क्रिकेट - ९

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो ज्या पद्धतीने बाद होत आहे ते पाहून आता revival ची आशा नाही दिसत. >> तो ज्या रितीने बाद होत होत होता त्यात वयामूळे स्लो झालेल्या रिफ्लेक्स्चा वाटा आहे असे मला वाटते. ऑफ स्टंपबाहेरच्या बॉल्स नी करीयरच्या सुरूवातीला त्याला सतावल्यावर त्याचा तोडगा म्हणून त्याने क्रीजबाहेर गार्ड घ्यायचा नि थोडासा ओपन स्टान्स घ्यायचा ह्यात मधममार्ग शोधला होता. स्क्वेअर कट किंवा ड्राईव्ह हा शॉट तो फारच क्वचितच खेळतो पण ऑफ, कव्हर नि एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह ही त्याचे बलस्थाने होती (आहेत). त्यामूळे ऑफ च्या बाहेर पडलेल्या बॉल वर त्याच्या बदलत्या अ‍ॅप्रोचवर धुमाकूळ घालू शकला. वाढत्या वयाबरोबर हेच ड्राईव्ह खेळण्यासाठी जिथपर्यंत पोहोचावे लागते त्या लेंग्थला पोहचायला होणारा उशिर हा त्याचा कमकुवत दुवा झाला आहे. अर्थात अजून बाहेर स्तान्स घेणे शक्य नाही त्यामूळे बॉल्स सोडून देणे किंवा अगदीच लॉज बॉल्स ची वाट बघणॅ एव्हढेच पर्याय उरतात. नुसताच स्ट्राईकवर राहिला तर कधि ना कधी तरी एखाद्या चांगल्या बॉलवर विकेट जाणार हा प्रॉब्लेम. परत त्याचा एकंदर बॅटींग चा अ‍प्रोच नेहमीच पॉझिटीव्ह राहिला आहे त्यामूळे रन स्कोअरीम्ग हे डी एन ए मधे असल्यासारखे आहे हा दुसरा वांदा. एकूण काय तर कोणी तरी आही तरी जिनियस उपाय शोधला तरच रीव्हाय्व्हल शक्य आहे. कोहली हा क्लच प्लेयर आहे त्यामूळे तो अजूनही काही करेल ह्या आशेवर खेळावले जाते.

*कोहली हा क्लच प्लेयर आहे त्यामूळे तो अजूनही काही करेल ह्या आशेवर खेळावले जाते.* - इतक्या दीर्घ काळच्या निराशाजनक कामगिरी नंतर कोहलीला ' क्लच प्लेयर ' म्हणणं (व म्हणून खेळवत रहाणं ) जरा खटकतंच ! कोहली हा रिफ्लेक्सेसपेक्षाही तंत्र, अथक सराव व फिटनेस यावर अधिक भिस्त ठेवणारा खेळाडू असल्याची त्याची ख्याती आहे. त्यामुळे, वयामुळे रिफ्लेक्सवर होणारा परिणाम त्याच्या खेळासाठी कमी घातक असावा व असामान्य जिद्दीमुळे तो ही कमतरता मेहनत घेवून भरून काढेल, या आशेवरच त्याला खेळवत असावेत !

भाऊ फिटनेस कितीही चांगला असू दे, वयानुसार स्लो होणारे रीफ्लेक्स कोणालाच चुकले नाहि आहेत. क्लच प्लेयर बद्दल मला असे वाटते कि फॉर्मॅट नि क्लच वागणे ह्यात भेदभाव करणे कठीण आहे. असे प्लेयर्स मूळातच दुर्मिळ असतात त्यामूळे त्यांना लाँग रोप देताना थोडे झुकते माप दिले जातात.

असामीजी, मान्य !
आजच माझ्या एका मित्राने मला ग्रेग चॅपेल याचं
महान फलंदाजांच्या निवृत्ती नजीकच्या मानसिक व शारीरिक अवस्थेचं अचूक, अभ्यासपूर्वक केलेलं अप्रतिम तपशीलवार विश्लेषण पाठवलं आहे. गावसकर, सचिन व कोहली यांचा त्यात आदरपूर्वक संदर्भही दिला आहे. शिवाय, चाहत्यांसाठीही अशा महान फलंदाजांबाबत मोलाचा सल्लाही दिला आहे -
As fans, we must celebrate these players not just for their peak performances but for their resilience in the face of decline. Instead of critiquing their struggles, we should honor their journey and the lessons they impart about the human spirit !

पूर्वी होडी कमी पडायची मासे ठेवायला, आता एकेका माशासाठी बसतोय असा तासनतास ! बहुतेक, गल्लत झालीय माशांची, कोळी व कोहली यामधे !!20181226_182418_0.jpg

वरुण चक्रवर्ती पाच विकेट
याला घेऊन जा चॅम्पियन ट्रॉफी
वन डे खेळवायला हव्या होत्या.
गेले वर्षभर फॉर्मात आहे.
✓✓✓
घेतले वाटते याला वन डे संघात

Instead of critiquing their struggles, we should honor their journey and the lessons they impart about the human spirit >> काय परफेक्ट लिहिलय ना ! मस्त भाऊ. त्याच्या पुस्तकामधए वाचल्याचे आठवत नाही. शक्य असेल तर पूर्ण लेख शेअर करू शकाल का ?

गेले वर्षभर फॉर्मात आहे. >> घेतलय कि !

*पूर्ण लेख शेअर करू शकाल ?* - माझ्या मित्राने लिंक न पाठवता पूर्ण लेखच ' कॉपी पेस्ट ' करून मला ' मेल ' केलाय. धाग्यावर पोस्ट करण्यासारखा तो संक्षिप्त नाहीय. बघतो, तुम्हाला ' विपु ' त पाठवता येतो का.
( आपल्या ' वीपु 'त पाठवला आहे )

घेतलय कि >>> हो, आधीची पोस्ट होती माझी. इच्छा पूर्ण झाली. वन डे मध्ये चमकावे त्याने. मिळाले तिकीट तर मिळाले.. त्याला स्वीप मारत डॉमिनेट करणे अवघड जात होते इंग्लिश फलंदाजांना. हा प्लस पॉइंट कामात येईल सेना देशांशी खेळताना.

राहुल यष्टि. आत - पंत बाहेर
अय्यर आत - कोहली बाहेर

३ डावखुरे फिरकी गोलंदाज - जाडेजा अक्षर कुलदीप
पैकी एकाला वगळून सुंदरला खेळवायला हवं होतं आज.

@नागपूर एकदिवशीय सामना.

*संझगिरी गेले, वाईट झाले* - श्रद्धांजली !!
क्रिकेटने नेव्हील कार्डस सारख्या अनेक लेखकांना प्रेरित करून दर्जेदार लिखाण निर्माण केलं. बॉबी तल्यारखान, के एन प्रभू ( इंग्लिश), कणेकर, संझगिरी ( मराठी ) इ इ आपल्या माहितीतील ठळक लेखक. क्रिकेटचा आनंद द्विगुणित करणाऱ्या या सर्व प्रतिभावंताना प्रणाम !

द्वारकानाथ संझगिरी .. लिखाणावरून. नेहमीच तरुण वाटायचे.. त्यामुळे आजारातून उठतील असे वाटले होते.. पण नाही झाले.. भावपूर्ण श्रद्धांजली !

249 विजयाचं लक्ष्य. कठीण नाही, पण सोप्पंही नाहीं ! राहुलचं यष्टीरक्षण बरं झालंय पण खरी कसोटी फलंदाजी हीच आहे ! आक्रमक फलंदाजीसमोर पंड्याची गोलंदाजी निष्प्रभ होते, असं बऱ्याच वेळा जाणवतं. त्यानें गोलंदाजीत वैविध्य आणण्यावर , विशेषतः ' चेंज ऑफ पेस ' वर अधिक मेहनत घ्यावी असं वाटलं.
रोहितवर फलंदाजीत आज विशेष दडपण असेल. शुभेच्छा.

पांड्याने आल्या आल्या सिक्स मारला. त्यामुळे शतकाजवळ आलेला गिल टेन्शनमध्ये आला. त्याने ही मग झटपट धावा जमवायला पुढच्या ओवरच्या पहिल्याच बोलला फोर मारला. अजून एक शॉट खेळायला गेला आणि बाद झाला.

जिंकलो पण कच्चे दुवे पक्के न होता ! रोहित ज्या तऱ्हेने बाद झाला, तें फारच निराशाजनक होतं. राहुलचंही तेच!

कालची हायलाइट्स पाहिली.
अभिषेक शर्माचे बरेच सिक्स गेलची आठवण करून देत होते.
हा या फॉरमॅट मध्ये सिक्सचा विक्रम रचणार हे नक्की..

द्वारकानाथ संझगिरी .. लिखाणावरून. नेहमीच तरुण वाटायचे.. >> +१ त्यांच्या लिखाणात तोचतोचपणा जाणवायला लागला होता जो वयोमानपरत्वे साहजिकच होता. तरीही त्यांनी लिहिले म्हटले कि वाचले जायचेच Happy

पांड्याने आल्या आल्या सिक्स मारला. त्यामुळे शतकाजवळ आलेला गिल टेन्शनमध्ये आला. >> गिलचे शतक व्हावे म्हणून राहुल विचित्र पणे खेळला नि बाद झाला त्यामूळे पांड्याने बॉलच्या लायकीप्रमाणे खेळणे चुकीचे नव्हते. (पांड्या च्या जागी रोहित किंवा पंत होता असा विचार केल्यास हे पटेल) गिल ने पहिला चौका मारल्यावर दुसर्‍या बॉलला परत मारायची गरज होतीच का असा विचार करून पहा. अजून तीन बॉल बाकी होते नि शेवटी स्ट्राईक रोटेट करता आला असता एव्हढा टच मधे दिसत होता.

मी वरची पोस्ट माझे निरीक्षण आणि तर्क म्हणून लिहिली. त्यात कोणाला दोष वगैरे द्यायचा नाहीये. की कोणाचे कौतुक करायचे नाहीये.

मुळात मी पांड्याचा सिक्स पाहिला नाही.
गिलचा पहिल्या बॉलचा चौका पाहिला नाही.
गिल बाद झाला तो बॉल मात्र FOW मध्ये पाहिला.

मला गिलचा स्वभाव माहीत आहे. त्याला शतकांची हाव आहे असे माझे निरीक्षण आहे. पण ठिक आहे. बरेच खेळाडूना कमी जास्त असते. त्याची खेळायची शैली पाहता तो २०-२० साठी अयोग्य पण वन डे साठी आदर्श खेळाडू आहे. येत्या काळात वन डे मध्ये त्याची आणि यशस्वीची जोडी सचिन सेहवाग, रोहीत शिखर प्रमाणे जमू शकते.

रात्री हायलाईट बघेन.. मला आय्याराची बॅटिंग बघायची आहे. तो डोमेस्टिक मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये होता.. आणि जग जिंकत सुटलेला. पण मी त्याला खेळताना पाहिले नव्हते. त्यामुळे कसा खेळतोय ते बघायचे आहे.

त्यात कोणाला दोष वगैरे द्यायचा नाहीये. की कोणाचे कौतुक करायचे नाहीये. >> मूळ पोस्ट मधे दोन वाक्यांना जोडणारे उभयान्वयी अव्यय काय वापरले आहेस ते पाहा बरे.

मी वरची पोस्ट माझे निरीक्षण आणि तर्क म्हणून लिहिली. >> निरीक्षण म्हणतोस नि वर परत "मुळात मी पांड्याचा सिक्स पाहिला नाही.
गिलचा पहिल्या बॉलचा चौका पाहिला नाही.
गिल बाद झाला तो बॉल मात्र FOW मध्ये पाहिला."

निरीक्षण आजच्या मॅच पुरते नाही ओ.. इतके क्रिकेट बघितले आहे आजवर. गिल याला सुद्धा बरेच खेळताना पाहिले आहे. माणसे अमुक तमुक सिच्युएशन मध्ये कशी आणि का वागतात याचे निरीक्षण करणे हा छंद आहे माझा. त्यामुळे विविध मानवी स्वभावाचा अंदाज आहे मला. कुठल्या क्रिकेटच्या पुस्तकात नाही सापडणार हे.. आणि तुम्हाला समजले नाही किंवा पटले नाही तर समजावून किंवा पटवून सांगू सुद्धा शकणार नाही Happy

“ त्यांच्या लिखाणात तोचतोचपणा जाणवायला लागला होता जो वयोमानपरत्वे साहजिकच होता. तरीही त्यांनी लिहिले म्हटले कि वाचले जायचेच” - संझगिरिंना श्रद्धांजली!!

“ मला गिलचा स्वभाव माहीत आहे.” - Uhoh मायबोलीचा ‘लखू रिसबूड‘ Lol

निरीक्षण आजच्या मॅच पुरते नाही ओ.. इतके क्रिकेट बघितले आहे आजवर. गिल याला सुद्धा बरेच खेळताना पाहिले आहे. >> आधी किती वेळा गिलला शतक जवळ आल्यावर रॅश शॉट मारून बाद झालेले पाहिले आहे नक्की ? इथे "पांड्याने आल्या आल्या सिक्स मारला. त्यामुळे शतकाजवळ आलेला गिल टेन्शनमध्ये आला." ह्यात "त्यामूळे" शब्द वापरला नसतास तर समजूनही घेता आले असते. आता उगाच शाहजोगपणे सारवासारव करतो आहेस हे उघड दिसते आहे.

‘लखू रिसबूड‘ >> Happy एकदम शोभतो खरा !

त्यामूळे" शब्द वापरला नसतास तर समजूनही
>>>
पण त्यामुळे हा शब्द मी वापरलाच आहे. ते कुठे नाकारत आहे. सारवासारव कसली त्यात. त्यामुळेच तर झाले हे नंतरही बोलत आहेच.

आधी किती वेळा गिलला शतक जवळ आल्यावर रॅश शॉट मारून बाद झालेले पाहिले आहे नक्की ?
>>>>
कधीच नाही.. तेच तर बोलत आहे.. पांड्या ने सिक्स मारताच त्याला समजले की आपण आता मारले नाही तर पांड्या सामना संपवणार आणि आपले शतक राहणार.. त्यामुळे त्याने मारला.. त्यात गेला.

लखू रिसबूड‘ >> Happy एकदम शोभतो खरा
>>>>

तुम्ही मला ओळखू शकता.. मी कसा आहे कसा शोभतो.. यावर कॉमेंट करू शकता.. जणू माझ्या बारशाचे जेवला आहात.. माझ्या शेजारीच राहता..

पण तेच मी गिलबाबत काही अंदाज लावला तर तो तेवढा हवेतला Happy वाह रे दुनिया !

असो,
त्या दिवशी शर्माबद्दल बॉडी शेमींग कॉमेंट आल्या ते कोणाला खटकले नाहीत ..
("शर्माजींच्या गोबर्‍या गालांचे गालगुच्चे घ्यायला आणि थुलथुलीत पोटाला चिमटे काढायला तिकिटं लावून पैसे कमवू शकतील.")

मी गिलबाबत बांधलेल्या अंदाजाचा किस पाडण्यापेक्षा क्रिकेटप्रेमी म्हणून अशा कॉमेंटला विरोध करा. निषेध नोंदवा. अन्यथा ही वृत्ती वाढत जाईल..

पण पंतला एक नाही तर अनेक वेळा पॅन्ट म्हटले गेले तर आपण म्हणे टायपिंग मिस्टेक झाली असेल..

असो
शुभ रात्री

मला तुझं ते ' पुल शॉट ' , ' लेग गलांस ' इ इ ,यांतल कांहीं कळत नहीं: फक्त 'लेग पुलिंग' चालतं ना आमच्या माबोवरच्या क्रिकेटमध्ये, तें मात्र मी जाम एन्जॉय करते !!20190102_225036_0.jpg

“ पण तेच मी गिलबाबत काही अंदाज लावला” - ‘आज पाऊस पडू शकेल‘, ‘पुढच्या मॅच मधे कदाचित कोहली आणि शर्मा फॉर्ममधे येतील‘ - हे झाले ‘अंदाज’ (guess)

“ मला गिलचा स्वभाव माहीत आहे” - हे झालं ‘विधान’ (factual statement)

Pages