली आहे
कारण शेवटी हा नुसता खेळ नाही तर व्यवसाय सुद्धा आहे
स्पर्धेचे शेड्युल सुद्धा ब्रँड व्हॅल्यू बघून ठरवले जाते Happy

नुसते वेळापत्रक नाही तर ग्रुप सुद्धा
भारत पाक दरवेळी आमने सामने असतातच
भले आता बोर होऊ लागले त्यांना सतत हरताना बघून..

Ever since the last bilateral series was played between India and Pakistan, always these two fall in the same group

ICC CT13: They were in the same group

ICC T20 WORLD CUP 2014:- They were in the same group

Icc CWC 2015:they were again in the same group

Icc world 20 2016:- they were in the same group

Icc ct17:- they were again in the same group

Icc CWC 2019:- this time it was a round robin tournament……so no groups

Icc wt20 2021:- they were placed in the same group

Icc wt20 2022:- they were placed in the same group again

Icc CWC 23 : it was again a round Robin tournament

Icc wt20 2024: same groups again

Icc ct25:- same group again

Reason is simple: everyone watches ind pak matches. During ind pak matches,large amount of. Viewership is generated.70 Percent of icc’s revenue is generated by india since other countries don't consider this sport seriously.icc is rigged!!!!!

Vidarbha vs Kerala, Final
Ranji Trophy

KER 272/5 (92.2 ov)
VIDAR 379
Sachin Baby* 71(185)
Mohammed Azharuddeen 32(56)
Darshan Nalkande 2/41 (11.2 ov)
Day 3 - Session 2: Kerala trail by 107 runs.

सचिन आणि अझर नडत आहेत Happy

समजल सर.
सरतेशेवटी आपण क्रिकेट आणि लंगडी या खेळातले सुपर पॉवर आहोत ना.

क्रिकेट आणि साउथ आफ्रिका हा फॉर्म्युला जमून आला की पाऊस पडतो. मी मुख्यमंत्री झालो तर महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात स्टेडियम बांधेन आणि आफ्रिकेला खेळवायला बोलवेन. #दूरदृष्टीमुख्यमंत्रीबोकलत

अफगाणला वॉश आऊट मिळाला हे बरेच झाले. मॅच थांबली तेंव्हा ते हरतीलच अशी चिन्हे दिसत होती. आता किमान आफ्रिका हरली तर अफगाणला सेमी मधे जाण्याचा चान्स तरी मिळेल. परत त्या निमित्तने आपली मॅच्पण अधिक इंटरेस्टींग ठरेल.

आता किमान आफ्रिका हरली तर अफगाणला सेमी मधे जाण्याचा चान्स तरी मिळेल
>>>>
दोनेकशे धावांनी हरली तर..

<<दुष्काळी भागात स्टेडियम बांधेन आणि आफ्रिकेला खेळवायला बोलवेन.>>
आणि तिथे पाउस पडला तरी तिथल्या लोकांना बरेच होईल. मग जिथे पाउस पाहिजे असेल तिथे दक्षिण अफ्रिकेला मॅच खेळायला बोलवायचे, पैसे देऊन सुद्धा ते चांगलेच होईल.

मला आठवतंय, भारत व नेल्सन मंडेला यांच्यामुळे द. अफ्रिकेवरील क्रिकेटबंदी उठली होती व नंतरच्या पहिल्याच मोठ्या स्पर्धेत ते पावसामुळेच बाहेर फेकले गेले होते. इराण्याच्या हॉटेलात आमच्या टोळक्यातला कुणी तरी म्हणाला, 'आज नको ठेवायला पाहिजे होती त्यांची मॅच'. त्यावर, ' अरे, आजच काय, मंडेला खेळले असते, तरी बिचारे हरलेच असते ' असा फालतू जोक मी केला होता व त्याची शिक्षा म्हणून टेबलाचं चहा, ब्रूनमस्का व सिगरेटसचं बिल मला भरावं लागलं होतं !
मुद्दा - द. आफ्रिका व पाऊस यांचं हे विळा - भोपळ्याचं
सख्य फार प्राचीन काळापासूनचंच आहे व त्यातच त्यांना बिचाऱ्याना ' चोकर्स ' हाही मग छाप मारण्यात आला !! ही स्पर्धा भारतात असती, तर निदान कुंभमेळ्यात डुबकी मारून कदाचित यातून शापमुक्त तरी झाले असते. पण तेही नशिबी नव्हतं त्यांच्या !!! Wink

मंडेला Proud

बाई दवे तो सामना म्हणजे १३ बॉल २२ चे १ बॉल २१ झालेले तोच का?

*झालेले तोच का?* - नक्की नाही आठवतं पण पावसाने त्यांचा घात केला होता हे नक्की आठवतंय. कांहीं द. आफ्रिकेचे खेळाडू अक्षरश: रडले होते पाऊस बघून, हेही आठवतंय !( वयोमानानुसार, इतकं आठवतंय हेही मोठ्ठं नशीबच ! Wink )

मुद्दाम सर्च केलं. होय, हीच ती 1992च्या विश्वचषकातील The Silly Semifinal ! -

1992
The World Cup semi-final that ended in farce. South Africa needed 22 off 13 balls to beat England in Sydney when rain stopped play. Ten minutes later the players were back on... and South Africa needed 21 off one ball. Blame the lowest-scoring-over rain rules, which ruined a cracking contest, and South Africa's dilatoriness - they bowled only 45 overs in the time allotted, and as a result many people felt they got their just desserts. England made 252 for 6, with Graeme Hick thumping 83 and Dermot Reeve bustling 25 off 14 balls. Even though nobody reached 50, South Africa were always in the hunt until the rain came. It meant England had qualified for their third World Cup final in the last four. Three days later they lost their third World Cup final in the last four.

बालपणीची अगदी सुरुवातीच्या काळातील क्रिकेटची ठळक आठवण आहे ती लाईव्ह पाहिलेली. त्यामुळे ते आकडे, ते खेळाडू, ती सिच्युएशन.. सारे लक्षात आहे. तेव्हा आफ्रिकेबद्दल एक वेगळीच आपुलकी होती Happy

शिवाय, 21 वर्षांची बंदी नोव्हे. 1991 ला उठल्यानंतर द. आफ्रिका प्रथमच मोठी स्पर्धा खेळत होती व त्यात फायनलला जाण्याची संधी मुख्यात: पावसामुळे हुकणे, याचं दुःख कमालीचं होतं. सर्वानाच याचं वाईट वाटलं होतं. पण पाऊस असाच त्यांना सदैव पिडत राहणार, याची मात्र कुणालाच त्यावेळी कल्पना नव्हती !

ह्या धाग्यावर भाउंची व्यंगचित्रे धमाल आणतात.
इथली match review चर्चा आवडते.
बाकी चर्चेतून आधुनिक म्हणी लिहायला मटेरियल सापडते Proud

झकासराव, अनुमोदन.
मला काळजी वाटते आहे की फायनलला जर भारत वि. द. अफ्रिका असे झाले तर त्या मॅचचे काय होणार?
पावसामुळे उगीचच डकवर्थ लुइस वगैरे नियम लावून निर्णय लागेल?
मला डकवर्थ लुइस अजिबात मान्य नाही. एका बाजूला म्हणायचे Cricket is a game of uncertainty, आणी मग त्याला कसलेतरी लॉजिक लावायचे! शेवटच्या षटकात सामना पलटू शकतो हे सांगायला पाहिजे का? मग शेवटचे षटक संपल्यावरच सामन्याचा निर्णय लागेल, तो पर्यंत अनिर्णित. वाटल्यास दुसर्‍या दिवशी पुनः खेळा. ते काय अमेरिकन क्रिकेट संघातल्या लोकांसारखे पार्ट टाईम खेळाडू नाहीत. त्यांना दुसरा काय धंदा आहे?

सेमी फायनलला सोप्पी प्रश्नपत्रिका मिळावी म्हणून हे आज मुद्दामून हारणार आहेत.

*मला डकवर्थ लुइस अजिबात मान्य नाही. * - सहमत. जरी खूप विचारपूर्वक हा फॉर्म्युला तयार केला असला, तरीही प्रत्यक्षात तो कधीही समाधानकारक तर नाहीच वाटला पण खूपदा विपरीतच वाटला !!

*सेमी फायनलला सोप्पी प्रश्नपत्रिका मिळावी म्हणून हे आ मुद्दामून हारणार आहेत.* - प्रश्नपत्रिका सोपी
मिळण्यासाठी चॅम्पियनची मानसिकताच सोडण्याचा प्रकार होईल तो ! Wink

आफ्रिका आणि कांगारूचे दुर्दैव गटातील स्थान निश्चित होऊनही त्यांनी उपांत्य सामन्यात नक्की कुठे खेळायचे हे भारत ठरविणार. Proud

मुद्दाम बिलकुल नाही हरणार...
ऑस्ट्रेलिया आफ्रिका न्यूझीलंड तिन्ही तगड्या टीम आहेत या स्पर्धेतील. यातील दोन संघाना हरवावेच लागणार आहे. आणि आपण ते करू शकतोच. त्यामुळे फार विचार करत नसतील खेळाडू. आज अशी स्थिती झाली ते चांगलेच आहे. अशी सिच्युएशन कशी हाताळावी याचा तेवढाच सराव. पण जिंकायला हवे. त्याने कॉन्फिडन्स वाढेल

Pages