माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनु, Happy

राजमा शिजवता येतो >> हे सर्वात मोठं qualification. Happy बाकी
स्वभाव, पगार, वैगरे सगळ मिथ्या Happy

ठिकरी (सोप्स्टोन) म्हणून एक खास दगड असतो. त्याचा वापर सुद्धा कडधान्य शिजायला करतात. त्यात कॅलशियम असते.
कोकणात श्रवण घेवडा, काळे वाटाणे वगैरे फोडणी देताना सुद्धा वापरतात. ह्यामुळे स्मोकी फ्लेवर येतो.

पातळ चपटा असतो. ज्याला ओळखता येतो त्यानेच आणून करावे. सहसा नदीकाठी सापडतो.

राजमा ही राजमा, शिजुदे अथवा न शिजुदे, मायबोलीवर फुटेज मात्र खूप घेतलं आणि मायबोलीकरांच्या प्रतिभेलाही बहर आणला Lol

आजच्या ठळक बातम्या ―
Starbucks च्या धर्तीवर लवकरच आता Rajmaks सुरु करण्याच्या निर्णयावर काल वरिष्ट सूत्रांकडून दुजोरा देण्यात आला.

राजमॅक्स
इथे काळे वाटाणे, छोले, चवळी आणि इतर सर्व हट्टी कडधान्ये मऊ शिजवून मिळतील.

ठिकरीचा एक खेळ आम्ही लहानपणी खेळायचो. आठ चौकोन. एकेका घरात ती ठिकरी - टाकायची. मग लंगडी घालत सगळ्या घरांत फिरून परत येताना ती ठिकरी उचलायची. तीच ठिकरी कडधान्य शिजवताना वापरतात?

पण आज मुलाने नेमकच राजम्याच पॅटी घालून बर्गर केला होता. त्याचा राजमा मस्त शिजला होता
>>>> पूर्वजन्मांची पुण्याई हो दुसरं काय? किंवा मग पत्रिकेत राज(मा)योग असेल.

राजमात्रस्त लोकांसाठी खास….
भारतात सीझन असल्याने राजमाच्या ओल्या शेंगा मिळत आहेत. फिकट पोपटी रंगाच्या, गुलाबी किंवा हलके जांभळे ठिपके असलेल्या शेंगा राजमाफली म्हणून मिळतात. दाणे बेज रंगाचे व वरीलप्रमाणे ठिपके असलेले ( म्हणजेच चित्रा राजमा, काश्मिरी नव्हे) असतात. दाणे एकदा धुवून तासभर भिजत घालायचे. मग दोन तीनदा धुवून आपापल्या पाकृप्रमाणे फोडणी घालून कुकरला लावायचे. वेगळे शिजवून घ्यायची गरज नाही.

रणवीरने बताया है के सुरूवातीला नाममात्र मीठ घालायचे. चणाडाळ शिजायला जेवढ्या शिट्ट्या लागतात त्यापेक्षा एक जास्त शिट्टी करून व नंतर कुकर उघडून थोडासा राजमा मॅश करून चवीनुसार मीठ घालून उकळले की मस्त गरगट राजमा शिजतो.

अशाप्रकारे ओल्या दाण्यांचा राजमा आजच केला. सुका राजमा भिजवून भाजी करायचा धीर येईपर्यंत यावरच प्रॅक्टीस करावी म्हणते.

मुलीला आवडतात म्हणून chips घरी करायचा प्रयत्न केला. कच्ची केळी आणि बटाटा दोन्हीचे करून पाहिले.
पण मऊ राहिले. चव बरी होती. कुरकुरीत होण्यासाठी काय करावे? मा का चु?

किल्ली, मी कच्च्या केळ्याचे मायक्रोवेव्ह ला केले आहेत, चांगले झाले होते.पण मेहनत ढीगभर आणि 5 घासात संपले असं होतं.
कच्ची केळी सोलून 2 मिमी जाडीचे काप करून मीठ अगदी थोडं शिंपडून मायक्रोवेव्ह च्या उंच जाळीवर ठेवून ग्रील मोड ला केले.मध्ये एकदा उलटावे लागतात.
बटाटे असे नेहमी करतो.अगदी थोडे(खाली चिकटणार नाही म्हणून) तेल चोळून 4 मिनिट मायक्रोवेव्ह वगैरे.मध्ये एकदा उलटावे लागतात.वेळ बघत राहून ठरवला.

ओह ओके
उनको तो मैने देखा है मार्केट मे
फक्त गंगाधर ही शक्तिमान है हे माहीत नव्हतं.

अनु> Lol

त्या video वाल्यांचे बरे asmr style कुरकुरीत होतात>>>>
आपण कुठे खाऊन बघतो कुरकुरीत की कसे ते Wink मला तर वाटतं एएसएमआर इफेक्ट येण्यासाठी एखादा ऑडीओ फिल्टर/एन्हासर वापरत असतील.

मला तर वाटतं एएसएमआर इफेक्ट येण्यासाठी एखादा ऑडीओ फिल्टर/एन्हासर वापरत असतील. >> मला पण नेहमी हेच वाटत. करंजी वर fork फिरवून अगदी आवाज बिवाज दाखवतात किती कुरकुरीत खुसखुशीत झाले बघा म्हणून.

Pages