ड्रंक लेडी विथ ऑडी..

Submitted by अश्विनीमामी on 10 June, 2015 - 01:28

आपल्या विशाल मुंबई शहरात व उपनगरांत रोज अनेक अपघात घडतच असतात. पण आज सकाळीच ही बातमी वाचनात आली व मन हेलावून गेले. जान्हवी गडकर ह्या ३५ वर्षीय वकील महिलेने दारुच्या नशेत उलट दिशेने ऑडी गाडी चालवली. ताशी १२०किमी च्या आसपास स्पीड होता. इस्टर्न फ्रीवे हा दिवसा उजेडी पण भरधाव जाणार्‍या वाहनांमुळे जरा डेंजरसच आहे. पण हा अपघात व जीवित हानी टाळता आली असती.

मूळ बातमी इथे आहे.
http://www.mumbaimirror.com/mumbai/cover-story/Drunk-corp-lawyers-Audi-r...

जे दोन पुरूष वारले त्यात एक टॅक्सी चालक व एका कुटुंबातील कर्ता पुरूष. तीन मुलांचा बाप. हे कुटुंब मुलाचा दहावीतील निकाल सेलिब्रेट करून घरी परत येत होते. राइट साइडनेच टॅक्सी चालली होती. दोन मुलींचे कॉलेज संपले व मुलगा दहावी झाला म्हणून कदाचित ते खुशीत असतील. तर प्राणच गेले ते ही हकनाक. व्हिक्टिम ऑफ ड्रंक ड्रायविंग!!! सांसरिक जबाबदारी थोडी हलकी होते आहे असे वाटण्यच्या क्षणीच जाणे.... सब उपरवाले की मर्जी. असे म्हणू शकतो पण मला इथे त्या महिला वाहन चालिकेचा राग आला आहे.

वकिली फर्म्स मध्ये अनेक पदे भूषवलेली, मोठ्या कंपनीत व्हीपी पदावर असलेली स्त्री, कामानंतर जेवना बरोबर सहा व्हिस्कीचे पेग पिते व कार राँग साइडने ११ कि,मी चालवते फ्री वेवर इतका जोरात अपघात होतो कि फायर ब्रिगेड बोलवायला लागावे. व तिला एवढे कळायला हवे होते कि ह्या अवस्थेत गाडी चालवू नये?! का अशी अपेक्षाच चुकीची आहे.

पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावरही ती झोपून गेली व दुसृया दिवशी स्टेटमेंट दिले. अपघाताच्या ठिकाणी पैसे देउन मिटवायचा प्रयत्न केला हे पटले नाही. हिला आता स्री आहे म्हणून कमी शिक्षा होईल, स्त्रियाना पण हवी तेवढी दारू प्यायचा हक्क आहे वगैरे चर्चा होतील . पण मग दारू प्यायल्यावर
कार न चालवायची बेसीक जबाबदारी व समजूतदार पणा पण हवा की नको. स्वातंत्र्य हवे पण जबाब्दारी घेणार नाही अशी मानसिकता बरोबर नाही. तिच्या वागणुकीचे बिल स्त्रिस्वातंत्र्या वर फाड्णे पटत नाही. हा फक्त एक अपघात समजावा असे अपील तिच्या आईने केले आहे. .....ऑलरेडी ती आम्हाला एक मनमिळाऊ कलीग म्हणूनच माहीत आहे वगिअरे छापून आले आहेच. ग

त्यातही तिची ऑडी असल्याने अपघात झाल्यावर एअर बॅग मुळे तिला कमी इजा झाली व टॅक्सीत तसे काही सोय नसल्याने पुढील जागी बसलेला चालक व पॅसेंजर तिथेच वारले. टॅक्सीत एअर बॅग का नसते. लॉजिकली असायला हव्यात नाही का?

सुरुवातीलाच तिने रॉग साइड घेतली. काही तरी होईल म्हणून एका चालकाने तिच्या मागे जायचा प्रयत्नही केला पण फारच जोरात गाडी चाल्वत असल्याने तो मागे पडला. व व्हायचे ते होउनच गेले.
गुन्हा सिद्ध झाल्यास!!! तिला १० वर्शाची सजा होउ शकते.

पण ते दोन जीव गेले... त्यांच्या कुटुंबियांची हानि भरून येणार नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यामध्ये अजून एक संतापजनक बाब म्हणजे मुलामुलींना बार किंवा पबमध्ये अल्पवयीन असले तरी अगदी सहज प्रवेश मिळू शकतो. पूर्वी मुले खोटे ID दाखवत. आजकाल त्याचीही गरज नाही म्हणे. पबच्या लोकांना पैसे देऊन कोणीही प्रवेश मिळवू शकतो. यात आपण अल्पवयीन मुलांना घेतो आहेत व त्याचा काय परिणाम होईल याचे त्यांना सोयरसुतक नाही. कदाचित ह्या वेदान्तसारखी मुले पैशाचा माज दाखवून धमकावूनही घेत असतील पण सामान्य मुलंमुलीही नियम धाब्यावर बसवून पैसे देऊन पबमध्ये जातात हे सत्य आहे. अमेरिकेवर बाकी कितीही टीका केली तरी पब/बार मध्ये मायनरना ID शिवाय प्रवेश नाकारतात. २१ वर्षापर्यंत दारू बंदी आहे. लपून छपून घरीबाहेरी पितात हे होत असले तरी पबमध्ये सर्रास एन्ट्री नाही.
कदाचित अवांतर होईल पण २/३ आठवड्यापूर्वी पुण्यात कोथरूडमध्ये एका ५व्या मजल्यावरच्या रुफटॉप रेस्टारंट मध्ये गेलेले. तिकडे अर्थातच बार होता व भरपूर टेबलांवर मद्य पिणे चालू होते. टेबले अगदी जवळ जवळ चिकटून होती. पण मला सर्वात खटकलेली गोष्ट म्हणजे एक टेबलवर २/३ फॅमिली जेवत होत्या. त्याच्याबरोबर ५/६ मुले हसत खेळत होती, साधारण ६-१२ वयाच्या आसपासची. एका मुलाचा वाढदिवस होता म्हणून शेवटी केक वगैरे कापून साजरा करत होते. आता जिथे आजूबाजूला टेबलांवर सर्रास ड्रिंक्स घेणे चालू आहे अशा ठिकाणी मुलांना कशाला आणायचे. नाही मी अजिबात जुनाट विचारांची नाही, ड्रिंक्स घेण्यास अजिबात वावडे नाही पण एका वयानंतरच ह्या बाबतीत ठाम आहे.
पण इथे न आणता जिथे बार नाही तिथे असे पालक मुलांना घेऊन जाऊ शकतातच ना ? कोणालाच त्यात काही विचित्र वाटले नाही?रेस्टारंटवाल्यांनी बार सेकशनला लहान मुले कशी जाऊ दिली ? मला मात्र ते प्रचंड खटकले.

त्या मुलाला निबंध लिहायला लावायला हवा तो असा : कल्पना कर की तू मृत पावलेल्यांचा पालक आहेस>> यांना काहीच फरक पडणार नाही. लिहून दाखवतील.>>>> काहीच होणार नाहीये माहितीये हो ... हतबल आहे सामान्य माणूस!

आ_रती: पुण्यातल्या कोणत्याही भागात साधारण तासाभराच्या तपासानंतर गांजा, 2-3 तासाच्या तपासात इतर ड्रग उपलब्ध होऊ शकतात, खात्रीशीर. त्यात वय वगैरेची भानगडच नाही. तुम्हाला रेस्टोरंटमध्ये मुलांच्या आजूबाजुला मद्यसेवनाचं आश्चर्य वतायलाच नको

२ जणांचा जीव घेणाऱ्याला शिक्षा न करता जनतेचा रोष शांत करायला हे बाकी पब वर बंदी चे विनोदी नाटक चालू आहे. यात खरा न्याय नाममात्र अल्पवयीन आहे आणि आर्थिक आणि राजकीय प्रभाव याच्या दुरुपयोगाने सुटायचा प्रयत्न केले म्हणून एक उदाहरण सेट करायला कडक शिक्षा करून केला पाहिजे. म्हणजे कोणीही भविष्यात या भ्रमात राहणार नाही की पैसे असले की सुटता येते. बाकी पब बंदी पॉर्शे गाडीवर बंदी, दुचाकी गाडीवर बंदी असले विनोद खूप करता येतील. हे इथे देखील बोलणारे राजकीय लोक आहेत. सामान्य लोक याचा विरोधच करत आहेत. दिशाभूल करणाऱ्यांचा हेतू राजकीय आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

पुर्ण कुटुंबच अपराधी प्रवृत्तीचे आहे. ताज्या बातमी नुसार त्या कार्ट्यां च्या आजोबा नेअ अजय भोसले नामक नेत्याला मारण्यासाठी छोटा राजन ला सुपारी दिली होती 2009 ला. आज्याचा भाऊ म्हणजे राम अग्रवाल जुन्या ली मेरिडियन चा मालक याच्या पुर्ण कुटुंबावर सुनेचा हुंड्यासाठी छळ केल्याचा खटला सुरू होता. अशी पार्श्वभूमी असल्यावर पोरगा असाच वाया गेलेला निघाला त्यात काय नवल

त्या मुलाला परत आज परत बाल हक्क न्यायालय मध्ये आणलाय, त्याचा पाठमोरा व्हिडीओ पाहिला. तर बारीक केसाचा मुलगा होता. त्या दिवशी accident दिवशी मोठ्या case वाला मुलगा होता.२दिवसात हेअर कट करून आलय पोरग. मी त्याच्या आई च्या किंवा त्याच्या जागी असतें तर मलाच हार्ट अटॅक येऊन ऍडमिट व्हावं लागलं असत एव्हाना, अन्न काय पाणी उतरलं नसतं घशाखाली. आणि हे पोरग मस्त हेअर कट करून आलय, निवांत चालतंय दाबात. कुठून आणतात एवढी गेंड्यासारखी कातडी, आणि मुर्दाड मनं ज्याच्या वर काहीच परिणाम नाही होतं

एक क्षण वाटलं त्या कोर्ट च्या आवारात जाऊन मार मारावं पोराला. माझ्या मुलाला मी मुद्दाम सगळे अपडेट्स देते आहे या case चे कारण उद्या उठून आपण कोणाबरोबर संगत करतो, कुठं जातो काय वागतो याच भान रहावं भविष्यात.

'हेअर कट' हे कोर्टात आरोपी 'साधा भोळा सालस मुलगा' दिसावा, केस लांब असतील, स्टबल असेल तर इमेज बिल्डिंग नीट होणार नाही असं काही असेल.

असेल अनु तसंही, आपण साधी विचार करणारी माणसं, असं वाटलं नॉर्मल आयुष्यात पण मुलाला हेअर कट करायला न्यायला वेळ मिळाला नाही तर आपण पुढच्या वीक मध्ये जाऊ म्हणतो, आणी इथं एवढ्या भयानक गोष्टी चालू असताना हेअर कट कसा सुचू शकतो पोराला. म्हणूनच म्हणलं कुठून एवढी निब्बर कातडी मिळवतात कोण जाणे

ते गुन्हेगारच आहेत. त्यांची कातडी तशीच असणार.
त्याकडे लक्ष देण्यापेक्षा पोलिस, राजकारणी, न्यायालये यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे.

पोलीसांवर दबाव आणणाऱ्या त्या दळभद्री आमदारा वर अजूनही त्याच्या पक्षाने कोणतीही कारवाई केलेली नाहीये. गेंड्याची कातडी दुसरं काय..

आमदार तनपुरेंच्या मुलाला शाळा सोडावी लागली होती, या मुलाच्या आणि मित्रांच्या त्रासामुळे.
तक्रार करुनही काही उपयोग झाला नव्हता तेव्हा, आमदारपत्नीने ट्विटर वर पोस्ट केलीय.

पुण्यातील कल्याणीनगर येथील 'हिट अ‍ॅण्ड रन' प्रकरणात दिवसेंदिवस नवनवे खुलासे होत आहेत. अशातच आता आरोपी वेदांत अगरवाल (Vedant Agarwal) याच्यासंदर्भातील बाल हक्क कोर्टात सुरु असलेल्या सुनावणीमध्ये आणखी आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे वेदांत अगरवाल याचा ब्लड टेस्ट रिपोर्ट कोर्टपुढे सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे वेदांत अगरवाल याला पुन्हा जामीन मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ### कायद्याचे धिंडवडे निघत आहेत

लायसन्स नसताना, रेकलेस स्पीड मध्ये, अनरजिस्टर्ड गाडी चालवणे आणि दोन खून करणे हे अटकेला पुरेसं नाही का?
डीयुआयने केस आणखी मजबुत बनेल पण त्या व्यतिरिक्त पोराला आत टाकायला वरील कारणं पुरेशी नाहीत?

चिडकू+१
मी बिल्वा, खरं आहे. एका मुलाची आई म्हणून सुद्धा ही केस प्रचंड अस्वस्थ करते आहे. इथे दुसऱ्या मुलाचा फुगा जरी आपल्या मुलामुळे फुटला तरी आपण 'सॉरी' म्हणायला लावतो/समजावतो. त्यांच्या घराण्याची एकंदरीत कारकीर्द बघितली काल, पिढ्यानपिढ्या गुंड आहेत.

आपली सोसायटी आणि आपल्या सगळ्या यंत्रणा अगदी प्रत्येक लेव्हलवर- (नुसती साखळीच नव्हे तर प्रत्येक कडी सुद्धा) फ#&प आहेत. यांना न्याय मिळायला हवा नाहीतर आपणही ह्या 'चलता है' यंत्रणेचा भाग आहोत याची एक माणूस म्हणूनही टोचणी राहील. रहायलाही हवी..!

त्या रात्री तो पोरगा मित्रांबरोबर दोन बार मधे गेला होता. त्यातील पहिल्या बारमधे एक-दीड तासात ४८००० रुपयांची दारु उडवली असे बिलावरून कळले आहे. दुसर्‍या बारचे बिल अजून समजले नाही.

दिवट्याचा जामीन रद्द केला. लोकांच्या रोषाचा परिणाम!.

एकुणात इथं न्यायालयात फक्त दाद मागायची झाली तरी मोठ्या प्रमाणात लोकांची मागणी असेल तरच काही होऊ शकतं. धन्य ती न्यायव्यवस्था!

ज्युव्हेनाइलला जामीन देतात का? की सुधारगृहात ठेवतात? जामीन फक्त प्रौढ गुन्हेगारांना असतो का? त्याला आता सुधारगृहात ठेवलं आहे ना?
नुकतेच कायद्यात काही बदल झालेत. त्यात १६-१८ या वयोगटा तल्या कोणी गंभीर गुन्हा केला असेल तर त्याला सज्ञान समजून पुढची कारवाई करता येते. अर्थात हे न्यायालय ठरवतं. पोलिस / सरकार तशी मागणी करतात.

हे सगळं फार वरवर वाचलं होतं, त्यामुळे बरोबर असेलच असं नाही.

सर्वोच्च न्यायालयात अशाच एका केस मधे फिर्यादी आणि सीबीआय अपीलात गेले होते. तेव्हां सर्वोच्च न्यायालयाने कायद्यात शिक्षा स्पष्ट नाही असे निरीक्षण नोंदवलेले आहे. फिर्यादीचे म्हणणे होते कि त्याने (अकरावीला असलेल्या अल्पवयीन मुलाने) परिणामांची जाणिव असतानाही हे कृत्य (खून) केले. सर्वोच्च न्यायालयाने यावर हायकोर्टाचा निकाल कायम ठेवत म्हटले कि अल्पवयीन मुलांना परिणामांची जाणिव नसते. खूप लांबचा विचार करून ते कृत्य करत नाहीत. भावनेच्या भरात त्यांच्याकडून गुन्हा घडतो. त्यामुळे हायकोर्टाचे मत योग्य आहे.

याउलट आणखी एका केस मधे सर्वोच्च न्यायालयाने खालच्या न्यायालयाचा निकाल बदलवत गंभीर गुन्ह्याची शिक्षा सांगितली.

अशा प्रकरणात जज्जचे मत अंतिम हे योग्यच आहे. ज्युडीशिअरी करप्ट असणे ही कीड आहे म्हणून त्यामागची थॉट प्रोसेस चुकीची नाही.

पुण्यातील त्या "विधी संघर्षित " मुलाचा अतिशय घाणेरडा विडिओ व्हायरल होतोय. त्या ब्रँड न्यू कार मध्ये तांत्रिक बिघाड देखील होता ( कोर्ट कामकाजाची सोय करून ठेवली ).

तांत्रिक बिघाड आहे हे माहीत असून देखील बापाने गाडी बाळाला दिली

बाळ गाडी चालवेल, तू बाजूला बस असे ड्राइवर ला सांगितले
बापाची चूक आहेच की ह्यात

आजच व्हाट्सअप्प वर msg आला की, या कारणांनमुळेच मोदींनी हिट अँड रन चा कायदा कडक केला होता आणि त्याविरोधात ट्रक चालकांनी संप केला होता आणि विरोधकांनी त्या संपाला पाठिंबा दिला होता, तेच विरोधक आता गळा काढत आहे, त्यांना काहीच हक्क नाही आता.

पोलिसांनी तो कायदा लावला पाहिजे. आणि जज ने पैसे घेऊन सोडले नाही पाहिजे. आमदार मध्यरात्री गेला नाही पाहिजे पोलीस स्टेशन ला. आपण मेलो उद्या तर आमदार सोडा शेजारच्या गल्लीतला कार्यकर्ता पण येणार नाही.

Pages