माजं काय चुकलं...?
येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?
मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं
टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं
पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं
उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं
जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!?
असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..
****************
पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत.
कॅन मधला राजमा वापरा. तो आधीच
कॅन मधला राजमा वापरा. तो आधीच शिजवलेला असतो का काय लक्षात नाही पण छान होते उसळ/ ग्रेवीवाली रेसिपी.
असाही राजमा काही रोज वापरात नाही त्यामुळे इतकी डोकेफोड टाळा.
मी राजमा तर करत नाही प्ण छोले
मी राजमा तर करत नाही प्ण छोले कॅन्डच वापरते. डोक्याला ताप नाही. सॅलडमध्येही धुवून लगेच वापरता येऊ शकतात.
कोणताही कडधान्य कुकरमध्ये
कोणताही कडधान्य कुकरमध्ये पातेल ठेवून त्यात न शिजवता डायरेक्ट कुकर मध्ये शिजवल तर मऊ मस्त शिजत हा माझा अनुभव आहे. गॅस अगदी फुल वर न ठेवता फुलपेक्षा अगदी किंचित कमी ठेवायचा आणि दोन शिट्ट्या झाल्या की पाचेक मिनिट बारीक करून मग घालवायचा. राजमा मी कधी आणत नाही पण काळे वाटाणे जे शिजायला कठीण असतात ते ह्या पद्धतीने अगदी मऊ शिजतात.
मी पण कुकरमध्ये डायरेक्टच
मी पण कुकरमध्ये डायरेक्टच शिजवते...
आम्हा मराठवाडी /वैदर्वाभियांना काळा वाटाणा ,घेवडा माहितीच नव्हता. इथल्या रेसिपीज वाचून करून बघू...
.. ह्या हट्टी बालकांच्या मागे लागणं सोडून दिलंय .. जे शिजायला कठीण ते पचायलाही कठीण...
भले तरी देऊ कुकरची ज्यादा
भले तरी देऊ कुकरची ज्यादा शिटी
नाही शिजला तर करु दुसरी आमटी
सेम प्रॉब्लेम मला ही येतो.
सेम प्रॉब्लेम मला ही येतो. चण्या ला ही यायचा. राजम्यासाठी १ च शिट्टी वाचून आश्चर्य वाटले. ८-१० तरी शिट्ट्या काढाव्या लागतात. हिंगं टाकून शिजवून पाहिला. तरी तेच.
जून असल्याने असे होत असावे. हॉटेल वाले सरसकट सोडा घालून शिजवत असतील का काय कोण जाणे.
कॅन मधले छोले वापरा सांगणार्यांना- ते प्रोसेस्स्ड असतात ना? शिवाय भाजीत घातले तर व्हिनेगराची स्ट्राँग चव येणार.
पण त्यापेक्षा चिमूटभर सोडा
पण त्यापेक्षा चिमूटभर सोडा घातला तर काय हरकत आहे?
छान मऊ शिजतात राजमा/ चणे .
आपण काही नेहमी करत नाही तसेही.
आणि हॉटेल मध्ये गेलो की खातोच की सोडा युक्त पदार्थ!
तिकडे नॉर्थ मध्ये, कदाचित वातावरणाचा परिणाम असेल, मऊ शिजायला.
राजमा का माजरा कुछ औरच है.
'राजमा का माजरा' कुछ औरच है, पॅलिंड्रोम करता येणारे पदार्थ त्रास देतात शिजवायला.
ते मटण लौकर/नीट शिजावे म्हणुन त्यात शिजवताना पपईचे तुकडे / किस घालतात. ही ट्रिक नाही का चालणार राजम्यासाठी?
हाटेलात राजमा, आख्खे काळे
हाटेलात राजमा, आख्खे काळे उडीद, काबुली चणे हे प्रकार लवकर आणि मेणासारखे मौ शिजावेत याकरता सोडा घालतात. आणि इतरही बर्याच प्रकारांत - उदा तांदूळ, कणकेत ही सोडा घालतात यामुळे पटकन पोट भरल्याची जाणिव होते, अन्न कमी लागतं; स्वस्तातल्या खानावळींमध्ये हा प्रकार फार कॉमन आहे. सोड्यामुळे भात, पोळ्या पांढर्याशुभ्र दिसतात हा बोनस...
कॅन्ड बीन्स आधी त्यातलं ब्रायनिंग/पिकलिंग लिक्वीड काढून टाकून मग एकदा रीन्सून वापरतात बहुधा, त्यामुळे व्हिनिगर ची चव नसेल येत मे बी. मी कॅन्ड प्रकार फार कमी वेळी वापरलेत...
मी सोडा पण घालून पाहिला(भोकाड
मी सोडा पण घालून पाहिला(भोकाड पसरणारी इमोजी)
अर्थात सोडा घरात फ्रीजमध्ये अनेक महिने होता पाकिटात.त्याचं सोडत्व अलरेडी आटलं असेल.पुढच्या वेळी ताजा सोडा आणून चिमूटभर घालेन.हा उपाय माहित होताच पण राजम्यात किंचित सोडा फ्लेवर किंवा वास येईल म्हणून टाळत होते.
पण प्रॉब्लेम राजम्यातच असेल
पण प्रॉब्लेम राजम्यातच असेल असं वाटतंय..बदलून बघावा एकदा..
सोडत्व >>>
सोडत्व >>>
राजमा कधीच नाही आणलेला, पण छोले शिजवताना चिमूटभर सोडा घालते मी. करवंटीच्या तुकड्याची आयडियापण चालते. (मी एकदा आईला करवंटीचा तुकडा घाल म्हटलं कशासाठीतरी. ती आधीच जाम वैतागली होती. त्यात तिला वाटल मी गंमत करतेय. मला म्हणाली, आता करवंटीतच शिजवते सगळं!!
)
हो.नक्कीच.
हो.नक्कीच.
अनु..
अनु..
सोडत्त्व !!
सोड्या ने सोडत्त्व सोडून कसे चालेल ?
अशी गुपितं फोडल्याने लवकरच
अशी गुपितं फोडल्याने लवकरच डीमार्टमध्ये करवंटीच्या तुकड्याची पाकिटेसुद्धा राजमा काळा वाटाणाच्या जोडीने आकर्षक किंमतीसह दिसू लागतील. (१ किलो राजमावर एक करवंटी पाकिट फ्री !!)
त्याचं सोडत्व अलरेडी आटलं
त्याचं सोडत्व अलरेडी आटलं असेल >>>> खूप हसले
सोडा घालणं म्हणजे माझ्या अंगी सुगरणपणाचा नसल्याचा पुरावा नाही का? तो मी बरा देईन…जोक्स अपार्ट काळा वाटाणा, छोले हे गड व्यवस्थित सर केल्यामुळे राजम्यासाठी प्रयत्न करतेय.
करवंटी आयडिया मस्त आहे.मी
करवंटी आयडिया मस्त आहे.मी करून बघेन पुढच्या राजमावेळी(कातरवेळी सारखं)
बाबौ!! केवढे उपाय !! का वा
बाबौ!! केवढे उपाय !! का वा आणि राजम्यासाठी करवंटी आणि फिल्टर चे पाणी हे म्हणजे माझ्यासाठी नालासाठी घोडा केला .. तसे होईल
असलेला सोडा घालून करून बघते करवंटी मिळू शकते पण लगेच इतका उत्साह नको !! इतकी चर्चा ऐकून चिडून का वा चे पिठले व्हायचे !!!सुरवातीला बऱ्याचवेळा मूग व मटकी यांची उसळ होण्याऐवजी पिठले व्हायचे !! कारण hot प्लेट इतकी तापायची कि दे दणादण २ शिट्या लागोपाठ व्हायच्या आणि बंद केल्यावर सुद्धा व्हायच्या नंतर लक्षात यायचे कुकर उचलून बाजूला ठेवायला हवा हे लक्षात येऊन तो उचलला कि तो हातात असताना शिट्टी मारायचा .. हीच ती शिट्टी आणि हाच तो क्षण जेव्हा मुगाचे आतल्या आत लाजू लाजू पिठले व्हायचे !!
फिल्टर चे पाणी वापरणे केव्हाच सोडून दिलेय , हो इथले पाणी हार्ड आहे हे १०० % मान्य परंतु जर्मनीत उकडलेले छोले व राजमा नॉर्मल सुपरमार्केटला टिन मध्ये मिळतात त्यामुळे माझे काम सोपे आहे तरी हट्टाने सा बा नी मला अर्धा किलो का वा दिले आहेत .. आता इथल्या सूचनांप्रमाणे सोडत्व
माझ्या साबा तर मूग न भिजवता कुकर ला शिजवतात २ शिट्या फक्त !!
नवीन धागा आहे actually ३ धागे झालेत आता मा का चु चे
सोडत्व अनु ग अनु
सोडत्व
अनु ग अनु
सोडत्व !!! अनु
सोडत्व !!! अनु
राजमा छोले वाटाणे शिजवताना करवंटी तुकडा घालण्या मागे काय कारण आहे ?
सोड्याचे सोडत्व ... जबरदस्त .
सोड्याचे सोडत्व ... जबरदस्त ... अफाट हसले.
हे अनु शिवाय कोणी लिहूच शकणार नाही
राजमा कधी भिजवला? अमावस्या
डबल पोस्ट
राजमा कधी भिजवला? अमावस्या
राजमा कधी भिजवला? अमावस्या होती का?
राजमा फक्त पौर्णिमेला भिजवायचा आणि करायचा. अमावस्येला नाहि होत चांगला
——
पण कश्मिरी राजमा नसेल तर दुसरा फिक्कट घ्ययाचा, तो चांगला होतो.
नाहितर गरम पाण्यातच भिजवायचा आणि ते पाणी फेकूनच दुसरे घ्यायचे कूकरात.
मी बटर मध्ये परतून मग गरम पाणी घालून कूकर बंद करून ३-४ शिट्ट्या काढते. मस्त होतो. काळा , गोरा कुठला का असेना..
सोडत्व
सोडत्व
सोडत्व >>
सोडत्व >>
वरचे उपाय पण एक से एक आहेत सगळे.
सोड्याचे सोडत्व ... जबरदस्त .
सोड्याचे सोडत्व ... जबरदस्त ... अफाट हसले.
हे अनु शिवाय कोणी लिहूच शकणार नाही +११११
कॅन्ड बीन्स म्हणजे मिठाच्या
कॅन्ड बीन्स म्हणजे मिठाच्या पाण्यात बीन्स असतात. व्हिनेगर नसते. वापरण्यापूर्वी ते पाणी फेकून बीन्स थंड पाण्यात धुवून घ्यायच्या.
खूप टिपा मिळाल्या इथे.सोडत्व
खूप टिपा मिळाल्या इथे.सोडत्व शब्दाच्या क्रेडिट बद्दल धन्यवाद मंडळी. पण हा माझा नाही.नातेवाईकाकडून ऐकलंय.
भंपकत्व मात्र पूर्ण माझा आहे
त्याचं सोडत्व अलरेडी आटलं
त्याचं सोडत्व अलरेडी आटलं असेल>>> अनू यार
हीच ती शिट्टी आणि हाच तो क्षण जेव्हा मुगाचे आतल्या आत लाजू लाजू पिठले व्हायचे !!>> अंजली
कॅन्ड बीन्स म्हणजे मिठाच्या
कॅन्ड बीन्स म्हणजे मिठाच्या पाण्यात बीन्स असतात. व्हिनेगर नसते. वापरण्यापूर्वी ते पाणी फेकून बीन्स थंड पाण्यात धुवून घ्यायच्या.>> yess canned गोष्टी कशातही का बुडवलेल्या असेनात मी त्या पार ३-४ दा धुऊन घेतेच !! बीन्स असो मका असो पेपेरोनी असो किंवा आणखी काही
Pages