फक्त पुरुषांसाठी - सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पुरुषांसाठी राखीव आसने / डब्बे असावेत असे वाटते का?

Submitted by विक्षिप्त_मुलगा on 22 April, 2020 - 03:28

धाग्याच्या शीर्षकाविषयी - मायबोलीवरील अन्य एका धाग्याने हा धागा काढण्याची प्रेरणा दिली आहे!

सध्या LockDown असल्याने जवळपास संपूर्ण देश थांबला आहे. परंतु काही दिवसांत परिस्थिती निवळेल आणि पुन्हा आपले रहाटगाडगे सुरु होईल.
ज्या शहरांत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तितकीशी सक्षम नाही आणि बहुतांश लोक जिथे प्रामुख्याने खाजगी वाहने (दुचाकी / चारचाकी) वापरतात त्या शहरातील लोकांना कदाचित हा धागा म्हणजे हास्यास्पद वाटेल. परंतु मुंबईसारख्या शहरात जिथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर जास्त होतो तेथील लोकांना या धाग्यातील मर्म आणि धागा लेखकाची व्यथा निश्चितच समजेल!!!

तर सध्या आधी स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारणाऱ्या, शालेय शिक्षणात मूल्य शिक्षणामध्ये स्त्री-पुरुष समानता आदी मुल्ये शिकवल्या जाणाऱ्या समाजातील काही वास्तव पाहू.
१. मुंबईतील बेस्ट बस - चालकाच्या केबिनमागील ६ आसने महिलांसाठी राखीव (एकूण १२ महिला); पुरुषांसाठी बाबाजीका **
२. मुंबईतील बेस्ट बस - गर्दीच्या वेळी काही मार्गावर 'केवळ महिलांसाठी' बस (उदा. बसमार्ग क्र. ७९); पुरुषांसाठी बाबाजीका **
३. मुंबईतील लोकल ट्रेन्स - १२ डब्ब्यांच्या ट्रेनमध्ये ४ डब्बे महिलांसाठी राखीव; पुरुषांसाठी बाबाजीका **
४. मुंबईतील लोकल ट्रेन्स - गर्दीच्या वेळी पूर्णच्या पूर्ण ट्रेन महिलांसाठी राखीव; पुरुषांसाठी बाबाजीका **
५. मुंबई मेट्रो - वर्सोवा बाजूचा अर्धा डबा महिलांसाठी राखीव; पुरुषांसाठी बाबाजीका **

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांना एखादी सुविधा दिली जात असेल तर तीच सुविधा पुरुषांना का दिली जात नाही?

वास्तविक स्त्री आणि पुरुष ही समाजनामक एकाच रथाची (किंवा आजच्या काळातील उदाहरण द्यायचे तर एकाच स्कूटरची!) दोन चाके आहेत. त्यामुळे दोघांना समान न्याय मिळाला पाहिजे. ज्याप्रमाणे स्त्रीविना सृष्टी चालू शकत नाही, त्याचप्रमाणे पुरुषांविनाही सृष्टीचे चक्र सुरु राहू शकत नाही. स्त्री ही जर सृष्टीचे इंजिन असेल तर पुरुष हा स्टार्टर आहे! तुम्ही स्कूटरच्या एका चाकात वेळोवेळी हवा भरत आहात, oiling करत आहात, bearings खराब झाल्या तर त्या बदलत आहात आणि दुसऱ्या चाकाकडे दुर्लक्ष करत असाल तर ती स्कूटर नीट चालणारच नाही. त्यासाठी दोन्ही चाकांकडे समान लक्ष दिले पाहिजे. (एखादे चाक आधीपासून खूप दुर्लक्षित असेल तर त्याकडे जरा जास्त लक्ष देणे समजू शकतो पण म्हणून दुसऱ्याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल?)

अ त्यं त म ह त्वा चे : येथे महिलांना दिल्या जाणाऱ्या सुविधा काढून घ्याव्यात असे कोठेही म्हटलेले नाही. महिलांना ज्या सुविधा मिळतात त्याच सुविधा पुरुषांनाही मिळाव्यात अशी रास्त अपेक्षा आहे.

म्हणजेच,
जर बसमध्ये ६ आसने (१२ व्यक्ती) महिलांसाठी आरक्षित असतील तर तितकीच आसने पुरुषांसाठी का नाहीत??
गर्दीच्या वेळी जशी 'खास महिलांसाठी' बस असते तिच्याच मागे/पुढे 'खास पुरुषांसाठी' बस का नाही???
लोकलमध्ये ४ डबे महिलांसाठी असतील तर तितकेच (४ डबे) पुरुषांसाठी आरक्षित का नाहीत???
गर्दीच्या वेळी पूर्णच्या पूर्ण ट्रेन महिलांसाठी आरक्षित असेल तर त्याच्या मागे/पुढे पूर्णच्या पूर्णच्या पूर्ण ट्रेन पुरुषांसाठी का आरक्षित नाही???
मुंबई मेट्रोमध्ये वर्सोवा बाजूचा अर्धा डबा महिलांसाठी आरक्षित असेल तर घाटकोपर बाजूचा अर्धा डबा पुरुषांसाठी का आरक्षित नाही???

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परंतु, आरक्षण योग्य व्यक्ती नंतर आल्यास, न मागता ती जागा त्या व्यक्तीला मिळाली पाहिजे !
>>>>

मी तरीही बसत नाही अश्या जागी.
कारण मग ती योग्य व्यक्ती स्पेशली महिला आली आहे का यावर सतत लक्ष ठेवावे लागते ज्यात बसण्याची मजा जाते.

पण थोबाडावर मेकअप थापून दुसऱ्याला attitude दाखवत फिरणाऱ्या मुलींपैकी कोणी अशा पुरुषांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर बसलेली दिसली तर तिला मात्र जास्तीत जास्त पाणउतारा करून उठवेन.
>>>>>

पहिल्याच नजरेत कसे कळणार मुलीत attitude आहे हे?

पण थोबाडावर मेकअप थापून दुसऱ्याला attitude दाखवत फिरणाऱ्या मुलींपैकी > attitude तर मेकअप न करणाऱ्याहि दाखवू शकतात . स्त्रियांनी मेकअप केला म्हणजे त्यांना attitude येतो , कमाल आहे . घरी बहुदा स्त्रिया नसाव्यात किंवा असल्यास मेकअप न करणाऱ्या किंवा त्यांना attitude दाखवायची परवानगी दिली नसावी बहुदा.
कमाल आहे इतका फालतू विचार कसे काय लोक करू शकतात .

अजनबी, अगदीच. पण मनाला लाऊन घेऊ नका. मजा घ्या थोडी.
बाकी अगदी हाच विचार करुन (म्हणजे काय ते समजलंच असेल) विमुंचा जबराट अपमान झालेला असेल असं वाटतं का हो?

*ज्यात बसण्याची मजा जाते.* पण कसरत करत उभं रहाण्याचा त्रास वाचतो ना ! ( तरुण आहात, आत्ताच नाही कळणार ! Wink )

जिला पाहिल्यावर ही माझी आई / मावशी आहे, अशी भावना मनात निर्माण होईल>>> मेट्रो बनण्याच्या आधी वर्सोवा चार बंगलोला ऑफिसला जायचो, अंधेरी वेस्टहून बसने....त्या बसमधे लांबच लांब रांगांमुळे कधी बसायला जागा नाही मिळायची....मग एक दोन बस सोडून बसायला जागा मिळेपर्यंत आमचा ग्रूप थांबायचा....पण कुणी ना कुणी आजोबा-आजी- प्रेग्नंट महीला रिक्वेस्ट करुन ती ही सीट घेऊन जायचे एखाद्या फ्रेंडची.... वैतागून माझ्या एका मित्राने टीशर्ट मागे प्रिंट करुन घेतलेलं - 'सीटसाठी रिक्वेस्ट करु नका, एक तास थांबून आणि दोन बस सोडल्यानंतर जागा मिळाली आहे.'

तरुण आहात, आत्ताच नाही कळणार ! Wink
>>

हे बरोबर आहे भाऊ..
पण तरुण नाहीत त्यांच्या साठी स्वतःचे आरक्षण असतेच ना Happy
आणि ते फुल असेल तर अर्थात तरुण मुलींनी आपली जागा ज्ये.ना. यांना देणेच अपेक्षित असले पाहिजे.

वि मु यांना काहीतरी अप्रिय अनुभव असतील त्यामुळे त्यांचे विचार कडवट झाले असतील.
त्यांच्या विचारांना कडक शब्दात झापले तर कदाचित ते विचार अजून कडवट होतील. इथे सुसंवादाची गरज आहे.

थोबाडावर मेकअप थापून दुसऱ्याला attitude दाखवत फिरणाऱ्या मुलींपैकी >>
या विधानाची फोड करूयात.

यात तीन अटी आहेत.
पहिली मेक अप थोबाडाला(च) लावलेला असणे >>> अन्यत्र नाही.. हात किंवा टाचेला मेक अप लावलेला असेल तर फाऊल.
दुसरी अट, थोबाडाला मेक अप लावल्यावर attitude दाखवणे. >> मेक अप लावून attitude न दाखवणे किंवा अजिबातच नसणे तसेच मेक अप न लावता attitude दाखवणे हे बाद समजण्यात येईल.
तिसरी अट - वरच्या दोन्ही अटी पाळणारी व्यक्ती मुलगी असली पाहीजे. >>> ती मध्यमवयीन बाई नसावी, वृद्ध स्त्री नसावी, मुलगा नसावा, पुरूष नसावा किंवा तृतीयपंथी नसावा.

या तीन अटी जेव्हां एकत्रित येतील तेव्हां त्या परिस्थितीत जागा न देण्याचा निर्णय घेण्याचा विमु यांना पूर्ण अधिकार आहे. त्यावर टीका करण्याचा अद्धिकार कुणालाही नाही.

Submitted by रघू आचार्य on 21 November, 2024 - 22:38 >>> तुम्ही नमूद केलेली दुसरी अट ही पुर्णपणेपणे एकाच गृहीतकावर आधारित आहे की मेकअप लावलेले थोबाड हे स्वतःचेच आहे, परंतू विमुंच्या बोलण्यात कुठेही तसा आग्रह दिसत नाही.... ब्युटीपार्लरवाली मुलगी, दुसऱ्या मुलीच्या थोबाडाला मेकअप लावून विमुंना ॲटिट्यूड दाखवत फिरत असेल तर त्या प्रकरणी देखील सीट न देण्याचे, नी त्या मुलीचा पाणउतारा करण्याचे अधिकार विमु राखून ठेवत आहे असे दिसते.

टीप - सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट च्या भाषेत याला एज केस म्हणतात.

धन्यवाद बेफि Happy

एक दिवस माझे स्वतःचे संकेतस्थळ असेल तेव्हा जरूर ते वाक्य वापरेन.

तूर्तास यावर कधीतरी एक स्वतंत्र लेख लिहिता येईल ही नोंद करून ठेवतो Happy

कोणालाही उभे राहायला लागू नये . सर्वांना बसायला जागा मिळेल इतक्या बसेस सोडाव्या . बसून प्रवास करणे हि एक मूलभूत गोष्ट असावी . तिकीट सर्वांना समानच असते ना .

कोणालाही उभे राहायला लागू नये . सर्वांना बसायला जागा मिळेल इतक्या बसेस सोडाव्या>>> भारतात हे विधान प्रॅक्टिकल तरी आहे का? लोकसंख्या किती..

भारतात हे विधान प्रॅक्टिकल तरी आहे का? लोकसंख्या किती.. > प्रॅक्टिकल आहे. जादा गाड्यांचा खर्च वाढेल हे खरे असले तरी त्यातून मिळणारे फायदे तो खर्च वसूल करतात असे मला वाटते. आरामदायी प्रवासामुळे लोकांची जीवनाची गुणवत्ता वाढेल. जास्त लोक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरतील व रस्त्यावरची रहदारी कमी होईल. प्रदूषण कमी होईल. दुचाकींचा वापर कमी झाला तर अपघाताचे प्रमाण कमी होईल. जादा गाड्यांमुळे रोजगार वाढेल.
जर मार्गांचे व बसेसचे व्यवस्थित नियोजन केले तर गर्दी समान विभागली जाईल. (एक बस तुडुंब भरलेली व मागून आलेल्या रिकाम्या हे पहिले आहे.) शक्य झाल्यास खाजगी बसेसचा पर्याय वापरावा . दिल्लीमध्ये हा पर्याय चालू केला आहे.
ज्यांना परवडते त्यांच्यासाठी अधिक तिकिटाच्या प्रीमियम बसेस चालू करता येतील. तसेही सध्या जे लोक रिक्षा ओला उबर वापरतात त्याचे भाडे सार्वजनिक बसेस च्या तुलनेत अव्वाच्या सव्वा असते. चांगली सुविधा मिळाली तर त्यातले काही इकडे येतील.

शक्य झाल्यास खाजगी बसेसचा पर्याय वापरावा . दिल्लीमध्ये हा पर्याय चालू केला आहे. ज्यांना परवडते त्यांच्यासाठी अधिक तिकिटाच्या प्रीमियम बसेस चालू करता येतील..... Submitted by माबो वाचक on 22 November, 2024 - 09:08
मुंबईतही आता हा पर्याय आहे. ज्या कंपनीने बेस्टसाठी bus tracking cum online ticketing software बनवले आहे, बस वाहकांसाठी android based ticket machines जी कंपनी पुरवते त्या 'चलो' कंपनीने स्वतःच्या 'Chalo Bus' ही प्रीमिअम बससेवा विमानतळ, बीकेसी अशा काही ठराविक मार्गांवर सुरु केली आहे.

घरी बहुदा स्त्रिया नसाव्यात किंवा असल्यास मेकअप न करणाऱ्या ....Submitted by Ajnabi on 21 November, 2024 - 18:48
आहे ना, माझी स्वतःची सख्खी बहीण आहे. साधे नाक्यावरच्या दुकानात / D-Mart मध्ये जायचे असेल तरी तयारीला किमान अर्धा तास लावणारी, मेट्रोने कुठे जायचे असेल तर escalator वर उजव्या बाजूला उभी राहणारी - आणि डावीकडे उभी रहा म्हणून सांगितले तर स्वतःची चूक न सुधारता 'कोणी नाही आहे मागे, काय सगळीकडे नियम नियम करत राहतोस' करून मलाच ऐकवणारी, एखाद्या दुकानात काही खरेदी करायची असल्यास गाडी दुकानाच्या समोरच लावावी अशी अपेक्षा ठेवणारी आणि त्यावर मी आक्षेप घेतला तर 'इतक्या सगळ्या लोकांनी लावल्या आहेत' म्हणून मलाच सांगणारी वगैरे वगैरे.

किंवा त्यांना attitude दाखवायची परवानगी दिली नसावी बहुदा.....Submitted by Ajnabi on 21 November, 2024 - 18:48
मुळात 'कोणीच कोणालाही attitude दाखवू नये' या मताचा मी आहे. मग तुम्ही स्त्री असा की पुरुष, modern असा की जुन्या विचारांचे.
शासन - प्रशासनाने जे काही नियम बनवले आहेत ते गुपचूप सगळ्यांनी तंतोतंत पाळावेत, त्यातच सगळ्यांचे भले आहे. जर तुम्हाला एखादा नियम चुकीचा वाटत असेल किंवा एखाद्या नियमात काही त्रुटी जाणवत असेल तर संबंधित यंत्रणेशी पत्रव्यवहार करा. पण नियमच न पाळणे आणि वर 'तुला मीच दिसते / दिसतो का?', 'इतके सगळे जण नियम मोडत आहेत' वगैरे वगैरे arguments करणे चुकीचेच आहे.

वैतागून माझ्या एका मित्राने टीशर्ट मागे प्रिंट करुन घेतलेलं - 'सीटसाठी रिक्वेस्ट करु नका, एक तास थांबून आणि दोन बस सोडल्यानंतर जागा मिळाली आहे.'.....Submitted by फार्स विथ द डिफरंस on 21 November, 2024 - 21:44

टीशर्ट वर 'मागे' प्रिंट करून काय फायदा? कारण सीटवर बसल्यावर ते झाकले जाणार ना? खरेतर पुढे छापून घ्यायला पाहिजे होते तुमच्या मित्राने!!!
btw चार बंगल्याला म्हणजे कुठे होतात कामाला? कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये की म्हाडामध्ये असलेल्या सिनेमा / tv related स्टुडिओज मध्ये???

विमु >> ते गमतीने विचारत आहेत. इतकी वैयक्तिक माहिती देऊ नये असे वाटते. वैयक्तिक मत.
नक्की कोणत्या प्रतिसादाबद्दल म्हणत आहात? Ajnabi यांच्या प्रतिसादाबद्दल म्हणत आहात का?
त्या प्रतिसादाबद्दल म्हणत असाल तर - त्यांचे profile तपासले असता त्या महिला आहेत त्यामुळे माझ्या प्रतिसादातील 'थोबाडावर मेकअप थापून दुसऱ्याला attitude दाखवत फिरणाऱ्या मुलींपैकी....' या वाक्यामुळे hurt होऊन त्यांनी 21 November, 2024 - 18:48 चा प्रतिसाद लिहिला आहे. त्यामुळे मी माझी / माझ्या बहिणीची ओळख / location उघड होणार नाही याची काळजी घेऊन त्यांना प्रतिसाद दिला आहे.

वि मु यांना काहीतरी अप्रिय अनुभव असतील त्यामुळे त्यांचे विचार कडवट झाले असतील.
Submitted by ऋन्मेऽऽष on 21 November, 2024 - 22:20 >>>> + ११११११११११

मायबोलीचा सर्व्हर overload होऊन बंद पडेल अशा अनुभवांची यादी लिहिली तर!!! तरीही काही नमुने खाली देतो आहे.

१. D-Mart मध्ये गर्दी असतांना मार्गिकेत कशीही trolly ठेवून उभ्या असलेल्या आणि ३-३ वेळा 'Excuse me!' म्हटले तरीही ढिम्म न हलणाऱ्या... व जर चौथ्या वेळेस आपण जरा चढ्या आवाजात 'excuse me' म्हटले तर मात्र लगेच 'Is this way to talk?' करुन उखडणाऱ्या या मेकअपवाल्याच दिसल्या आहेत. याउलट एखादी चाळीत राहणारी / घरकाम करणारी साधीशी महिला असेल आणि तिला जर मी 'ताई / मावशी, जरा बाजूला होता का?' म्हटले तर त्या मात्र अगदी पहिल्या वेळीच ऐकून जागा करून देतात!

२. काही महिन्यांपूर्वीच (ओशिवरा डेपोतून Force Motors च्या त्या फालतू tempo traveller बस बाद होण्यापूर्वी) एका बसमार्गावर मी प्रवास करत असताना अगदी पहिल्याच stop वर (जिथे बस पूर्णपणे मोकळी होती) एक so called modern महिला महिलांच्या रिकाम्या सीटवर न बसता जनरल सीट वर येऊन बसली. तिला शांतपणे महिलांसाठी आरक्षित असलेल्या सीटवर बसायला सांगितल्यावर... 'क्यू? तुम्हे क्या प्रॉब्लेम है? तुम्हे बैठने के लिये तो मिला है ना?' वगैरे वगैरे सुरु केले. अशा नखरेल बायकांच्या मते 'काकूबाई' (साधी राहणी) असलेल्या महिलांकडून मात्र मला असा अनुभव कधीच आला नाही. त्या एकतर महिलांसाठी आरक्षित आसने मोकळी असतील तर स्वतःहून तिथेच बसतात किंवा अन्य कोणी सांगितले तर शांतपणे आरक्षित आसनावर जातात.

<< महिला महिलांच्या रिकाम्या सीटवर न बसता जनरल सीट वर येऊन बसली. तिला शांतपणे महिलांसाठी आरक्षित असलेल्या सीटवर बसायला सांगितल्यावर... >>

---- महिलांसाठी राखिव असलेल्या जागा रिकाम्या आहेत म्हणून त्यांनी तिथेच बसायला हवे असा काही नियम नाही. त्या कुठल्याही रिकाम्या जागेवर बसू शकतात ( हा नियम आहेत ).

आपण शांतपणे विनवणी करायची. अर्थात या विनवणीमधे पण त्यांना attitude दिसल्यास वादाचीच शक्यता जास्त आहे. बसायला जागा नसेल तर धक्के खात उभ्याने राहून प्रवास केलेला आहे. Happy

गर्दीवर उपाय म्हणून पूर्वी एक पर्याय खूप गंभीरपणे चर्चेत होता _" कार्यालयांची वेळ वेगवेगळी ठेवणे " . त्यावर पूर्विचार होणंही उपयुक्त ठरू शकतं.

महिलांसाठी राखिव असलेल्या जागा रिकाम्या आहेत म्हणून त्यांनी तिथेच बसायला हवे असा काही नियम नाही. त्या कुठल्याही रिकाम्या जागेवर बसू शकतात ( हा नियम आहेत ).....
म्हणूनच पुरुष प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठीच 'जितकी आसने महिलांना आरक्षित तितकीच आसने पुरुषांना आरक्षित' पाहिजेत!!!
म्हणजे प्रश्नच मिटेल!!!

बसायला जागा नसेल तर धक्के खात उभ्याने राहून प्रवास केलेला आहे.... मीही हेच करतो. कित्येकदा असे होते की, एखादी लेडीज सीट रिकामी असते. अशावेळी काही सहप्रवासी सांगतात, उधर बैठ जाओ, बाद मे उठना. त्यांना मी नम्रपणे नकार देऊन उभे राहणेच पसंत करतो.
देवाने आपल्याला दोन पाय दिले आहेत ना? मग उभे राहायचे!

मेकप वाल्या बाईला एक्स्युज मी म्हणण्यापेक्षा ताई माई अक्का मावशी आजी म्हणून बघा.

रिझर्व्ड सीट रिकामी आहे म्हणून बसा आणि मग रिझर्वेशनवाला प्रवासी आला की उठा असे केल्याने फार हाल अनुभवले आहेत.

एकदा अंधेरी डी एन नगर ते बोरिवली असा प्रवास करत होतो. एकच सीट रिकामी ती ज्येष्ठ नागरिकांची. तिथे बसलो. काही स्टॉपनंतर एक ज्ये ष्ठ नागरिक पुढच्या दाराने चढले , त्यांच्यासाठी सीट रिकामी करून उभा राहिलो. पण पुढच्या दोन्ही बाजूच्या सीट्स आरक्षित असतात. तोवर उभ्यांच्याही दोन रांगा लागल्या होत्या. मागे येणं शक्य नव्हतं. बसायला मिळायची शक्यता नाही कारण आरक्षित जागा. उतरणार्‍यांचे आणि पुढून चढणार्‍यांचे धक्के खात पूर्ण प्रवास केला. सगळ्या आरक्षित जागा एकाच बाजूला ठेवल्या तर हा त्रास वाचेल. आधी अंपंगांसाठी, मग ज्येष्ठांसाठी त्यामागे स्त्रियांसाठी.

स्त्रियां साठी आरक्षित सीटवर अन्य कोणी बसताना फार दिसत नाही. पण ज्येष्ठ आणि अपंगांच्या सीटवर असतात. आणि ज्येष्ठ नागरिक आल्यावर ते उठतातच असं नाही. यात स्त्रिया , कॉलेज तरुणीही आल्या.

महिलांसाठी राखिव असलेल्या जागा रिकाम्या आहेत म्हणून त्यांनी तिथेच बसायला हवे असा काही नियम नाही. त्या कुठल्याही रिकाम्या जागेवर बसू शकतात ( हा नियम आहेत ) >> स्त्री पुरुष समानता बोलताना खरं तर असे जुनाट नियम बदलणे आवश्यक आहे. जसे रेल्वे आरक्षणात वेटींग लिस्टमध्ये सीट वर वर सरकतात तसे आधी त्यांना त्यांच्या आरक्षित सीट्स वर बसणे अनिवार्य असले पाहिजे. नंतर त्या जागा भरल्या वर कुठेही बसा / उभे रहा.

-------

आता त्या विविक्षित स्त्रीच्या बाजूने थोडं पाहू - बस मध्ये फार पुढच्या सिटवर बसून प्रवास म्हणजे केबिन मधला वास आणि इतर काही तत्सम गोष्टी अश्या कारणामुळे बसचा पुढील भाग सोडून मध्यावर बसून प्रवास सुखकर वाटू शकतो. तसेच खडड्यातून गेल्यावर तुलनेने कमी त्रास होईल. (मेकअप नीट सांभाळणे किंवा उतरता उतरता हलके टच अप करणे शक्य होईल Light 1 ) ह्याशिवाय इतरही काही कारणे जसे पुढे खिडकीच्या बाजूस न बसता जर रांगेच्या बाजूस बसले तर उतरणाऱ्या प्रवशांचा (जाणते / अजाणते धक्के लागत राहून मानसिक त्रास होणे इत्यादी.

ऊन कोणत्या बाजूला येतंय हाही एक मुद्दा घ्या. लोकसत्ता मुंबई वृत्तान्ताने महिलांच्या सीट्स उन्हात अशी बातमी छापली होती. ती वाचून माझा हात आपसूक माझ्याच कपाळावर जाऊन आपटला.

हा हा @बातमी Lol
मग तर पार्किंगसाठी सम विषम नियम तसे इकडे 4pm पूर्वी आणि नंतर असे नियम करावे लागतील उन्हाची सांगड घालताना
:कपाळ बडवती:

मै चाहे यहा बैठूं
मै चाहे वहां बैठू
मेरी मर्जी

लेडिज सीट पर मै ना बैठूं
मेरी मर्जी
जनरल पर मै हक जमाऊं
मेरी मर्जी
मर्दों को मै बैठने न दूं
मेरी मर्जी
लेडीज सीट पर सॅंडल रखूं
मेरी मर्जी
मै चाहे ये करू
मै चाहे वोह करू
मेरी मर्जी

म्हाडामध्ये असलेल्या सिनेमा / tv related स्टुडिओज मध्ये??? >> RGV चा स्टुडिओ होता त्याच्या मागे, गणेश आचार्या ची डान्स ॲकॅडमी आहे त्या सेम लेन‌मधे. ऑनलाइन शॉपिंग पोर्टल कंपनी होती, आमच्या ऑफिस समोरच 'तेरा तेरा तेरा सुरुर' वाल्याचा रेकॉर्डिंग स्टुडियो होता. Biggrin

Pages