ड्रंक लेडी विथ ऑडी..

Submitted by अश्विनीमामी on 10 June, 2015 - 01:28

आपल्या विशाल मुंबई शहरात व उपनगरांत रोज अनेक अपघात घडतच असतात. पण आज सकाळीच ही बातमी वाचनात आली व मन हेलावून गेले. जान्हवी गडकर ह्या ३५ वर्षीय वकील महिलेने दारुच्या नशेत उलट दिशेने ऑडी गाडी चालवली. ताशी १२०किमी च्या आसपास स्पीड होता. इस्टर्न फ्रीवे हा दिवसा उजेडी पण भरधाव जाणार्‍या वाहनांमुळे जरा डेंजरसच आहे. पण हा अपघात व जीवित हानी टाळता आली असती.

मूळ बातमी इथे आहे.
http://www.mumbaimirror.com/mumbai/cover-story/Drunk-corp-lawyers-Audi-r...

जे दोन पुरूष वारले त्यात एक टॅक्सी चालक व एका कुटुंबातील कर्ता पुरूष. तीन मुलांचा बाप. हे कुटुंब मुलाचा दहावीतील निकाल सेलिब्रेट करून घरी परत येत होते. राइट साइडनेच टॅक्सी चालली होती. दोन मुलींचे कॉलेज संपले व मुलगा दहावी झाला म्हणून कदाचित ते खुशीत असतील. तर प्राणच गेले ते ही हकनाक. व्हिक्टिम ऑफ ड्रंक ड्रायविंग!!! सांसरिक जबाबदारी थोडी हलकी होते आहे असे वाटण्यच्या क्षणीच जाणे.... सब उपरवाले की मर्जी. असे म्हणू शकतो पण मला इथे त्या महिला वाहन चालिकेचा राग आला आहे.

वकिली फर्म्स मध्ये अनेक पदे भूषवलेली, मोठ्या कंपनीत व्हीपी पदावर असलेली स्त्री, कामानंतर जेवना बरोबर सहा व्हिस्कीचे पेग पिते व कार राँग साइडने ११ कि,मी चालवते फ्री वेवर इतका जोरात अपघात होतो कि फायर ब्रिगेड बोलवायला लागावे. व तिला एवढे कळायला हवे होते कि ह्या अवस्थेत गाडी चालवू नये?! का अशी अपेक्षाच चुकीची आहे.

पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावरही ती झोपून गेली व दुसृया दिवशी स्टेटमेंट दिले. अपघाताच्या ठिकाणी पैसे देउन मिटवायचा प्रयत्न केला हे पटले नाही. हिला आता स्री आहे म्हणून कमी शिक्षा होईल, स्त्रियाना पण हवी तेवढी दारू प्यायचा हक्क आहे वगैरे चर्चा होतील . पण मग दारू प्यायल्यावर
कार न चालवायची बेसीक जबाबदारी व समजूतदार पणा पण हवा की नको. स्वातंत्र्य हवे पण जबाब्दारी घेणार नाही अशी मानसिकता बरोबर नाही. तिच्या वागणुकीचे बिल स्त्रिस्वातंत्र्या वर फाड्णे पटत नाही. हा फक्त एक अपघात समजावा असे अपील तिच्या आईने केले आहे. .....ऑलरेडी ती आम्हाला एक मनमिळाऊ कलीग म्हणूनच माहीत आहे वगिअरे छापून आले आहेच. ग

त्यातही तिची ऑडी असल्याने अपघात झाल्यावर एअर बॅग मुळे तिला कमी इजा झाली व टॅक्सीत तसे काही सोय नसल्याने पुढील जागी बसलेला चालक व पॅसेंजर तिथेच वारले. टॅक्सीत एअर बॅग का नसते. लॉजिकली असायला हव्यात नाही का?

सुरुवातीलाच तिने रॉग साइड घेतली. काही तरी होईल म्हणून एका चालकाने तिच्या मागे जायचा प्रयत्नही केला पण फारच जोरात गाडी चाल्वत असल्याने तो मागे पडला. व व्हायचे ते होउनच गेले.
गुन्हा सिद्ध झाल्यास!!! तिला १० वर्शाची सजा होउ शकते.

पण ते दोन जीव गेले... त्यांच्या कुटुंबियांची हानि भरून येणार नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सलमान सुटला तसा हा ही सुटेल. पोलीस पब वर कारवाईची थुकपट्टी करतील, लोक सलमानचा गुन्हा विसरले तसा यालाही विसरतील.

रॅप साँगचा का ? >> होय , पण तो डीप फेक आहे असं पण आलंय.

१) तो मुलगा गाडी चालवत नव्हता
२) तो मुलगा तेंव्हा पुण्यात नव्हता.
३) त्याने दारू प्यालीच नव्हती.
४) पुरेसे पुरावे नाहीत.

कॉस्ट ऑफ मेनेजमेंट
अपघात झाला तेंव्हा : १०-२० लाख
दुसऱ्या दिवशी दुपार पर्यंत : ५० लाख
सोशल रेसिस्टन्स वाढल्यानंतर : १-५ करोड

( नेट वर्थ ६०० कोटी आहे असं वाचनात आलं. कदाचित १०-२० मध्ये कसं आटपायच म्हणून देखील हवा दिली असेल. )

जोपर्यंत पेइंग कपॅसिटी आहे तो पर्यंत सबकुछ चलता है ...

(बोनस : पब्ज आणि हॉटेल कडून सगळं रुटीन करण्यासाठी, मागायची पण गरज नाही )

५) अल्कोहोल टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि तोच गाडी चालवत होता याचे अनेक साक्षीदार आले तर: त्याला माहीतच नव्हते तो दारू पितोय. कुणीतरी प्रॅंक केले आणि त्याच्या कोक मध्ये मद्य मिसळून प्यायला दिले होते. यासाठी एक साक्षीदार आणि एक हो मी गंमत करायला हे प्रॅंक केले होते असे रडत सांगणारा एखादा मित्रही पुढे येईल.

टिंगरे म्हणाले की, पोलिस स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर संध्याकाळी पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रकरणाची माहिती घेतली. तोपर्यंत सगळं झालेलं होतं. या प्रकरणाला मी प्रभावित करण्यात प्रश्नच येत नाही, जर माझा तसा हेतू असता तर मी त्याला वाचवू शकलो असतो आणि त्याचं नावही बाहेर येऊ दिले नसतं, असंही टिंगरे म्हणाले.

https://marathi.indiatimes.com/maharashtra/pune-news/pune-porsche-accide...

पूर्वी ऑफिसमधून मध्यरात्री घरी परतताना काहीवेळा टल्ली झालेले चालक रस्त्यात पाहून एकदा केलेले स्वप्नरंजन:

१. लायसन्स नाहीये, कॅन्सल केलेय हे गाडीला कळायला हवे. चावी आणि फिंगर प्रिंट सेन्सरने व्हेरिफाय करूनच गाडी सुरू होईल. फिंगर प्रिंट व्हेरिफाय झाले की प्रत्येकवेळी या व्यक्तीकडे वैध परवाना आहे की नाही आणि तो सध्या रद्द केला नाहीयेना हे RTO सर्व्हर वरून व्हेरिफाय होईल.
२. गाडीचा वेग वाढला की २०, ४० हा स्पीड ओलांडण्यास परत फिंगर प्रिंट व्हेरिफिकेशन. (फिंगर प्रिंट सेन्सर स्टीअरिंग व्हीलवर सोयीस्कर ठिकाणी असावा) म्हणजे एकाने गाडी सुरू करून दिली आणि दुसरा बसून चालवतोय असे होणार नाही. रनिंग गाडीचा वेग ५ पेक्षा कमी झाल्यास परत फिंगर सेन्सर व्हेरिफाय केल्याशिवाय २० पेक्षा जास्त स्पीड घेणार नाही.
३. गाडीमध्ये हवा सतत मॉनिटर करणारे यंत्र. हे ट्रिकी आहे. गाडीच्या काचा बंद असतील तर हे काम करेलच, उघड्या असताना ड्रायव्हरच्या बाजूने एअर फ्लो नक्की कसा होतो हे पाहुन सेन्सर कुठे बसावावेत इत्यादि बघायला हवे. यात अल्कोहोल डिटेक्ट झाले तर गाडी वरील एक दिवा आणि सायरन वाजेल जो ड्रंक ड्रायव्हिंग दर्शवेल आणि गाडीचा वेग योग्य त्या सुरक्षित दराने कमी होत गाडी थांबेल.
यात बाजूची, मागची व्यक्ती मद्य घेऊन बसली असेल तेव्हा फॉल्स अलार्म येण्याची शक्यता असेल तेव्हा अशी यंत्रणा बनवणे चॅलेंजिंग असेल.
----
दुचाकी स्वारांना हेल्मेट बंधनकारक असले तर अल्कोहोल सेन्सर त्यात बसवता येईल. पण हेल्मेट योग्यरीतीने चालकाच्याच डोक्यावर घातले की नाही किंवा घालुन मध्येच काढुन तर टाकले नाही ना हे तपासुन, तपासत राहुन प्रणाली बनवणे फार जिकरीचे असेल.

चांगल्या कल्पना आहेत.सध्या इंजिनिअरिंग कॉलेजेस याच 2 गोष्टींवर भरपूर प्रोजेक्ट्स बनवतायत: जास्तीत जास्त व्हेईकल ऑटोमेशन आणि सस्टेनेबल प्रयोग(प्लास्टिक रियुज, इरिगेशन,खाऱ्या पाण्याचे गोडे पाणी इत्यादी.)
माझ्या डोक्यात हे एक नेहमी येतं.जास्तीत जास्त अपघात दुचाकीला मागून धडक बसून चालक पडून मोठ्या वाहनांच्या चाकाखाली जाऊन होतात.दुचाकीच्या मागे मोशन प्रॉक्झिमिटी आणि स्पीड सेन्सर लावून टक्कर ओळखली जाऊन दुचाकीभोवती एक मोठा संरक्षक फोम फुगा तयार व्हावा (याला हवा जायला यायला योग्य व्यवस्था.) आणि चालक थेट जमिनीवर पडून जखमी होऊ नये, थोडा रिएक्शन वेळ मिळावा.तसंच मोठ्या वाहनांच्या चाकाला ह्युमन/लिव्हिंग थिंग सेन्सर(हे फिटनेस बँड मध्ये ब्लड शुगर किंवा हार्ट बिट मोजतात त्याच्या समान तंत्राने शक्य आहे)
या योजनेत अर्थातच खूप त्रुटी आहेत.पण विचार करायला दिशा.

HOD च्या सांगण्यावरून त्या मुलाचे ब्लड सँपल डस्टबिन मध्ये फेकून दुसऱ्या कोणाचे तरी ब्लड त्या मुलाचे म्हणून दाखवण्यात आले.
या प्रकरणाच्या निमित्ताने सिस्टीम मध्ये प्रत्येक स्टेजला असलेला गैरव्यवहार आणि कीड समोर येते आहे.

बिल्डर एका वजनदार राजकीय नेत्याशी संबंधित आहे.
सैनिकवाडी (वडगावशेरी) इथे असलेली एक इलेक्ट्रिकल उपकरणे बनवणारी कंपनी फॅक्टरी सहीत याच नेत्याशी संबंधित एका वाहन उद्योगातील समूहाने विकत घेतली
काही वर्षे मग स्वतःच्या नावाने चालवली. मग त्या उद्योगाला जमीन रहिवासी योग्य करून मिळाली. तिथे मग या बिल्डरने नेत्रदीपक गृहनिर्माण प्रकल्प उभारला. त्याचे नामकरण कल्याणी नगर अॅनेक्स असे केले.
कल्याणी नगर मधून कॉर्पोरेशन च्या खर्चाने रस्ता बनला. या रस्त्यासाठी तीस वर्षे पेक्षा जास्त काळ मागणी करण्यात येत होती.
हा प्रकल्प या नेत्याचा आहे कसे बोलले जायचे.

नदीच्या पलिकडे ग्रीन झोन मधे याच नेत्याच्या नातवाचे पब आहे. इथे मोठ मोठे इव्हेंटस हैतात.
इथेच एक फॅशन शो याचि देही याचि डोळा पापणी न लवता पाहिला.

किडीने इतकं पोखरलेलं आहे की परत उभे रहाणे आपल्या सिस्टिमला शक्य नाही. राजकारणी, पोलिस, न्यायालये, न्याय -वैद्यक, पैसेवाले, मिडिया आणि सामान्य माणूसही त्यातलाच आहे. जात्यातले सुपात आले की रंग दिसू लागतात. बातम्या ही करमणूक झाली आहे. हे सगळं बघुन माझ्या मनात काय आलं? यावर एक चांगला सिनेमा/ वेबसिरीज बनू शकेल. दोन जीव गेले ते गेले बाराच्या भावात! विषण्ण करणारं आहे सगळंच.

मानव, चांगली कल्पना.
सतत हॉर्न्स ऐकून वैतागलेल्या माझं पण एक स्वप्नरंजन -
गाडीचा हॉर्न वाजवला की प्रत्येक वेळी अकाउंट मधून काही रक्कम वळती व्हायला हवी.

जात्यातले सुपात आले की रंग दिसू लागतात >>> exactly
आज जे कंठशोष करत आहेत त्यांच्या सोबत ही कीड आज नाही तर गेली तीस चाळीस वर्षे आहे. पवित्रे बदलले, जागा बदलल्या कि भूमिका बदलतात आणि यांना काहीही वाटत नाही. आज जे सत्तेत आहेत ते आज शांत आहेत. विरोधात असताना प्रकार झाला असता तर देश डोक्यावर घेतला असता. या सर्वांना किती सिरीयसली घ्यायचं हाच प्रश्न आहे.

मानव, कल्पना चांगली असली तरी धोके आणि पळवाटा बघता असलं ऑटोमेशन अजिबात असू नये या मताचा आहे.

लायसन्स व्हेरीफार करायला सर्वर कनेक्शन हवं. ते नसेल तर गाडी चालूच व्हायची नाही. हा लायसन्सचा डीबी (नाव, नंबर, जन्मतारीख, एक्सपायरी डेट) हा एकतर ओपन हवा किंवा त्याला व्हेरीफाय करणारी सुविधा सगळ्या गाड्यांत हवी. ती सगळीकडे आणणं अर्थात सोपं नाही. परत हे सगळं बायोमेट्रिक माहितीशी ताडून बघायचं. जितकी कॉम्प्लेक्सिटी वाटत जाते तितके बग्ज्स आणि पळवाटा वाढत जातात, व्हल्नरेबिलिञी वाढत जाते आणि पर्सनल स्पेस आक्रसत जाते. फिंगरप्रिंट हे सिंगल एन्ट्री ऑफ फेल्युअर बनतय भारतात.

ब्रेथलायझर मधले धोके तुम्ही लिहिलेच आहेत.
ब्रेथलायझर अवश्य असावा, पण ते चालकाला/ पॅसेंजराला वॉर्निंग देण्यापुरतंच असावं. की सध्या गाडीत मद्यपी बसलेला आहे, ड्रायव्हर मद्यपी आहे. दारू पिऊन गाडी चालवून इतके मृत्यू झाले. तुमचा पुढचा नंबर असेल. इ. इ. त्यावर तुम्ही अ‍ॅक्शन घ्या. गाडी त्वरित थांबवा.
त्याचा पोलिसांना तर बिलकुल (सहज तर अजिबातच नको.. ) अ‍ॅक्सेस नसावा. कायद्याला फारतर थोडाफार असावा.

प्रायव्हसीचा भंग होईल असे कुठलेही ऑटोमेशन अजिबात असू नये असे माझे स्पष्ट मत आहे.
लवकरात लवकर स्वयंचालित (self driving) गाड्या वापरात आल्या की बरेचसे अपघात कमी होतील, अशी आशा आहे. तसेही ९०% वेळ गाड्या पार्किंगमध्येच उभ्या असतात. माझे स्वप्न असे आहे की एका ऍपमधून मी गाडी बोलावणार. स्वयंचालित गाडी आपोआप माझ्या घरासमोर येऊन उभी राहणार, मी इच्छित स्थळी गेलो की ती गाडी टॅक्सीप्रमाणे दुसऱ्या प्रवाशाकडे जाणार. याचा अर्थ मला गाडी विकत घ्यायची गरजच नाही, इन्शुरन्स नको, मेंटेनन्सपण नको, ड्रायव्हर ठेवायची किंवा स्वतः चालवायची कटकट पण नको.

तुमची स्वप्नं ठीक आहेत. पण आपण युटोपियात जगत नाही.
तुम्ही डीयुआय करत नाही ना? तुम्ही टार्गेट ऑडियन्स नाही. राजरोस नियम मोडून बेदरकारपणे वागायचं एकदा ठरवलं आणि पैशाने सगळं होतं अशी सिस्टिम असली की त्यावर काही इलाज असेल असं वाटत नाही.
आता तुमच्या युटोपियात ही जी अ‍ॅप मधुन गाडी येणार आहे ती अग्रवाल बापजाद्यांनी मेंटेन केलेली किंवा न केलेली असेल. तिच्यात निकृष्ट पार्ट वापरलेली असतील, पेट्रोल वाचवायला भेसळ असेल, सेफ्टीचे कॉर्नर कट केलेले असतील, वॉर्निंग सेंसर डिसेबल केलेले असतील अशा अनेकानेक गोष्टी असतील. एकदा ठरवलं की नियमाप्रमाणे चालायचं नाही की काय करणार तुम्ही?

स्वयंचालित गाडी असेल तर 'डी यु आय'ची किंवा अपघाताची काळजीच नसेल. पुढील १० वर्षात स्वयंचालित गाड्या सर्रास दिसतील, अशी आशा (जवळपास खात्री) आहे.

100% ड्रायव्हरलेस गाडी(automation level 4 and 5) भारतातल्या रोड कंडिशन्स, वेगवेगळ्या प्रकारची रस्त्यावर असलेली वाहने,रस्त्याची प्रत,इंडिकेटर्स काही ठिकाणी असणे नसणे यामुळे अशक्य आहे.लेव्हल 1 आणि 2 बद्दल पण गाड्या विकणारे भारतात साशंक आहेत.
बहुधा कुठेतरी न्यूझीलंड वगैरे ला, जिथे लांबच्यालांब सुंदर रस्ते, अगदी तुरळक रहदारी आणि घरे अश्या जागी लेव्हल 5 चांगले चालू शकेल.लेव्हल 4 किंवा 5 च्या च्या उबर कार ने एका बाईला मारले.बाई सायकल ढकलत आडव्या चालल्या होत्या.त्यामुळे सॉफ्टवेअर ने बाईला सायकल, कार आणि अज्ञात वस्तू समजले.सॉफ्टवेअर ला बाई ह्युमन आणि आणि आपण ब्रेक दाबायला हवा कळेपर्यंत उशीर झाला होता.(ड्रायव्हर शेजारी बसून हुलू बघत होता.त्याला हे ऑटोमॅटिक वाहन असल्याने लक्ष न देण्याच्या सूचना होत्या.लक्ष द्यायला लागेल हे कळेपर्यंत उशीर झाला.कार च्या सॉफ्टवेअर सिस्टम ने बाईला माकड,सायकल,कार समजले.ह्युमन समजेपर्यंत ब्रेकिंग डिस्टन्स ओलांडले होते.)

एक्झॅक्टली!
सर्रासची व्याख्या काही शहरांत, त्या शहरातील काही भागांत, ते ही व्यापारी वापरासठी अशी आक्रसत जाते. क्न्झ्युमर मार्केट, सगळे रस्ते यावर न बोललेलंच बरं.
परत मुद्दा कायदे वाकवुन काहीही करू शकतो हा आहे. हा माज आणि डोक्यातली हवा ऑटोमेशनने कशी जाणार आहे? हा नाही दुसरा अपघात करतील, आणि ताठ मानेने पिढीजात करत रहातील. काय झालं ऑटोमेशनने नक्की?

From NHSTA site as of Today

One day, automated driving systems, which some refer to as automated vehicles, may be able to handle the whole task of driving when we don’t want to or can’t do it ourselves.

आवडो अथवा न आवडो, स्वयंचालित गाड्या सर्वसामान्य लोकांसाठी येणारच. प्रश्न आहे की कधी.

Pages