आपल्या विशाल मुंबई शहरात व उपनगरांत रोज अनेक अपघात घडतच असतात. पण आज सकाळीच ही बातमी वाचनात आली व मन हेलावून गेले. जान्हवी गडकर ह्या ३५ वर्षीय वकील महिलेने दारुच्या नशेत उलट दिशेने ऑडी गाडी चालवली. ताशी १२०किमी च्या आसपास स्पीड होता. इस्टर्न फ्रीवे हा दिवसा उजेडी पण भरधाव जाणार्या वाहनांमुळे जरा डेंजरसच आहे. पण हा अपघात व जीवित हानी टाळता आली असती.
मूळ बातमी इथे आहे.
http://www.mumbaimirror.com/mumbai/cover-story/Drunk-corp-lawyers-Audi-r...
जे दोन पुरूष वारले त्यात एक टॅक्सी चालक व एका कुटुंबातील कर्ता पुरूष. तीन मुलांचा बाप. हे कुटुंब मुलाचा दहावीतील निकाल सेलिब्रेट करून घरी परत येत होते. राइट साइडनेच टॅक्सी चालली होती. दोन मुलींचे कॉलेज संपले व मुलगा दहावी झाला म्हणून कदाचित ते खुशीत असतील. तर प्राणच गेले ते ही हकनाक. व्हिक्टिम ऑफ ड्रंक ड्रायविंग!!! सांसरिक जबाबदारी थोडी हलकी होते आहे असे वाटण्यच्या क्षणीच जाणे.... सब उपरवाले की मर्जी. असे म्हणू शकतो पण मला इथे त्या महिला वाहन चालिकेचा राग आला आहे.
वकिली फर्म्स मध्ये अनेक पदे भूषवलेली, मोठ्या कंपनीत व्हीपी पदावर असलेली स्त्री, कामानंतर जेवना बरोबर सहा व्हिस्कीचे पेग पिते व कार राँग साइडने ११ कि,मी चालवते फ्री वेवर इतका जोरात अपघात होतो कि फायर ब्रिगेड बोलवायला लागावे. व तिला एवढे कळायला हवे होते कि ह्या अवस्थेत गाडी चालवू नये?! का अशी अपेक्षाच चुकीची आहे.
पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावरही ती झोपून गेली व दुसृया दिवशी स्टेटमेंट दिले. अपघाताच्या ठिकाणी पैसे देउन मिटवायचा प्रयत्न केला हे पटले नाही. हिला आता स्री आहे म्हणून कमी शिक्षा होईल, स्त्रियाना पण हवी तेवढी दारू प्यायचा हक्क आहे वगैरे चर्चा होतील . पण मग दारू प्यायल्यावर
कार न चालवायची बेसीक जबाबदारी व समजूतदार पणा पण हवा की नको. स्वातंत्र्य हवे पण जबाब्दारी घेणार नाही अशी मानसिकता बरोबर नाही. तिच्या वागणुकीचे बिल स्त्रिस्वातंत्र्या वर फाड्णे पटत नाही. हा फक्त एक अपघात समजावा असे अपील तिच्या आईने केले आहे. .....ऑलरेडी ती आम्हाला एक मनमिळाऊ कलीग म्हणूनच माहीत आहे वगिअरे छापून आले आहेच. ग
त्यातही तिची ऑडी असल्याने अपघात झाल्यावर एअर बॅग मुळे तिला कमी इजा झाली व टॅक्सीत तसे काही सोय नसल्याने पुढील जागी बसलेला चालक व पॅसेंजर तिथेच वारले. टॅक्सीत एअर बॅग का नसते. लॉजिकली असायला हव्यात नाही का?
सुरुवातीलाच तिने रॉग साइड घेतली. काही तरी होईल म्हणून एका चालकाने तिच्या मागे जायचा प्रयत्नही केला पण फारच जोरात गाडी चाल्वत असल्याने तो मागे पडला. व व्हायचे ते होउनच गेले.
गुन्हा सिद्ध झाल्यास!!! तिला १० वर्शाची सजा होउ शकते.
पण ते दोन जीव गेले... त्यांच्या कुटुंबियांची हानि भरून येणार नाही.
गाडी वळण सोडून चालली आहे
गाडी रस्ता सोडून भलत्याच वळणावर चालली आहे
गाडी रस्ता सोडून भलत्याच
गाडी रस्ता सोडून भलत्याच वळणावर चालली आहे >> सहमत
स्वयंचलित कारमध्ये पडणारे
गाडी रस्ता सोडून भलत्याच
गाडी रस्ता सोडून भलत्याच वळणावर चालली आहे >>
स्वयंचलित गाडी असेल तर भलतेच वळण टाळले जाईल.
“कायदे वाकवुन काहीही करू शकतो
“कायदे वाकवुन काहीही करू शकतो हा आहे. हा माज आणि डोक्यातली हवा ऑटोमेशनने कशी जाणार आहे? ” - बुल्स आय!!
मागे एकदा टेक्सास मधे रहाणार्या मित्राकडे भारतातून त्याचे नातेवाईक आले होते. तिकडे त्यांचा मोठा व्यवसाय आहे (म्हणजेच ते वेल-कनेक्टेड आहेत, सर्वसामान्यांपेक्षा वेगळे आहेत ई.). एकदा त्यांना पोलिसाने स्पीडिंगसाठी थांबवल्यावर, त्यांनी माझ्या मित्राला, ‘तू थांब, मी बघतो‘ सांगून गाडीतून उतरायचा प्रयत्न केला होता. त्या मित्राने वेळीच त्यांन आवरलं. पण अमितवने उल्लेख केला तशी ‘आपण कायदा हवा तसा वाकवू शकतो‘ ही वृत्ती घातक आहे. ह्या वृत्तीला प्रोत्साहन देणारी व्यवस्था घातक आहे.
ससून मधल्या गैर कारभाराची
ससून मधल्या गैर कारभाराची चौकशी करण्यासाठी जी समिती नेमली आहे तिच्या अध्यक्ष्यांवरच जुने भ्रष्टाचाराचे आरोप आहेत !
कायदे वाकवुन काहीही करू शकतो
कायदे वाकवुन काहीही करू शकतो हा आहे. हा माज आणि डोक्यातली हवा ऑटोमेशनने कशी जाणार आहे?-->
लोक त्यातल्या त्यात अपघात कमी होईल, जीव वाचतील असा विचार करतात अशा घटना झाल्या वर. असे बक्कळ अपघात घडत असतात. ही केस चिकार गाजत आहे पण इतर ठिकाणी तर कोणी वालीपण नसतो अन्यायग्रस्तांना व आजच्या सुग्रीवांवर {रीड कायदेरक्षक} तर कोणाचाच विश्वास उरला नसेल.
ब्लड सॅम्पल बदललेले उघडकीस
ब्लड सॅम्पल बदललेले उघडकीस येणे हा प्लॅन चा भाग आहे. आता न्यायालयात ते ग्राह्य धरणार नाही. सलमान याच बेस वर सुटला. आपल्याला वाटत पोलीस किती प्रामाणिक तपास करतायेत.
एकंदर मुलाने खूप लोकांना
एकंदर मुलाने खूप लोकांना कामाला लावलं.
थोडी गाडी नीट चालवली असती किंवा गप ड्रायव्हर शेजारी बसला असता किंवा नुसती झाडावर आपटली असती तर बरं झालं असतं.
एखादं पोरगं किती कपाळ करंटं
एखादं पोरगं किती कपाळ करंटं असतं बघा..
दारू पिऊन दोन जीवांचा बळी घेतला...
बाप जेल मध्ये गेला..
आजोबा ला जेल मध्ये घातलं..
ड्रायव्हर ला डांबून राहावं लागलं.. पोलिसी चौकशीचा बांबू बसला..आता त्यालाही कोर्ट कचेरी आणि पोलिसांचे खिशे गरम करावे लागतील केस चालू असे पर्यंत..किती वर्षे सांगता येत नाही..निर्दोष सुटला तर बरे..नाहीतर दंड किंवा जेल होऊ शकते..
दारू पिऊन पण ब्लड रिपोर्ट नॉर्मल दिला म्हणून दोन डॉक्टर घरी बसले..
पोलीस तपासात दिरंगाई केली म्हणून दोन PI दर्जाचे पोलीस अधिकारी निलंबित झाले..
ज्या लॅब ने रिपोर्ट नील दिले ते पण चौकशीच्या फेऱ्यात येतीलच..
हे सगळं झाल्यावर गेल्या पाच सहा दिवसात..४९ पब कारवाई होऊन ते बंद झाले..
वास्तविक हे पब अनधिकृत सुरू होते..
अनधिकृत चालू असल्याचा साक्षात्कार पोलिसांना आता झाला..
४९ पब बंद झाले म्हणजे त्यांचे हप्ते पण बंद झाले..
एकूणच पोलिसांचे जब्रा नुकसान झाले..आणि ज्या नेत्याला वर पैसे जायचे त्याचे पण हप्ते बंद झाले की एकरकमी मोठी तोडी होऊन अजून बक्कळ माल मिळेल नव्या परवानग्या घ्यायला सांगता येत नाही..
काही दुकान आणि बार यांचे लिकर लायसन्स सस्पेंड झाले..
आयचा घो..
अगरवाल पोऱ्या चा accident लय महागात पडला ...
गोर गरीब दारू पिणाऱ्या पासून ते पब , बार चालवणाऱ्या मालक , नोकर , वेटर , नाचणाऱ्या पोरी..
विशेष सेवा देणाऱ्या पोरी अश्या सर्वांवर पानशेत धरण फुटल्या सारखी संक्रांत आली..
एवढ्यात बिचारा पुणे पोलीस आयुक्त वाचवला दादाने..
नायतर त्याचा पण नंबर होता..
आयुक्त वाचवणे गरजेचे होते..नाहीतर काय इस्कोट झाला असता..
अगरवाल बाजूला राहिला असता आणि नको ते कांड बाहेर आले असते..
शेवटी बाराव्वी पास झाल्याची दारू पार्टी अशी इतक्या लोकांना महागात पडली..
आज धाव्वी पास झालेल्या पोरांच्या बापानी काळजी घ्या..
गाडीच्या चाव्या लपवून ठेवा..
उपकार होतील अख्ख्या पुण्यावर..
यातील उपरोध महत्वाचा..
हे किती योग्य आहे हे माहिती
हे किती योग्य आहे हे माहिती नाही पण ह्या सर्व प्रकरणात जज च नाव कुठेही येत नाही किंवा कोण टीकाही करत नाही. ३०० शब्दांचा निबंध लिहून जामीन देणारा जज खरच प्रामाणिक असेल का? का पोलिसांनीच कलमे चुकीची लावली आणि त्यामुळे जज चां नाईलाज झाला?
अनिरुद्ध, +११
अनिरुद्ध, +११
एवढ्यात बिचारा पुणे पोलीस आयुक्त वाचवला दादाने..
नायतर त्याचा पण नंबर होता..>>
मागच्या काही वर्षांपूर्वी एक आयुक्त जाताजाता गृहमंत्र्याचं नाव घेऊन गेला. आता या आयुक्तावर कारवाई करायला जावं तर हाही गप्प बसेलच असं काही सांगता येत नाही. एक माणूस गांगरल्यासारखा दिसतोय हे दमानियांचं निरीक्षण इंटरेस्टिंग आहे.
जज कुणी धनावडे म्हणून आहे
जज कुणी धनावडे म्हणून आहे बाल न्यायालयाचा.
त्याच्या पासूनच सुरु झाले हे सगळे. त्याला सोडायला नको!
Submitted by अ'निरु'द्ध on 29
Submitted by अ'निरु'द्ध on 29 May, 2024 - 09:12 ~~~~~ ही पोस्ट WA वर वाचली आत्ता.. सकाळी इथे वाचली होती.. viral झाली आहे. नाव नाही पण खाली.
कालच आली होती WA वरती.
कालच आली होती WA वरती.
https://www.loksatta.com/pune
https://www.loksatta.com/pune/pune-car-crash-panel-set-up-to-probe-condu...
त्या मुलाच्या आईने ससूनमधे
त्या मुलाच्या आईने ससूनमधे आपले blood sample मुलाच्या blood sample च्या ऐवजी test करायला दिले होते. आता मुलाने बाबाला आणि आजोबाला जेलमधे पाठवले आहे, आता आईवरही ती पाळी येणार असं दिसत आहे.
या कुटुंबाविषयी आता इतक्या गोष्टी उघडकीस आल्या आहेत की आता त्या मुलाची चीड न येता कीव कराविशी वाटते, अशा कुटुंबात वाढल्यावर त्याच्याकडून चांगल्या वर्तनाची अपेक्षा करणेच चूक आहे.
थोडी हायस्कूल बायोलॉजी शिकला
थोडी हायस्कूल बायोलॉजी शिकला असता तर किमान मेल सँपल दुसर्या मेल सॅंपलने रिप्लेस करता!
खूप जास्त disturbing आहे हा
खूप जास्त disturbing आहे हा सगळा अपघात . आणि आता ज्या गोष्टी समोर येतात त्याने खरंच खूप तिळपापड होतो आहे ..
त्या मुलाबद्दल तर कीव पण नाही वाटत.. अतिशय माजलेला , उन्मत्त कुटुंबातल्या मुलाकडून अजून काय अपेक्षा करणार, खरंय.
किती आणि काय level ला जाऊन त्याला वाचवायचा प्रयत्न चालू होता/ आहे हे बघून केवळ आश्चर्य वाटतंय..
हॉस्पिटल म्हणजे तर खेळच झालंय.. आणि आता तर politicians ची नावं सांगितली तर सक्तीची रजा दिली ... काय म्हणावं..
सगळी morales, ethics, लाज सोडून चालला आहे हे सगळ..
आता तर आई पण phone बंद करून गायब आहे कुठेतरी!
त्यातल्या त्यात दिलासा म्हणजे मुलगा रिमांड होम मध्ये आहे, वडील नी आजोबा जेल मध्ये.
हे एवढं सगळं सोशल मीडिया (दुधारी तलवार असली तरी) मुळे एवढ्या पुढे नेणं शक्य झालं आहे ..लोकांनी शूटिंग केलं, पोलिसात नेल, तिथे eyewitness तयार झाले योग्य माहिती द्यायला.. म्हणून जमलं तरी..अस वाटतंय
अश्विनी आणि अनिश ल लवकर न्याय मिळो..आणि कुठल्याही आई बाबा / कुटुंबियांवर अशी वेळ नको यायला ही ईश्वरचरणी प्रार्थना!
>>> मुलाच्या आईने ससूनमधे
>>> मुलाच्या आईने ससूनमधे आपले blood sample मुलाच्या blood sample च्या ऐवजी test करायला दिले होते
देवा!
इतकी पावलोपावली आडवळणं घेण्यापेक्षा कायदा नाहीच असं डिक्लेअर करणं किती सोपं नाही का?! दोन्ही बाजूंचा वेळ वाचेल!
त्या मुलाबरोबर गाडीत त्याचे
त्या मुलाबरोबर गाडीत त्याचे मित्र होते, त्यांच्या रक्ताचे नमुनेही घेण्यात आले होते. आता कळतंय की ते ही बदलले गेले होते.
त्यातला एकजण कोणी बड्या राजकीय नेत्याचा मुलगा होता म्हणे.
एकंदर ज्या महान गतीने सर्व
एकंदर ज्या महान गतीने सर्व चालू आहे त्याप्रकारे फार काही वाकडं होणार नाही कुटुंबाचं.आता महाबळेश्वर मध्ये सरकारी जमिनीवर हॉटेल बांधलं ते बाहेर येतंय.
हे सर्व धंदे गेली अनेक वर्षं बिनबोभाट चालू होते, वादळ निवल्यावर, लोकं विसरल्यावर परत चालू राहतील.
दरम्यान अजून 3 हिट अँड रन पिंपरी चिंचवड मनपा हद्दीत झाले.पण फार जास्त दखल घेतली गेली नाही.
मंत्र्याचे नाव घेताच डॉ काळे
१ मंत्र्याचे नाव घेताच डॉ काळे सक्तीच्या रजेवर
२ महिन्यातून अनेक दिवस रजेवर , दररोज राउंड नाही, निष्क्रियतेमुळे डॉ काळे सक्तीच्या रजेवर
दामिनी चित्रपट आठवला. जितके
दामिनी चित्रपट आठवला. जितके जास्त विरोधात पुरावे तेवढे जास्त घबाड हे समीकरण. मग तेवढ्या घबाडासाठी काय काय घडवून आणायचेय ते आणायचे.
मी काय म्हणते, कशाला
मी काय म्हणते, कशाला सगळ्यांना त्रास! काही गोष्टी अगदी अधिकृत करून टाका-
१. अल्पवयीन मुलांना कोणतेही वाहन हातात देणे.
२. रजिस्ट्रेशन नसूनही गाडी राजरोसपणे कशीही बेदरकारपणे चालवू देणे.
३. दुचाकीवरून बिनदिक्कत मोठ्या माणसांनाही ट्रिपल सीट बसायला परवानगी देणे.
४. लाल सिग्नलला अजिबात न थांबणे. किंबहुना, सिग्नल पाळल्यास दंड करणे.
५. नो एंट्रीतूनसुद्धा आडवीतिडवी गाडी घालणे.
६. चिंचोळ्या गल्लीतून वोल्वो गाडी वळवण्यासाठी मागचे सगळे ट्रॅफिक अडकवणे. कोणी आवाज उठवल्यास राडा करणे.
प्रज्ञा असा कसे मग मामा
प्रज्ञा असा कसे मग मामा लोकांची सोय कशी होणार?
भारतीय दंड विधान (भादंवि)
भारतीय दंड विधान (भादंवि) मधून बिल्डर्स, राजकारणी, गुंड्, हप्तेवसुली वाले, बाबा महाराज इत्यादींना (अधिकृतपणे) वगळावे.
बैलांची /एडक्यांची टक्कर
बैलांची /एडक्यांची टक्कर लावायची स्पर्धा असते तशी उन्मत्त गाड्या हाकणाऱ्यांच्या गाड्यांची गाडीवाना सहित वार्षिक टक्कर स्पर्धा भरवावी.
एवढं सगळं चालू असतानाही आज
एवढं सगळं चालू असतानाही आज पहाटे ३.३० ला पिं. चि मध्ये एका अल्पवयीन मुलाने आपल्या car ने पोलो गाडी ल धडक मारली. पोलो पार्क केलेली SoC बाहेर आणि हा येऊन धडकला.. बराच नुकसान झालंय आणि भांडण झाल्यावर सुद्धा भरपाई द्यायला नकार दिलाय.. पोलिसांनी पॉलिटिकल दबावात येऊन तक्रार ही नोंदवली नाही.. अशी बातमी आहे..
काय करावं .पालकांना खरच समजत नाही..की लक्ष नसतं.. की नजर चुकवून जातात मुलं... काही कळत नाही.. खूपच दुःखद चित्र आहे हे सगळ...
इत्यादींना (अधिकृतपणे) वगळावे. ~~~~~ खरंच.. तसच चालु आहे कारण ..ते official तरी होईल...
अजितदादाच नाव आलय आता या
अजितदादाच नाव आलय आता या प्रकरणात.
https://marathi.indiatimes.com/maharashtra/pune-news/pune-car-accident-d...
Pages