Submitted by हस्तर on 15 October, 2024 - 16:44
चला विधान सभा पड्घम वाजले
मि कोण त्याही पक्षा चा प्रवक्ता नाही
पण विरोधकान् कडे महाराष्ट्र व्यापी अस मुद्दा नाहिये
पोर्षे , बदलापुर ,शिवपुतळा एवढी धग नाही राहीली
स्पर्धा परिक्शे चे घोटाळी पण जुने झाले
लाडकी बहीण जोरात चाललैये
विरोधी पक्ष जिन्कणार तर कसे?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
असो, निकाल आलेत
असो, निकाल आलेत
मोदी पुन्हा आले, ट्रम्प परत आला आणि महाराष्ट्रात महायुती परत आली. विरोधकांना आता 2029 पर्यंत ठणठणाट करणे, चकाट्या पिटने, उनिदूनी काढणे या शिवाय वेगळी कामे नाहीत. कारण इथे किंवा इतर कुठल्याही माध्यमांवर कितीही चर्चा केली, धागे काढले, निगेटीव्ह लिहिले तरी हे निकाल काही बदलणार नाहीत.
दुसऱ्यांची उनिदूनी करून रेष छोटी करण्याऐवजी विरोधकांनी उलट पुढच्या वेळेसाठी जय्यत तयारी करावी आणि स्वतःची रेष मोठी करावी.
लोकशाही शाबूत आहे, संविधान धोक्यात नाहीये, जातीय फॅक्टर चालत नाहीत.
मविआने जर ठिकठिकाणच्या
मविआने जर ठिकठिकाणच्या माजलेल्या , कसलीही विचारसरणी नसलेल्या, इकडून तिकडे लीलया उड्या मारणार्या संस्थानिकांना आता विश्रांती दिली आणि खरंच सामान्य कार्यकर्त्यातून नेतृत्व पुढे आणले तर हारलेल्या बाजूने उभं रहायला काहीही लाज वाटणार नाही. शरद पवार हे आजही नेते आहेत. त्यांनी बाळासाहेब थोरातांना सोबत घ्यावं पण नातेवाईकबाजीतून महाराष्ट्राची आणि मविआची सुटका करावी. लोकांना गृहीत धरू नये. सामान्य लोक सुद्धा निवडून येऊ शकतात. आलेले आहेत. स्वतः शरद पवार सुरूवातीच्या काळात निवडून आले आहेत.
महायुतीने जरी नातेवाईकबाजीला सोडचिट्ठी दिली तरीही जोपर्यंत ते धर्माधारित राजकारण सोडत नाहीत तोपर्यंत महायुतीला स्विकारणे अवघड आहे.
यंदा सर्व पक्षांकडून रेकॉर्ड
यंदा सर्व पक्षांकडून रेकॉर्ड ब्रेक पैसे वाटप झाले.... अनेक लोकांना पैसे मिळाल्याचे काल ऑफिस मध्ये कानावर आले....काहींनी तर दोन्ही बाजूने पैसे घेतलेत.....
अशा निवडणुका झाल्या तर भवितव्य उज्वल(?) आहे.
लोकांनी लोकांसाठी(की पैश्यासाठी?) चालवलेले राज्य...अशी नवीन व्याख्या बनत आहे.
इतके पैसे खर्च करणारे नेते आता विकास कितपत करतील याबाबत शंकाच आहे.
लोकांनी लोकांसाठी(की
लोकांनी लोकांसाठी(की पैश्यासाठी?) चालवलेले राज्य >> या प्रकारचे प्रतिसाद दोन्हीकडून फाट्यावर मारले जातात. फक्त विचारसरणीसाठी अशांच्या मागे फरफट किती काळ लोक सहन करतील ? समर्थकांनी सोशल मीडीयात जनमत बनवण्यापेक्षा जनमताचा कानोसा घेऊन नेत्यांचं मत बदलवलं पाहीजे.
मविआ ज्या बाजूकडून आहे ती बाजू (विचारसरणी) शुभ्र आहे. पण तिकडून उभे आहेत म्हणून भाई ठाकूर, बेकायदा दारूचा महाराष्ट्रातला किंग बापू पठारे , पप्पू कलानी अशांना मत द्यायचे का ?
आम्ही बाबरी पाडली असे अभिमानाने उद्धव ठाकरे सांगत होते तरी मुसलमानांनी त्यांना मतदान केले, कारण त्यांना हिंदुत्वाला रोखायचे होते असा बिनडोक हवालदीलपणा मतदारात हवाय का ?
अजून २४ फेर्या असल्याने कदाचित निकाल उलटे लागतील ही शक्यता गृहीत धरून लिहीले आहे. विजयी झाल्यावर किमान विचार करावा.
शरद पवार हे आजही नेते आहेत.
शरद पवार हे आजही नेते आहेत. त्यांनी बाळासाहेब थोरातांना सोबत घ्यावं पण नातेवाईकबाजीतून महाराष्ट्राची आणि मविआची सुटका करावी
साहेबांना बारामती साठी एकही पवार इतर उमेदवार मिळू नये ही शोकांतिका आहे. साठ वर्षे झाले. किती तरी वेळा नवे राजकीय पक्ष तयार केले. दुसऱ्या तिसऱ्या फळीचे नेते तयार केले आणि या वेळी गरज होती तर उमेदवार म्हणून कोण दिला तर मुंबईस्थित, विदेशात शिकलेला आणि राजकीय पार्श्वभूमी नसलेला युगेंद्र पवार आणि अपेक्षा ही की तो पवार आहे म्हणून त्याला लोकांनी डोळेझाक करून निवडून द्यावे.
भाई ठाकुर - बहुजन विकास
भाई ठाकुर - बहुजन विकास आघाडी मविआ मध्ये आहे का? वसईत काँग्रेसचा उमेदवार उभा आहे.
अशा निवडणुका झाल्या तर
अशा निवडणुका झाल्या तर भवितव्य उज्वल(?) आहे
खरय, अनेक वर्षे झाली निवडणुकीत खोऱ्याने पैसा वाटला जातो. जसे भविष्य घडले तेच आता पुढे घडेल. लोकांनी देश घडवला मग राजकारणी कसेही असो. स्वप्रगतीची ईच्छा असते बाकी काही नाही.
या वेळी बर्याच ठिकाणी
या वेळी बर्याच ठिकाणी मविआचे दोन दोन उमेदवार पक्षाच्या तिकीटावर लढले.
वसई विरार मधे सुद्धा मैत्रीपूर्ण लढत होती का ?
लोकसभेला भाई ठाकूरची युती मविआसोबत नव्हती का ??
https://x.com/Prksh_Ambedkar
https://x.com/Prksh_Ambedkar/status/1859786638257479907
If VBA gets the numbers, tomorrow, to support a party or an alliance to form the government in Maharashtra, we will choose to be with one who can form the government.
We will choose power! हम सत्ता में रहना चुनेंगे!
महायुचे हार्दिक अभिनंदन.....
महायुचे हार्दिक अभिनंदन..... आता जिवनात एकच ध्येय्य, कुठल्याही बऱ्या वाईट प्रकारे जास्तीत जास्त पैसा कमवायचा आणि त्यात कुणी प्रामाणिक माणूस जरी आडवा आला तर त्याला पैशाच्या जोरावर चिरडायचे.....आता किमान माझ्यासमोर तरी तेच टिकणार जे माझ्यापेक्षा पैशाने, सत्तेने जास्त बलवान आहेत जे कमी आहेत ते जरी नैतिकतेच्या दृष्टीने बरोबर असले त्यांना चिरडणार म्हणजे चिरडणार...शिवाजी महाराजांना अखेरचा जय महाराष्ट्र.
फार्स विथ द डिफरंस >>> +१
फार्स विथ द डिफरंस >>> +१
नैतिकता संपली.
नैतिकता संपली >> यापेक्षा
नैतिकता संपली >>नैतिकता जगली, नैतिकता संपली या बातांमधे आता काडीचा ही रस नाही, लोकांचा वैचारिक कल ध्यानात आला... लोकसभेच्या लिटमस टेस्ट नंतर ज्या मुख्य प्रयोग च्या निकालाची प्रतिक्षा होती त्याने हे स्पष्ट झाले आहे की नैतिकता वगैरे सब झूठ, सिर्फ पैसा बोलता है...हे जंगल आहे आणि जंगलाचे नियम हेच इथले नियम...जर माझ्या आजूबाजूला बहूसंख्येंने असेच विचार करणारे लोक असतील तर मग अशा लोकांचा ते कितीही बाकीच्या बाबतीत चांगले असतील तरी मी का विचार करावा??.....मग आता इतका पैसा कमवायचा की जेव्हा केव्हा माझ्या मुलगा कुणाला त्याच्या गाडीखाली चिरडून मारेल तेव्हा तो बिनबोभाट सुटायला हवा नव्हे त्याला गाडी हातात घेतानच ती खात्री असायला हवी...आणि TBH हे भविष्यात माझ्याकडून झालं तरी मला निश्चितच एका पैशाचेही वाईट वाटणार नाही.
काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी
काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी पक्ष आणि शिवसेना यांची फूट होऊन त्यांनीच भाजपला सत्तेत बसवले. २०१४ ला शरद पवारांनी बिनशर्त पाठिंबा दिला, १९९९ ला दिला. २०१९ ला पहाटेचा शपथविधी केला. त्यामुळे हे दोन वेगवेगळे आहेत असे वाटत नाही.
अजित पवारांनी स्पष्टच सांगून टाकले कि हे बंड पवारांच्या आशिर्वादाने झाले होते. नाना पटोले भाजपच्या सांगण्यावरून सभापतीपदाचा राजीनामा देऊन पाय उतार झाले असे संजय राऊत म्हणाले होते. असो.
महायुती आल्याचा आनंद नाही आणि मविआ हरल्याचे दु:ख नाही. यातलं एकही आपल्या कामाचं नाही. ज्यांच्या कामाचे आहेत त्यांनी आनंद / दु:ख करावे. (जमल्यास इतर पक्षाच्या नावाने खडे मारून पहावेत म्हणजे शिक्का मारता येईल. असे केल्याने आरोप करणे सोपे होते).
युती लोकशाही मार्गाने जिंकली
युती लोकशाही मार्गाने जिंकली असती तर नक्कीच आनंद झाला असता. आणी भारतीय लोकशाही बद्दल मान शरमेने खालीही गेली नसती.
अमित ठाकरे तिसर्या नंबरवर.
अमित ठाकरे तिसर्या नंबरवर. अशा डॅशिंग पर्सनॅलिटीचा माणूस विधानसभेत हवा होता.
मनसेचं कल्याणपण गेलं.
आयोगाने महाराष्ट्रातल्या
आयोगाने महाराष्ट्रातल्या मतदानाचे आकडे इतक्या लवकर जाहीर केले याचं नवल वाटतं. लोकसभेच्या वेळी वाट बघायला लावली होती. हे आकडे फायनल नसतील ना? प्रत्य क्ष मतमोजणीच्या वेळी किती फरक पडतो, तेही तपासून इथे लिहाल का? म्हणजे काल जाहीर केलेले आकडे आणि मतमोजणीनंतरचे आकडे, यातला फरक. निकालासाठी वेगळा धागा काढा. >>
खूपच फरक पडला. त्यामुळे आज सकाळी ७-८ यावेळेत परत जवळपास सगळे आकडे परत भरायला लागले. मला ही सगळी माहीती संदर्भासाठी लागत असते. त्यामुळे शेवटची अद्ययावत माहिती इथे न टाकता वेगळा धागा काढून तिथे टाकली आहे.
एक मात्र नक्की २०२९ पर्यंत मोदींच्या मार्गातील सगळे अडथळे दूर झाले आहेत. २५ डिसेंबर २०२४ पर्यंत रशिया युक्रेनच्या मिझाइलला कसे उत्तर देतोय. बायडेन वर इंपिचमेंटची मागणी. रशियाने अणु बॉंब वापरातील त्याचा धोरणात केलेला बदल हे मात्र खूप मोठे परिणाम करणारे घटक असू शकतात.
सावध असणे महत्वाचे वाटते.
_/\_
अमित ठाकरे तिसऱ्या नंबरवर
अमित ठाकरे तिसऱ्या नंबरवर जाईल वाटलं नव्हतं. उलट मला जिंकून भाजपबरोबर मंत्री होईल वाटलेलं.
मी कल्याण ग्रामीणमध्ये युतीधर्म पाळला असला (जो मी नेहेमीच पाळते, इथे कमळ नसतं त्याचं वाईट वाटतं मला) तरी मनसे येईल असं वाटलेलं मला.
अमित ठाकरेंना विधानपरिषदेवर
अमित ठाकरेंना विधानपरिषदेवर नियुक्त केलं पाहिजे
प्रॉमिस केलं असेल तर करतील
प्रॉमिस केलं असेल तर करतील नाहीतर आता महायुतीला गरज नाही राहिली मनसेची. भाजपसाठी राबणारे, पदाची अपेक्षा न करता काम करणाऱ्या लोकाना पाठवायला हवं खरंतर. कदाचित राज भाजपचा मुख्यमंत्री होईल सांगत होते, त्याचं बक्षीस देतीलही.
जर माझ्या आजूबाजूला
जर माझ्या आजूबाजूला बहूसंख्येंने असेच विचार करणारे लोक असतील तर मग अशा लोकांचा ते कितीही बाकीच्या बाबतीत चांगले असतील तरी मी का विचार करावा??
एकूण मतदान 65%, त्यातील विजयी उमेदवाराला साधारणपणे मिळतात 30% म्हणजे 100 पैकी 65 आणि 65 पैकी 19 लोकांनी तो उमेदवार दिला. उरलेल्या 81 लोकांनी काहीच चुकीचे केले नाही. किंबहुना 19 लोकांना त्यांना योग्य वाटले ते केले, म्हणून सगळ्यांच्याच बाबतीत चांगला विचार करावा आपले ही चांगलेच होईल.
कर भला हो भला. नेकी कर दर्या मे डाल (स्मित हास्य)
जर माझ्या आजूबाजूला
जर माझ्या आजूबाजूला बहूसंख्येंने असेच विचार करणारे लोक असतील तर मग अशा लोकांचा ते कितीही बाकीच्या बाबतीत चांगले असतील तरी मी का विचार करावा??
एकूण मतदान 65%, त्यातील विजयी उमेदवाराला साधारणपणे मिळतात 30% म्हणजे 100 पैकी 65 आणि 65 पैकी 19 लोकांनी तो उमेदवार दिला. उरलेल्या 81 लोकांनी काहीच चुकीचे केले नाही. किंबहुना 19 लोकांना त्यांना योग्य वाटले ते केले, म्हणून सगळ्यांच्याच बाबतीत चांगला विचार करावा आपले ही चांगलेच होईल.
कर भला हो भला. नेकी कर दर्या मे डाल (स्मित हास्य)
बाळासाहेब थोरात हरले.
बाळासाहेब थोरात नबाब मलिक हरले.
महाराष्ट्र शेणपट्ट्यात गणला
महाराष्ट्र शेणपट्ट्यात गणला जाणार??
आता महाराष्ट्राच्या विकासाला
आता महाराष्ट्राच्या विकासाला गती कशी देता येईल याचा विचार सत्ताधारी पक्षांनी करावा. गेले पाच सहा वर्ष या राजकारणामुळे सगळ्या गोष्टी खोळंबल्यात.
उरलेल्या 81 लोकांनी काहीच
उरलेल्या 81 लोकांनी काहीच चुकीचे केले नाही.>>>>>सुक्या बरोबर ओले ही जळते हा निसर्ग नियम आहे. त्यांनी सुके जोमाने जळेल आणि त्याची धग ओल्याचाही कोळसा बनवेल ही परिस्थिती निर्माण होऊ दिली हीच त्यांची चुक. आणि ज्या १९ जणांनी उमेदवार निवडले त्यांनी भाबडेपणाने, अथवा भूलून उमेदवार निवडले असे असेल तर जे लोक आधीच मुर्ख आहेत त्यांचा वापर करुन मी माझा फायदा करुन घेतला तर त्यांच्या नैसर्गिक स्थितीत मी काहीही ढवळाढवळ करत नाही आहे त्यामुळे मला वाईट वाटून घेण्याचा प्रश्नच उद्भवता कामा नये.
सगळ्यांच्याच बाबतीत चांगला विचार करावा आपले ही चांगलेच होईल.>>> हा दिवसागणिक भाबडा आशावाद ठरत चालला आहे, अशा वांझोट्या विचारांवर अवलंबून रहाण्यापेक्षा, माझे चांगले मी प्रसंगी दुसऱ्याचे वाईट करुनही घडवून आणेन या कर्मयोगाची फलनिष्पत्ती सध्याच्या जगात फारच उठावदार दिसत आहे. स्वतः च्या आनंदाची, सुखाची व भल्याची व्याप्ती फक्त स्वतःपुरतीच मर्यादित ठेवली तर खुप गोष्टी, आकांक्षा, भावना नियंत्रणात येतात हिच गोष्ट दिवसेंदिवस अधोरेखित होत चालली आहे.
महाराष्ट्र शेणपट्ट्यात गणला
महाराष्ट्र शेणपट्ट्यात गणला जाणार??>>>आता शेणपट्ट्यात गणला जाऊदे, की प्रत्यक्ष शेण म्हणून गणला जाऊ देत..... doesn't matter.... अब तो बस अपना काम बनता, भाड मे जाए जनता हाच ॲटिट्यूड ठेवून पुढे चाल करायची.
खुप गंभीरपणे हा प्रश्न
खुप गंभीरपणे हा प्रश्न विचारतो आहे, बाहेर जय श्री राम च्या आरोळ्या सुरु झाल्यात, तर रामाचे नाव लावून किंवा राम हा ब्रॅण्ड वापरुन त्याचा फायदा घेऊन एखादा धंदा, बिझनेस, स्किम सुरु करण्याची आईडीया कुणी सुचवू शकतं का??
अब तो बस अपना काम बनता, भाड
अब तो बस अपना काम बनता, भाड मे जाए जनता हाच ॲटिट्यूड ठेवून पुढे चाल करायची. सहमत. वयक्तिक हित पहायचे. मरनारे त्यांच्या कर्माने मरनार.
वयक्तिक हित पहायचे. मरनारे
वयक्तिक हित पहायचे. मरनारे त्यांच्या कर्माने मरनार.>>> वैयक्तिक हित हा चुकीचा शब्द कोणत्याही स्थितीत फक्त स्वार्थ साधायचा असं माझं म्हणणं असेल....मरणारे त्यांच्या कर्माने मरुदेत, वर्माने मरुदेत की मर्माने मरुदेत, जोवर आपल्यावर येत नाही तोवर आपलं काय घेणंदेणं?? आणि आपल्यावरही आलं तरी त्यातलाच एखादा सोईचा ढकलून द्यायचा आपल्या जागी मरायला.
"कुंभकर्ण रोबोटिक्स" कंपनी
"कुंभकर्ण रोबोटिक्स" कंपनी काढा.
चांगल्या ऑर्डर्स मिळतील.
Pages