धाग्याच्या शीर्षकाविषयी - मायबोलीवरील अन्य एका धाग्याने हा धागा काढण्याची प्रेरणा दिली आहे!
सध्या LockDown असल्याने जवळपास संपूर्ण देश थांबला आहे. परंतु काही दिवसांत परिस्थिती निवळेल आणि पुन्हा आपले रहाटगाडगे सुरु होईल.
ज्या शहरांत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तितकीशी सक्षम नाही आणि बहुतांश लोक जिथे प्रामुख्याने खाजगी वाहने (दुचाकी / चारचाकी) वापरतात त्या शहरातील लोकांना कदाचित हा धागा म्हणजे हास्यास्पद वाटेल. परंतु मुंबईसारख्या शहरात जिथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर जास्त होतो तेथील लोकांना या धाग्यातील मर्म आणि धागा लेखकाची व्यथा निश्चितच समजेल!!!
तर सध्या आधी स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारणाऱ्या, शालेय शिक्षणात मूल्य शिक्षणामध्ये स्त्री-पुरुष समानता आदी मुल्ये शिकवल्या जाणाऱ्या समाजातील काही वास्तव पाहू.
१. मुंबईतील बेस्ट बस - चालकाच्या केबिनमागील ६ आसने महिलांसाठी राखीव (एकूण १२ महिला); पुरुषांसाठी बाबाजीका **
२. मुंबईतील बेस्ट बस - गर्दीच्या वेळी काही मार्गावर 'केवळ महिलांसाठी' बस (उदा. बसमार्ग क्र. ७९); पुरुषांसाठी बाबाजीका **
३. मुंबईतील लोकल ट्रेन्स - १२ डब्ब्यांच्या ट्रेनमध्ये ४ डब्बे महिलांसाठी राखीव; पुरुषांसाठी बाबाजीका **
४. मुंबईतील लोकल ट्रेन्स - गर्दीच्या वेळी पूर्णच्या पूर्ण ट्रेन महिलांसाठी राखीव; पुरुषांसाठी बाबाजीका **
५. मुंबई मेट्रो - वर्सोवा बाजूचा अर्धा डबा महिलांसाठी राखीव; पुरुषांसाठी बाबाजीका **
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांना एखादी सुविधा दिली जात असेल तर तीच सुविधा पुरुषांना का दिली जात नाही?
वास्तविक स्त्री आणि पुरुष ही समाजनामक एकाच रथाची (किंवा आजच्या काळातील उदाहरण द्यायचे तर एकाच स्कूटरची!) दोन चाके आहेत. त्यामुळे दोघांना समान न्याय मिळाला पाहिजे. ज्याप्रमाणे स्त्रीविना सृष्टी चालू शकत नाही, त्याचप्रमाणे पुरुषांविनाही सृष्टीचे चक्र सुरु राहू शकत नाही. स्त्री ही जर सृष्टीचे इंजिन असेल तर पुरुष हा स्टार्टर आहे! तुम्ही स्कूटरच्या एका चाकात वेळोवेळी हवा भरत आहात, oiling करत आहात, bearings खराब झाल्या तर त्या बदलत आहात आणि दुसऱ्या चाकाकडे दुर्लक्ष करत असाल तर ती स्कूटर नीट चालणारच नाही. त्यासाठी दोन्ही चाकांकडे समान लक्ष दिले पाहिजे. (एखादे चाक आधीपासून खूप दुर्लक्षित असेल तर त्याकडे जरा जास्त लक्ष देणे समजू शकतो पण म्हणून दुसऱ्याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल?)
अ त्यं त म ह त्वा चे : येथे महिलांना दिल्या जाणाऱ्या सुविधा काढून घ्याव्यात असे कोठेही म्हटलेले नाही. महिलांना ज्या सुविधा मिळतात त्याच सुविधा पुरुषांनाही मिळाव्यात अशी रास्त अपेक्षा आहे.
म्हणजेच,
जर बसमध्ये ६ आसने (१२ व्यक्ती) महिलांसाठी आरक्षित असतील तर तितकीच आसने पुरुषांसाठी का नाहीत??
गर्दीच्या वेळी जशी 'खास महिलांसाठी' बस असते तिच्याच मागे/पुढे 'खास पुरुषांसाठी' बस का नाही???
लोकलमध्ये ४ डबे महिलांसाठी असतील तर तितकेच (४ डबे) पुरुषांसाठी आरक्षित का नाहीत???
गर्दीच्या वेळी पूर्णच्या पूर्ण ट्रेन महिलांसाठी आरक्षित असेल तर त्याच्या मागे/पुढे पूर्णच्या पूर्णच्या पूर्ण ट्रेन पुरुषांसाठी का आरक्षित नाही???
मुंबई मेट्रोमध्ये वर्सोवा बाजूचा अर्धा डबा महिलांसाठी आरक्षित असेल तर घाटकोपर बाजूचा अर्धा डबा पुरुषांसाठी का आरक्षित नाही???
जातीय आरक्षण आणि स्त्री-पुरुष
जातीय आरक्षण आणि स्त्री-पुरुष राखीव सीट हे दोन्ही भेद एकत्र चर्चेत आणू नयेत.
पहिली केस समान संधी मिळावी याची आहे. त्यामध्ये काळानुसार आरक्षणाची गरज कमी होत जाईल.
दुसऱ्या केसमध्ये प्रश्न समान संधीचा नाही तर लैंगिक भेदामुळे जो फरक आहे तो निसर्गाने बनवला आहे आणि कायम राहणार आहे.
४९८अ अंतर्गत , दोन
४९८अ अंतर्गत , दोन महिन्याच्या बाळाचे आरोपी म्हणून नाव दिले गेले आहे अशी किती उदाहरणे आहेत? या अत्यंत दुर्मिळ ( आणि हास्यास्पद) तक्रारीचा संबंध आणि एकंदरित बायकांचा attitude शी संबंध लावणे खटकले.
Submitted by उदय on 24 November, 2024 - 06:26
ते एक उदाहरण दिले होते, काही महिला कोणत्या थराला जाऊ शकतात हे दाखवण्यासाठी. सगळ्याच महिला वाईट असतात असे मी कधीही म्हटले नाही. मी या जगात आलो आहे ते देखील एका महिलेमुळेच (माझ्या आईमुळेच), त्यामुळे सगळ्याच महिलांना मी एकाच पारड्यात तोलण्याची चूक नाही करणार.
परंतु वर उदाहरणात दिलेल्या महिलेसारखी (पुरुषांना केवळ त्रास देण्याची) मानसिकता / विचारसरणी असलेल्या महिलांपासून स्वतःला सुरक्षित ठेवू इच्छिणाऱ्या / त्यांच्या वाटेला जावे लागू नये असे वाटणाऱ्या पुरुषांसाठी 'वेगळे आरक्षित डबे' हवेत.
आणि हो, वर दिलेल्या महिलेचे उदाहरण दुर्मिळात दुर्मिळ वाटत असेल तर Google वर महिलांच्या अत्याचार / छळणुकीने त्रस्त होऊन किती पुरुषांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे हे शोधले तर भयानक आकडे समोर येतील!
आपल्या महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात (पूर्वीचा औरंगाबाद) एक 'पत्नी पिडीत पुरुष आश्रम' आहे. जिथे एखाद्या पुरुषाला राहायचे असेल तर मुख्य अट आहे की त्याच्या पत्नीने त्याच्यावर किमान २० गुन्हे दाखल केलेले असावेत! आणि असे कित्येक पुरुष केवळ मन:शांती मिळावी यासाठी त्या आश्रमात राहत आहेत!!!
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 'पत्नी पिडीत पुरुष आश्रम' - https://maps.app.goo.gl/PoPaktaWdJXZfsqV7
गुजरात मध्येही अहमदाबाद (कर्णावती) शहरात अशीच एक संघटना कार्यरत आहे. - https://patnipiditpurushsangh.org/
------------------------------------
दुसऱ्या केसमध्ये प्रश्न समान संधीचा नाही तर लैंगिक भेदामुळे जो फरक आहे तो निसर्गाने बनवला आहे आणि कायम राहणार आहे.
Submitted by ऋन्मेऽऽष on 24 November, 2024 - 09:36
याची जाण मलाही आहे. त्यामुळेच 'महिलांना सध्या असलेले आरक्षित डबे कमी करा किंवा बंद करा किंवा सगळे सुरवातीला / शेवटच्या बाजूस टाकून द्या' असल्या मागण्या मी कधीही करणार नाही. मला फक्त काही कटकट्या /किरकिऱ्या बायकांपासून स्वतःला वाचवण्यासाठी 'पुरुषांसाठी स्वतंत्र आरक्षित डबे' हवेत.
कंटाळा आला.
कंटाळा आला.
कटकट्या /किरकिऱ्या
कटकट्या /किरकिऱ्या बायकांपासून स्वतःला वाचवण्यासाठी 'पुरुषांसाठी स्वतंत्र आरक्षित डबे
>>>>
हो, याच्याशी सहमत आहेच.
फक्त अश्या महिलांबाबत मनात राग ठेऊ नका. त्यांनाही काही अप्रिय अनुभव आले असतात ज्यामुळे त्या एकूणच पुरुष जातीवर त्याचा राग काढतात, किंवा तेच सावधगिरी म्हणून सोयीचे असा विचार करतात.
कुठल्याच फक्त लेडिज सलून
कुठल्याच फक्त लेडिज सलून मध्ये पुरुषांना जराही आत यायला परवानगी नसतेच (नसावी).
अलीकडेच मी सलून मध्ये होते थोबाड स्पा करत होते. फोन मेला होता माझा. तर त्या दिवशी नेमका, चावी विसरलेला माझा नवरा ४ तास सलून बाहेर गाडीत थांबून राहिला सौज्यनशीलपणे. फोन मरण्याआधी त्याला माहित होते मी सलून मध्ये असणार पण एकदा सलून मध्ये गेल्यावर, हे करा, ते करा करण्यात वेळ गेला.
तर मुद्दा आहे की, स्त्रीयांनी पण हा रुल पाळावा जर बाहेर तशी नोटीस असेल “ओन्ली जेन्ट्स“.
आणि ३० वर्षापुर्वी, आमचे केस सुद्धा न्हव्याने कापलेत अगदी लहान असताना ; तेव्हा ना बाबांना प्रॉबलेम होता ना न्हव्याला. हो आणि शहरातलीच गोष्ट होती.
पुरुषांना पण आरक्षण असावे .
पुरुषांना पण आरक्षण असावे . मघाशी म्हटले तसे, एक बाजू पुर्ण पुरुषांकरता.
काही स्त्रीया सुद्धा उगाच कांगावा करतात. मग त्या कोणीही असतात, थोबाडभर मेकअप असो का नसो. मी स्वतः एक स्त्री असून सपोर्ट नाही केलेय एका स्त्रीला जेव्हा ती खरोखर चुकीची होती बसमध्ये.
स्रीयांचा मान असेल तर तो
स्रीयांचा मान असेल तर तो सत्यनारणाच्या पुजेत, नको त्या त्यांनी ठिकाणी मानाची अपेक्षा करु नये हे उत्तम.>>> मायबोली वर हे वाक्य वाचले आणि भरून पावले. वाह! उत्तम. चालू द्या.
जाई
खरंच पेशन्स ला सलाम.
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/trending/woman-misbehaving-in-a-train-with-a-ma...
आतातरी लोकांच्या डोक्यात प्रकाश पडेल आणि त्यांना कळेल की 'पुरुषांसाठी आरक्षित डबे / आसने का आवश्यक आहेत' ते!!!
आणि जर एखादा गेलाही तरी
आणि जर एखादा गेलाही तरी पार्लर मधील इतर महिला ग्राहक त्या पुरुषाचे तिथे येणे accept करतील का??? >>>>>>>>>>पार्लर मद्ये एखादी स्त्री वॅक्सिन्ग करत असेल तर तिला अजिबात आवडणार नाही कुठल्या पुरुषाने त्यावेळी तिथे असलेलं बाकी पार्लर मध्ये स्त्रिया पुरुषांसारख्याच केस कापायला , आयब्रो करायला, मेकअप करायला आणि अश्याच इतर गोष्टी करायला जातात .
विमू
विमू
त्या व्हिडीओत समोरच्या सीटवर बसला होता तो माणूस. रिकामी कुठे होती?
अहो विमु, १% केसेस दाखवून
अहो विमु, १% केसेस दाखवून पुरुष आरक्षण सीट कोणी देतं का? मुळात लेडीज सीट्स आरक्षण द्यायला काही ठोस कारणं होती, म्हणुन तो प्रस्ताव मंजूर झाला असणार.
इथे मायबोली वर ४ डबे स्त्रिया, ४ पुरुष & ४ जनरल असं सुचवायला काही जात नाही, पण तसं होणार नाही.
४+४+४ +१ तृतीयपंथी लागेल
४+४+४ +१ तृतीयपंथी लागेल अश्या न्यायाने
१% केसेस ते दाखवत आहेत.
१% केसेस ते दाखवत आहेत. प्रत्यक्षात जास्त घडत असतील. कोणी आपले ऐकून घेणारे आहे हे जाणवले तर कदाचित अजून काही पुरुष आपले अनुभव सांगू लागतील.
४ डब्बेच मिळायला हवेत असे गरजेचे नाही. त्या अपेक्षा फार आहेत. सुरुवात एका डब्यापासून होऊ शकते.
तृतीयपंथी लोकांना सुद्धा द्या आरक्षण हा मुद्दा जर योग्य असेल तरी पूर्ण डब्बा द्यायची गरज नाहीं. एखादा हिस्सा देऊ शकतो. जसे अपंगाना असतो.
मायबोलीवर चर्चा केल्याने काही नियम बनत नाही असे म्हणू शकत नाही. विचार असाच कुठेतरी मांडला जातो आणि मग तो पसरला जातो. उद्या पुरुषांना एखादा राखीव डबा मिळायला सुरुवात झाली तर विमु याना जरूर श्रेय जाईल.
त्या व्हिडीओत समोरच्या सीटवर
त्या व्हिडीओत समोरच्या सीटवर बसला होता तो माणूस. रिकामी कुठे होती?>>> पण तो बसलेला असतांना त्या महिलेने त्याच्या बसायच्या जागेवर पाय ठेवणे कितपत योग्य आहे? जर ते दोघे नातेवाईक असतील (उदा. आई-मुलगा किंवा नवरा-बायको) तर ते त्यांचे आपापसातील समजून घेणे (mutual understanding) म्हणू शकतो परंतु अनोळखी व्यक्ती (मग gender काहीही असो) एखाद्या सीटवर बसलेली असतांना आपण त्याच सीट वर आपली bag ठेवणे (ज्यामुळे त्या समोरील व्यक्तीला नीट बसताही येणार नाही), उरलेल्या जागेत पाय ठेवणे हे निश्चितच योग्य नाही.
अहो विमु, १% केसेस दाखवून पुरुष आरक्षण सीट कोणी देतं का? ....इथे मायबोली वर ४ डबे स्त्रिया, ४ पुरुष & ४ जनरल असं सुचवायला काही जात नाही, पण तसं होणार नाही.>>>
या १% केसेस म्हणजे हिमनगाचे टोकही असू शकते! आणि मुळातच पुरुष आपल्या हक्कांबाबत किती उदासिन असतात हे इथे दिसतेच आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या घरात / कार्यालयात random लोकांना 'जागतिक महिला दिन' कधी असतो आणि 'जागतिक पुरुष दिन' कधी असतो हे विचारलेत तरी तुम्हालाही लक्षात येईल. कित्येक पुरुषच असे असतील की ज्यांना 'जागतिक पुरुष दिन' असा काही असतो हेच माहित नसेल, कधी असतो ते तर खूप दूरची गोष्ट! अशांना आपल्या हक्काबाबत जागरूक करून पुरेसे जनमत तयार झाले की संबंधित यंत्रणांकडे मागणी करता येऊ शकते.
ऋन्मेऽऽष चा 26 November, 2024 - 08:25 चा संपूर्ण प्रतिसाद >>> +११११११११११११११११११११११११११
महिलांना आधीच बस / रेल्वे
महिलांना आधीच बस / रेल्वे प्रवासात सवलती (आरक्षित आसने / डबे) आहेत, ST च्या तिकिटात ५०% सवलत आहे.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आता पुण्यातल्या या ताईना हेल्मेटसक्तीच्या बाबतीत सुद्धा महिलांना सवलत हवी आहे! हेल्मेटसक्ती फक्त पुरुषांसाठी असावी, लेडीजसाठी नको!!!
https://x.com/PaigambarSpeaks/status/1862311873493844248
काय बोलावे आता!!!
मजेशीर व्हिडीओ आहे.
मजेशीर व्हिडीओ आहे.
लेडीज चा हात पोटावरती आहे....
लेडीज चा हात पोटावरती आहे.... ही... ही...
(No subject)
हेल्मेट घालू नका, पण भाषण
हेल्मेट घालू नका, पण भाषण आवरा.
ताईला हेल्मेट सोबत सिग्नल पण
ताईला हेल्मेट सोबत सिग्नल पण नकोसा आहे.
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
व्हिडीओ मजेशीर आहे. ताईंना
व्हिडीओ मजेशीर आहे. ताईंना राजकारणात स्कोप आहे. प्रश्न विचारणाऱ्या पोरीने ताईंना लाडकी बहीणवरून पुन्हा हेल्मेटवर आणलं ते हहपुवा आहे.
रच्याकने,![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
........... पण तो बसलेला असतांना त्या महिलेने त्याच्या बसायच्या जागेवर पाय ठेवणे कितपत योग्य आहे? .......
या वाक्यात नक्की कुठे पाय ठेवलाय याबाबत संभ्रम निर्माण होऊ शकतो.
>>>
>>> ताईंना राजकारणात स्कोप आहे.
दुसऱ्या सुषमा अंधारे होऊ शकतील
या वाक्यात नक्की कुठे पाय
या वाक्यात नक्की कुठे पाय ठेवलाय याबाबत संभ्रम निर्माण होऊ शकतो>>>>>>
योग्य जागी असेल तर ‘ठेवला’ हे क्रियापद चूक आहे.
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वरील व्हिडिओने उरल्यासुरल्या
वरील व्हिडिओने उरल्यासुरल्या शंका सुद्धा मिटल्या![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
काय बोलावे आता!!!>>>> लाडकी
काय बोलावे आता!!!>>>> लाडकी बहीण योजनेमुळे लेडीजच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. निवडणूकीच्या आधी हेल्मेटचा नियम आला असता तर लाडक्या भावांनी सवलत दिली ही असती.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>> ताईंना राजकारणात स्कोप
>>> ताईंना राजकारणात स्कोप आहे.
दुसऱ्या सुषमा अंधारे होऊ शकतील <<
फरक आहे. ताई मुद्दे सोडून बोलत होत्या. अंधारेंचं वक्तृत्व मिरवणं सोडलं तरी सर्वसाधारणतः मुद्देसूद आणि बिनधास्त बोलतात आणि विरोधकांच्या मर्मावर आघात करतात.
त्यांना मुद्देसूद प्रत्युत्तर दिलेलं फारसं पाहिलं नाही मी.
>>> फरक आहे. ताई मुद्दे सोडून
>>> फरक आहे. ताई मुद्दे सोडून बोलत होत्या. अंधारेंचं वक्तृत्व मिरवणं सोडलं तरी सर्वसाधारणतः मुद्देसूद आणि बिनधास्त बोलतात आणि विरोधकांच्या मर्मावर आघात करतात.
त्यांना मुद्देसूद प्रत्युत्तर दिलेलं फारसं पाहिलं नाही मी.
I agree. गंमतीत लिहिले होते ते मी!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
<< फरक आहे. ताई मुद्दे सोडून
<< फरक आहे. ताई मुद्दे सोडून बोलत होत्या. अंधारेंचं वक्तृत्व मिरवणं सोडलं तरी सर्वसाधारणतः मुद्देसूद आणि बिनधास्त बोलतात आणि विरोधकांच्या मर्मावर आघात करतात.
त्यांना मुद्देसूद प्रत्युत्तर दिलेलं फारसं पाहिलं नाही मी. >>
------ विरोधी विचारांचा छान समाचार घेतात. अभ्यास दांडगा आहेच आणि बहुतेक प्रसंगी मुद्द्याला धरुन बोलणे असते. आपल्या कडे अशा अभ्यासू नेत्या नसल्यामुळे कायम टिकेचे लक्ष्य बनतात.
येथे त्यांचा उल्लेख होण्याचे आश्चर्य वाटले नाही. गमतीने म्हटले होते हे नंतरचे सुचलेले शहाणपण आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पुणे आणि पिंपरी चिंचवड या
पुणे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी धावणारी PMPML बस मध्ये जेष्ठ नागरिक सुद्धा उभ्याने प्रवास करतात
Pages