ड्रंक लेडी विथ ऑडी..

Submitted by अश्विनीमामी on 10 June, 2015 - 01:28

आपल्या विशाल मुंबई शहरात व उपनगरांत रोज अनेक अपघात घडतच असतात. पण आज सकाळीच ही बातमी वाचनात आली व मन हेलावून गेले. जान्हवी गडकर ह्या ३५ वर्षीय वकील महिलेने दारुच्या नशेत उलट दिशेने ऑडी गाडी चालवली. ताशी १२०किमी च्या आसपास स्पीड होता. इस्टर्न फ्रीवे हा दिवसा उजेडी पण भरधाव जाणार्‍या वाहनांमुळे जरा डेंजरसच आहे. पण हा अपघात व जीवित हानी टाळता आली असती.

मूळ बातमी इथे आहे.
http://www.mumbaimirror.com/mumbai/cover-story/Drunk-corp-lawyers-Audi-r...

जे दोन पुरूष वारले त्यात एक टॅक्सी चालक व एका कुटुंबातील कर्ता पुरूष. तीन मुलांचा बाप. हे कुटुंब मुलाचा दहावीतील निकाल सेलिब्रेट करून घरी परत येत होते. राइट साइडनेच टॅक्सी चालली होती. दोन मुलींचे कॉलेज संपले व मुलगा दहावी झाला म्हणून कदाचित ते खुशीत असतील. तर प्राणच गेले ते ही हकनाक. व्हिक्टिम ऑफ ड्रंक ड्रायविंग!!! सांसरिक जबाबदारी थोडी हलकी होते आहे असे वाटण्यच्या क्षणीच जाणे.... सब उपरवाले की मर्जी. असे म्हणू शकतो पण मला इथे त्या महिला वाहन चालिकेचा राग आला आहे.

वकिली फर्म्स मध्ये अनेक पदे भूषवलेली, मोठ्या कंपनीत व्हीपी पदावर असलेली स्त्री, कामानंतर जेवना बरोबर सहा व्हिस्कीचे पेग पिते व कार राँग साइडने ११ कि,मी चालवते फ्री वेवर इतका जोरात अपघात होतो कि फायर ब्रिगेड बोलवायला लागावे. व तिला एवढे कळायला हवे होते कि ह्या अवस्थेत गाडी चालवू नये?! का अशी अपेक्षाच चुकीची आहे.

पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावरही ती झोपून गेली व दुसृया दिवशी स्टेटमेंट दिले. अपघाताच्या ठिकाणी पैसे देउन मिटवायचा प्रयत्न केला हे पटले नाही. हिला आता स्री आहे म्हणून कमी शिक्षा होईल, स्त्रियाना पण हवी तेवढी दारू प्यायचा हक्क आहे वगैरे चर्चा होतील . पण मग दारू प्यायल्यावर
कार न चालवायची बेसीक जबाबदारी व समजूतदार पणा पण हवा की नको. स्वातंत्र्य हवे पण जबाब्दारी घेणार नाही अशी मानसिकता बरोबर नाही. तिच्या वागणुकीचे बिल स्त्रिस्वातंत्र्या वर फाड्णे पटत नाही. हा फक्त एक अपघात समजावा असे अपील तिच्या आईने केले आहे. .....ऑलरेडी ती आम्हाला एक मनमिळाऊ कलीग म्हणूनच माहीत आहे वगिअरे छापून आले आहेच. ग

त्यातही तिची ऑडी असल्याने अपघात झाल्यावर एअर बॅग मुळे तिला कमी इजा झाली व टॅक्सीत तसे काही सोय नसल्याने पुढील जागी बसलेला चालक व पॅसेंजर तिथेच वारले. टॅक्सीत एअर बॅग का नसते. लॉजिकली असायला हव्यात नाही का?

सुरुवातीलाच तिने रॉग साइड घेतली. काही तरी होईल म्हणून एका चालकाने तिच्या मागे जायचा प्रयत्नही केला पण फारच जोरात गाडी चाल्वत असल्याने तो मागे पडला. व व्हायचे ते होउनच गेले.
गुन्हा सिद्ध झाल्यास!!! तिला १० वर्शाची सजा होउ शकते.

पण ते दोन जीव गेले... त्यांच्या कुटुंबियांची हानि भरून येणार नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानव - नाशिक तसेच कुर्ला या दोन्ही अपघातात EV बस मुळे झालेला आहे. दोन्ही ठिकाणी बसेसची मालकी खासगी आहे. बेस्ट किंवा मनपा बसेसचा वापर कंत्राट / भाडेतत्वावर करत आहे ( wet lease) वापरल्या जात आहेत अशी परिस्थिती आहे?

"The bus involved in the accident is registered in the name of a company called EVEY Trans and was taken on a wet lease by the BEST. "

NDTV च्या बातमीत EVEY Trans चा उल्लेख आहे. EVEY Trans प्रसिद्ध अशा MEIL ची उपकंपनी आहे.
https://eveytrans.com

कुर्ला अपघातातला ड्रायव्हर इलेक्ट्रिक बस चालवायला नुकताच शिकला होता. क्लचऐवजी त्याने अ‍ॅक्सलरेटर दाबला अशी लोकसत्ताची बातमी आहे.

वडोदरा अपघात.
हा भयंकर चीड आणणारा आहे. लॉ स्टुडंटने सात लोकांना उडवले, त्यात एक महिला जागीच ठार झाली, इतर काही अपघातग्रस्त निपचित पडले आहेत. आणि हा कार मधुन उतरून धुंद नशेत "अनादर राउंड! अनादर राउंड! निकिता! अंकल! ओम नमः शिवाय!" असे जोरजोराने असंबद्ध ओरडतो आहे.
नंतर हा म्हणतो की रस्त्यात खड्डा होता तो चुकवताना याची कार एका स्कुटीला ब्रश खाली आणि एअर बॅग्ज उघडल्या आणि मला काही दिसले नाही. मी दारू, भांग, गांजा काहीही घेतले नव्हते.

याचे ब्लड सॅम्पल लगेच घेतले होते की नाही कळले नाही.

गाडी अनेकांना उडवतच आली होती Sad , वेगांतच होती असे बघ्यांचे म्हणणे आहे. अनेकांना उडविले तरी नशा उतरली नव्हती असे व्हिडिओ मधे दिसत आहे. एव्हढ्या नशेत असतांना गाडी का चालवायची?

एव्हढ्या नशेत असतांना गाडी का चालवायची?>>>
ते कळलं असतं तर त्याला नशा का म्हटलं असतं?>>>>>
नशेत असताना गाडीही चालवू नये, आणि देशही..... 😓

https://www.youtube.com/watch?v=VF41SkVj8nA
New details emerge in the Vadodara hit-and-run case. Accused Rakshit Chaurasiya, a law student, was caught by police last month for causing a drunken commotion. He was released with just an apology after being dragged to the station by a lawyer

गुजरात ड्राय स्टेट आहे बरं का.

आणि हा मीडियाला मुलाखती कसा देतो?

बापरे, हा नशेत तर वाटतोय.

गुजरात ड्राय स्टेट आहे बरं का. >>> हे बघून तरी डोंबलाची ड्राय स्टेट म्हणावसं वाटतंय. इझिली मिळत नसली तरी काही जणांना नक्की दारु मिळतेय.

Pages