ड्रंक लेडी विथ ऑडी..

Submitted by अश्विनीमामी on 10 June, 2015 - 01:28

आपल्या विशाल मुंबई शहरात व उपनगरांत रोज अनेक अपघात घडतच असतात. पण आज सकाळीच ही बातमी वाचनात आली व मन हेलावून गेले. जान्हवी गडकर ह्या ३५ वर्षीय वकील महिलेने दारुच्या नशेत उलट दिशेने ऑडी गाडी चालवली. ताशी १२०किमी च्या आसपास स्पीड होता. इस्टर्न फ्रीवे हा दिवसा उजेडी पण भरधाव जाणार्‍या वाहनांमुळे जरा डेंजरसच आहे. पण हा अपघात व जीवित हानी टाळता आली असती.

मूळ बातमी इथे आहे.
http://www.mumbaimirror.com/mumbai/cover-story/Drunk-corp-lawyers-Audi-r...

जे दोन पुरूष वारले त्यात एक टॅक्सी चालक व एका कुटुंबातील कर्ता पुरूष. तीन मुलांचा बाप. हे कुटुंब मुलाचा दहावीतील निकाल सेलिब्रेट करून घरी परत येत होते. राइट साइडनेच टॅक्सी चालली होती. दोन मुलींचे कॉलेज संपले व मुलगा दहावी झाला म्हणून कदाचित ते खुशीत असतील. तर प्राणच गेले ते ही हकनाक. व्हिक्टिम ऑफ ड्रंक ड्रायविंग!!! सांसरिक जबाबदारी थोडी हलकी होते आहे असे वाटण्यच्या क्षणीच जाणे.... सब उपरवाले की मर्जी. असे म्हणू शकतो पण मला इथे त्या महिला वाहन चालिकेचा राग आला आहे.

वकिली फर्म्स मध्ये अनेक पदे भूषवलेली, मोठ्या कंपनीत व्हीपी पदावर असलेली स्त्री, कामानंतर जेवना बरोबर सहा व्हिस्कीचे पेग पिते व कार राँग साइडने ११ कि,मी चालवते फ्री वेवर इतका जोरात अपघात होतो कि फायर ब्रिगेड बोलवायला लागावे. व तिला एवढे कळायला हवे होते कि ह्या अवस्थेत गाडी चालवू नये?! का अशी अपेक्षाच चुकीची आहे.

पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावरही ती झोपून गेली व दुसृया दिवशी स्टेटमेंट दिले. अपघाताच्या ठिकाणी पैसे देउन मिटवायचा प्रयत्न केला हे पटले नाही. हिला आता स्री आहे म्हणून कमी शिक्षा होईल, स्त्रियाना पण हवी तेवढी दारू प्यायचा हक्क आहे वगैरे चर्चा होतील . पण मग दारू प्यायल्यावर
कार न चालवायची बेसीक जबाबदारी व समजूतदार पणा पण हवा की नको. स्वातंत्र्य हवे पण जबाब्दारी घेणार नाही अशी मानसिकता बरोबर नाही. तिच्या वागणुकीचे बिल स्त्रिस्वातंत्र्या वर फाड्णे पटत नाही. हा फक्त एक अपघात समजावा असे अपील तिच्या आईने केले आहे. .....ऑलरेडी ती आम्हाला एक मनमिळाऊ कलीग म्हणूनच माहीत आहे वगिअरे छापून आले आहेच. ग

त्यातही तिची ऑडी असल्याने अपघात झाल्यावर एअर बॅग मुळे तिला कमी इजा झाली व टॅक्सीत तसे काही सोय नसल्याने पुढील जागी बसलेला चालक व पॅसेंजर तिथेच वारले. टॅक्सीत एअर बॅग का नसते. लॉजिकली असायला हव्यात नाही का?

सुरुवातीलाच तिने रॉग साइड घेतली. काही तरी होईल म्हणून एका चालकाने तिच्या मागे जायचा प्रयत्नही केला पण फारच जोरात गाडी चाल्वत असल्याने तो मागे पडला. व व्हायचे ते होउनच गेले.
गुन्हा सिद्ध झाल्यास!!! तिला १० वर्शाची सजा होउ शकते.

पण ते दोन जीव गेले... त्यांच्या कुटुंबियांची हानि भरून येणार नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खाली उतरल्यावर सगळं जवळ मिळायला पाहिजे ही आपलीच मानसिकता आहे. हॉकर्स झोन वगैरे आपल्या पचनी पडणाऱ्या कल्पना नाहीत. हे एक अनेक कंगोरे असलेलं दुष्ट चक्र आहे>>>>>

नव्या मुंबईत हॉकर्स झोन सोडुन इतरत्र सहसा कोणी बसत नाही. त्यामुळे फुटपाथ शिल्लक असतात चालायला. वाशी थोडेफार क्राऊडेड आहे.

मुंबईत आता जागाच शिल्लक नाहीय असले लाड करायला.

सिलिंन्क वरचा अपघात दुर्दैवी आहे. आपण कॅमेरात दिसतोय हे माहित असतानाही पळुन जायची तयारी व बापाची मदत करण्याची तयारी. Sad

सध्या काय चालू आहे समजतच नाही.
पुण्याचे नाव चळवळींचे प्रेरणास्थान म्हणून घेतले जाई. आता अपघात आणि हिट अ‍ॅण्ड रन चा आदर्श घालून देतं.

परवा रात्री वाकडला एका इसमाचे तीन तुकडे झाले अपघातात. माझी पुतणी याच भागात एका मल्टीनॅशनल कंपनीत आहे. गेल्या वेळी जिथे एका परिचिताचा अपघात झाला तिथेच. इथून आठवड्यात दोनदा तरी जाणे होतेच. भयानक स्पॉट आहे. तीनही लेन मधून ट्र्क्स चाललेले असतात. कार्स वाट काढत असतात. अशात अपघात होतो.

ही बातमी ऐकतोय नाही कि लगेच मुंबईतली घटना. मुंबईतून सुद्धा तीन चार घटना इतक्यात ऐकल्या. बीडला पण दोनच दिवसांपूर्वी धनिकाच्या मुलाने हिट अ‍ॅण्ड रन अपघात केला. लगेचच हॅरिस ब्रीज वर पोलिसाचाच हिट अ‍ॅण्ड रन मधे बळी गेल्याची बातमी आली. सोशल मीडीयावर तर इतक्या बातम्या येऊ लागल्यात कि बधीर झालो.

प्रश्न असा पडतोय कि अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे कि ते इतकेच होत होते , पण बातम्या वाढल्यात ?
पुतणीला टू व्हीलर बंद करून टाकली. मुलीला बस ने सुद्धा नको म्हणून कॉलेजजवळ भाड्याने फ्लॅट घेतला.
पालकांची अवस्था सर्वत्र अशीच आहे का ?

बातम्या येत नव्हत्या त्यात सुख होते असे म्हणावे का ?

खरंच.भीती वाढली आहे.रोजच्या बातम्या वाचून निराश व्हायला होतं.इथे मुंबई च्या अपघातात किमान त्या बाईंना बंपरवरून खाली उतरवून पळून गेला असता तरी बाई वाचली असती.पुरावा समूळ नष्ट होतो का माणूस संपवून?cctv, प्रत्यक्षदर्शी असतातच ना?
यातून कायदा नीट झाला तरच खरं.नाहीतर हळूहळू दुचाकी चालवणं बंद करावं लागेल.

माज पूर्वीही होताच फक्त गाड्या उडवणे परवडणार्‍यांची संख्या कमी होती आणि सीसीटीवी फुटेज तसेच नागरीकांनी काढलेले विडीओ असे काही नसल्याने अश्या घटनांना वाचा फुटणेही फारसे होत नव्हते.

कायदा हातात घेण्याच्या विरोधात आहे. पण वाडकरांनी ज्या पद्धतीने अपघाताचे वर्णन केले त्यावरून भावना समजल्या.
ते प्रसिद्ध कलाकार असल्याने त्यांचा आवाज ऐकला जाईल. पोलीसाचा आवाज ऐकला जाईल. बाकिच्यांचे काय ?
मागे इथे एका अपघाताचे वर्णन दिले होते. ते जुन्या सोसायटीच्या जवळच राहतात. अपघातानंतर त्यांच्या जातीचे लोक येऊ लागले. तर त्याची बहीण ओरडली कि "आमच्या दु:खात स्टंटबाजी सुचते का ?" नंतर जेव्हां पोलीस चौकी, कोर्ट या फेर्‍यात न्याय मिळेल कि नाही ही शंका येऊ लागली तसे त्यांना मदतीची गरज वाटली. या वेळी त्यांना कुणीच मदतीसाठी आले नाही.

इथे संघटना, पक्ष, जात, सेलेब्रिटी स्टेटस, प्रभावी व्यक्ती असे असेल तरच न्याय मिळेल असे चित्र दिसतेय. सामान्य माणसाने खरंच काय करावं ?

न्याय म्हणजे त्या दोषी व्यक्तीला तर जबर शिक्षा व्हावीच पण खरा न्याय एकून समाजात कायद्याची जरब बसणे हाच असेल. बाकी माणूस तर गेलाच आहे.
कायदा हातात न घेणे वगैरे लेव्हल प्लेईंग फील्डलाच ठीक. इथे वेळ गेल्याने ड्रग टेस्टची वेळ गेलीच असवी. आता आणखी थोड्या गोष्टी मॅनेज केल्या ही कसला कायदा नी कसचं काय! कायदा हातात न घेता ही पायदळी तुडवला जाईल.

भारतात धनदांडग्यांचा पैसे चारून काय वाट्टेल ते "मॅनेज" करता येते हा कॉन्फिडन्स वारंवार दिसून येतो. आणि हे फार भयंकर आहे!
इतक्यातच पुण्यातली केस झालेली आणि गाजलेली असून, पुन्हा तशीच केस होणे हे एक आणि तशी वेळ येताच बापाने पळून जाण्याचा सल्ला देणे आणि सर्व परस्पर मिटवण्याची तयारी करणे हे अवाक करणारे आहे. काहीच भिती वाटत नाही का यांना ?! Uhoh
कोण कोणाचा बेटा वगैरे कसलीही गय न करता अशा केसेस मधे लवकरात लवकर आरोपी अन त्यांच्या आई बापाला कडक शिक्षा झाल्या तरच तशा इतर माजुरड्यांना कदाचित जरब बसेल.

पण साधारण एकंदरीतच माजूर्डेपणा वाढत चाललाय. आजकालच्या
मुलांमध्ये भयंकर गुर्मी आहे...एका नावाजलेल्या युनिव्हर्सिटीत काम करते मी...१८ ते २३ वर्षाची मुल सतत आजूबाजूला असतात..त्यांचं वागणं , बोलण, teachers बद्दल वापरत असलेली भाषा सगळं च शॉकिंग आहे...९०% मुल मुली बडे बाप की aulad आहेत...एवढी फी भरून admission घेतलीये ना मग कॉलेज आमच्या मालकीचं असा आव असतो... Sufficient Attendance नाही म्हणून exam la बसू दिलं नाही की my dad will meet you असं म्हणून निघून जातात..मग dad नाहीतर mom येते सारवासारव करायला..
आई वडिलांच्या पैशावर उड्या मारायच्या..
सगळीकडे अस असेल अस नाही पण माझ्या युनिव्हर्सिटी मध्ये तर मी हे दररोज पाहतीये ...किसिका बाप मेरा कूछ नही बिगाड सकता..हा attitude ahe.

इथे संघटना, पक्ष, जात, सेलेब्रिटी स्टेटस, प्रभावी व्यक्ती असे असेल तरच न्याय मिळेल असे चित्र दिसतेय. सामान्य माणसाने खरंच काय करावं ?
Submitted by रघू आचार्य on 9 July, 2024 - 07:09
>>
अशांना मग न्याय मिळवुन द्यायला एकजुट होऊन समर्थ लोकांनी वा संघटनेनी न्याय मिळेपर्यंत मदत केली तरच काहीतरी होऊ शकेल. पण अशा इच्छाशक्तीचे असे लोक मिळणे अशक्य.

<< Sufficient Attendance नाही म्हणून exam la बसू दिलं नाही की my dad will meet you असं म्हणून निघून जातात..मग dad नाहीतर mom येते सारवासारव करायला. >>

सारवासारव करून मुलाला परीक्षेला बसू दिले जात असेल, तर मग इतर प्रकरणात 'पैशाचा माज' असे बोलणे म्हणजे दुटप्पीपणा झाला तो.

Exam ला नाहीच बसू देत हो... System च मुलाचं नाव डिफॉल्टर लिस्टला टाकते...exam eligibility list मध्ये नावचं येत नाही त्याच... माझ म्हणणं आहे की मुलांना 80% attendance चा सिरीयसनेसच कळत नाही..एवढी फी भरली ना आम्ही मग आम्हाला वाटेल तेवढेच लेक्चर्स आम्ही अटेंड करू हा attitude आहे.
प्रत्येक AY च्या सुरवातीला newcomers साठी orientation प्रोग्राम असतो..त्यात attendance cha criteria सांगितला की हमखास ' क्या बकवास कॉलेज हे यार.. इससे अच्छा तो हम दुसरा कॉलेज ले लेते ' , इतना पैसा क्या लेक्चर्स अटेंड करने के लिये दिया है क्या ' असे डायलॉग ऐकू येतात.

माझ्या युनिव्हर्सिटी मध्ये ड्रेस कोड आहे...गर्ल स्टुडंट्स ना crop top, ripped jeans ,tank का tang top , low neck kurtis घालणं allowed नाही..पण मुली बिनधास्त हे सगळ घालून फिरतात...एका मुलीचा ड्रेस फारच ऑकवर्ड होता म्हणून एका लेडी फॅकल्टी नी थांबवून समज दिली तर फाडकन रिप्लाय आला...'mam..my body..my choice...I have paid xxx bucks for this.'
काय बोलायचं आता...ॲक्शन घेतली त्या मुलीवर..पण हे अस आहे..
मागच्या आठवड्यात newcomers च orientation झालं..३ तासाचा प्रोग्राम होता फक्त. ..मुलांसाठी स्नॅक्स म्हणून व्हेज सँडविच, muffin आणि चहा कॉफी असा मेनू होता.. त्यातही मुलांचे शेरे...'बर्गर अँड कोल्ड कॉफी देते तो क्या जाता इनका...ये कौन खायेगा..इतना पैसा भरा हे वो ये xxxxx (युनिव्हर्सिटी founder च नाव) घर लेके गया क्या सा.....(इथे भ पासून सुरू होणारी शिवी)
सगळीच मुलं अशी आहेत अस नाही...पण मागे मी लिहिलं तस ९०% crowd असा आहे...बर त्यातही सगळीच मुलं management कोट्यातून ॲडमिशन घेऊन आली आहेत असही काही नाही..( त्यांचा तर अजून वेगळाच रुबाब असतो).....व्यवस्थित entrance exam आणि इंटरव्ह्यू पास होऊन admission घेतलेली आहेत..हुशार आहेत..पण माज भयंकर...

मला वाटते की सोशल मीडियावर आपण ज्या बेभानपणे व उन्मादाने व्यक्त होऊ शकतो ती बेभानता व उन्माद प्रत्यक्ष आयुष्यात राजरोसपणे आलेला आहे व हे सगळे त्याचे परिणाम आहेत. बहुधा, या सर्व घटनांमागे मानसशास्त्रीय कारण आहे जे भीषण आहे. फेसबुक, whats app यावर बेताल, बेलगाम प्रतिक्रिया देत देतच लोक थेट प्रत्यक्ष आयुष्यात येतात आणि तिथे वर्तन तसेच राहते. माहीत असते की सीसी टीव्ही आहे, आपण करतोय तो गुन्हा आहे, त्याला शिक्षा आहे, पण 'मगाचची' बेभानता उतरलेली नसते. होईल ते होईल, आत्ता मी टॉपला पाहिजे, एवढेच डोक्यात!

याला वयाचे वगैरे बंधन नाही, आजूबाजूला पोलीस असतील याची भीती नाही. भीती कसली, पोलिसांनाच उडवतायत.

यासाठी (बाबुरावगिरी - म्हणजे पारावर बसून 'असे व्हायला हवे, तसे व्हायला हवे' करायचीच झाली तर) गुन्हेगारासाठी असलेली सज्ञानतेची वयोमर्यादा बदलायला हवी आणि शिक्षेचे स्वरूप! तिथल्यातिथे हातपाय मोडून ठेवले की जनता जागेवर येईल.

नाहीतर मग आहेच दहा दहा वर्षे तारीख पे...

जी लोकं क्रिकेट सामन्याच्या विजया नंतर मरिन लाइन्स वर जमा झाली होती , ती अशा घटनासाठी एकत्र का येउ शकत नाहीत .

>>जी लोकं क्रिकेट सामन्याच्या विजया नंतर मरिन लाइन्स वर जमा झाली होती , ती अशा घटनासाठी एकत्र का येउ शकत नाहीत .>>
योग्य कारवायी होवून न्याय मिळणे हे रुटिन असायला हवे, त्यासाठी लोकांना संघटित होवून रत्यावर उतरायची वेळच यायला नको.

डेहराडुनला कार अपघातात सहा तरुण मेले. त्यातल्या तीन मुली. वय १९ ते २५. रात्री दीडची वेळ. त्या आधी अर्थात पार्टी. दुसर्‍या कारशी रेस केली असं लोक म्हणतात. पोलिस म्हणतात नाही.

त्या मुलांबद्दल आणि त्यांच्या पालकांसाठी सहानुभूती वाटलीच पाहिजे का? त्या मुलाने कार स्वतःच्या कमाईतून घेतली होती की आईबापांनी दिली होती? ट्विटरवर लोक म्हणताहेत, बाइकपेक्षा सेफ म्हणून आईबापांनी बाळाला कार दिली. बाळ आहे तर कारची चावी स्वतःच्या ताब्यात ठेवायला हवी आणि कुठे कशासाठी जातोय हे माहीत करून घेऊनच द्यायला हवी.

हे अगदीच असंबद्ध वाटू शकेल. इनहेरिटन्स टॅक्स गरजेचा आहे.

त्यातल्या एकाने नवी कार घेतली होती त्याची पार्टी होती. १७० किमी पर अवर जाणारी गाडी कंटेनर का ट्रकखाली घुसली. तो अपघात इतका भयानक होता की सनरुफमधून बघणाऱ्या दोघांचा लिटरली शिरच्छेद झाला. ट्विटरवर अपघातानंतरचे व्हिडीओ होते. सुदैवाने पाहिले नाहीत.
त्यांच्या आईवडलांची काय परिस्थिती असेल याचा विचारही करवत नाही. आई वडील काय आणि किती शिकवणार मुलांना? चांगल्या अफ्लुअंट घरातल्या सुशिक्षीत मुलांना ड्रंक ड्रायव्हिंगचे धोके समजत नसतील तर कोण काय करू शकते?

काय!!! सनरुफ मधुन डोकी वर काढून १७० च्या वेगात बाहेर बघतात! बातमीत अवयव रस्त्यावर पडले वाचलं, आणि अवयव असे धडावेगळे व्हायला कसा अपघात असेल काही समजत न्हवतं. आता समजलं. सुन्न करणारे आहे. आपपल्या मुलांशी बोलून हे पचतील तेवढे पण ग्रेव तपशील पोहोचवा. मी पण बोलेन.
भरत, स्वकष्टार्जित का वडिलोपार्जित याने काय फरक पडला असता समजलं नाही. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट! नशिब कोलॅटरल डॅमेज मध्ये कोणाच्या जिवावर बेतलं नाही.

माझं मत असं आहे की मुलं अशी बेजबाबदार वागतात याला बऱ्याच अंशी आणि बऱ्याच वेळा आईवडील/पालकांकडून होणारे संस्कार कारणीभूत ठरतात. संस्कार हा शब्द व्यापक अर्थाने घ्यावा. चांगलं/योग्य काय आणि वाईट/अयोग्य काय हे सातत्याने ( consistently) आपल्या वागण्या-बोलण्यातून मुलांना दिसलं तर त्याचा परिणाम मुलांवर नक्कीच होतो!
कालच रस्त्यावर एका मुलाला, ज्याचे पायही नीट खाली पोचत नव्हते, वेगात दुचाकी चालवताना बघितलं. हेल्मेट वगैरे बोलायचंच नाही. अक्षरशः एका क्षणात होत्याचं नव्हतं होऊ शकतं. अशा मुलांच्या आईवडिलांना सरळ तुरुंगात टाकलं पाहिजे. तुम्ही तुमच्या मुलाचं आणि रस्त्यावरच्या इतरांचं आयुष्य धोक्यात टाकताय. (तसा कायदाही बहुतेक आता आहे, पण त्याची अंमलबजावणी कडकपणे व्हायला पाहिजे. )
१७० च्या वेगात सनरूफमधून बाहेर डोकी काढणं हा मूर्खपणा आहे.

बाप रे! Sad

>>> भरत, स्वकष्टार्जित का वडिलोपार्जित याने काय फरक पडला असता समजलं नाही
स्वकष्टार्जित असलं की घ्यायची ऐपत येईपर्यंत वाढलेल्या वय आणि अनुभवातून काही शहाणपण आलेलं असण्याची शक्यता जास्त.

डेहराडुन अपघातातल्या मुलांबद्दल सहानुभुतीही वाटत नाही Sad हातात फुकटचा पैसा आला की सारासारविवेक बुद्धी संपते. पालकांबद्दल काय बोलणार? मुलांना आवरणे त्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले आहे. जसे पालक, तशीच मुले.

आपपल्या मुलांशी बोलून हे पचतील तेवढे पण ग्रेव तपशील पोहोचवा. मी पण बोलेन.>>>

खरं आहे. मुलांना काही गोष्टींचे भयानक परीणाम दाखवले पाहिजेत. त्यातून ती काय ग्रास्प करतील ते त्यांच्याशी.

बाकी सनरुफमधून आपल्या लाडक्यांना बाहेर पहायला देणे रादर त्यासाठी सनरुफवाली गाडी घेणे हा काही नवश्रीमंतांचा शौक आहे. मुळात भारतासारख्या उष्णकटीबंधीय देशात सनरुफची गरज मला समजत नाही. मूंबईच्या ट्रॅफीकमध्येही हा आचरटपणा चालतो. सनरुफमधून बाहेर बघताना नुसता ब्रेक मारायला लागला तरी मान किंवा मणक्याला इजा होऊ शकते.

मुळात भारतासारख्या उष्णकटीबंधीय देशात सनरुफची गरज मला समजत नाही. मूंबईच्या ट्रॅफीकमध्येही हा आचरटपणा चालतो. सनरुफमधून बाहेर बघताना नुसता ब्रेक मारायला लागला तरी मान किंवा मणक्याला इजा होऊ शकते>>>>>

सहमत. आंबोली घाटात दर चार गाड्यांमागे एक सनरुफ गाडी असते आणि लहान मुले, मोठे बाप्ये/बाया डोके बाहेर काढुन मजा बघत असतात. घाटवळणाच्या रस्त्यावर आपण किती मोठी रिस्क घेतोय हे त्यांना कळत नाही.

सनरुफ मधुन डोकं बाहेर काढतात? आणि हे इतकं सर्रास करतात?>>>

हो. शहरातले मला माहित नाही पण आमच्या गावात येणारे पर्यटक, त्यांची मुले सनरुफच्या बाहेर डोके काढुन उभी असतात. सनरुफ हे त्यासाठीच बनवले आहे हा भारतियांचा समज आहे हे ज्ञान मला गावी आल्यावर झाले. Happy

बहुतेक तसं अपेक्षित >>>

नोप, सनरुफ त्यासाठी नाहीय. भारतात सनरुफचा उपयोग शुन्य. पण लोकांना त्याचे काय…

तसं नाही अपेक्षित. सनरुफ फक्त बाहेर जाताना ढग आणि वरची झाडं बघायची हुक्की आली तर गाडी न थांबवता वर बघता यावं, खिडक्या न उघडता वारा हवा असेल, कनवर्टिबल परवडत नसताना केस उडवुन हवे असतील, थोडक्यात गाडी छान दिसायचं फीचर आहे. उपयुक्तता त्यात काही फार नाही. बुड कायम सीटवर ठेवणे अपेक्षित आहे.

Pages