Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58
आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मध्यंतरी सफरचंदाच्या बियांत
मध्यंतरी सफरचंदाच्या बियांत सायनाईड असतं समजलं आहे>>>cherry pit मधेही सायनाईड असते ते ozark बघून कळले होते.
ब्रेकिंगबॅड मधे वॅाल्टर म्हणतो.. कॅस्टर बीन मधे रायसीन असते. ते ऐकून जस्सी विचारतो .. rice and bean?
नेटफ्लिक्सवर Irish Wish
नेटफ्लिक्सवर Irish Wish मुव्ही बघितला. एकदम क्यूट मॅजिकल कॉमेडी.
आखिर वही करो जो तुम्हारा दिल चाहता है असा टिपीकल बॉलीवूडीय विषय आहे पण तरी आवड्लाच.
आयर्लंड मधले सुंदर रस्ते तिथली काही ठिकाणं एकदम मस्त.
मेरी ख्रिसमस पहाण्याचा
मेरी ख्रिसमस पहाण्याचा प्रयत्न केला. मला बोअर झाला. दोघंही खूनी आणि इतके नॉर्मल - कसे काय असू शकेल?
मी मधेच बंद केला.
वरती अमितव यांनी म्हटल्याप्रमाणे, खरच राधिका आपटेच लीड रोलमध्ये हवी होती. शिवाय 'डोसा चाटूनपुसून खाल्ला - तेवढाच भाग रियल होता' या अस्मिताच्या वाक्याशी अगदीच सहमत आहे.
'चाइल्ड अॅब्युझ' विषय अगदीच सुपरफिशिअली हाताळलाय. इन फॅक्ट मुलीला सतत झोपवुन-उठवुन तिची झोपेची सायकल भंग करुन कत्रिनाही एक प्रकारे तेच करते आहे - असे वाटले.
प्राईमवर इरफान खान चा साँग ऑफ
प्राईमवर इरफान खान चा साँग ऑफ स्कॉर्पियन मुव्ही दिसला आज. ट्रेलर बघितले, थोडा ईंटेन्स वाटतोय. कोणी पाहिला का?
आजचा चित्रपट:
आजचा चित्रपट:
एन्टरटेन्मेंट, 2014 मध्ये आलेल्या या चित्रपटात अक्षय कुमार, तमन्ना, कृष्णा, जॉनी लिव्हर, सोनू सूद, प्रकाश राज अशी भली मोठी आणि तगडी cast असून सुद्धा चित्रपटात सगळ्यात चांगले परफॉर्मन्स "एन्टरटेन्मेंट" नाव असलेल्या क्यूट डॉगचे आहे.
बाकी लिहिण्यासारखे काहीच नाही.
(No subject)
अगदी सहमत.एंटरटेनमेंट मध्ये
अगदी सहमत.एंटरटेनमेंट मध्ये इतके मोठे स्टार्स घेऊन कचरा केलाय कथेचा.ती पापा ला फापा म्हणणारी तमन्ना काय, तो प्रत्येक वाक्यात बॉलिवूड स्टार चे नाव बळंच घालणारा अक्षय कुमारचा मित्र काय, सगळे घीसेपीटे जोक्स काय, ते विषारी खीर, इस्त्री चा शॉक वाले भयंकर जोक्स काय.तो कुत्रा आणि मधल्या एका सिन मध्ये अनेक कुत्रे सोडून काहीही बघण्यासारखं नाही.त्यातल्या त्यात मिथुन चं काम आवडलं.अक्षय कुमार ने प्रचंड ओव्हर ऍक्ट केले आहे.
एंटरटेनमेंट हा एक विशेष
एंटरटेनमेंट हा एक विशेष चित्रपट होता जो काही काळाने जराही आठवत नाही. ही सुद्धा एक कला आहे.
एन्टरटेन्मेंट तीन चार वेळा
एन्टरटेन्मेंट तीनचार वेळा फक्त घरातील बाळगोपाळांमुळे बघितला आहे. रिचर्ड गिअरचा Hachi (हाची) बघितला आणि शेवटी कुत्राच घेऊन टाकला. 'हाची देही याची डोळा' झाले आता.
हाची दोन्ही मुलं शेवटपर्यंत
हाची दोन्ही मुलं शेवटपर्यंत पाहू शकली नाहीत. मुलीने रडून रडून गोंधळ घातला होता.
हो, आम्हालाही फारच अस्वस्थ
हो, आम्हालाही फारच अस्वस्थ वाटलं होतं. एवढं उदात्त प्रेम आणि खडतर प्रतिक्षा बघून काळजात तुटलं. तो सिनेमा बघून मीही अचानकच कुत्रा घ्यायला होकार दिला. ती खरी गोष्ट आहे म्हणे.
हो. खरी गोष्ट आहे.
हो. खरी गोष्ट आहे.
गेल्या वर्षी १० नोव्हेंबरला "हचिको" शंभर वर्षांचा झाला.
एंटरटेनमेंटचा विषय हळवा आहे
एंटरटेनमेंटचा विषय हळवा आहे का. मला पिक्चर हा माहितीच नाहीये, मला कमेंट वाचून हसू आलं, म्हणून मी ती स्मायली टाकली.
अंजूताई. वरील कमेंट 'हाची'
अंजूताई, वरील कमेंट 'हाची' सिनेमा वरच्या आहेत. एन्टरटेन्मेंट हलकाफुलकाच आहे. दोन्ही कुत्र्यावरचे आहेत म्हणून एकातून दुसरा विषय सुरू झाला. तुझी स्मायली पर्फेक्टच आहे.
थँक्स अस्मिता स्मायली योग्य
थँक्स अस्मिता स्मायली योग्य सांगितल्याबद्दल.
हाची बद्दल विषय सुरू झाला ते समजलं पण मला वाटलं त्यावरून एंटरटेनमेंट घेतलाय की काय.
एंटरटेनमेंट पिक्चरच्या वरच्या
एंटरटेनमेंट पिक्चरच्या वरच्या पोस्ट वाचून आठवले की मी याची छोटीशी व्हिडिओ क्लिप फेसबुक वर पाहिली होती. त्यातील कुत्र्यासोबत अक्षयकुमार जो आचरटपणा करतो तो मला चित्रपटातील एक कॉमेडी सिकवेंस असावा असे वाटले होते. पण पूर्ण चित्रपटचं त्यावर बेतला असेल तर अवघड आहे..
There is a Hachi statue
There is a Hachi statue outside the station he used to wait for his owner. Pilgrimage level place for dog lovers.
प्रतिसाद वाचुन हचिकोची खरी
प्रतिसाद वाचुन हचिकोची खरी गोष्ट वाचली. खूपच टचिंग आहे
एंटरटेनमेंट हा साजिद - फरहाद
एंटरटेनमेंट हा साजिद - फरहाद सामझी बंधूंचा सिनेमा आहे. आधी गाणी (एम बोले तो) आणि डायलॉग (आता माझी सटकली) लिहिता लिहिता अचानक आपण लई भारी दिग्दर्शक बनू असा गैरसमज झालेल्या दुकलीनी आधी जोडीने अन् मग स्वतंत्र पणे एक से एक भयाण सिनेमे काढले आहेत. (हाऊसफुल ३-४, बच्चन पांडे, किसी का भाई किसी की जान वगैरे)
याचं नाव दिसलं की लगेच सिनेमा वर फुली...
तो हाऊसफुल्ल 4 असलाच भयाण.1,2
तो हाऊसफुल्ल 4 असलाच भयाण.1,2,3 पाहिले नाहीत त्यामुळे त्याबद्दल टिप्पणी नाही.प्रसिद्ध नावं, जरा चांगल्या दिसणाऱ्या ग्लॅमर वाल्या नायिका घेऊन आपण लोकांना काहीही कचरा खपवू शकतो असं बॉलिवूड वाल्यांना का वाटत असावं?
घरातल्यांना ते पांचट शाब्दिक जोक (शिक्षा को उठाव, तपस्या को उठाव, गामामारेगा वगैरे) आवडत असल्याने अनेकवेळा पहावा लागतो.नाना पाटेकर मिटू आरोपामुळे यातून बाहेर काढले गेले असं वाचलं होतं.सुटले बिचारे हा भयंकर पिक्चर शूट करण्याच्या अत्याचारातून.
एन्टरटेन्मेंट म्हणजे कपिल
एन्टरटेन्मेंट म्हणजे कपिल शर्मा शो चं वाढीव वर्जन होतं. पाणी घालून वाढवल्याने अंमळ पाणचट झालं होतं. इतक्या सगळया लोकांना घेऊन सुद्धा काही म्हणावा तसा परिणाम होईना म्हणून शेवटी कुत्र्याला घ्यावं लागलं. त्या कुत्र्यामुळेच लोकांनी तो सिनेमा पाहिला.
कुत्र्याने तारून नेलेला 'तेरी
कुत्र्याने तारून नेलेला 'तेरी मेहेर्बानियां' नंतर हा दुसरा सिनेमा मग !
हाऊसफुल्ल 4 आमचा पांचट प्रेमी
हाऊसफुल्ल 4 आमचा पांचट प्रेमी मित्रमंडळाचा आवडता पिक्चर आहे. जुडवा आणि बाकीच्या डेव्हिड धवन पिक्चरांवर वाढलेला पिंड आहे हा
मला डेव्हिड धवन पिक्चर्स
मला डेव्हिड धवन पिक्चर्स चालायचे.पण हाऊसफुल्ल4 अंमळ टू मच आहे, राजाला भेट म्हणून खायला डुक्करएक्स्क्रीटा देणे वगैरे.
एन्टरटेन्मेंट तीनचार वेळा
एन्टरटेन्मेंट तीनचार वेळा फक्त घरातील बाळगोपाळांमुळे बघितला आहे
>>>
+१
त्यांच्या आवडीनुसारच चित्रपट बघावे लागतात. आपल्या आवडीचे काही बघायचे असल्यास मोबाईलवर OTT चा सहारा घ्यावा लागतो
'अमलताश' बघून गंडलेला/गंडलेली
'अमलताश' बघून गंडलेला/गंडलेली समदुःखी इथं कुणी आहे काय?
ट्रेलर बरा वाटलेला.
ट्रेलर बरा वाटलेला.
Some feedback/opinions on
Some feedback/opinions on Savarkar and Randeep Hooda
‘सावरकर’ पाहिला. या विषयावर
‘सावरकर’ पाहिला. या विषयावर इम्पार्शिअली लिहिणे माझ्यासाठी कठीण आहे.
सो
काय आवडले?
* रणदीप हुडाचे बेअरिंग पटले. सावरकरांची देहबोली माहित नसली तरी सावरकरांचे उतारवयातील फोटो पाहिल्याने त्याचे तरुण वय ते वृद्धावस्था ट्रान्फॉर्मेशनही पटले. त्याचे कामही आवडले.
* अंकिता लोखंडेचे काम छोटेसे असले तरी चांगले आहे.
* सावरकरांचे रॅशनल विचार विविध प्रसंगांतून ठसवले आहेत, अगदी बहुचर्चित माफी व पेन्शन.
* गांधी व सावरकरांचे विचार सुरूवातीपासून पटत नाहीत हे दाखवले आहेच. पण थॅंकफुली गांधींजींचे पात्र कॅरिकेचरीश नाही. (शेवटच्या भेटीतला संवाद मात्र अगदीच मुर्खपणा आहे.)
* जिना यांचे पात्रही योग्य प्रकारे चित्रीत केले आहे.
काय आवडले नाही?
* फॅक्चुअल व ग्लेअरिंग चुका - भगतसिंग व सावरकरांची भेट झाल्याचे कुठेही, अगदी सावरकरांच्या लिखाणातही वाचले नाही. त्यामुळे ती भेट, त्यातही रत्नागिरीत झाल्याचे दाखवणे पूर्णतः हास्यास्पद.
* सुभाषबाबू व सावरकरांची भेट सुमारे १९२७मधे पुण्यात झाली होती. ती दुसरे महायुद्ध सुरू होण्याच्या आसपास दाखवणे हे चुकीचेच.
*लंडनमधल्या व अंदमानातल्या काही प्रसंगांत रणदीप हुडा थोडा स्टायलाईज्ड वाटतो.
* इन जनरल काही संवादही आधुनिक वाटतात. पण असे प्रसंग कमी आहेत.
अजून काय चांगले करता आले असते?
मराठी उच्चार. विशेषतः ‘सागरा प्राण तळमळला’. रणदीप हुडाने ते म्हणण्याचा प्रयत्न केला याबद्दल त्याचे कौतुक करावे का बॅकग्राउंडला असल्याने व्यवस्थित उच्चारात डब करता आले असते तर मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत ते पोहोचले असते असे मानावे हे समजत नाही.
मध्यंतरी सावरकरांना न मानणार्या एका अमराठी व्यक्तीला मंगेशकर कुटुंबियानी गायलेली ‘सागरा’ व ‘स्वतंत्रते’ गाणी ऐकवली असता आवडली होती.
छान लिहिलंय परीक्षण.काल आज
छान लिहिलंय परीक्षण.काल आज शोज भरलेले बघून आनंद झाला बुकमायशो वर.शिवाय रिव्ह्यू चांगले आले आहेत.
किमान भांडवल निघावे.हुडा ने घर गहाण ठेवले आहे.नफ्यात जावा,जास्तीत जास्त मराठी अमराठी लोकांनी पहावा, आवडावा ही तर मनातली इच्छा.
Pages