माजं काय चुकलं...?
येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?
मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं
टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं
पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं
उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं
जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!?
असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..
****************
पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत.
मीही ममोच्या पद्धतीने उकड
मीही ममोच्या पद्धतीने उकड करते नेहमी. फेल्सेफ रेसिपी आहे. माझ्याकडे इथे ज्यूजर्सीत घेतलेला प्रीती चा मिक्सर आहे. चांगले वाटले जातात तांदूळ. अगदी गंध नाही पण जवळपास जातात. किंचित कणी राहिली असे वाटले तरी शिजल्यावर काही रहात नाही. आणि कायम इन्स्टापॉट मधेच स्टीम करते. आधी सॉटे मोड वर पाणी उकळी येऊन गरम झाले की मग स्टँड आत ठेवायचा. मग इन्स्टा पॉट मधे स्टीम मोड वर १ मिनिट टायमिंग लावते फक्त. कारण १० मिनिटाने वाफ भरपूर आल्यावरच ते टायमींग काउंट डाउन सुरु होते. तोवर मोस्टली उकडून झालेले असतात मोदक. अगदी लुसलुशीत मस्त होतात मोदक. मी २-३ वेळ इथे नॉन मराठी लोकांना शिकवले देखिल आहेत.
अरे वा, अंजली_कूल ट्राय करेन
अरे वा, अंजली_कूल ट्राय करेन मी पुढच्या वेळेस. माझ्याकडे आंबेमोहोर आहे. मैत्रेयी, इन्स्टापॉट टिप्सबद्दल धन्यवाद.
अंजली कुल धन्यवाद. काय मस्त
अंजली कुल धन्यवाद. काय मस्त वाटलं उकड छान झाली हे वाचून.. आणि कौतुक तरी किती भारी केलं आहेस त्या मऊ मऊ उकडीचं. शनिवारी मोदक जरूर कर, छान होतील.
मै, धन्यवाद, शिकवले ही आहेस म्हंजे एकदमच छान... छान होऊ देत हया वर्षीचे ही मोदक....
एक प्रश्न आहे.तांदूळ 4 तास
एक प्रश्न आहे.ममो पद्धतीत तांदूळ 4 तास ऐवजी 8-9 तास भिजले आणि मग वाटले तर रिझल्ट मध्ये फरक पडेल का?
गणेश चतुर्थीला उठून सकाळी करायचे आहेत.पहिल्यांदा ही पद्धत वापरत असल्याने भिजणे वाटणे रात्री करून सकाळ पर्यंत परत कंसिस्टंसी मध्ये फरक पडेल अशी शंका आहे.
ममो >> हो .. काल उकड
ममो >> हो .. काल उकड काढल्यावर जवळपास मला my whole life is been lie अशी भावना / अवस्था आली हाहा .. किती ते टेन्शन किंवा दबदबा असायचा त्या उकडीचा ..
मी _अनु हो मला ही असा प्रश्न पडलेलाच आहे.. पण तरी मी असे करेन बहुतेक.. की रात्री झोपताना तांदूळ व exact पाणी मोजून ठेवायचे सकाळी ६ ला उठून तांदूळ धुवायचे व भिजत घालायचे व परत झोपायचे .. हाहा !! शक्यतो बाकी मुख्य स्वैपाक उरकून साडे ९ ला मोदक करायला घायचे असा माझा तसेही नेम असतो .. साडे ९ ऐवजी १० होतील फार तर सव्वा १० कारण तांदूळ वाटायला १० मिन व उकड व्हायला अक्षरशः २ min लागतात .. व नंतर ती मळायचीही फार गरज नसते म्हणजे गॅस पेटवला कि हातात कालथा घेऊन तिथून एक क्षण ही बाजूला व्हायचे नाही.
मला अजून एक जाणवले काल की बासमती च्या तांदळाला खूप चिकटपणा नसतो त्यामुळे मी जो मोदकाचा आकार जस्ट काल देऊन पाहिला त्याच्या कळ्या पटपट चिकटत नव्हत्या व सुटत होत्या मी आतल्या बाजूने थोडे पाणी लावून try केले पण फार काही नाही घडले .. व तूप जास्त नक्की झालेले नव्हते तर काही ट्रिक आहे का ? माझ्याकडे लगेच आंबेमोहोर इंद्रायणी अजिबात मिळणार नाही
(मी पहाटे 4 चा अलार्म लावून
(मी पहाटे 4 चा अलार्म लावून तांदूळ भिजवायचे आणि परत झोपायचं असे क्रेझी विचार करतेय.जरा लवकर चालू करायचं आहे.)
गूड लक तुम्हा सुगरणींना.
गूड लक तुम्हा सुगरणींना.
माझे तळणी चे मोदक मागल्या वर्षी चुकल्याने (गूळ वितळून तेलात गेला, कव्हर ला लगला, कव्हर चामट झाले वगैरे) मी या वर्षी सरळ खोब्र्याच्या वड्या थापून मोदक करेन.
उकड प्रकार जमत नाहीत.
मीपण रात्री भिजवून सकाळी करू
मीपण रात्री भिजवून सकाळी करू का हीच शंका घेऊन आले आहे. पहाटे ५ ला तांदूळ भिजत पडणार नाहीत हे नक्की. आणि या वेळाची तांदूळ पिठी करून होईल उद्या कारण धुतलेले तांदूळ वाळून पुरचुंडी तयार आहे दळायला देण्यासाठी.
यावेळीपण कलिग्ससाठी करायचे आहेत (पुढच्या आठवड्यात) तेव्हा ममोंच्या पद्धतीने उकड काढणार असं ठरवतेय, म्हणून आधीपासून शंकानिरसन!
अगदी घड्याळ लावून चार तास
अगदी घड्याळ लावून चार तास भिजवले नाही तरी चालेल. तांदूळ भिजल्यावर मऊ होतात , तसे झाले की वाटले तरी चालतील.
किंवा तांदूळ रात्रीच वाटून पेस्ट करून फ्रिज मध्ये ठेवून द्यायचं. सकाळी बाहेर काढून नॉर्मल ला आली उकड काढा. हे ही work होईल अस वाटतंय.
सध्या मला गणपतीच्या आधी हा प्रयोग करणं शक्य नाहीये पण
मीच करून बघेन आणि लिहीन रिझल्ट लवकरच.
ओके ममो.
ओके ममो.
प्रयोग करून बघेन, चांगला झाला तर सांगेन.(माझ्या स्वतःच्या गोंधळामुळे बिघडून) सांगितले नाही तर समजून घ्या सगळे
चार दिवसापूर्वी मी मुलीकडे
चार दिवसापूर्वी मी मुलीकडे मोदक केले. आदल्यादिवशी तांदूळ भिजवून, रात्री वाट्ले आणि रेफ्रिजरेट केले रात्रभर. सकाळी अर्धा तास बाहेर काढून ठेउन मग उकड आणि मोदक केले. खूप छान झाले. ममोनी लिहील्याप्रमाणे ही उकड फार मळावी पण लागत नाही.
ममो, ह्या रेसिपीसाठी खूप धन्यवाद!
शूगोल थँक्यु... आणि बर झालं
शूगोल थँक्यु... आणि बर झालं इथे आदल्या दिवशी पेस्ट करून ठेवण्याचा अनुभव लिहिलास म्हणून.
आता तांदूळ भिजत घालायला म्हणून गजर बिजर लावून अजिबात उठू नका गणपतींच्या दिवशी . पेस्ट आदल्या दिवशी तयार करून चालते. छान होतात मोदक.
ओके, रात्री करून ठेवू.काम
ओके, रात्री करून ठेवू.काम सोपे होईल.
हे अगदी योग्य वेळी इथे
हे अगदी योग्य वेळी इथे सांगितल्याबद्दल धन्यवाद! __/\__
मी काल रवा बेसनचे लाडू केले.
मी काल रवा बेसनचे लाडू केले. माझा पाक थोडा जास्त घट्ट झाला असावा कारण लाडू फारच कोरडे पडले आहेत, यावर काही करता येईल का? दुधाचा हबका देऊन लाडू वळावे ही टीप माहीत आहे पण तसे केल्यास लाडू जास्त टिकणार नाहीत ना? दोन-तीन घरी द्यायचे आहेत आणि विकेंड शिवाय देणे होणार नाही म्हणून विचारले. धन्यवाद
Pages