फक्त पुरुषांसाठी - सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पुरुषांसाठी राखीव आसने / डब्बे असावेत असे वाटते का?

Submitted by विक्षिप्त_मुलगा on 22 April, 2020 - 03:28

धाग्याच्या शीर्षकाविषयी - मायबोलीवरील अन्य एका धाग्याने हा धागा काढण्याची प्रेरणा दिली आहे!

सध्या LockDown असल्याने जवळपास संपूर्ण देश थांबला आहे. परंतु काही दिवसांत परिस्थिती निवळेल आणि पुन्हा आपले रहाटगाडगे सुरु होईल.
ज्या शहरांत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तितकीशी सक्षम नाही आणि बहुतांश लोक जिथे प्रामुख्याने खाजगी वाहने (दुचाकी / चारचाकी) वापरतात त्या शहरातील लोकांना कदाचित हा धागा म्हणजे हास्यास्पद वाटेल. परंतु मुंबईसारख्या शहरात जिथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर जास्त होतो तेथील लोकांना या धाग्यातील मर्म आणि धागा लेखकाची व्यथा निश्चितच समजेल!!!

तर सध्या आधी स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारणाऱ्या, शालेय शिक्षणात मूल्य शिक्षणामध्ये स्त्री-पुरुष समानता आदी मुल्ये शिकवल्या जाणाऱ्या समाजातील काही वास्तव पाहू.
१. मुंबईतील बेस्ट बस - चालकाच्या केबिनमागील ६ आसने महिलांसाठी राखीव (एकूण १२ महिला); पुरुषांसाठी बाबाजीका **
२. मुंबईतील बेस्ट बस - गर्दीच्या वेळी काही मार्गावर 'केवळ महिलांसाठी' बस (उदा. बसमार्ग क्र. ७९); पुरुषांसाठी बाबाजीका **
३. मुंबईतील लोकल ट्रेन्स - १२ डब्ब्यांच्या ट्रेनमध्ये ४ डब्बे महिलांसाठी राखीव; पुरुषांसाठी बाबाजीका **
४. मुंबईतील लोकल ट्रेन्स - गर्दीच्या वेळी पूर्णच्या पूर्ण ट्रेन महिलांसाठी राखीव; पुरुषांसाठी बाबाजीका **
५. मुंबई मेट्रो - वर्सोवा बाजूचा अर्धा डबा महिलांसाठी राखीव; पुरुषांसाठी बाबाजीका **

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांना एखादी सुविधा दिली जात असेल तर तीच सुविधा पुरुषांना का दिली जात नाही?

वास्तविक स्त्री आणि पुरुष ही समाजनामक एकाच रथाची (किंवा आजच्या काळातील उदाहरण द्यायचे तर एकाच स्कूटरची!) दोन चाके आहेत. त्यामुळे दोघांना समान न्याय मिळाला पाहिजे. ज्याप्रमाणे स्त्रीविना सृष्टी चालू शकत नाही, त्याचप्रमाणे पुरुषांविनाही सृष्टीचे चक्र सुरु राहू शकत नाही. स्त्री ही जर सृष्टीचे इंजिन असेल तर पुरुष हा स्टार्टर आहे! तुम्ही स्कूटरच्या एका चाकात वेळोवेळी हवा भरत आहात, oiling करत आहात, bearings खराब झाल्या तर त्या बदलत आहात आणि दुसऱ्या चाकाकडे दुर्लक्ष करत असाल तर ती स्कूटर नीट चालणारच नाही. त्यासाठी दोन्ही चाकांकडे समान लक्ष दिले पाहिजे. (एखादे चाक आधीपासून खूप दुर्लक्षित असेल तर त्याकडे जरा जास्त लक्ष देणे समजू शकतो पण म्हणून दुसऱ्याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल?)

अ त्यं त म ह त्वा चे : येथे महिलांना दिल्या जाणाऱ्या सुविधा काढून घ्याव्यात असे कोठेही म्हटलेले नाही. महिलांना ज्या सुविधा मिळतात त्याच सुविधा पुरुषांनाही मिळाव्यात अशी रास्त अपेक्षा आहे.

म्हणजेच,
जर बसमध्ये ६ आसने (१२ व्यक्ती) महिलांसाठी आरक्षित असतील तर तितकीच आसने पुरुषांसाठी का नाहीत??
गर्दीच्या वेळी जशी 'खास महिलांसाठी' बस असते तिच्याच मागे/पुढे 'खास पुरुषांसाठी' बस का नाही???
लोकलमध्ये ४ डबे महिलांसाठी असतील तर तितकेच (४ डबे) पुरुषांसाठी आरक्षित का नाहीत???
गर्दीच्या वेळी पूर्णच्या पूर्ण ट्रेन महिलांसाठी आरक्षित असेल तर त्याच्या मागे/पुढे पूर्णच्या पूर्णच्या पूर्ण ट्रेन पुरुषांसाठी का आरक्षित नाही???
मुंबई मेट्रोमध्ये वर्सोवा बाजूचा अर्धा डबा महिलांसाठी आरक्षित असेल तर घाटकोपर बाजूचा अर्धा डबा पुरुषांसाठी का आरक्षित नाही???

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यावर एक रात्री वेगळा धागा काढतो.
<<

हो. ते ट्रॅडिशनल कुटुंब वगैरेच्या चालीवर, "स्त्री-दाक्षिण्य की पुरुष उत्तरीय?" असा धागा काढ, ऋण्म्या.

तुम्ही आला नाहीत त्या कुटुंबाच्या धाग्यावर आरारा..
थोडे जळजळीत निखारे पेरून त्या मळमळीत विषयाला तंदूरी तडका द्यायचे होते की ..

देशात काही भाग स्त्रियांसाठी आणि काही भाग पुरूषांसाठी राखून ठेवला आणि कुणालाही इकडून तिकडे जाण्यायेण्याची परवानगी नाकारली तर धाग्यात सांगितलेला वाद आपोआप संपुष्टात येईल. तिसर्‍या आणि चुfunction at() { [native code] }ह्या लिंगासाठीही एखाद दुसरा भाग ठेवायला काहीच हरकत नाही.

अगोदर च अनेक कारणानं माणसामाणसातील भेद खूप आहेत.
( जात,धर्म,भाषा,प्रांत,गरीब,श्रीमंत ई.)
अजून स्त्री पुरुष हा नवीन झगडा नको.

स्त्रियां न काही राखीव आसने असण्यात काही गैर नाही.
फक्त एकच मत व्यक्त करावे असे वाटते त्या राखीव आसनावर शारीरिक रित्या दुर्बल स्त्री चा पहिला हक्क आहे अशी विचार धारणा स्त्रिया न मध्ये असावी.

आता ठरलं आहे. आता माघार नाही.
बस, मेट्रो मधे पुरूषांवर अन्याय होता कामा नये. दोन देश झालेच पाहीजेत. स्त्रियांच्या देशात स्त्रिया मेट्रो, बस मधे जातील, पुरूषांच्या देशात पुरूष.

उदय Lol

<< मायबोलीवर लिहिण्याचा कोणाचा पहिला हक्क असावा?
नवीन Submitted by मानव पृथ्वीकर on 19 November, 2023 - 21:58 >>

----- तिन विभाग करायचे.
मायबोली- फक्त पुरुष आयडी, फक्त महिलां आयडी.... , इतर

पुरुष प्लस स्त्री बरोबर पुढची पिढी.
वंश चालू.
आता त्याची पण गरज लागत नाही ती गोष्ट वेगळी .
कारण अजून असे 100% विभाजन झाले नाही.

100% विभाजन होईल स्त्री आणि पुरुष हे कंप्लीट वेगळे होतील चेहरा पण बघायला मिळणार नाही तेव्हा आयुष्य खूप नीरस वाटेल.

इतके नक्की..

जगाचे दोन भाग करावेत.
एका भागात फक्त पुरुष आणि दुसऱ्या भागात फक्त स्त्रिया.
कुणालाही इकडून तिकडे किंवा तिकडून इकडे जायला यायला परवानगी नसावी. कुणी घुसखोरी केलीच तर सुळावर चढवावे (नको फार त्रास होतो) शिरच्छेद करावा ( हे ही नको) कडेलोट करण्यात यावा.

अरेच्चा! या धाग्यावर माझ्या नावाने आधीच कुणीतरी सेम प्रतिसाद दिला आहे. बहुतेक टंचनिकेचं काम.
सेपरेशन झाले कि ती कामात मदत कशी करणार?

किमान हा धागा तरी पुरूषांकरिता राखीव असावा, संयुक्त्या ग्रुपात.
रंजलेगांजलेले पुरूष आपल्या करूण कहाण्या इथे शेअर करू शकतील. अनुभवी पुरूष तोडगे सुचवतील.

*आज जागतिक पुरुष दिन होता* -

अग, मला वाटलं आज ' जागतिक पुरुष दिन आहे ' म्हणून बायका उभं राहून पुरुषांना त्यांच्या आरक्षित सीट देताहेत: बस डेपोतून नुकतीच धुवून बाहेर आणली होती, हे ओल्या सीटवर बसल्यावर माझ्या लक्षात आलं !!20190115_202619_0.jpg

Lol भारीच!
खूप दिवसांनी व्यंग्यचित्र दिसलं तुमचं Happy

भाऊ Lol

Lol

गरोदर स्त्रीया, अपंग व्यक्ती( सगळेच आले ह्यात), वृद्ध व्यक्ती ह्यांनाच सीट्स असाव्यात. त्यांना पुढील दाराने चढण्यास मुभा द्यावी.
आणि तसेच एक रो(बाजू) फक्त स्त्रीयांसाठी, दुसरी बाजू पुरुषांसाठी असावी.

व, आरक्षित जागा रिकाम्या असतील, तरउभे असलेले प्रवासी त्यावर बसू शकतील . परंतु, आरक्षण योग्य व्यक्ती नंतर आल्यास, न मागता ती जागा त्या व्यक्तीला मिळाली पाहिजे !

तसेच एक रो(बाजू) फक्त स्त्रीयांसाठी, दुसरी बाजू पुरुषांसाठी असावी.+१११११

आरक्षित जागा रिकाम्या असतील, तरउभे असलेले प्रवासी त्यावर बसू शकतील..... तसे सध्याही बसता येते. परंतु असा एखादा प्रवासी बसलेला असल्यास त्याला महिला प्रवासी ज्या पद्धतीने त्याचा अपमान करून (अगदी बसलेला प्रवासी ५०+ असला तरीही) उठवतात... तो अपमान होऊ नये म्हणून पुरुष प्रवाशांना हक्काची आसने असलीच पाहिजेत.

आणि उद्या अशी पुरुषांना आरक्षित आसने / डबे मिळाली... आणि प्रवास करतांना माझ्यासमोर एखादी गर्भवती / तान्ह बाळ सोबत असलेली महिला किंवा एखादी अगदी वयस्कर नाही पण ५०+ वयाची जरी स्त्री आली (जिला पाहिल्यावर ही माझी आई / मावशी आहे, अशी भावना मनात निर्माण होईल) तर अशा महिलेस मी पुरुषांसाठी आरक्षित असलेल्या आसनापैकी जागासुद्धा देईन. पण थोबाडावर मेकअप थापून दुसऱ्याला attitude दाखवत फिरणाऱ्या मुलींपैकी कोणी अशा पुरुषांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर बसलेली दिसली तर तिला मात्र जास्तीत जास्त पाणउतारा करून उठवेन.

भाउ Lol

Pages