आपल्या विशाल मुंबई शहरात व उपनगरांत रोज अनेक अपघात घडतच असतात. पण आज सकाळीच ही बातमी वाचनात आली व मन हेलावून गेले. जान्हवी गडकर ह्या ३५ वर्षीय वकील महिलेने दारुच्या नशेत उलट दिशेने ऑडी गाडी चालवली. ताशी १२०किमी च्या आसपास स्पीड होता. इस्टर्न फ्रीवे हा दिवसा उजेडी पण भरधाव जाणार्या वाहनांमुळे जरा डेंजरसच आहे. पण हा अपघात व जीवित हानी टाळता आली असती.
मूळ बातमी इथे आहे.
http://www.mumbaimirror.com/mumbai/cover-story/Drunk-corp-lawyers-Audi-r...
जे दोन पुरूष वारले त्यात एक टॅक्सी चालक व एका कुटुंबातील कर्ता पुरूष. तीन मुलांचा बाप. हे कुटुंब मुलाचा दहावीतील निकाल सेलिब्रेट करून घरी परत येत होते. राइट साइडनेच टॅक्सी चालली होती. दोन मुलींचे कॉलेज संपले व मुलगा दहावी झाला म्हणून कदाचित ते खुशीत असतील. तर प्राणच गेले ते ही हकनाक. व्हिक्टिम ऑफ ड्रंक ड्रायविंग!!! सांसरिक जबाबदारी थोडी हलकी होते आहे असे वाटण्यच्या क्षणीच जाणे.... सब उपरवाले की मर्जी. असे म्हणू शकतो पण मला इथे त्या महिला वाहन चालिकेचा राग आला आहे.
वकिली फर्म्स मध्ये अनेक पदे भूषवलेली, मोठ्या कंपनीत व्हीपी पदावर असलेली स्त्री, कामानंतर जेवना बरोबर सहा व्हिस्कीचे पेग पिते व कार राँग साइडने ११ कि,मी चालवते फ्री वेवर इतका जोरात अपघात होतो कि फायर ब्रिगेड बोलवायला लागावे. व तिला एवढे कळायला हवे होते कि ह्या अवस्थेत गाडी चालवू नये?! का अशी अपेक्षाच चुकीची आहे.
पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावरही ती झोपून गेली व दुसृया दिवशी स्टेटमेंट दिले. अपघाताच्या ठिकाणी पैसे देउन मिटवायचा प्रयत्न केला हे पटले नाही. हिला आता स्री आहे म्हणून कमी शिक्षा होईल, स्त्रियाना पण हवी तेवढी दारू प्यायचा हक्क आहे वगैरे चर्चा होतील . पण मग दारू प्यायल्यावर
कार न चालवायची बेसीक जबाबदारी व समजूतदार पणा पण हवा की नको. स्वातंत्र्य हवे पण जबाब्दारी घेणार नाही अशी मानसिकता बरोबर नाही. तिच्या वागणुकीचे बिल स्त्रिस्वातंत्र्या वर फाड्णे पटत नाही. हा फक्त एक अपघात समजावा असे अपील तिच्या आईने केले आहे. .....ऑलरेडी ती आम्हाला एक मनमिळाऊ कलीग म्हणूनच माहीत आहे वगिअरे छापून आले आहेच. ग
त्यातही तिची ऑडी असल्याने अपघात झाल्यावर एअर बॅग मुळे तिला कमी इजा झाली व टॅक्सीत तसे काही सोय नसल्याने पुढील जागी बसलेला चालक व पॅसेंजर तिथेच वारले. टॅक्सीत एअर बॅग का नसते. लॉजिकली असायला हव्यात नाही का?
सुरुवातीलाच तिने रॉग साइड घेतली. काही तरी होईल म्हणून एका चालकाने तिच्या मागे जायचा प्रयत्नही केला पण फारच जोरात गाडी चाल्वत असल्याने तो मागे पडला. व व्हायचे ते होउनच गेले.
गुन्हा सिद्ध झाल्यास!!! तिला १० वर्शाची सजा होउ शकते.
पण ते दोन जीव गेले... त्यांच्या कुटुंबियांची हानि भरून येणार नाही.
त्या बाळासोबत असलेल्यापैकी
त्या बाळासोबत असलेल्यापैकी एकाचे वडील रात्री तिथे पोचले होते का?
ओह्! टिंगरेपुत्र होता का?
ओह्! टिंगरेपुत्र होता का?
कोण होता बडा राजकारणी?
१२ करोडच डील झालं होता म्हणे.
१२ करोडच डील झालं होता म्हणे...
आता कितीही मीडिया बाजी केली तरी, महत्वाचा पुरावा टेम्पर झाला आहे, रक्त तपासणीचा. जेंव्हा कोर्ट मध्ये केस दाखल होईल तेंव्हा पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं असेल. ऍक्सीडेन्ट ची केस होईल आणि दुसरा रिप्लेस मेन्ट ड्रायवर ला शिक्षा होईल (ती पण थोडी फार ).... आणि लोक विसरून जातील. आताचे कबुलीजवाब कोर्टात टिकणार नाहीत आणि साक्षीदार फितूर झाले असे कोर्ट डिक्लेर करेल.
मला हे कळत नाहीये की रक्त
मला हे कळत नाहीये की रक्त तपासणीला इतके महत्त्व का? अल्कोहोल न घेताही लोकांना उडवले तरी गुन्हाच आहे तो! ( उलट जास्त गंभीर म्हणायला हवा) बाकी जे नवे नवे डीटेल्स रोज येत आहेत त्याने थक्क व्हायला होतंय. एवढे नक्कीच कळतंय की सिस्टीम इतकी वरपर्यन्त सेट आहे की इन्सिडन्ट घडल्या घडल्या सगळ्या यंत्रणा बिनभोभाट क्लीन अप च्या कामाला लागतायत! हे एक प्रकरण बाहेर आले. पण अशी कित्येक बिना अडचण मार्गी लागत असतील. भयंकर आहे सगळे.
अल्कोहोल रिझल्ट निगेटिव्ह आला
अल्कोहोल रिझल्ट निगेटिव्ह आला तर अजून पळवाटा(लोक अचानक समोर आले/ब्रेक फेल अचानक झाले)काढुन वकिलांना वाचवता येते.पण dui कागदोपत्री लागला तर गुन्ह्याची गंभीरता वाढते.
ज्युवेनाइल विरुद्ध अजुनही
ज्युवेनाइल विरुद्ध अजुनही कायदे कडक नाहीत याचा फायदा या मुलाला मिळवुन देतिल
अनु निपा +१
अनु निपा +१
नुसत्या अपघाताला मोटीव्ह नाही. DUI हा गुन्हा आहे, अपघात गुन्हा नाही. अर्थात इथे मायनर, ड्रायव्हर लायसन नाही, वेग, गाडी रजिस्टर नाही इ. आहेच. पण एकदा ड्रायव्हर बदलला की विषय संपला.
तो १८+ असता तरी काहीच वेगळं घडलं नसतं. पैसा! आणि पोखरलेली व्यवस्था.
मायनर ने दारू पिल्याचे
मायनर ने दारू पिल्याचे उघडकीस आले तर अशा केस मधे त्याला मायनर म्हणायचे कि सज्ञान ही न्यायाधिशांकडे असलेली विवेक बुद्धी ते यात वापरू शकतील असे वाटते. दारू पिऊन चालवली हे सिद्ध झाले नाही तर अपघाताच्या केस मधे मायनर असल्याने निर्दोष सुटका होईल.
त्या मुलाला सही सलामत सोडवणे
त्या मुलाला सही सलामत सोडवणे हे ह्या केसच फायनल outcome अपघात घडला त्याच क्षणी set केलं गेलं आहे, त्या दृष्टीने पुरावे गोळा करणं चालू आहे. " You show me the man i will show you the rule " हे जो पर्यंत बदलत नाही, ह्यात कोणाला गैर वाटत नाही तोपर्यंत आपण सुधारणे शक्य नाही.
काल (गुरुवारी पहाटे 3 वाजता)
काल (गुरुवारी पहाटे 3 वाजता) अजून एका भरधाव कारने BRT मार्ग मधे गाडी ठोकली. सातारा रोड, पर्वती इंडस्ट्रियल इस्टेटच्या समोर. कार सिटी प्राईड कडून स्वारगेटला चालली होती. ड्रायव्हिंग करणारा विशाल भाकरे, 22 वर्षांचा मुलगा आहे आणि वडील पोलीस आहेत. स्वारगेट - पोलीस लाईन मध्ये राहतात.
सध्या काय मुलांनी कार एक्सीडेंट करण्याचा सिझन चालू आहे का? इतक्यातच किती केसेस झाल्या.
मुलीला कॉलेजला जायला जी बस
मुलीला कॉलेजला जायला जी बस आहे तिची सर्व्हिस बरोबर नसल्याने पीएमटीची बस वापरून पाहिली. दीड तासाने बस येते, थांबत नाही. खूप दिवसांपासून तिला कार घेऊन द्यावी का हा विचार चालू आहे पण निर्णय घेऊ शकलो नाही. ती तरी नुकतीच अठरा पण झाली आहे. लायसेन्स पण आहे. पण हिंमत होत नाही.
त्या मुलाला कायद्याने सज्ञान होण्याआधी पोर्शे कार घेऊन देणारे कुठल्या मानसिकतेचे असतील ?
पोलीस जे चार्जशीट दाखल करतील
पोलीस जे चार्जशीट दाखल करतील , त्यानुसार कोर्टात पुरावे सादर करावे लागतील. सद्सद्विवेक बुद्धीवर केस चालत नाही. कोर्टात निकाल काय लागला पाहिजे या प्रमाणेच जर पुरावे गोळा करणें / गहाळ करणें / संधिगद्धता ठेवणे या गोष्टी मॅनेज केल्या कि झालं. तेच तर आता सुरु आहे. साक्षीदार फुटणे / उलटणे हे काही आपल्याकडे नवीन नाही (एकतर धमकी देऊन किंवा आमिष दाखवून ).
सलमान कार अपघात केस मधील त्याच्या बरोबर असलेल्या बॉडीगार्ड पोलिसाचा खूप बेक्कार अंत झाला आहे. ( रवींद्र पाटील ). एवढ्या रेफरन्स ची आठवण करून देणे पुरेसे आहे साक्षीदारांना.
जॉनी एलएलबी मध्ये जज म्हणतात , पहिल्या दिवशी जेंव्हा खटला सुरु होतो तेंव्हा जजच्या लक्षात आलेलं असता कि दोषी कोण आहे, तेंव्हा पासून जज वाट पाहत असतो कि तो योग्य पुरावा कधी समोर येईल. हेच अंतिम सत्य....
इनोसंट अंटील प्रुव्हन गिल्टी
हो.रवींद्र पाटील चा अंत आठवतो
हो.रवींद्र पाटील चा अंत आठवतो वाचलेला.त्याला कोणीही साथ दिली नाही.अक्षरशः खंगून,उत्पन्न संपून,व्यसनी होऊन झिजून संपला तो.
पोर्शा प्रकरणात जे चालू आहे ते बघून खूप आशा नाही.निवडणूक निकाल आला, मीडियाला नवा खेळ मिळाला की सर्व मागे पडून मुख्य आरोपी सूमडीत दंड देऊन जामिनावर सुटेल.
हिट अँड रन खूप वाढल्या आहेत हे खरं. रस्ते, रस्त्यावर गाड्या वाढल्या आहेत.परदेशातल्या सारखं.पण गाड्या चालवताना लागणारा सिव्हीक सेन्स, लेन शिस्त,पादचाऱ्यांनी फ्रीवे वर चालताना घेण्याची काळजी वाढली नाही(परदेशापेक्षा वेगळं.)
ताथवडे मुंबई बसेस पकडण्याच्या स्टॉप वर एकाला उडवलं.तो रात्री 1.30 ला मुंबई बस पकडायला उभा होता आणि लघुशंका करायला सर्व्हिस रोड ओलांडून जात होता.
शिवाय चारचाकी चालवताना, रात्री चारचाकी चालवताना जो रोड सेन्स(रात्र असली तरी कुठूनही काही वाहन/माणूस येऊ शकेल)लागतो तो आणि अक्कल मिसिंग आहे.
बाळाच्या आईला अटक.
बाळाच्या आईला अटक.
आता खोके पुरेसे होतील का?
तो १८+ असता तरी काहीच वेगळं
तो १८+ असता तरी काहीच वेगळं घडलं नसतं. पैसा! आणि पोखरलेली व्यवस्था.>>>> +१
माझ्या मित्राचे वडील रात्रपाळी करून १२.३० च्या सुमारास घरी येत होते. त्यांना एका दारूड्याने उडवले. अगदी मिडल क्लास घरातला होता.
१२ वर्षे झाली केस चालू आहे.
ईथे तर काय पैशाचा महापुर आहे. सगळी व्यवस्था, बेस्ट लॅायर्स, हाताशी आहेत.
न्याय मिळेल अशी आशा पण वाटत नाही.
काही दिवसांनी लोकांना
काही दिवसांनी लोकांना चर्चेसाठी नवे विषय मिळतील.... मग हे प्रकरणही मागे पडेल.
सद्सद्विवेक बुद्धीवर केस चालत
सद्सद्विवेक बुद्धीवर केस चालत नाही. >>> गंभीर गुन्ह्यात आरोपीवर सज्ञान समजून केस चालवायची कि अल्पवयीन म्हणून चालवायची याचे अधिकार न्यायाधिशाकडे असतात असे अनेकांचे मत गेल्या काही दिवसात वाहीन्यांवर प्रसारीत झालेले आहे.
https://testbook.com/ias-preparation/how-can-a-juvenile-be-tried-as-an-a....
दिल्ली निर्भया घटनेनंतर
दिल्ली निर्भया घटनेनंतर कायद्यांत ( Juvenile Justice Act 2015 ) दुरुस्ती आणि सुस्पष्टता आलेली आहे.
गुन्हेगाराला अल्पवयीन ठरवायचे का सज्ञान हे त्या व्यक्तीने केलेल्या गुन्ह्याच्या गंभिरतेवर अवलंबून आहे. अपराध काय केला होता, आणि त्या अपराधाला जास्तीत जास्त किती शिक्षा मिळू शकते या निकषावर गुन्ह्यांचे तीन वर्ग ठरतात.
किरकोळ गुन्हे (शिक्षा ३ वर्षे)
गंभिर गुन्हे ( ३ - ५ वर्षे)
घृणास्पद गुन्हे -बलात्कार, खून ( शिक्षा ७ ते १० वर्षे)
सज्ञान ठरविण्यासाठी घृणास्पद कृत्य केले होते का? ( उत्तर नाही आहे)
हिट - रन केस आहे का ? ( उत्तर नाही आहे)
खून करणे हा त्याचा उद्देश नव्हता. सर्व आकाश पातळ एक केले तरी हा अपघात गंभिर गुन्ह्यापर्यंतच पोहोचतो. Juvenile Justice Act 2015 वाचल्यावर त्याला सज्ञान समजता येत नाही.
सर्वोच्च न्यायालयाच्या एका
सर्वोच्च न्यायालयाच्या एका निरीक्षणाचा वरच्या कमेण्ट मधे विचार केलेला नाही.
नि.पा. आणि me _Anu शी सहमत..
नि.पा. आणि me _Anu शी सहमत..
चारचाकी चालवताना, रात्री चारचाकी चालवताना जो रोड सेन्स लागतो तो आणि अक्कल मिसिंग आहे. -~~~~~~ मेजर missing आहे . पार्किंग करतानाचा साधा सेन्स नसतो लोकांना .. इथे तर !
Jolly LLB - १०००% खरंय!!
Insta reels नुसार - जे दोन मित्र झाडाखाली घाबरून थांबलेले, त्यातला एक थोडा शुद्धीवर होता आणि त्यानेच पटापटा फोनाफोनी सुरू केली.. थोडे वेळाने कळलं की ब्रम्हा वाल्यांचा मुलगा आहे तेव्हा पब्लिक थोड थांबलं आणि त्यांना स्टेशनला घेऊन गेले.
Overall ... खूपच क्लेशदायक चित्र आहे जे चाललंय ते. खूपच पोखरली गेलीय सिस्टीम
या केसच्या पार्श्वभुमीवर
या केसच्या पार्श्वभुमीवर आलेली ही मुलाखत...म्हणजे सिस्टिम गन्डलेलीच आहे पण किती...
त्या पोराला जेव्युनाइल म्हणून मोस्टली काहिही शिक्षा होणार नाही अस वाटतय...किमान बाकीचच्याना तरी व्हावी.
https://www.youtube.com/watch?v=ZSWSxyF2Fv8&ab_channel=Mitramhane
अपघात घडल्यानंतर पहिल्यापासून
अपघात घडल्यानंतर पहिल्यापासून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोलिसांना सूचना /आदेश देत आहेत.
या केसबद्दल मी पोलिस आयुक्तांशी बोललो नाही. (म्हणजे पोलिस आयुक्तांशी बोललो, पण या केसबद्दल नाही.)
सुनील टिंगरे को शुगर है और वो बीमार है
इति अजित पवार
मुलाचे रक्ताचे नमुने बदलले पण
मुलाचे रक्ताचे नमुने बदलले पण कोणाचे घेतले?
तर आईचे घेतलेले अशी जोरदार शक्यता पोलिसांनी व्यक्त केलीय. आईच्या रक्ताची DNA वै प्रोसेस आता.
भारतात काहीही करा, खिशात लै पैसा आणि राजकारणी सोबत साटेलोटे असेल तर तुम्ही मोकळेच अशी प्रथाच पडत चालली आहे. अशा केस up बिहार मध्ये होतात असे अफवा / गॉसिप स्वरूपात ऐकून होतो.
इथे पुण्यात अनुभवतोय. सिविक सेन्स बाबत महाराष्ट्र बिघडत चाललाय, त्यांनी सुधारायचे ते सोडून पुढारलेले बिघडत आहेत.
शिरूर मध्ये अल्पवयीन मुलीने पिकअप टेम्पो वेगात चालवून 2 चाकी स्वार ठोकला. मुलीचे वडील तिच्या सोबत बाजूला बसलेले. ते पोलीस पाटील आहेत.
अपघात ग्रस्त लोकांना मदत करण्याऐवजी टेम्पो तिथेच सोडून निघून गेले. अपघात जोरदार होता. एकजण जागीच गेले आणि एक गंभीर जखमी. इति लोकसत्ता आज रविवार मधील सविस्तर बातमी.
*त्येला काय हुतय* रोगाची लागण दुसरे काय.
भीतीदायक आहे सर्व.मोठ्या
भीतीदायक आहे सर्व.मोठ्या वाहनाकडून अपघात झाला की जमाव मारणार, वाहनावर दगडफेक करणार.आणि या भीतिने कधी मोठ्या वाहनाची चूक नसेल तरी ते मॉब लिंचिंग होऊ नये म्हणून पळून जाणार.आणि या सगळ्यात कोणी वेदांत निर्धास्तपणे दारू चालवून गाडी चालवून खून करून पण करोडो रुपये चारून सुटणार.
अपघात झाल्यावर सर्वात मोठी प्रायोरिटी जखमींना लगेच सोडवून उपचार चालू करणे.दुसरी समांतर प्रायोरिटी अपघाताचे इन्व्हेस्टीगेशन पुरावे नाहीसे होण्याआधी होणे.या सर्वांसाठी परिणामकारक आणि लोकसंख्या प्रमाणात 911 मदत, हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यास 'पैसे कोण भरणार, पैसे भरा मग ऍडमिट करू' हा प्रश्न न येता इन्श्युरन्स मधून इलाज होणे या सर्व गोष्टी आवश्यक आहेत.आणि लोकसंख्या जास्त असल्याने कठीण आहेत.
तोवर घाबरत घाबरत डिफेनसिव्ह ड्राईव्ह करत, आपण कोणाकडून मारले जाणार नाही, आपल्याकडून गाडी चालवताना कोणी मारले जाणार नाही इतकीच काळजी घेऊ शकतो.
तोवर घाबरत घाबरत डिफेनसिव्ह
तोवर घाबरत घाबरत डिफेनसिव्ह ड्राईव्ह करत, आपण कोणाकडून मारले जाणार नाही, आपल्याकडून गाडी चालवताना कोणी मारले जाणार नाही इतकीच काळजी घेऊ शकतो.>> अगदी अगदी.
अशी घटना घडली की मला आपण शेवटला केलेला लॉंग ड्राइव्ह आठवतो. हायवेला आपण एवढ्या वेगाने का चालवली (खरं तर रस्ता, रहदारी, रॉंग साइड कोणी येण्याची, बाजुला थांबलेले वाहन अचानक धाडकन उजव्या लेन्स मध्ये येण्याची, डिव्हायडर मध्ये झुडपे असतील तर कुणी व्यक्ती, प्राणी अचानक रस्त्यावर येण्याची, वळण असेल तर ऐन वळणावर कोणी गाडी थांबवली असण्याची, खड्डा असण्याची, किंवा काहीही अनपेक्षित असण्याची, मागुन कुणी डावीकडून भरधाव ओव्हरटेक करण्याची, पुढचा आपल्या डाव्या /उजव्या लेन मधला इतका वेळ व्यवस्थित चालवत असला तरी अचानकपणे कसलीही सूचना न देता आपल्या लेन मध्ये येण्याची अशा कितीतरी शक्यता गृहीत धरून, आपण ज्याला ओव्हरटेक करणार आहोत त्याला हॉर्न ने सावध करून आणि त्याने त्याची दखल घेतलीय याची खात्री करून, नजरेने कुठेही कसलीही वेगळी हालचाल टिपली की मेंदु टवकारत चालवत असतो तरीही) पुढच्या वेळेस ८० च बास असा विचार येतो.
आमदार टिंगरे पहाटे ३ वाजता
आमदार टिंगरे पहाटे ३ वाजता घटनास्थळी, पोलिस ठाण्यांत मधे कशासाठी? ६:०० वाजेपर्यंत. तीन तास कशासाठी? पोलिसांना त्यांचे काम करु द्या, तुम्ही तुमचे आमदारकीचे काम करा.
मतदार संघांत अपघांत झाल्यावर आमदाराने पोलिस ठाण्यात तब्बल तीन तास ठिय्या देणे हा दबावाचा प्रकार किंवा चौकशीच्या कामांत अडथळा आणण्याचा प्रकार आहे.
गाडी चालवणारे बेदरकार पणे
गाडी चालवणारे बेदरकार पणे चालवतातच पण नीट फूट पाथ नाहीत हा ही issue आहेच. एकतर फुटपाथ नाहीतच, असल्यास ते खुप अरुंद असणे आणि ते ही फेरीवाल्यांनी व्यापून टाकलेले असणे ह्या ही समस्या आहेतच. खाली उतरल्यावर सगळं जवळ मिळायला पाहिजे ही आपलीच मानसिकता आहे. हॉकर्स झोन वगैरे आपल्या पचनी पडणाऱ्या कल्पना नाहीत. हे एक अनेक कंगोरे असलेलं दुष्ट चक्र आहे . आपल्याला प्रत्येकाला मनातून वाटल्या शिवाय हे बदललं जाणार नाही. किती ही कायदे केले तरी उपयोग होणार नाही.
खरं आहे.परवा मी 3.30 च्या
खरं आहे.परवा मी 3.30 च्या उन्हात 1.5 किलोमीटर चालत होते आणि मला त्या ऍक्टिव्हिटी मध्ये 4 वेळा फुटपाथ चढणे उतरणे करावे लागले कारण थेट फुटपाथवर चहा बिडी च्या टपऱ्या आणि प्लास्टिक ची स्टुल्स होती.
पण ज्यांना या फुटपाथ टपऱ्या चालताना अडथळा करतात तेच नंतर या टपऱ्या रोज व्यापून त्यांचे रोजचे गिऱ्हाईक बनतात.
मुंबई मधील नवीन केस ची बातमी.
मुंबई मधील नवीन केस ची बातमी. परत बाजूने जाता आलं असतं, मग अंगावरून गाडी का घातली समजत नाही.
महिलेला दोन किमी फरफटत नेलं, मग पुन्हा अंगावर कार घातली
मीहिर शाहने कावेरी नाखवा यांना धडक दिली त्यानंतर त्याने त्यांना तब्बल दोन किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. त्यानंतर वरळी सीलिंक येथे त्याने गाडी थांबवली. त्यानंतर त्यांनी बंपरमध्ये अडकलेल्या कावेरी यांना बाहेर काढलं. मग, ड्रायव्हर हा ड्रायव्हिंग सीटवर बसला. त्यानंतर त्यांनी गाडी पुन्हा मागे घेतली आणि ती कावेरी यांच्या अंगावर घालून तिथून पळ काढला. ही घटना तिथल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
खूप भीतीदायक आणि निराशाजनक
खूप भीतीदायक आणि निराशाजनक आहे.कोणाची भीती राहिलेलीच नाही या लोकांना.स्वतःच्या 5 मिनिटाच्या ड्रायव्हिंग थ्रिल साठी लोकांची आयुष्य उध्वस्त करतात.
Pages