क्रिकेट - ९

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला एखाद्याचा स्वभाव माहीत आहे म्हणजे तो अंदाजच झाला, वैयक्तिक मतच झाले..

शाहरूखच्या जवान चित्रपटाने हजार कोटीचा धंदा केला.
मस्त पिक्चर होता.
यातले पहिले विधान fact आहे तर दुसरे माझे मत.

जसे वर तुम्ही माझ्यावर जी कॉमेंट केली ते तुमचे माझ्याबद्दलचे मत आहे.

बरे ते शर्मा बॉडी शेमिग करणाऱ्यांना काही नाही बोलणार..
गिल शतक बनवायच्या नादात बाद झाला या विधान वरच वातावरण गरम...
तुम्हाला माहीत आहे का नंतर इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा त्याला हेच विचारले.. बाबा शतकाच्या नादात बाद झालास का? सर्वसाधारण विचार प्रक्रिया आहे ही.. असो..

तुम्हाला माहीत आहे का नंतर इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा त्याला हेच विचारले.. बाबा शतकाच्या नादात बाद झालास का? सर्वसाधारण विचार प्रक्रिया आहे ही.. असो.. >> प्रश्न साहजिक आहे. त्याचे उत्तर तुझेच उत्तर होते का ? तू कंक्लूजन काढलेस हा मोठा फरक आहे .

बाकी बॉडी शेमिंग बद्दल तू बोलू शकतोस , भांडू शकतोस. मला त्या वादात पडायचे नाहि आहे. तुला जे खटकते त्याबद्दल तू बोलू शकतोस.

बाकी बॉडी शेमिंग बद्दल तू बोलू शकतोस , भांडू शकतोस. मला त्या वादात पडायचे नाहि आहे. तुला जे खटकते त्याबद्दल तू बोलू शकतोस.
>>>>>

हो नक्कीच
बोललो म्हणून थांबली !

बॉडी शेमिंग थांबली

हाडाचा मुंबईकर आहे.
बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही.

शाहरूखच्या जवान चित्रपटाने हजार कोटीचा धंदा केला.
मस्त पिक्चर होता.
यातले पहिले विधान fact आहे तर दुसरे माझे मत.
>>
मत आणि अंदाज यातही फरक आहेच की पण...

पण जसं आपली टेस्ट टीम लीडरशिप न्यूझीलंड / ऑसीज विरुद्ध मालिके नंतरही 'आमची बॅटिंग फेल गेली' हे सपशेल मान्य न करता 'काही गोष्टी मनाजोग्या नाही झाल्या' वगैरे सारवासारव करते तसंच चाललं आहे तुझं.

हाडाचा मुंबईकर आहे.
बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही.
>>
हाडाचा मुंबईकर बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही
की बघ्याची भूमिका घेऊ शकणारा हाडाचा मुंबईकर नसतो??

उरलेल्या दोन सामन्यांमधे रोहित शर्मा पुन्हा अपयशी ठरणार - हा अंदाज
तरीही तो चॅंपियन ट्रॉफी मधे कर्णधारपद भूषविणार - हे सत्य

आणि तिथेही तो काही फारसे दिवे लाऊ शकणार नाही - हे मत

अर्थातच माझं 😉

मत आणि अंदाज यातही फरक आहेच की पण... >> फरक आहे पण एका गटात आहेत. दोन्ही सब्जेक्तीव्ह आहेत. आणि हा मुद्दा आहे.

उरलेल्या दोन सामन्यांमधे रोहित शर्मा पुन्हा अपयशी ठरणार - हा अंदाज
>>>
सेम माझाही हाच अंदाज

तरीही तो चॅंपियन ट्रॉफी मधे कर्णधारपद भूषविणार - हे सत्य
>>>>
हे सत्य म्हणू शकत नाही. हा सुद्धा अंदाज झाला. भविष्य कोणी बघितले आहे. सूर गवसत नाही बघून तो माघार घेऊ शकतो जसे अखेरच्या कसोटीत घेतली.

आणि तिथेही तो काही फारसे दिवे लाऊ शकणार नाही - हे मत
>>>>
हा सुद्धा अंदाज म्हणू शकतो. माझाही तोच आहे.
चाहता म्हणून नाराज आहे. पण देश पाहिला.

“ मला एखाद्याचा स्वभाव माहीत आहे म्हणजे तो अंदाजच झाला, वैयक्तिक मतच झाले” Proud

I know आणि I guess मधला फरक जाणून घे एकदा.

Netflix
The greatest rivalry
INDIA vs pakistan
बघतो आजच रात्री...

कोहलीच्या बाहेर असण्यामूळे पहिल्या मॅच्च्या काँबो मूळे बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत. अय्यर बाहेर असणार होता जो कोहली नसल्यामूळे खेळला. ह्या अर्थ कोहली तीन किंवा चार वर खेळणार होता. गिल नि अय्यर दोघेही दणकून खेळले आहेत तेंव्हा कोहली फिट झाला तर कुठे खेळणार आता ?
१. ओपनर - जयस्वालच्या जागी ? रोहित नि गंभीर दोघांनाही लेफ्ट राईट काँबो आवडते हे लक्षात घेतले तर मग गिल किंवा कोहली पैकी एक जण वर सरकेल नि दुसरा तीन वर येईल हा पर्याय बाद होतो.
२. कोहली साठी गिल किंवा अय्यर पैकी कोणालाही ड्रॉप करणे अन फेयर वाटते.
३. राहुल किंवा पंत कीपर म्हणून असतील.
४. सहा बॉलर्स हवेत हे लक्षात घेतले कि पुढचा लाईन अप बदलत नाही.

पंतला ओपन करायला लावून राहुल च्या जागी कोहली ? गिल किंवा कोहली पैकी कोणीही चौथ्या क्रमांकावर येणारा (नॉर्मल मॅचेस मधे) फुकट
गेल्यात जमा आहे .
अक्षर ला ओपन करायला घेऊन राहुलला ही आतच ठेवणे जास्तच धाडसी वाटाते नि परत गिल नि कोहली दोघेही जण तीन वरच फिट आहेत हा प्रश्न सुटत नाही.

छान होती The greatest rivalry INDIA vs pakistan
सुरुवातीला पंधरा वीस मिनिटे पकवापकवी चालू होती पण नंतर रंगात आली. चढत्या क्रमाने रंगत वाढत गेली.
पण अजून सिझन येतील असे वाटते. कारण यात दोन मालिकावरच फोकस होता.

यातला काळ नाईंटीज किड साठी नोस्तलजिक करणारा होता म्हणून छान वाटले.
सहारा कप टोरांटो दादाचा जलवा असेल पुढच्या सीझनला.. त्यात सुद्धा मजा येईल

"कोहलीच्या बाहेर असण्यामूळे पहिल्या मॅच्च्या काँबो मूळे बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत" - खरंय. पण जनरल ट्रेंड बघता, अय्यर बाहेर बसेल असा माझा अंदाज आहे. ह्या सिरीजपेक्षाही, चँपियन्स ट्रॉफीसाठी लाईन-अप काय असेल ते बघणं इंटरेस्टिंग ठरेल.

Pages