क्रिकेट - ९

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोहितचं शतक, तेही रुबाबात, स्वतःच्या आक्रमक, शैलीदार खेळाचं प्रात्यक्षिकं देत !! सार्थक झालं सामना पाहील्याचं !!

वन-डे चा फॉर्मॅट शर्मा-कोहली ला सूट होतो आणि आज शर्माला फॉर्मही गवसला. मस्त सेंच्युरी मारली. इंडियासाठी आणि त्याच्यासाठी, चँपियन्स ट्रॉफी च्या दृष्टीनं खूप सुखावह गोष्ट आहे.

हार्दिक पंड्या सोडून आज आपले फलंदाज खूप जबाबदरिने व समयोचीत खेळले ! धावांची सरासरी प्रथमपासूनच 7च्या वर ठेवून, नंतर तें दडपण येवू दिलं नाहीं. कोहली एका अप्रतिम चेंडूवर बाद झाला. बॅड लक ! श्रेयस व अक्षर आपलं संघातल स्थान बळकट करताहेत, हे विशेष ! संघात एका चांगल्या लेग स्पीनरची उणीव मला तरी तीव्रतेने जाणवते !
आपल्या संघाला - अभिनंदन व शुभेच्छा !

आज सुरुवातीपासूनच जो कंट्रोल होता तो दिसून येत होता.
म्हणून मी आज आमच्या ग्रूपवर त्याचा प्रत्येक रनची लाईव्ह कॉमेन्ट्री देत होतो.. इथेही दोन चार पोस्ट टाकल्या..
कारण आज सुरुवातीलाच लक्षात आले की फॉर्ममध्ये यायची खेळी लोड होतेय.

आता जरा मजा येईल चॅम्पियन ट्रॉफी बघायला. कारण आयसीसी स्पर्धात सारे संघ आपले प्रमुख गोलंदाज उतरवतात. आणि हा माणूस वर्ल्डक्लास गोलंदाजांना सुद्धा ठोकून काढतो..

रो सुपरहिट शर्मा. चॅम्पियन ट्रॉफी गाजवणार. इंग्रजांचं नशीब की १८५७ च्या उठावात रोहित न्हवता नाहीतर तिथेपण हे हारले असते. रोहित मागच्या जन्मी चंपानेरच्या टीमचा कॅप्टन होता ज्याने इंग्रजांना हरवून सगळ्या गावचा लगान माफ केला होता.

नॉन प्लेईंग कर्णधार असी गरज आहे का खर तर ? कोच नि सपोर्ट स्टाफ आहेतच ना . कर्णधाराचे खर मूल्य मैदानावर उपस्थित राहून थिक ऑफ द थिंग्स असते असे मला वाटते. मैदानाबाहेर राहून करण्यात काहि अर्थ नाही.

आज शर्माला फॉर्मही गवसला. मस्त सेंच्युरी मारली. इंडियासाठी आणि त्याच्यासाठी, चँपियन्स ट्रॉफी च्या दृष्टीनं खूप सुखावह गोष्ट आहे. >> +१. आता कोहली नि राहुललाही गवसला म्हणजे दूधात साखर पडल्यासारखे होईल. शेवटी ह्या तिघांच्या जीवावर सामने काढू शकतो.

रोहितचं शतक, तेही रुबाबात, स्वतःच्या आक्रमक, शैलीदार खेळाचं प्रात्यक्षिकं देत >> बर्‍याच दिवसांनी जुना रोहित बघितल्यासरखे वाटले. त्याने पुल (त्याचा रीलीज शॉट आहे) कमी मारले पण तरीही नीट ठोकठाक केली हेही विशेष.

रोहितने आज जवळपास 50 होईपर्यंत तरी पुल मारला नाही वाटते आणि हे त्याने ठरवून केले असे वाटले. त्यामुळे त्याचे विशेष कौतुक वाटले. कारण तो आपला गेम प्लान ठरवून आलेला. आणि तरीही त्याचे ३० चेंडूत अर्धशतक झाले हे त्याचा हिटिंग क्लास दाखवते.

मध्यंतरी कुठेतरी कॉमेंट वाचली होती. तो फेल जातोय आणि त्यातून बाहेर पडायला तो विशेष काही करत सुद्धा नाहीये..
पण असे नसते. नेट्स मध्ये मेहनत घेणे चालू असतेच. फक्त ती दिसून येत नाही. पुन्हा सूर गवसत अशी एखादी खेळी येइपर्यंत..

या खेळीची त्याला किती गरज होती हे आपल्या सर्वाँना माहीत आहे. तरीही शतकाजवळ ९६ वर असताना त्याने रशीदला पुढे सरसावत सिक्स मारत एक स्टेटमेंट दिले. हे शर्माचं करू शकतो. आणि गंमत म्हणजे तो सिक्स मारूनच शतक करणार असे वाटतच होते. असा विश्वास देखील त्याच्या बद्दलच वाटू शकतो.

आज आपल्या इनिंगच्या सुरुवातीलाच मैदानावर एक बोर्ड वाचला. वन सेंचुरी फॉर.. त्याच्या मुलाचे नाव होते.
आणि त्याने खरेच सेंच्युरी मारली.
पण आजची त्याची सेंचुरी त्याच्या चाहत्यांसाठी आणि तमाम भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी होती असे वाटते.

रोहीत इज बॅक, गिल सातत्य राखून, अय्यर सुद्धा तेच करतोय, लोअर मिडल ऑर्डर म्हणजे अक्षर पांड्या जडेजा सुद्धा ठिकठाक वाटत आहेत. अश्यात राहुल ऐवजी पंत खेळवू शकतो आता असे वाटते.

“आता कोहली नि राहुललाही गवसला म्हणजे दूधात साखर पडल्यासारखे होईल. शेवटी ह्या तिघांच्या जीवावर सामने काढू शकतो.” - +१

शुभमन, जडेजा फॉर्ममधे आहेत. होपफुली, Bumrah can hit the ground running. कुलदीप-शामी त्यांच्या वर्ल्डकप मधे होते त्या फॉर्ममधे यायला हवे. मजा येईल चँपियन्स ट्रॉफीला.

Most sixes in ODIs
351 Shahid Afridi 369 innings
335 Rohit Sharma * 259 innings
331 Chris Gayle 294 innings

काल शर्माने गेलला मागे टाकले.
आफ्रिदी लवकरच.
बरे झाला फॉर्म आला. यात निवृत्त झाला असता तर हा रेकॉर्ड कायम आफ्रिदी नावे राहिला असता.

*यात निवृत्त झाला असता तर हा रेकॉर्ड कायम आफ्रिदी नावे राहिला असता.* - त्याहीपेक्षा , यात निवृत्त झाला असता तर त्याच्या अगणित, अप्रतिम खेळी पाहिल्याच्या निखळ आनंदात उगीचच त्याच्या हल्लीच्या निराशाग्रस्त खेळी मिठाचे खडे टाकत राहिल्या असत्या !!

राशीदने रोहितचा उलटा धांवत जावून घेतलेला झेल ' 83च्या विश्वचषक फायनल मध्ये कपिलने विव्ह रिचर्ड्सच्या घेतलेल्या कॅचची आठवण करून देणारा होता. राशिदचं फ्लाईट, टप्पा व चेंडू वळवणे यावरील प्रभुत्व कौतुकास्पद !

गिलची फटकेबाजी सफाईदार, शैलीदार व अधिकार दर्शिक असते. लव्ह वॉचिंग हिम बॅट !!

हार्दिक पंड्या - माझा खूप गहिरा पूर्वग्रह असावा याच्याबद्दल. पण आपल्याला सारं येतं व शिकण्यासारखं कांहीं शिल्लक नाही, अशीच जणू त्याची देहबोली वाटते मला . तसं नसावं पण असेल तर त्यानें तत्काळ ती समजूत त्याग करावी; खूप सुधारणा होईल त्याच्या खेळात ! Wink

तर त्याच्या अगणित, अप्रतिम खेळी पाहिल्याच्या निखळ आनंदात उगीचच त्याच्या हल्लीच्या निराशाग्रस्त खेळी मिठाचे खडे टाकत राहिल्या असत्या !!
>>>>>>

हो अगदीच.

मला सुद्धा त्याचसाठी त्याने निवृत्ती घ्यावी असे वाटत होते.
कारण असा तो आयुष्यात पुन्हा खेळेल असे वाटले नव्हते.
पण काय कमाल खेळी होती. हा माणूस गेले दहाबारा इनिंग बॉल शोधत होता ते खरे की हे खरे हा प्रश्न काल पडला..

कसोटी कप गेला पण या नादात.. रोहीत नेहमीचा असता तर आपण किमान २-१ ने जिंकलो असतो न्यूझीलांड मालिका..
पण आता लक्ष चॅम्पियन ट्रॉफी

व्वा: !! गिल शतकं, विराट, श्रेयस ( नाबाद) अर्धशतक !!
अगदी वेळेवर फॉर्ममध्ये येताहेत वाटतं सर्व जण. गेल्या विश्वचषका नंतर झालेल्या एकदिवसीय सामन्यांत 33 डावात 53+ च्या सरासरीने धांवा काढून जागतिक क्रमवारीत श्रेयस दुसऱ्या स्थानी आहे, असं आकडेवारी सांगतेय !!!
रशीद आपल्या फलंदाजांना अडचणीत आणतोय व आपल्याकडे एकही चांगला लेगस्पीनर नाहीं, या दोन्ही गोष्टी चिंताजनक आहेत व त्यावर लक्ष देणे अत्यावश्यक !

इंग्लंडचा तीन शून्य धुवा
मागच्या सामन्यात फलंदाज शर्मा फॉर्मात आला,
आजच्या सामन्यात कप्तान शर्मा फॉर्मात आला.

*India's biggest margins of victory against England in men's ODIs:*

158 runs, Rajkot 2008
142 runs, ahmadabad Today

सुंदर / जाडेजा/ अक्षर ह्यातले कोणी तरी दोन एव्हढा बदल वगळता बहुधा हाच संघ चँपियन्स ट्रॉफी खेळेल असे वाटते. पहिले पाच परत भरात येणे जबरदस्त बातमी आहे. पांड्या नि वरच्या तिघांमधले जे कोणी दोन असतील ते गरज पडली तर काँपीटेटीव्ह स्कोअर द्यायला खेळू शकतील. ड्यू वगैरे गोष्टींमूळे सामन्यांचे निकाल ठरायला नको अशी आशा ठेवूया.

रशीद आपल्या फलंदाजांना अडचणीत आणतोय >> मुख्यत्वे कोहली असे वाटते. बाकीचे हँडल करू शकत आहेत नि डॉमिनेट करायला जाताना बाद हो आहेत असे वाटले. अक्षर किंवा जाड्जाला फ्लोटर म्हणून वापरून अशी थ्रेट कमी करता येईल गरज पडली तर ना ?

रोहित शर्माने रशीदलाच सिक्स मारून आपले शतक साजरे केले ना..
कोहली बाबत वन डे मध्ये वेगवान नाही तर स्पिनर जास्त त्रास देणार याची शक्यता आहेच.. स्पेशली बॉल बाहेर नेणारे

“ सुंदर / जाडेजा/ अक्षर ह्यातले कोणी तरी दोन एव्हढा बदल वगळता” - जडेजा आणि अक्षर खेळतील / ह्यांनी खेळावं असं मला वाटतं. हे दोघंही सुंदरपेक्षा जास्त काँपिटंट बॉलर्स आहेत - रन्स रोखणं आणि विकेट्स घेणं ह्या दोन्ही बाबतीत. बॅटिंगमधेही हे दोघं जास्त मॅच्युरिटीने खेळतात.

*रोहित शर्माने रशीदलाच सिक्स मारून आपले शतक साजरे केले ना..* - याचा अर्थ त्याने रशिदवर प्रभूत्व मिळवलं असा होत नाही. लेग स्पीनरचा तो ' ट्रॅप ' ही असू शकतो !
मला संघात चेंडूला फ्लाईट देणारा एक तरी गोलंदाज, लेग स्पीनर असेल तर उत्तमच, असावा असं वाटतं.

Pages