Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कुठे त्या बोकलत यांच्या
कुठे त्या बोकलत यांच्या प्रतिसादाला उत्तर देत बसता....
ह्या विकेटवरची सेमी व फायनल
ह्या विकेटवरची सेमी व फायनल (बहुतेक ! ) रंगतदार होण्याची शक्यता कमी आहे, असं वाटतं. कदाचित, लो स्कोअरिंग पण अटीतटीचे सामने झाले तरीही छान , आक्रमक फलंदाजी पहायला मिळणं कठीणच वाटतंय. बघू, काय आश्चर्य दडवून ठेवलंय खेळपट्टीने तें !!! मला ह्या मॅच मध्ये कुलदीपची गोलंदाजी कशी चालते याला आपल्या पुढच्या सामन्यांत खूप व निर्णायक महत्त्व येणार असं जाणवतंय ! शेवटी, glorious uncertainties of cricket हे आहेच, सगळ्या भाकीतांवर बोळा फिरवायला !!!
आज भारताच्या गोलंदाजीचा कस
आज भारताच्या गोलंदाजीचा कस लागणार आहे. ३०-३५ धावा अजून हव्या होत्या. बघूया काय होतं ते 🤷
मला कुलदीप नाही तर चक्रवर्ती
मला कुलदीप नाही तर चक्रवर्ती काय करतोय याची उत्सुकता आहे.. त्याचे वर्जन नवीन आहे. तो ट्रम्प कार्ड ठरू शकतो.
चक्रवर्तीने त्याची पहिली
चक्रवर्तीने त्याची पहिली विकेट काढली..
पंत ऐवजी राहुल ला खेळावायाचा
पंत ऐवजी राहुल ला खेळावायाचा अट्टाहास थांबवायला हवा
राहुल ने 2 झेल सोडले
राहुल ने 2 झेल सोडले
आमची मॅच म्हणजे तुम्ही जिंका
आमची मॅच म्हणजे तुम्ही जिंका तुम्ही जिंका आहे. nz बोलते आम्ही नाही बाबा जिंकणार ind बोलते जिंका ना हो प्लीज. याला म्हणतात दहशत.
ती एक गोष्ट नाही का आहे. राजा
ती एक गोष्ट नाही का आहे. राजा त्याच्या दोन पोरांची घोड्यावर बसून शर्यत लावतो. जो हारणार तो जिंकणार. ते दोघेपण टंगल मंगळ करत असतात. त्याना एक साधू भेटतो तो बोलतो एकमेकांच्या घोड्यावर बसा. आता आज यांच्याकडे घोडा पण नाही.
हा संघ भारी आहे..
हा संघ भारी आहे..
चार प्रॉपर स्पिनर..
ऑस्ट्रेलिया प्रार्थना करत असेल भारत नको येऊ दे आपल्याला..
बिचारे!
सँटनर आपल्या मुंबई इंडियन्सचा
सँटनर आपल्या मुंबई इंडियन्सचा खेळाडू. दुनिया हिला देंगे.
*तो ट्रम्प कार्ड ठरू शकतो.*
*तो ट्रम्प कार्ड ठरू शकतो.* ठरला 5- 40 ! आज आपल्या स्पीनर्सनी 10 पैकी 9 विकेट घेतल्या - परंपरेला जागले , खूप बरं वाटलं. आजच्या कामगिरीमुळे अपेक्षा खूप उंचावल्या आहेत. शुभेच्छा !
त्याला ट्वेंटी-ट्वेंटी मधेच
त्याला ट्वेंटी-ट्वेंटी मधेच खेळवयचे आणि वनडे घेत नव्हते तेव्हाच वाटत होते की याला वनडे संघात स्थान देऊन चॅम्पियन ट्रॉफी न्यायला हवे.
आता लक्षात येत आहे की त्याला अगदी छान प्लान केले जे अखेरपर्यंत जपून आणि लपवून वापरले. आणि यात गंभीरचा मोठा हात असावा.
दुबई कंडिशन मध्ये चार प्रॉपर मॅच विनर स्पिनर आणि क्रमांक आठ पर्यंत फलंदाजी जी चांगल्या फॉर्म मध्ये हे पाहता आपण फेवरेट आहोत यात शंका नाही. मला तर आतापासूनच ट्रॉफी उचलतानाची स्वप्ने पडू लागली आहेत
<<पंत ऐवजी राहुल ला
<<पंत ऐवजी राहुल ला खेळावायाचा अट्टाहास थांबवायला हवा>>
सहमत.
मला राहुल योग्य वाटतो
मला राहुल योग्य वाटतो सध्याच्या कॉम्बिनेशन मध्ये .. भले मी डाय हार्ड पंत फॅन असलो तरी..
कारण मला वाटते सध्या बॉलिंग आपली स्ट्रेंथ आहे. फलंदाजांनी फार काही भन्नाट न खेळता सन्मानजनक स्कोअर केला तरी पुरेसे ठरावे जसा आजचा सामना झाला.
आता पंतची उपयुक्तता अशी आहे की तो संघ अडचणीत आलेला असताना बघता बघता सामना पलटवणारी इनिंग खेळू शकतो. पण त्या नादात बाद सुद्धा होऊ शकतो. पण राहुल रडतखडत का खेळेना पण एखादी सन्मानजनक किंवा फायटिंग धावसंख्या गाठण्याची शक्यता वाढवतो.
मला राहुलची भिती एकाच बाबतीत वाटते ते म्हणजे त्याला नॉकऔट वगैरे मोठ्या सामन्यांचे प्रेशर झेलता येत नाही आणि तो अजून शेलमध्ये जातो. पण अर्थात असे कारण सांगून आता त्याला संघाबाहेर तर करू शकत नाही.
त्यामुळे प्रार्थना करतो की तशी वेळ येऊच नये. आणि आली तर आशा करतो त्याने वरची इमेज पुसून सकारात्मक खेळावे.
आता अचानक सगळ्यांना भारताला
आता अचानक सगळ्यांना भारताला एकाच ठिकाणी राहून, एकाच मैदानावर प्रॅक्टीस व सामने खेळण्याचा प्रचंड फायदा मिळतोय याची जाणीव कशी झाली ! विव्ह रिचर्ड्स देखील आज ही पोटदुखी व्यक्त करताहेत. भारताला हा फायदा निश्चितच आहे पण तो भारताने लबाडी करून किंवा स्वतःचं क्रिकेट मधलं वजन वापरून मिळवला आहे का व भारत याच अटीवर ही स्पर्धा खेळणार हे स्पर्धा सुरू होण्याआधीच जर ठरलेलं होतं, तर आताच तो मुद्दा कां चघळला जातोय ! शिवाय, हा फायदा बऱ्याच प्रमाणात स्पर्धेच्या यजमान संघाला नेहमीच मिळत असतो पण त्यामुळे स्पर्धा unfair
ठरते का ? व, हा फायदा महत्त्वाचा, निर्णायक असता तर पाक संघ प्राथमिक फेरीतच बाद झाला असता का ?
इतर देश कित्येक वर्ष सुरक्षेच्या कारणावरून पाकिस्तानात जावून खेळत नव्हते . मग, ज्या भारताला तर वादातीत हा सुरक्षेचा प्रश्न कायम व अनुभवाने सतावतो, इंटरपोलही ज्या भारताला याच बाबतीत सावधगिरीचा सल्ला देत असतो, त्याने खेळाडूंच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानात खेळणे नाकारले, तर तें काय क्रिकेटमध्ये फायदा मिळवायला ? बकवास !!!
का कुणास ठाऊक पण इतका फायदा
.
भारताला फायदा मिळतोच आहे.
भारताला फायदा मिळतोच आहे. नाकारण्याचा काही प्रश्नच नाही. ह्याला काही पोटदुखी म्हणता येणार नाही. समजा आपण जिंकलोच तर अजून जास्त टीका होईल. त्याची तयारी आपण ठेवली पाहिजे.
*आहेत नाकारण्याचा काही
*आहेत नाकारण्याचा काही प्रश्नच नाही. * - "भारताला हा फायदा निश्चितच आहे ", हे मी प्रथमच म्हटलं आहे; पण तो कां मिळाला, तो इतका निर्णायक असतो का, तो आत्ताच कां खुपायला लागला, इ हे खरे मुद्दे आहेत. यामागची खरी करणं माहित असूनही, भारताने लबाडीने हा फायदा मिळवलाय व जणू त्यामुळेच ते यशस्वी होताहेत असं सूचवण ही पोटदुखी नाही तर काय आहे ?
अर्थातच हा फायदा भारताने
अर्थातच हा फायदा भारताने लबाडीने मिळवला नाही.पण उघड उघड फायदा होत असताना दुसऱ्या टीम्स चे चाहते/ एक्सपर्टस शांत बसणे शक्य वाटत नाही. त्यांच्या दृष्टीने आपली टीम पाकिस्तानात जाऊन खेळू शकते तर भारत का नाही? हाच प्रश्न असणार. त्याच्यामागची कारणे ते का शोधत बसतील. कारण दुसऱ्या टीम्स ना भारताबरोबर मॅच असली की देश बदल, वातावरणातील बदल, होणारा प्रवास हे सगळे त्रास सहन करावे लागत आहेत. त्यामुळे होणाऱ्या टीकेत मला तरी काही विशेष वाटत नाही.
*त्यामुळे होणाऱ्या टीकेत मला
*त्यामुळे होणाऱ्या टीकेत मला तरी काही विशेष वाटत नाही* - ठीक आहे ना, मी तरी कुठे म्हणतो प्रत्येकाला मला वाटतं तसंच वाटलं पाहिजे असं !
भारताला त्याच्या ग्रुपमध्ये
भारताला त्याच्या ग्रुपमध्ये नेहमी पाकिस्तान सारखा दुबळा संघ भेटतो हे सुद्धा मला अनफेअर वाटते.
विव्ह रिचर्ड्स देखील आज ही
विव्ह रिचर्ड्स देखील आज ही पोटदुखी व्यक्त करताहेत
>>
यांचा संघ पात्र ही ठरत नाही
बरेचदा मोठ्या स्पर्धा वगळता यांना बीसीसीआय आर्थिक सहाय्य पुरवते
यांचे कर्णधार पाकिस्तान पेक्षा जलद बदलतात
यांचे खेळाडू संघाकडून खेळण्यापेक्षा लीग खेळणं पसंत करतात
अन् यांना त्याबाबत काहीही बोलावंसं वाटत नाही
गंमतच आहे...
इंझमाम बोलतोय भारत
इंझमाम बोलतोय भारत पाकिस्तानात येत नसेल तर बाकीच्या सगळ्या देशांनी त्यांचे खेळाडू आयपीएलमध्ये पाठवू नका. कोंबड्याला वाटतंय सूर्य आपल्या बांगेने उगवतोय असली गत या भिकारी लोकांची. यांच्यावर कितीपण उपकार शेवटी हे भुंकणारच. भारताने या स्पर्धेत भागच नको घ्यायला पाहिजे होता असं वाटायला लागलंय आता.
तो लेल्या एक तिकडे
तो लेल्या एक तिकडे पाकिस्तानात जाऊन फुल जोशात आलाय. लाहोरच्या मार्केटची तुळशीबागेशी तुलना करत लोणची घेत फिरतोय त्याला सांगा कोणीतरी गप्प हॉटेलात बसून राहा. आपल्याकडे दिवाळीत आपटी बार फुटतात तसे तिकडे बॉम्ब फुटतात. लोणची खाता खाता एखाद दुसरा फुटला जवळ तर केव्हढ्यावर पडेल या लेल्याला.
पॅडी शिवलकर गेले..
पॅडी शिवलकर गेले..
भारतासाठी न खेळलेले एक महान गोलंदाज..
आमच्या घरी आईवडील यांचा उल्लेख याच संदर्भाने नेहमी करायचे.. आणि पॅडी शिवलकर नावानेच करायचे.
दुसऱ्या टीम्स ना भारताबरोबर
दुसऱ्या टीम्स ना भारताबरोबर मॅच असली की देश बदल, वातावरणातील बदल, होणारा प्रवास हे सगळे त्रास सहन करावे लागत आहेत. त्यामुळे होणाऱ्या टीकेत मला तरी काही विशेष वाटत नाही. >> +१ हे सगळे आयसीसीच्या पायावर वाहावे. जर प्रॉब्लेम होतातर भारतीय संघाला बॅन करायचे होते सीटी मधून. ते करता येत नाही मग गप्प बसा ह्यापलीकडे अजून काय ! एकाच जागी असल्याचा फायदा इतका मोठा आहे असे वाटत होते तर आयसिसी कडे स्क्येड्यूल अजून वाढवण्याचा पर्याय होता. बाद फेरी पूर्णपणे दुबई मधे खेळवता आली असती. चार चांगले संघ बाद फेरी मधे गेले ह्यात सगळे आले.
सुरक्षेसाठी पाकिस्तानात खेळणे नाकारले, तर तें काय क्रिकेटमध्ये फायदा मिळवायला ? बकवास !!! >> आधी मलाही खटकले होते पण दोनदा जबरदस्त सुरेक्षेमधून लोक पिचपर्यंत येऊ शकले हे पाहून बीसीसीआय ला अगदीछ दोष येता येईल असे नाही. असलाच एखादा माथेफिरू तर काय घ्या ?
भाऊ, असामी, सहमत.
भाऊ, असामी, सहमत.
<<असलाच एखादा माथेफिरू तर काय घ्या ?>>
असलाच काय म्हणता? आहेतच.
करोना च्या वेळी घरून काम करायची वेळ आली तर बाँब बनवण्याचे धडे घेणार्या किर्त्येक पाकिस्तान्यांनी घरातच बाँब फोडले असे ऐकले!
जाऊ दे आज आपली या स्पर्धेतील
जाऊ दे आज आपली या स्पर्धेतील शेवटची मॅच आहे. भारतीय संघाला खूप खूप शुभेच्छा.
*पॅडी शिवलकर गेले* - ज्यावेळी
*पॅडी शिवलकर गेले* - ज्यावेळी मुंबईचा हेवा वाटावा असा भारतीय क्रिकेटमध्ये दबदबा होता, तेंव्हा त्यांचा सर्वोत्तम प्रभावी स्पिनर राष्ट्रीय संघात येवू शकला नाही, कारण त्याच वेळी बेदी स्पर्धेत आला व निवड समितीचे अध्यक्ष लाला अमरनाथ झाले ! बॅड लकचा कहर !! कांगा लीग ( A डिव्हिजन), रणजी मध्ये सातत्याने वर्षांनुवर्ष अप्रतिम रेकॉर्ड असूनही एकही कसोटी खेळणं नशिबात नव्हतं !! ही खंत उराशी घेवून जगलेला एक अत्यंत जिद्दी पण नम्र खेळाडू , सुरेल गायक व सभ्य माणूस !!! श्रद्धांजली !!!!
*जाऊ दे आज आपली या स्पर्धेतील शेवटची मॅच आहे * - खरंय, फायनलला समोर कुणीही आलं तरी जिंकायला तशी स्पर्धा भारताला जाणवणार नाहीं !!
*बीसीसीआय ला अगदीछ दोष येता येईल असे नाही.* - माझ्या माहितीनुसार, केंद्र सरकारही याला अनुमती देत नाहीं !
भारतीय संघाला शुभेच्छा !!
Pages