फक्त पुरुषांसाठी - सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पुरुषांसाठी राखीव आसने / डब्बे असावेत असे वाटते का?

Submitted by विक्षिप्त_मुलगा on 22 April, 2020 - 03:28

धाग्याच्या शीर्षकाविषयी - मायबोलीवरील अन्य एका धाग्याने हा धागा काढण्याची प्रेरणा दिली आहे!

सध्या LockDown असल्याने जवळपास संपूर्ण देश थांबला आहे. परंतु काही दिवसांत परिस्थिती निवळेल आणि पुन्हा आपले रहाटगाडगे सुरु होईल.
ज्या शहरांत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तितकीशी सक्षम नाही आणि बहुतांश लोक जिथे प्रामुख्याने खाजगी वाहने (दुचाकी / चारचाकी) वापरतात त्या शहरातील लोकांना कदाचित हा धागा म्हणजे हास्यास्पद वाटेल. परंतु मुंबईसारख्या शहरात जिथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर जास्त होतो तेथील लोकांना या धाग्यातील मर्म आणि धागा लेखकाची व्यथा निश्चितच समजेल!!!

तर सध्या आधी स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारणाऱ्या, शालेय शिक्षणात मूल्य शिक्षणामध्ये स्त्री-पुरुष समानता आदी मुल्ये शिकवल्या जाणाऱ्या समाजातील काही वास्तव पाहू.
१. मुंबईतील बेस्ट बस - चालकाच्या केबिनमागील ६ आसने महिलांसाठी राखीव (एकूण १२ महिला); पुरुषांसाठी बाबाजीका **
२. मुंबईतील बेस्ट बस - गर्दीच्या वेळी काही मार्गावर 'केवळ महिलांसाठी' बस (उदा. बसमार्ग क्र. ७९); पुरुषांसाठी बाबाजीका **
३. मुंबईतील लोकल ट्रेन्स - १२ डब्ब्यांच्या ट्रेनमध्ये ४ डब्बे महिलांसाठी राखीव; पुरुषांसाठी बाबाजीका **
४. मुंबईतील लोकल ट्रेन्स - गर्दीच्या वेळी पूर्णच्या पूर्ण ट्रेन महिलांसाठी राखीव; पुरुषांसाठी बाबाजीका **
५. मुंबई मेट्रो - वर्सोवा बाजूचा अर्धा डबा महिलांसाठी राखीव; पुरुषांसाठी बाबाजीका **

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांना एखादी सुविधा दिली जात असेल तर तीच सुविधा पुरुषांना का दिली जात नाही?

वास्तविक स्त्री आणि पुरुष ही समाजनामक एकाच रथाची (किंवा आजच्या काळातील उदाहरण द्यायचे तर एकाच स्कूटरची!) दोन चाके आहेत. त्यामुळे दोघांना समान न्याय मिळाला पाहिजे. ज्याप्रमाणे स्त्रीविना सृष्टी चालू शकत नाही, त्याचप्रमाणे पुरुषांविनाही सृष्टीचे चक्र सुरु राहू शकत नाही. स्त्री ही जर सृष्टीचे इंजिन असेल तर पुरुष हा स्टार्टर आहे! तुम्ही स्कूटरच्या एका चाकात वेळोवेळी हवा भरत आहात, oiling करत आहात, bearings खराब झाल्या तर त्या बदलत आहात आणि दुसऱ्या चाकाकडे दुर्लक्ष करत असाल तर ती स्कूटर नीट चालणारच नाही. त्यासाठी दोन्ही चाकांकडे समान लक्ष दिले पाहिजे. (एखादे चाक आधीपासून खूप दुर्लक्षित असेल तर त्याकडे जरा जास्त लक्ष देणे समजू शकतो पण म्हणून दुसऱ्याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल?)

अ त्यं त म ह त्वा चे : येथे महिलांना दिल्या जाणाऱ्या सुविधा काढून घ्याव्यात असे कोठेही म्हटलेले नाही. महिलांना ज्या सुविधा मिळतात त्याच सुविधा पुरुषांनाही मिळाव्यात अशी रास्त अपेक्षा आहे.

म्हणजेच,
जर बसमध्ये ६ आसने (१२ व्यक्ती) महिलांसाठी आरक्षित असतील तर तितकीच आसने पुरुषांसाठी का नाहीत??
गर्दीच्या वेळी जशी 'खास महिलांसाठी' बस असते तिच्याच मागे/पुढे 'खास पुरुषांसाठी' बस का नाही???
लोकलमध्ये ४ डबे महिलांसाठी असतील तर तितकेच (४ डबे) पुरुषांसाठी आरक्षित का नाहीत???
गर्दीच्या वेळी पूर्णच्या पूर्ण ट्रेन महिलांसाठी आरक्षित असेल तर त्याच्या मागे/पुढे पूर्णच्या पूर्णच्या पूर्ण ट्रेन पुरुषांसाठी का आरक्षित नाही???
मुंबई मेट्रोमध्ये वर्सोवा बाजूचा अर्धा डबा महिलांसाठी आरक्षित असेल तर घाटकोपर बाजूचा अर्धा डबा पुरुषांसाठी का आरक्षित नाही???

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही स्वतः लेडीज फर्स्ट क्लास मधून प्रवास न करता तुमच्या मैत्रिणीच्या (?) बोलण्यावर विश्वास ठेवता ?
>>>>

मी अमेरिकेला सुद्धा गेलो नाही
पण तेथील मायबोलीकरांचे अनुभव वाचतो आणि विश्वास ठेवतो.
प्रत्येक गोष्टीत कश्याला खरे खोटे करत फिरायचे Happy

तेथील मायबोलीकरांचे अनुभव वाचतो आणि विश्वास ठेवतो>> हो ना ! मग मी ही मायबोलीकर आहे आणि लेडीज फर्स्ट क्लास मधून प्रवास करते आहे . त्यामुळे माझा अनुभव वैलिडेट ठरतो ना सांगोवंगीच्या मैत्रिणीच्या म्हणण्यापेक्षा !

खरे खोटे झाले की इथेच Happy

त्यामुळे माझा अनुभव वैलिडेट ठरतो ना सांगोवंगीच्या मैत्रिणीच्या म्हणण्यापेक्षा !
>>>>>>

संगोवांगी म्हणजे?
तुम्हाला मी प्रत्यक्ष ओळखत नाही. मैत्रीण प्रत्यक्ष ओळखीची आहे. त्यामुळे तसे पाहिले तर तिच्या अनुभवाला वेटेज जास्त.

पण वर म्हटले तसे तुम्ही दोघी आपल्या जागी बरोबर आणि खऱ्या असाल. ज्याचे जसे अनुभव.

मागे सुद्धा शेअर रिक्षा मध्ये चौथ्या सीट वर बसतात आणि तिथे मुली सुद्धा बसतात यावर बरेच जण असे काही नसते म्हणून माझ्याशी वाद घालत होते. पण आता आमच्या इथे बायका सुद्धा रिक्षा चालवतात आणि पुरुष सुद्धा त्यांच्या शेजारी चौथ्या सीटवर बसतात. यावर विश्वास बसायला फोटो काढून दाखवावा लागेल त्यांना.

मी मात्र जे आपण पाहिले नाही ते घडत नाही असे नसते हे समजून घेत प्रत्येकाचे अनुभव खरेच मानतो Happy

आताच बायकोला विचारले. ती फार फार आधी प्रवास करायची. ती म्हणाली की शक्यतो बसत नाहीच. तीनचीच पद्धत आहे. पण अगदीच गर्दी असेल तर बसतात.
अर्थात त्या काळी इथे या लाईनला गर्दी जास्त नसायची. त्यामुळे तिला हा अनुभव क्वचित होता.
पण मुद्दा हा की गर्दीच्या वेळी समजून घेतले जायचे.
जे पुरुषांच्या डब्यात मला तरी आजवर आढळले नाही. अगदी पावसामुळे ट्रेन खोळंबून मरणाची गर्दी का झाली असेना असे चौथी सीट माझ्या पाहण्यात आले नाही.

बाकी गर्दी होते म्हणून मुली पुरुषांच्या फर्स्ट क्लास मध्ये चढतात वगैरे वेगळे मुद्दे . त्याचा चौथ्या सीट्सशी सबंध नाही .
>>>

तो मुद्दा आधीच्या चर्चेत होता.
विमु यांच्यासाठी.. (एकाच प्रतिसादात लिहिले होते कारण प्रतिसाद वाढलेले इथे काहीना आवडत नाही Happy )

जर स्त्रियांना त्यांच्या प्रमाणात त्या आकाराचा राखीव डब्बा दिला नाही तर त्या पुरुषांच्या म्हणजेच जनरल डब्यात चढणे साहजिकच आहे. त्यांना देखील काही आवड नसणार. कम्फर्ट बघतात.

मी तुम्हाला खोटे ठरवत नाहीयेच.
पण तुम्ही हट्टाने मला खोटे ठरवायचा प्रयत्न करत आहात.
अशी चर्चा न करणेच उत्तम Happy
तुम्ही आपल्या अनुभवांनाच खरे मानून पुढे जा...
मी सर्वाचे गोळा करून पुढे जातो Happy

जाई
यांच्या सहनशक्तीला त्रिवार सलाम.

स्त्रियांच्या फर्स्ट क्लासमध्ये सिट्स कमी असतात, ८ जणी बसतात ती एक आडवी व समोर ३-३ बसणार्‍या दोन सिट्स एवढ्याच सिट्स असतात म्हणुन जनरल फर्स्ट मध्ये स्त्रिया चढतात.

या डब्ब्यात सहसा ९ वी व ४ थी सिट नाही देत. अगदीच बारक्या बसल्या असतील व ४थीही आरामात बसु शकत असेल तर मिळते. निदान फर्स्टमध्ये तरी आरामात बसायला मिळायला हवे.

तसे सेकंड मध्येही ४थी आरामात बसु शकत नाही, उगीच त्रास सहन करत बसायचे.

एकंदरीतच, " जावे त्याच्या वंशा तेव्हां कळे ", अशीच परिस्थिती वाहतूक आरक्षणाबाबत असावी, असं या चर्चेतून निष्पन्न होतंय !! Wink

८ जणी बसतात ती एक आडवी
>>>>
८ कसले तिथे ७ च बसतात पुरुषात. आणि आठव्याने सुद्धा मागायला येऊ नये म्हणून पाय पसरवून बसायची काळजी घेतली जाते.

फर्स्ट क्लास मध्ये तरी आरामात बसायला मिळायला हवे हा विचार योग्यच वाटतो.
पण त्याच फर्स्ट क्लासमध्ये जीवाशी खेळ करत दारावर लटकलेल्या लोकांना बघतो तेव्हा यांनी काय मिळवले फर्स्ट क्लासचे तिकीट काढून असेच वाटते.
अर्थात घामाच्या वासात फरक असतो दोन्हीकडील गर्दीत. सुदैवाने माझ्यावर कधी आयुष्यात अश्या गुदमरलेल्या गर्दीच्या वातावरणात प्रवास करायची वेळ आली नाही.

हाहा ऊबो.. नाही, पण मुंबईच्या दक्षिण भागात आयुष्य गेले आणि प्रवास उत्तरेकडे केला. त्यामुळे सकाळच्या वेळेस फर्स्ट क्लास काय सेकंड क्लास मध्ये देखील वाऱ्याची खिडकी मिळायची. ते देखील कमी म्हणून जिथे डोके टेकवून झोपायला सपोर्ट मिळेल अशी खिडकी निवडायचे स्वातंत्र्य असायचे. इतर गर्दीत प्रवास करणाऱ्या मित्रांना चिडवायला मी रिकाम्या ट्रेनचे फोटो काढून त्यांना शेअर करायचो. संध्याकाळी येताना अगदी इतके सुख नसले तरी निवांत बसायची सोय व्हायची. आणि पुढे हवी तशी खिडकीची सीट मिळायची.
कधी परत येताना पावसामुळे ट्रेन खोळंबल्या तर मात्र गर्दी वाढायची. अश्यावेळी मी ट्रेन सोडायचो. उशीरा घरी जायचो. पण गर्दीत चढायचो नाही.

सध्या मुलांना ट्रेनने फिरायची आवड आहे. म्हणून मुद्दाम लोकल ट्रेनने कुठे कुठे नेतो. त्यांनी गर्दीचा अनुभव अजून घेतला नाही. कारण आमचे फिरणे उलट्या दिशेने आणि सुट्टीच्या दिवशी भल्या पहाटे किंवा मध्यरात्री होते. त्यामुळे त्यांना ट्रेनचे दुसरे रूप माहीत नाही. रिकाम्या ट्रेनमध्ये गप्पा मारत, गेम खेळत प्रवास करणे आणि बसून बोर झाले की हॅण्डलला लटकने इतकेच त्यांना माहीत आहे. एकदा मुद्दाम त्यांना युट्यूब व्हिडिओ दाखवले होते. असेही लोकं प्रवास करतात म्हणून Happy

'आय आयडेंटीफाय ॲज अ वुमन' हा मंत्र म्हणून स्त्रियांच्या सीटवर बसता येणार नाही का Uhoh

धाग्याच्या निमित्ताने - फक्त पुरुषांसाठी गप्पांचा वाहता धागा असावा असे वाटते का?

या धाग्यावर आधी सगळे टीपी प्रतिसाद देत होतो.
एखाद्या गोष्टीचा नियम बनला कि त्या नियमात काही चुकीचं कसं आहे हे दाखवण्याची एक वृत्ती असते. नियम बनलाय तो आपल्यावर अन्याय म्हणून असे काहींना नेहमी वाटते. स्त्री दाक्षिण्य हा नियम / कायदा बनावा अशी परिस्थिती यावी हे दुर्दैव. आपल्या घरातल्या आया बहिणींना आधी जागा मिळावी मग आपण संधी मिळाल्यावर बसावे हा विचार आपण करतो. आपल्या घरातली नसली तरी स्त्री आहे तिला तो मान द्यावा एव्हढी साधी अपेक्षा आहे. अजून तरी बहुमताने ती मान्य आहे म्हणून नियम तसा आहे. उद्या धाले प्रमाणे सगळे विचार करू लागलेले मनपा मधे गेले कि हा नियम बदलू शकेल.

पुण्यात हेल्मेट घालून गाडी चालवायची असा दंडक काढल तेव्हां लोक रस्त्यावर आले. वृत्तपत्रांनी शब्द वापरला तो हेल्मेट सक्ती. वास्तविक गाडी घेताना काही गाड्यांच्या ओनर्स मॅन्युअल मधेच असा नियम आहे हे सांगितलेले असते. फक्त आहे त्या नियमाची अंमलबजावणी सुरू होणार होती. आपल्यावर मोठा अन्याय होतोय असे वाटून लोकांनी अगदी मानेचे आजार, मणक्याचे विकार यावर ज्ञान सांडले. ते योग्य कि अयोग्य हा प्रश्न बाजूला ठेवू. पण नियम आधीपासून असताना या function at() { [native code] }इहुषार लोकांना ते कसे समजले नाही ? एव्हढा अभ्यास इथे केला असता तर आधीपासून अस्तित्वात असलेल्या नियमाच्या विरोधात लढा देणे व्यर्थ आहे हे समजले असते.

बरं नियम बनवणारे किंवा आता अंमलबजावणीचा आग्रह धरणारे लहरी मोहम्मद होते का ? एका सर्व्हे मधे रस्त्यावर होणार्‍या अपघातात काही टक्क्याच्यावर ( कदाचित ७०%) मृत्यू हे हेल्मेट न घातल्याने डोकं फुटून होतात असा अहवाल होता. त्यांनी पोलीस कमिशनरकडे हेल्मेटचा आग्रह धरला होता त्यांना ते पटले. विनाकारण, लहर फिरली म्हणून असला प्रकार नव्हता.

कार्यकारणभाव समजून घेऊन केलेला विरोध असेल तर त्या विरोधात पटवून देण्याची क्षमता असते. मला काही समजून घ्यायची आवश्यकता नाही, मला असे वाटते ना, बस्स... असा अ‍ॅटीट्यूड सोशल मीडीयामुळे जास्त दिसतो. तुमचे म्हणणे बरोबर असले तरी तुम्ही आधी दुसरी बाजू समजावून घेतली का या प्रश्नाचे उत्तर शोधल्यास अशा बर्‍याच काथ्याकूटांना सोशल मीडीयात जागा राहणार नाही.

उद्या धाले प्रमाणे सगळे विचार करू लागलेले मनपा मधे गेले कि हा नियम बदलू शकेल.>>>यासाठी नक्कीच प्रयत्न करायला हवेत... याने पुरुषांचा फयदा होणार असेल तर त्यात माझाही फायदा आला. स्रीयांचा मान असेल तर तो सत्यनारणाच्या पुजेत, नको त्या त्यांनी ठिकाणी मानाची अपेक्षा करु नये हे उत्तम.

पुरुषांना राखीव डब्याची गरज काय? कुठल्या स्त्रिया समोरून येऊन त्यांचा विनयभंग करणार आहेत? भलत्याच अपेक्षा आहेत..
स्त्रिया पुरुषांचा विनयभंग करतील की नाही हा वेगळा मुद्दा. पण चुकून जरी धक्का लागला तरी विनयभंगाची तक्रार दाखल करून एखाद्याला आयुष्यातून नक्कीच उठवू शकतात. कारण आपले एकतर्फी असलेले कायदे! कित्येक स्त्रियांनी पुरुषांवर (प्रवासातच नव्हे तर इतर वेळीही) विनयभंग / बलात्कार असे खोटे गुन्हे दाखल केले आहेत. काही न्यायालयांनी देखील यावर चिंता व्यक्त केली आहे. बातमीची लिंक मिळाली की टाकेन. जर पुरुषांसाठी स्वतंत्र डबे असले तर निदान प्रवासात तरी अशी भीती राहणार नाही.

जर एखादी सुंदर महिला जनरल डब्यात चढली तर पुरुषांचा डब्बा अर्धा रिकामा आणि जनरल डब्यावर एक्स्ट्रा लोड असे नाही का होणार? Submitted by ऋन्मेऽऽष on 23 November, 2024 - 02:44
सध्या ४ डबे महिलांसाठी आणि ८ डबे जनरल असतात. त्या ८ डब्यांपैकी एखाद्या डब्यात सुंदर महिला चढली तर काय बाकीच्या ७ डब्यांमधले पुरुष एकाच डब्यात गर्दी करतात का??? लिहायचे म्हणून काहीही लिहायचे का??? ज्यांना त्या सुंदर महिलेला न्याहाळायचे आहे (याचे मी समर्थन करीत नाही) ते जनरल डब्यातून प्रवास करतील आणि ज्यांना त्या सुंदर महिलेने आपल्या विरोधात तक्रार करून IPC 354 चा गुन्हा आपल्यावर दाखल होऊ नये असे वाटते ते पुरुषांच्या डब्यातून प्रवास करतील!!! अगदी साधे आहे.

म्हणून मला तरी फक्त पुरुषांचा डब्बा नकोय. त्यात महिला सुद्धा असलेल्या उत्तम. जसे बायकांमुळे घराला घरपण येते, तशीच फिलिंग ट्रेनच्या त्या रुक्ष डब्यात सुद्धा येते..
Submitted by ऋन्मेऽऽष on 23 November, 2024 - 02:50
मग ज्यांना असे so called feeling हवे आहे त्यांच्यासाठी जनरल डबे असतीलच ना! काही सभासद इथे जसे (कुत्सितपणे) ‘पृथ्वीचे दोन भागच करा / पृथ्वी मधोमध कापा’ अशा अतार्किक प्रतिक्रिया देत आहेत तसे काही मी ५०-५०% विभाजन सुचवत नाही आहे. माझे म्हणणे – ४ डबे अगोदरच महिलांसाठी आरक्षित आहेतच, ते तसेच ठेवावेत, त्यांना कोणताही धक्का लावू नये (महिलांनी प्रतिक्रिया देण्यापूर्वी हे बोल्ड केलेले वाक्य किमान १० वेळा वाचावे, ही विनंती.) उरलेले ८ डबे जे जनरल आहेत त्यापैकी ४ डबे पुरुषांसाठी आरक्षित करून ४ डबे जनरल ठेवावेत. म्हणजेच ४ डबे महिला + ४ डबे पुरुष + ४ डबे जनरल = १२ डबे!
म्हणजे नवरा-बायको, नवरा-बायको-मुले असे कुटुंब किंवा कपल्स, मित्र-मैत्रिणी यांना एकत्र प्रवास करायचा असेल तर त्यांच्यासाठी ४ डबे जनरल असतील. पण कोण्या एखाद्याला घराचे फिलिंग हवे म्हणून ते सगळ्याच पुरुषांवर थोपवणे कितपत योग्य आहे???

रघू आचार्य यांच्या 23 November, 2024 - 23:36 या प्रतिसादाला अनुसरून –
स्त्री दाक्षिण्य हवेच, याबाबत दुमत नाही. पण कोणत्या मर्यादेपर्यंत??? अगोदरच एक तृतीयांश (४ डबे) महिलांसाठी आरक्षित आहेतच. उरलेल्यांपैकी ४ डबे पुरुषांसाठी आरक्षित करा म्हणणे म्हणजे स्त्री दाक्षिण्य नाही, असे कसे म्हणता येईल??? काही स्त्रियांना जर जनरल डब्यातूनच प्रवास करण्याची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी ४ डबे जनरल असतीलच. पण केवळ काही स्त्रियांना जनरल डब्यातून प्रवास करावा लागतो / आवडतो, काही पुरुषांना महिला सोबत असल्यावर घरगुती फिलिंग वगैरे येते म्हणून सगळ्याच पुरुषांना त्यांच्या हक्कापासून का वंचित ठेवावे??
समाजात काही स्त्रिया अशाही आहेत ज्या सरकारने आपल्याला सवलती दिल्या आहेत / बहुतांश कायदे आपल्या बाजूने आहेत म्हणून स्त्री असण्याचा गैरफायदा घेतांना दिसतात. उदाहरणादाखल एक लिंक खाली देतो आहे, तो video पूर्ण पहा.
https://www.youtube.com/watch?v=KaR_IYffUrg
त्यात मुलाखत देणाऱ्याने एक अनुभव सांगितला आहे. एका विवाहित स्त्रीने आपल्या सासरच्या माणसांवर (नवरा, सासू-सासरे, नणंद, दीर इ.) IPC 498 (A) (घरगुती हिंसाचार) ची केस टाकून त्यांना तुरुंगात पाठवले पण आरोपींमध्ये कुटुंबातील एका दोन महिन्यांच्या लहान बाळाचेही नाव लिहिले! I repeat – दोन महिन्यांचे लहान बाळ, ज्याला स्वतःची मानही सावरता येत नाही. समजा ही तक्रार जरी खरी असेल, म्हणजे ती सासू कजाग असेल, नवरा त्या बाईला माहेराहून पैसे आणण्यासाठी मारहाण वगैरे जरी करत असेल तरी त्या दोन महिन्यांच्या बाळाला – ज्याला स्वतःला भूक लागली, शी झाली, कुठे दुखते आहे हेही सांगता येत नाही, केवळ रडता येते अशा बाळाला कळते आहे का की, ही दुसऱ्या घरातून आपल्या घरात लग्न होऊन आली आहे पण येताना हिने सोन-नाण काही आणलं नाही, टीव्ही-फ्रीज, बाईक-गाडी काही आणली नाही वगैरे वगैरे. जरी समजा खरोखरच छळ होत असेल तरी दोन महिन्यांच्या बाळाचे नाव आरोपी म्हणून देण्यामागे काय कारण असू शकेल??? एकच कारण – समोरच्याला त्रास देणे, कारण कायदा माझ्या बाजूने आहे!
वर मी जे attitude दाखवणाऱ्या बायका म्हटले आहे ते या अशाच! कायदा आपल्या बाजूने असल्याचा गैरफायदा घेणाऱ्या बायका. कारण त्यांना माहित आहे, आपण क से ही वागलो तरी समोरचा आपल्याला काहीही करु शकत नाही.
अशा बायका कधीही एखाद्या पुरुषावर प्रवासात चुकून जरी धक्का लागला तरी राईचा पर्वत / पराचा कावळा करून त्याच्यावर विनयभंगाची केस टाकून त्याचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. त्यामुळे अशी टांगती तलवार प्रवासात सतत डोक्यावर राहू नये, म्हणून पुरुषांसाठी आरक्षित डबे हवेत.
स्त्री दाक्षिण्य दाखवणे योग्यच आहे पण त्यामुळे कधी आपल्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जाणार नाही / आपली प्रतिमा, सामाजिक प्रतिष्ठा डागाळली जाणार नाही, आपले नुकसान होणार नाही याची काळजी घेणेही तितकेच महत्वाचे आहे! नाहीतर त्या मुक्तपीठ मधल्या लुनावाल्या ब्रम्हेत आणि आपल्यात काय फरक???????

विक्षिप्त मुलगा पोस्ट पटली.
काही पोस्ट मी अश्याच गमतीत लिहिल्या होत्या. ती स्टाईल आहे माझी. त्यांना कोट करून उत्तर द्यायची गरज नव्हती.
ते असो,
पण ज्या पुरुषांना स्वतंत्र डब्बा हवा त्यांना तो मिळायला हवे. या मागणीत काही वावगे नाही हे मान्य आहे.
तुमचे यासंदर्भातले मुद्दे पटले.
अजून एक मुद्दा म्हणजे, कधी मित्रांच्या ग्रूप सोबत प्रवास करत असलो तर यथेच्छ शिवीगाळ करत गप्पा माराव्याश्या वाटतात. किंवा बॉईज टॉल्क करावेसे वाटते.. पण तेच डब्यात एखादी जरी महिला किंवा फॅमिली बसलेली असेल तर कंट्रोल करावे लागते.

#एकदा जंप मारून धावती लोकल पकडतांना चुकून महिलांचा डबा पकडला होता. #
<< मला असे दोन तीन अनुभव आहेत.
मी ओशाळून सॉरी बोललो कोणी काही चिडले रागावले वगैरे नाही.
दारात उभा राहिलो आणि पुढचे स्टेशन उतरलो.. >>

----- तुम्ही पुढच्याच स्टेशनवर उतरल्यावर त्या महिला सहप्रवाशांनाही वाईट वाटले असेल. Happy

<< जातीय आरक्षणातील हुषार मुले जातीय आरक्षित जागा भरायच्या आधी जनरल मधील जागेत अ‍ॅडमिशन घेऊन मोकळी झाली तर काय मत आहे इथल्या लोकांचं? >>

----- असे चित्र झालेले बघायला मला आवडेल .

असे होण्याचे प्रमाण जेव्हा वाढेल त्यावेळी आरक्षणाची गरजच नसेल.

<< जरी समजा खरोखरच छळ होत असेल तरी दोन महिन्यांच्या बाळाचे नाव आरोपी म्हणून देण्यामागे काय कारण असू शकेल??? एकच कारण – समोरच्याला त्रास देणे, कारण कायदा माझ्या बाजूने आहे!
वर मी जे attitude दाखवणाऱ्या बायका म्हटले आहे ते या अशाच! >>

----- विक्षिप्त मुलगा -
तक्रार करणार्‍याला नावे द्यायला काहीच लागत नाही, कुणाचेही नाव देता येते. पोलीसांच्या रेकॉर्डवर ते नाव नक्कीच नसणार आहे. या केसमधला दोन महिन्याच्या बाळाचे नाव आरोपी म्हणून लिहीणे प्रकार अगदी हास्यास्पद आहे आणि ४९८ अ चे गांभिर्य कमी करणारा आहे.

४९८अ अंतर्गत , दोन महिन्याच्या बाळाचे आरोपी म्हणून नाव दिले गेले आहे अशी किती उदाहरणे आहेत? या अत्यंत दुर्मिळ ( आणि हास्यास्पद) तक्रारीचा संबंध आणि एकंदरित बायकांचा attitude शी संबंध लावणे खटकले.

तुम्ही पुढच्याच स्टेशनवर उतरल्यावर त्या महिला सहप्रवाशांनाही वाईट वाटले असेल. Happy
>>>>>

हो, असेही होतेच.
Why should boys have all the fun Happy
हा स्वतंत्र धाग्याचा विषय आहे.

< जातीय आरक्षणातील हुषार मुले जातीय आरक्षित जागा भरायच्या आधी जनरल मधील जागेत अ‍ॅडमिशन घेऊन मोकळी झाली तर काय मत आहे इथल्या लोकांचं? >>

Form वर राखीव जात नमूद केलेली असली तर आरक्षणतूनच प्रवेश घ्यायला लागतो.

जातीय आरक्षणातील हुषार मुले जातीय आरक्षित जागा भरायच्या आधी जनरल मधील जागेत अ‍ॅडमिशन घेऊन मोकळी झाली तर काय मत आहे इथल्या लोकांचं>>>>

असे एक उदाहरण प्रत्यक्ष पाहिलेले आहे. आरक्षणातली मुलगी खुप हुशार होती, तिला जनरलमध्ये एमबिबिएसला प्रवेश मिळण्यासारखा होता, तिने तो घेतला. तिने सगळ्यांना ऐटीत सांगायला सुरवात केली की मी बघा कशी आमची एक आरक्षीत सिट वाचवली. तेव्हा जनरलवाले लोक भडकले, तुला वेगळी सिट असताना तु आमची सिट का घेतलीस?

बहुतेक आता कोर्टाचे रुलिंग आहे की आधीचा प्रवास आरक्षणातुन केला असेल तर नंतर जनरलमध्ये घुसता येत नाही. नसेल रुलिण्ग तर अशी मागणी घेऊन कोणेर्तरी कोर्टात गेल्याचे वाचलेले आठवते.

गुगलले तर असे घुसता येते असे वाचायला मिळाले.

https://www.livelaw.in/supreme-court/reserved-category-candidate-can-cla...

https://timesofindia.indiatimes.com/india/supreme-court-reaffirms-genera...

Pages