हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.
तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा.
धन्यवाद
अस्मिता.
आधार चे आर्किटेक्त्त असलेल्या
आधार चे आर्किटेक्त्त असलेल्या डॉ प्रमोद वर्मा यांची हि छान मुलाखत.
https://www.youtube.com/watch?v=VV8d2p01vaw
मित्र म्हणे वर सौमित्र पोटेने
मित्र म्हणे वर सौमित्र पोटेने प्रियांका बर्वेची मुलाखत घेतली आहे. पोटे जरा पोरकट किंवा बालिश वाटतो. ती चांगलं बोलली आहे.
माझे अत्यंत आवडते लेखक श्री
माझे अत्यंत आवडते लेखक श्री रत्नाकर मतकरी यांची म्हणाल तर मुलाखत वा प्रश्नोत्तरी. BBC वर.
https://www.bbc.com/marathi/india-52703882
रत्नाकर मतकरी 'सोपं, सुबोध लिहिणं हे अवघड काम आहे,' असं का म्हणायचे? हा ही माझा आवडता टॉपिक. कुठल्या बीबी वर टाकायचा?
चूक झाली असेल तर काढून टाकतो.
योग्य धागा आहे केशवकूल. छापील
योग्य धागा आहे केशवकूल. छापील स्वरूपात उपलब्ध असणाऱ्या मुलाखतींचेही स्वागत आहे.
अस्मिता आभार. धन्यवाद.
अस्मिता
आभार. धन्यवाद.
प्रियांका बर्वे कोणे? नाही
प्रियांका बर्वे कोणे? नाही माहिती, बघते आता मुलाखत.
बहुतेक abp माझा चॅनेल वर Bariatric Surgeon संजय बोरुडे यांची मुलाखत चांगली आहे.
म्हणजे अतिमहा लठ्ठ लोकांची ते सर्जरी करतात, जठराचा भाग काढून वगैरे तसले सर्जन
कोण भूषण कडू?
Submitted by स्वाती_आंबोळे on 17 May, 2024 - 15:3>> आई गं , बिचारा गं.. भूषण कडू ..!
पार कचरा केला.. !
इतका नाहीय तो तसा फेमस. श्यामची मम्मी व कॉमेडी एक्सप्रेस मुळे माहित आहे. बिग बॉस नाही बघितलेले त्याचे.
https://youtu.be/XfIAfpKgqVo
https://youtu.be/XfIAfpKgqVo?si=lKvImVcOe4p4AFIY
श्रुती चतुर्वेदी ची ही मुलाखत निवडणुका आणि त्यात सोशल मिडिया चे स्थान,बदलत चाललेले स्वरूप अशा अनेक चालू मुद्यांवर . तर्कशुद्ध आणि मोकळेपणाने बोलली आहे.. आवडली. बऱ्याच गोष्टींची थोडीफार कल्पना होती.
फैय्याज आणि बकुळ पंडित यांची
फैय्याज आणि बकुळ पंडित यांची मुलाखत आली आहे सह्याद्री वर.. फारच भारी. फैय्याज तर आवडतेच , ७५+ असून काय आवाज आहे आज सुद्धा. नक्कीच ऐका.
अजून एक सर्व पक्षीय नेत्यांची ९६ च्या निकाल नंतरची नलिनी सिंग ची मुलाखत आहे, त्यात पायलट , वाजपेयी आहेत. किती सभ्य डेकोरम, अजिबात ओरडणे नाही. अर्णब ला हे रोज १० वेळा दाखवायला हवे.
नलिनी सिंग ची हॅलो जिंदगी आठवते का कोणाला? जगजीत सिंग चे टायटल साँग होते. फारच उच्च मालिका अन् शीर्षक गीत. कसली मस्त बोलायची ती.
पुणे पोर्शे केसवर आधारीत
पुणे पोर्शे केसवर आधारीत मुलाखत
https://youtu.be/ZSWSxyF2Fv8?si=tEz3OR6YWGhLGA5f
सायो, बाप रे, किती भयंकर आहे
सायो, बाप रे, किती भयंकर आहे हे. जवळपास १/३ पाहिली, बंद केली. नंतर पाहीन पुढे.
हो. भयंकर आहे, पण हे असंच
हो. भयंकर आहे, पण हे असंच असेल अशी अपेक्षा होती. अनुराधा सहस्त्रबुद्धे चांगलं बोलल्या आहेत.
भयंकर फ्रस्ट्रेटिंग आहे.
भयंकर फ्रस्ट्रेटिंग आहे. ह्यात चिकाटैने काम करणार्या आणि मुलांना मदत करुन चांगल्या मार्गाला लावू इच्छिणार्या लोकांना हॅट्स ऑफ.
लंपन नलिनी सिंग आठवतेय, exit
लंपन नलिनी सिंग आठवतेय, exit pole ची सुरुवात तिनेच केली का. मला तीच आठवतेय.
तिचा भाऊही प्रसिद्ध पत्रकार आहेना.
अरुण शौरी. इंडियन एक्सप्रेसचे
अरुण शौरी. इंडियन एक्सप्रेसचे संपादक होते. मग वाजपेयींच्या मंत्रीमंडळात निर्गुंतवणूक खात्याचे मंत्री.
अंजू ताई तो अरुण शौरी. Exit
अंजू ताई तो अरुण शौरी. Exit म्हंटल की मला तो योगेंद्र यादव आठवतो डी डी वरचा, त्यावेळी फक्त एकच ए पोल असत डी डी वरचे. त्याच्या मुळे हे प्रकरण काय असते ते समजले.
Insiders हे मराठी यु ट्यूब
Insiders हे मराठी यु ट्यूब चॅनेल सुरू हल्लीच सुरू झालेलं दिसतंय. त्यावर अभिनेता आशुतोष गोखलेची मुलाखत पाहिली.
प्रश्न विचारणार्याचा चेहरा दिसत नाही की आवाज येत नाही. प्रश्नाची स्लाइड दिसते. मुलाखत देणार्यालाही तेवढीच दिसत असेल का?
त्याचं अभिनेता होणं, राजकीय कल (आजोबा विद्याधर गोखले शिवसेनेकडून लोकसभेवर खासदार आणि संघविचारांचे) , ललित कला केंद्र मध्ये झालेला प्रकार , सोशल मीडिया, करोना लॉकडाउन काळात त्याने केलेलं काम , वडिलांच्या अभिनयाशी तुलना इ.बद्दल आशुतोष बोलला आहे.
प्रेक्षक म्हणून मला एक तास खूप जास्त वाटला. अनेकदा वाक्यांची, मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली. ते एडिट करता आलं असतं .
त्याने सतत हातवारे केलेत. कॅमेर्यानेही काही वेळा त्याच्या हातांवर फोकस केलाय. पण मला ते हातवारे खटकले नाहीत. उलट तो शब्दांतून जे सांगत होता, त्याला जोड किंवा जोर मिळत होते.
त्याने चिन्मयी सुमीत / सुर्वे-ला मावशी , तिने त्याला माझ्या मित्राचा मुलगा म्हणणे यावरून सुमीत की उम्र का पताही नहीं चलता असं वाटलं. तिला इतक्यात पाहिलेलं नाही - अर्थात टीव्ही किंवा नेटवर.
हा पाचवा एपिसोड आहे. आधीच्या भागांत प्रसाद ओक, किरण माने, अभिजीत खांडकेकर, सिद्धार्थ चांदेकर यांच्या मुलाखती झालेल्या दिसतात.
Yashwant Deshmukh on
Yashwant Deshmukh on #election2024 Result, EVM Hack,Modi vs Rahul |The Raunac Podcast|TRP| RJ RAUNAC : https://www.youtube.com/watch?v=QCU9qmwgLII
एक विस्तृत, संयमित आणि साधकबाधक मुलाखत. फार छान आहे.
अशोक हांडे हे एक कलाकार
अशोक हांडे हे एक कलाकार म्हणून सर्वांना माहीत आहेतच पण आंब्याची दलाली हा त्यांच्या वडिलांचा व्यवसाय ते आज ही त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून तितक्याच ताकदीने सांभाळत आहेत. त्यांची मुलाखत अवश्य ऐका. त्यांच्या apmc च्या गाळ्यातच मुलाखत घेतली आहे. मागे जे आंब्याचे क्रेट दिसतायत त्यातले स्वस्तिक चिन्ह असलेले क्रेट आमचे आहेत. ..
https://youtu.be/TTd2NZuyWH8?feature=shared
>>Submitted by सायो on 31 May
>>Submitted by सायो on 31 May, 2024 - 10:26
>>
फार अस्वस्थ करणारी मुलाखत! गेल्या ३० वर्षांत यंत्रणा अजूनच वाईट झाली आहे हे फार जाणवले. त्यातही चिकाटीने काम करत रहाणार्यांबद्दल फार आदर वाटतो.
ममो, बघते मुलाखत!
मीही यशवंत देशमुखांची मुलाखत
मीही यशवंत देशमुखांची मुलाखत पाहिली. अगदी सॅंपलिंगपासून सगळ्या विषयावर डिस्कशन केले आहे.
भरत, कालच चिन्मयी सुमितची
भरत, कालच चिन्मयी सुमितची वुमन की बात मध्ये आरपार मध्ये मुलाखत बघितली. मुग्धा गोडबोलेने घेतली आहे. दोघी आवडतात आणि अर्थात मुलाखतही आवडली. चिन्मयीने काम केलं पाहिजे वाटतं, पण ती अर्थात तिची इच्छा!
मुग्धा गोडबोलेने मुलाखत हे करिअर करायला हरकत नाही इतकी छान मुलाखत घेते ती.
चिन्मयीने काम केलं पाहिजे
चिन्मयीने काम केलं पाहिजे वाटतं, पण ती अर्थात तिची इच्छा!
>>> अगदी. ती खूप प्रगल्भ आहे. मुलाबाळांत अडकली असेल बऱ्याच स्त्रियांप्रमाणे. मुग्धा पण छान आहे. सुमित पण व्हर्साटाईल आहे पण तो विनोदी पात्रांत अडकला आहे. अनेक वर्षांपूर्वी 'खुपते तिथे गुप्ते' मधे विनय आपटेंनी दोघांनाही विनवणी केली होती 'बाहेर पडा' म्हणून. एकदम हताश होऊन शेवटी 'चालायचंच... घराचे हप्ते, मुलंबाळं , मुलांच्या फीस, संसार असतंच शेवटी' असंही म्हटले.
अरे वा. अशोक हांडेंची मुलाखत
अरे वा. अशोक हांडेंची मुलाखत नक्की बघणार. धन्यवाद मनीमोहोर.
हो. संसारात अडकलेली आहे. ते
हो. संसारात अडकलेली आहे. ते स्वेच्छेने आहे असं मला तरी वाटलं. म्हणुनच म्हटलं तिची इच्छा. ती तिला आवडतं ते काम करतच असावी.
भरत, लंपन थँक्स. मला नाव
भरत, लंपन थँक्स. मला नाव आठवेनाच.
योगेंद्र यादव exit साठी आठवतोच पण आधी समहाऊ मला नलिनी सिंग आठवते.
Kani who won the Kerala State
Kani who won the Kerala State Award in 2019 for the Malayalam film Biriyani, tells Rediff.com's Divya Nair what the Cannes recognition means for her, why she carried the watermelon handbag, and how winning awards has changed the game for her.
https://www.rediff.com/movies/report/kani-kusruti-the-win-is-not-just-fo...
फैय्याज आणि बकुळ पंडित यांची
फैय्याज आणि बकुळ पंडित यांची मुलाखत आली आहे सह्याद्री वर.. फारच भारी. फैय्याज तर आवडतेच , ७५+ असून काय आवाज आहे आज सुद्धा. नक्कीच ऐका. >>>> लंपन, थॅन्क्स रेको साठी. खूपच छान झाली आहे ही मुलाखत. फैयाझ आणि बकुळ पंडित खूप छान बोलल्या, पण समहाऊ मला मुलाखतकार उत्तरा मोने, मुलाखतीसाठी तयारी करून आल्या नव्हत्या असं वाटलं.
अमुक तमुक वर - डॉ. मुलमुलेंची
अमुक तमुक वर - डॉ. मुलमुलेंची सुखाचा शोध घेता येतो का मुलाखत ऐकली. मागच्या भागाप्रमाणे ही पण मुलाखत खूप छान आहे. हुशार माणूस आहे एकदम.
डायबेटीस विषयावर डॉ. भाग्येश कुलकर्णींचे पण २-३ भाग फार उत्कॄष्ट आहेत.
चिन्मयी सुमीतची मुग्धा
चिन्मयी सुमीतची मुग्धा गोडबोलेने घेतलेली मुलाखत पाहिली. आवडली.
क्लृप्ती हा शब्द फार क्वचित ऐकायला मिळतो. उपलब्धी म्हटल्यावर लगेच हा हिंदी शब्द आहे, हेही तिने सांगितले. ती मालिकांच्या संवादांतल्या चुकांबद्दल बोलताच मुग्धा लगेच डिफेन्सिव्ह झाली. ती वापरत असलेल्या सिस्टिमवर उकार बाय डिफॉल्ट दीर्घ येतात, असं काही तरी म्हणाली. त्यावरून
एकादोन मायबोलीकरांची आठवण झाली.आशुतोष गोखले पाठोपाठ आणखी एका अभिनेत्याने घरातल्या वेगळ्या राजकीय विचारसरणीबद्दल सांगितलं.
यांचा सेट काही वेगळाच आहे. कमेंट्समध्ये एकीने लिहिलंय की मुग्धाची मिरर इमेज दाखवली आहे का ? कारण पदर उजव्या खांद्यावरून आहे.
यु ट्यूबने बाजूला दिल के करीब मधली चिन्मयीची मुलाखत सुचवली. इतक्यात तरी पाहत नाही. सुलेखाच्या चेहरेपट्टीत सीमा देव यांचा भास होतो का बघा.
दूरदर्शनसाठी शंकर वैद्य यांनी
दूरदर्शनसाठी शंकर वैद्य यांनी घेतलेल्या सुधीर फडके यांच्या मुलाखतीचा पहिला भाग पाहिला. शंकर वैद्य किती नीरस, अलिप्तपणे बोलतात हे वर्णन मी कॉलेजात असताना ऐकलं होतं. ( ते आमच्याकडे एका स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आले होते.) त्याचा प्रत्यय आला. सुधीर फडके इतके उत्साहाने बोलत असताना ते आणखीनच जाणवलं.
Pages