Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58
आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लापता लेडीजचा ट्रेलर आवडला
लापता लेडीजचा ट्रेलर आवडला होता. ओटीटीवर बघितलात की थिएटरमध्ये अँकी?
लापता लेडीज माझ्या मैत्रीणीने
लापता लेडीज माझ्या मैत्रीणीने theatre ला बघितला . छानच आहे म्हणाली . मला पण बघायचाय
ही पोस्टही आवडली माझेमन.
ही पोस्टही आवडली माझेमन.
ॲन्की, छान पोस्ट.
पुलंचे भाषण ऐकल्याचे आठवत
पुलंचे भाषण ऐकल्याचे आठवत नाही. पण त्यांचा लेख वाचलेला आहे. तो छान होता. गणगोत किंवा गुण गाईन आवडी मधे होता.
ओटीटीवर बघितलात की थिएटरमध्ये
ओटीटीवर बघितलात की थिएटरमध्ये अँकी?
>>
नेटफ्लिक्स ला येईल काही महिन्यांनी.
सध्या थिएटर ला आहे (खूप शो नाही आहेत, पण चौथ्या आठवड्यात @७५% सीट भरलेल्या होत्या)
मी PVR वेगा सिटी ला पाहिला, संध्याकाळी ७:१५ चा शो आहे.
propaganda movie?
propaganda movie?
>>
बिल्कुल नहीं बिल्कुल नहीं
सावरकरांवर सिनेमा बनवताना ते
सावरकरांवर सिनेमा बनवताना ते गांधींपेक्षा थोर होते असे दाखवण्याचा अट्टाहास का करतात निर्माते? त्यांचे जीवन पुरेसे नाट्यमय आहेच की.
>> विजय कुलकर्णींशी सहमत. (थोडंसं अनपेक्षितच आहे, पण आपली सहमती/असहमती व्यक्तींशी नसून मुद्द्यांशी असते) .
अशा प्रकारे विरुद्ध विचारांच्या पात्रांना कॅरिकेचर, बनवणे, मुद्दाम तुलना दाखवून इतरांना कमी दाखवणे ह्याने सिनेमा चीप होतो. बहुतेक टाळ्या-शिट्ट्यांची काही कमर्शिअल गणिते असावीत. पण खडे बाजूला सारून चित्रपट पाहण्याची इच्छा मात्र आहे.
चरित्रनायकाचे दोष दिग्दर्शन
चरित्रनायकाचे दोष दिग्दर्शन करणाऱ्या सिनेमाला प्रेक्षक म्हणून कोण येणार हा पण कळीचा मुद्दा आहे. शिवाय अनुयायांकडून विरोध होण्याची भीती असते. >>>
बहुतेक टाळ्या-शिट्ट्यांची काही कमर्शिअल गणिते असावीत >>>
असेच काहीतरी असावे. अगदी न्युआन्स्ड चर्चा दाखवली तर पब्लिक डुलक्या मारेल बहुधा. आणि टीआरपी करता/कमर्शियल गणिता करता एक बाजू वरचढ दाखवावीच लागत असेल. नाहीतर त्यांचे भक्तही येणार नाहीत, आणि विरोधक तर आधीच विरोधात आहेत.
पण पटकथा व दिग्दर्शनाचे कौशल्य त्यातच आहे. दोन विरोधी विचारधारा दाखवणे बास आहे. यांनी त्यांना निरूत्तर केले व ते पळून गेले असे दाखवायची गरज नाही. (त्या मराठी पिक्चर मधे तसे होते. या पिक्चर मधले माहीत नाही). अहिंसेची विचारधारा इतकी कमजोर असती तर पुढे तीस वर्षे टिकली नसती.
सावरकर सिनेमा पाहिला.
सावरकर सिनेमा पाहिला. सगळ्यात जास्त काय जाणवलं असेल तर एका ध्येयवादी व्यक्तिमत्त्वाची विलक्षण विलपॉवर. अंदमानातले सर्व प्रसंग अंगावर येतात. इतक्या पराकोटीच्या हालअपेष्टा भोगूनही, प्रतिकूल परिस्थितीतही मनानं खचून न जाता पुढे वाटचाल करत राहणे यासाठी किती प्रखर मानसिक बळ असायला हवं. ध्येयापोटी पूर्ण कुटुंबाची फरफट होते पण ध्येयावरची निष्ठा ढळत नाही. सावरकरांचं रॅशनल असणं, त्यांची हिंदुत्वाची व्याख्या, सामाजिक समानतेसाठीची धडपड योग्य रितीने दाखवली आहे. गांधी आणि सावरकर यांचे विचार जुळत नसले तरीही एकमेकांबद्दलचा आदर लक्षात येतो. दोघेही आपापल्या विचारांशी प्रामाणिक होते हे दिसतं. सावरकरांवरचा सिनेमा असल्यानं त्यांच्यावर फोकस आहे इतकंच. उत्तुंग व्यक्तिमत्त्व!
तीन तासांचा सिनेमा असूनही अर्धवट वाटला कारण त्यांचं प्रचंड लिखाण आणि विचार यांना पुरेसा न्याय मिळाला नाहीये. घटना आणि पात्रं फार तुकड्यातुकड्यात येतात पण सिनेमाच्या इतक्या छोट्या अवधीत हे होणं अपरिहार्य आहे. खरंतर एक मालिका निघायला हवी.
रच्याकने, या सिनेमामुळे भिकाजी कामांबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली. यांचे कार्य फारसे माहित नाही.
PVR वेगा सिटी मग जाऊ दे. फारच
PVR वेगा सिटी >>मग जाऊ दे. फारच लांब आहे. अमलताशचा पण बहुतेक याच थिएटरला रात्री दहा वीसचा शो होता. त्यामुळे अशक्यच होतं.
पुलंचं सावरकरांवरचं हे भाषण पूर्वी ऐकलं होतं. आज परत थोडं ऐकलं. उरलेलं उद्या ऐकते. याच कार्यक्रमातलं अटलबिहारींचं भाषणही मागे ऐकलं होतं.
(अति अवांतर- पुलं जेव्हा 'गुण गाईन आवडी' या भूमिकेत शिरतात तेव्हा त्यांच्या शब्दांना वेगळी झळाळी येते. नरहर कुरुंदकरांवरच्या गौरवग्रंथाच्या (गोदातटीचे कैलासलेणे) प्रकाशनाच्या वेळचं भाषणही असंच सुंदर आहे. )
propaganda movie? >> बिल्कुल
propaganda movie? >> बिल्कुल नहीं बिल्कुल नहीं
Submitted by अँकी नं.१ on 26 March, 2024 - 23:28
>>>
धन्यवाद, मी propaganda चित्रपट बघत नाही, फार पूर्वी "शौर्य" नावाचा propaganda चित्रपट बघितला होता. तेव्हाच या सगळ्यांची कीव वाटली होती त्यानंतर हे असले चित्रपट बघणे बंद केले. काश्मीर फाईल्स तर केवढा गाजावाजा (मुद्दाम) केला होता, तो ही बघायचा टळला. चित्रपटगृहात शेवटचा कोणता चित्रपट बघितला आता हे सुद्धा आठवत नाहीये. पण इथे चित्रपट रसिक भरपूर आहेत आणि आवर्जून चित्रपट गृहात चित्रपट बघणारे सुद्धा बरेच आहेत याचा आनंद वाटतो.
बाकी निखळ मनोरंजन करणारे चित्रपट असतील आणि वेळ मिळाला तर बघतो.
Dune -2 बघितला Imax मधे. मस्त
Dune -2 बघितला Imax मधे. मस्त आहे. जरा वेळच झाला बघायला पण लकीली शो होता.
खर तर सावरकर बघायचा विचार होता. पण कोणालाच इंटरेस्ट नव्हता बरोबर यायला. OTT वर बघेन आता.
शौर्य >>>> ‘शौर्य’ मला चांगला
शौर्य >>>> ‘शौर्य’ मला चांगला वाटला होता. मी ओटीटीवर पाहिलाय. जॅक निकल्सन, टॉम क्रुझ व डेमी मुरच्या ‘अ फ्यू गुड मेन’वर आधारीत आहे. आणि भारतिय पार्श्वभुमी चांगली घेतली आहे.
सावरकर सिनेमाबद्दल प्रत्यक्ष
सावरकर सिनेमाबद्दल प्रत्यक्ष बघून आल्यानंतर लिहिलेल्या सगळया पोस्ट आवडल्या. नाहीतर सध्या सगळीकडे सिनेमा बाजूला राहून, एकतर प्रो किंवा अँटी सावरकर अशाच पोस्ट्स दिसताहेत.
शौर्य>> अजिबात propaganda
शौर्य>> अजिबात propaganda नव्हता. मला वाटते की काही प्रसंग वेगळे काढून त्याला propaganda सारखे पसरवले गेले.
Dune -2 बघितला Imax मधे>> आम्ही तिकीटे मिळत नव्हती म्हणून एक आठवडा थांबलो पण Imax मध्येच पाहिला. चित्र आणि आवाज एकदम भारी येतो. बहुतेक त्याचे चित्रीकरणही Imax कॅमेरा ने झालेले आहे त्यामुळे पूर्ण फ्रेमचा अनुभव घ्यायचा असेल त्याच स्क्रीन वर पहावा लागेल.
अजिबात propaganda नव्हता. मला
अजिबात propaganda नव्हता. मला वाटते की काही प्रसंग वेगळे काढून त्याला propaganda सारखे पसरवले गेले.
>>>>>
अगदी अगदी. दिग्दर्शकाने दाखवलंय काय आणि मीम्स काय पसरली आहेत हे बघितलं तर दिग्दर्शक कपाळावर हात मारेल.
‘सावरकर’ सिनेमा फार मस्त
‘सावरकर’ सिनेमा फार मस्त बनवलाय. प्रखर अगदी. हुडा ने जी कामगिरी केलीये त्याबद्दल त्याला नमस्कार.
कुठेही सावरकरांना गोड, साधे, प्रेमळ, मोठाले शब्द वापरुन तत्वद्यानी, नाट्यमय संवाद वगैरे दिलेत असे काही नाही.. अगदी क्वचित तसे संवाद आहेत. ते जसे प्रखर होते, तसेच दाखवलेत व संवाद पण तसेच दिलेत, त्यांना फक्त स्वातंत्र हा एकच शब्द दिसत होता हे लख्ख दिसत रहातं पुर्ण सिनेमाभर.
वर ‘महात्मा गांधींची चेष्टा केली का’ असे विचारलेले वाचले. तसे काही नाहीये. ‘अंदमानात १० वर्षांनी भेटायला गेलेला भाऊ त्यांना ‘गांधीजी सावरकरांना मुक्त करायला पत्र लिहिणार आहेत असे सांगतो तेव्हा सावरकर आश्चर्याने ‘गांधी इतना बडा हो गया?‘ हा प्रश्न विचारतात. तितकेच आहे. त्यांचे आयुष्य अंदमानात जाते त्यामुळे १० वर्षात झालेल्या घडामोडी माहिती नसतात. आणि समकालीन व्यक्तिमत्वं ती दोन्ही.
अंदमानच्या आयुष्यावर खूप वेळ दिलाय सिनेमात जे हवंच होतं आणि ते इतकं परिणामकारक झालंय की मी आ वासुन फक्त पहात होते. काय यातना सहन केल्यात त्या सर्वांनी.
प्रत्येक स्वातंत्र्य नेत्याच्या लढ्याची आपापली पद्धत होती. आपल्याला बोलायला सोपं असतं, की हिंसा का केली, अहिंसा का केली वगैरे,. पण त्यांनी त्यावेळी जे शक्य होते ते केले. ते होते म्हणुन, १००-२०० वर्ष भारताच्या नसानसात चिकटलेले ब्रिटिश परत गेले नाहीतर अजुनही ते भारतावर राज्य करत असते व तसे असते तर आपल्याला जगात स्वतःचा देशच नसता. आपली ओळखच नसती. या सर्व सैनिकांचे कोटीकोटी आभार. आपली लायकी नाही कोणालाच नावे ठेवण्याची.
झी चित्र गौरव पाहिलं काही
झी चित्र गौरव पाहिलं काही दिवसांपूर्वी त्यात बापल्योक नावाच्या चित्रपटाला भरपूर बक्षीसं मिळाली. या चित्रपटाचं मी नाव पण ऐकलं नव्हतं त्याआधी. मला प्राईम वर दिसला आज आणि उत्सुकतेपोटी पाहून टाकला. काय सुरेख सिनेमा आहे. खूप सुंदर. सगळं सगळं एकदम खरंखुरं आणि अस्सल. बापलेकाच्या नात्यातली विण खूप मस्त दाखवली. शशांक शेंडे बद्दल काय बोलावं, नुसत्या डोळ्यातून अभिनय करतो तो माणूस, पण जो नवीन मुलगा आहे त्याचा पण अभिनय मस्त. खूप दिवसांनी इतका तरल, भावस्पर्शी तरीही हलकाफुलका सिनेमा पाहिला. माझ्याकडून यासाठी जोरदार रेको मंडळी.
हो मागच्या पानांवर मी लिहिलं
हो मागच्या पानांवर मी लिहिलं होतं या मुव्हीबद्दल!
फार सुंदर आहे! परत बघावासा आहे.
प्रत्येकाला कोपर्यातली सीट
प्रत्येकाला कोपर्यातली सीट हवी असल्याने चित्रपट चालत नाही ही शक्यता कधीच कशी विचारात घेतली नाही ?
कोपर्यातल्या सीटसाठी निर्मात्याकडे अर्ज वगैरे करायचा असतो का ?
चुडैल के भूत के पीछे शैतान का भूत हा सिनेमा आला कि करीन अर्ज.
द फ्रंट पेज - जुनाच पण फुल
द फ्रंट पेज - जुनाच पण फुल धमाल पिक्चर. दोन दिवसांत नेटफ्लिक्सवरून जाणार आहे.
'हिज गर्ल फ्रायडे' याच थीमवर आहे असं कळलं. आत्ता बघतोय.
सावरकर-काल पाहिला.
सावरकर-काल पाहिला.
रणदीप हुडा ने 100% पेक्षा जास्त मेहनत केली आहे.किती आजकाल चे हिरो त्यांचं ऑन स्क्रीन पात्र म्हातारं झाल्यावर एम पॅटर्न बाल्डनेस दाखवतात?फार फार तर केसात बरेच चंदेरी पट्टे दाखवतात, बाकी त्वचा तरुण.हा एक अगदी छोटा भाग झाला.त्याने केलेला वेट लॉस तर आपण पाहिलाच असेल बातम्यांत.
दोन गोष्टी खटकल्या आणि नीट करता आल्या असत्या.गांधी पात्राचे विचार जरी तत्वतः पटले नाहीत तरी तत्कालीन गांधी सावरकरांपेक्षा वयाने थोडे मोठे होते.ऑन स्क्रीन आदर बोलण्यात दाखवायला हवा होता.पहिली ब्रिटन मधली भेट अतिशय उद्धट वाटली.
काला पानी वर बराच वेळ घालवला आहे.अर्थातच हुडा ने चित्रपट माझी जन्मठेप वाचून बनवला असेल तर हा भाग जास्त असणं साहजिक आहे.पण त्यामुळे नंतरचे मुद्दे, डावपेच, सुभाषचंद्र बोस भेट, अखंड भारत कल्पना,भारतभूमी-हिंद भूमी वर प्रेमाने राहणारा कोणत्याही धर्माचा माणूस हिंदू म्हणता येईल, दलित मंदिर प्रवेश हे मुद्दे अजून थोडे डिटेल मध्ये मांडता आले असते असं वाटलं.एकंदर माहितीपूर्ण कंटेंट इतका सांगायचा होता की शेवटी शेवटी जरा घाईत गुंडाळलेले वाटले.
ऑल धिस सेड-एकदातरी बघावा असा चित्रपट आहे.
बापल्योक - एक अतिशय सहज आणि
बापल्योक - एक अतिशय सहज आणि सुंदर चित्रपट. अंजली_१२ आणि सान्वी, रेकोबद्दल धन्यवाद.
सहसा तेढ असलेलं एक नातं उमलत जाताना बघणं एक सुंदर अनुभव होता.
मर्डर मुबारक बघितला. चांगला
मर्डर मुबारक बघितला. चांगला आहे. अमितव मला बहुदा बॅन करेल ह्या चर्चेतून कारण मला ऑल्टरनेट थियरीज सुचत नाहीत.
ज्यांना सिनेमाकडून खूप अपेक्षा आहेत त्यांचं मत कदाचिfunction at() {
[native code]
}अ वेगळं असू शकेल.
माझा एकमेव आक्षेप म्हणजे, ‘फ’काराने सुरू होणार्या शब्दांचा वापर मर्यादित ठेवला तर चालू शकेल. आनंद, दु:ख, आश्चर्य, नैराश्य अश्या सगळ्याच भावनांना एकाच प्रकारचा चेहरा ठेवणारे पूर्वसुरीचे भारत भुषण वगैरे अॅक्टर्स(!) होते त्याच धर्तीवर मला हे प्रत्येक रिअॅक्शन ** ह्या शब्दात व्यक्त करणारे संवादलेखक वाटतात. इतकं शब्ददारिद्र्य!!
माझा एकमेव आक्षेप म्हणजे, ‘फ
माझा एकमेव आक्षेप म्हणजे, ‘फ’काराने सुरू होणार्या शब्दांचा वापर मर्यादित ठेवला तर चालू शकेल. >> चक्क फेफ हे म्हणत आहेत!
>>>>>>>>>>चक्क फेफ हे म्हणत
>>>>>>>>>>चक्क फेफ हे म्हणत आहेत!
(No subject)
‘फ’काराने सुरू होणार्या
‘फ’काराने सुरू होणार्या शब्दांचा वापर >>> कोंबडी कक्क कक्क कक्क कक्क आवाज करत फिरते तसे काही चित्रपट / मालिकातले संवाद असतात.
फकारचे उदात्तीकरण करणारा
फकारचे उदात्तीकरण करणारा चित्रपट आहे ना कोणता, माबोवरच त्याबद्दल वाचल्याचे आठवते.
ते सगळं ठीक फक्त मराठी
ते सगळं ठीक फक्त मराठी लोकांना 'फ'काराबद्दल तक्रार करण्याचा काही अधिकार नाही असं मला फक्त वाटतं. पण हे फक्त माझं मत आहे.
Pages