Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58
आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मर्डर मुबारक पंकज त्रिपाठी
मर्डर मुबारक पंकज त्रिपाठी दिसला म्हणून लावला. चालू झाला तर हे सगळे ढिगभर कलाकार. वाटेत मोकळे फिरताना दिसले म्हणून बसमध्ये पकडून आणले टाईप. डायरेक्शनची पार वाट. कंटाळून बंद केला आणि महारानी लावली.
आता 'मेरी ख्रिसमस' उच्च
आता 'मेरी ख्रिसमस' उच्च वाटायला लागला मला. उगाच नावं ठेवली. >>
अस्मिता,
बघा..! तरी मी सांगितलं होतं, चांगला पिच्चर है म्हणून.
मला वाटलंच संप्रति तुम्ही
मला वाटलंच संप्रति तुम्ही 'मोगॅम्बो खुश हुआ' करणार, गेला बाजार 'तसंच पाहिजे अस्मिताला' तरी.
मै कहा हूं ?
मै कहा हूं ?
श्रद्धांजलीच्या पोस्टस वाला धागा कुठे गेला ? कुणीतरी नेमके कलाकार पण सांगितले होते.
या चित्रपटाच्या निमित्ताने ऑफ बीट हा शब्द पहिल्यांदा समजला. वयाच्या मानाने आणि अमिताभयुगाचा सूर्य माथ्यावर तळपत असताना असे सिनेमे रटाळ वाटले असते, पण हाफचड्डीतल्या आम्ही सर्व मित्रांनी हा सिनेमा (मधली ती लग्नाची बोअर गाणी चुळबुळत बघून) पूर्ण पाहिला असतो. बदला असा पण असतो हे नवीन होतं. हिरॉईन ती पण पिचलेली एकही डायलॉग न मारता बदला घेऊ शकते हे धक्कादायक होतं.
परत बघायला पाहिजे. ओटीटीवर भारतात नाही. तर मग युट्यूबकडे कूच करतो.
अस्मिता>>>ट्रेलर बघून ‘मर्डर
अस्मिता>>>ट्रेलर बघून ‘मर्डर मुबारक’ इंटरेस्टींग वाटला होता. बरं झालं तू लिहीलंस. आता नाही बघणार.
‘अ मॅन कॉल्ड ओटो’ पाहिला. त्याचे प्रिमायसेस वेगळे/चांगले असले तरी एकंदरीत कथानक प्रेडीक्टेबल आहे. एकदा पाहण्यासारखा नक्कीच.
मॅरीसोल झालेल्या अभिनेत्रीचं काम आवडलं.
‘बरेली की बर्फी’ खूप दिवस दिवस पहायचा होता. आज मुहूर्त मिळाला. आवडला. राजकुमार राव भन्नाट आहे.
मर्डर मुबारकच मराठी पिक्चर
मर्डर मुबारकच मराठी पिक्चर सारख झालय म्हणजे ट्रेलर एकदम भारी वाटणारा पण मुळ पिक्चर मधे काहिच दम नाही...सगळयानी अक्षरश; पाट्या टाकल्यात..पन्कज त्रिपाठीचा रोलही एकदम छाप पडु नये असा लिहलाय..सस्पेन्स कॉमेडि असा जॉनर होता तर एकही दमदार विनोद किवा सिच्युएशन नाही..
सारा अत्यत अॅव्हरेज..
अस्मिता आणि सायो दोघींच्या
अस्मिता आणि सायो दोघींच्या कमेंटस खुसखुशीत.
फेफ
फेफ
मर्डर मुबारक बद्दल वाचून "गॉसफोर्ड पार्क" आठवला. तो मात्र चांगला आहे. पण पंकज त्रिपाठी आहे म्हंटल्यावर मर्डर मुबारक निदान एकदा चेक करायला हवा.
गॉसफोर्ड पार्क - हा पिक्चर पाहिला तेव्हा डाउनटन अॅबी मालिका आलेली नव्हती. पण त्यात जे असंख्य डिनर इव्हेण्ट्स दाखवले आहेत आहेत तशा एका इव्हेण्ट मधे एक खून होतो व त्याचे रहस्य उलगडण्याबद्दल ती कथा आहे. अॅबी वाल्या ज्युलियन फेलोजनेच लिहीली आहे व अॅबी मधली खत्रा आजी पण त्यात आहे.
( अशा वेळेस कोणतातरी अगम्य वाटण्यासारखा पिक्चर आठवून त्याचा संदर्भ देणे यात एक स्नॉबिशनेसपणा येतो, त्याचा रिस्क घेउन हे लिहीले आहे. )
(( अशा वेळेस इंग्रजी पिक्चरचा संदर्भ देणे ही किड लेव्हल. फ्रेंच पिक्चरचा देणे ही अॅडल्ट लेव्हल. आणि पूर्व युरोपियन भाषेतील एखाद्या आपल्याला पाच मिनिटात झोप आणणार्या पिक्चरचा देणे ही लेजेंड लेव्हल असते))
आणि यातलं काहीही जमलं नाही तर
आणि यातलं काहीही जमलं नाही तर बेबी लेव्हल म्हणजे पण पुस्तकातली मजा नाही आली. किंवा गेलाबाजार, हा शिनुमा आवडला असेल तर आता पुस्तक वाच. सिनेमा विसरून जाशील.
बाकी मॅगी स्मिथ साठी मी काहीही बघू शकतो. ती काचाठो आहे
हो हो मॅगी स्मिथ भन्नाट आहे.
हो
हो मॅगी स्मिथ भन्नाट आहे.
स्नॉबिशनेसपणा >> हा शब्द
स्नॉबिशनेसपणा >> हा शब्द आवडला सांगायचं राहिलं.
फारएण्ड >>
फारएण्ड >>
चुप(कि छुप)कोथा नावाचा चित्रपट खूप दिवसांपासून शोधत होतो. आज बुक माय शो वर मिळाला.
दहा ते पंधरा मिनिटे (कोणताही) सलग चित्रपट पाहिल्यावर अस्वस्थ व्हायला होतं. त्यामुळं शैतान रेण्ट वर आहे का हे शोधताना हा सापडला.
एक लहान मुलगी कुर्साँगच्या जंगलात हरवलेली असते. एक टिव्ही जर्नेलिस्ट तिचा शोध घेतेय. तिला अन्य प्रकरणात बर्याच धमक्याही आलेल्या आहेत. ही मुलगी जिथून गायब झाली आहे तिथे एक घर आहे जे काळ्या शक्तीसाठी कुप्रसिद्ध आहे. प्लॉट तर चांगला आहे.
सगळेच कलाकार चांगला अभिनय करताहेत. पण असायलम मधल्या दृश्यात मुलीचे आई वडील म्हणून जे कलाकार घेतलेत ते बहुतेक पैसे वाचवण्यासाठी. कारण घाबरण्याचा जो अभिनय त्यांनी केलाय त्यामुळे इतका वेळ जमवून आणलेला तणाव क्षणात नाहीसा झाला.
(हिंदीत हुश्श नावाने आहे).
कंटाळवाणा आहे. ओटीटी च्या मार्गाने जाणारा. रहस्यभेद अगदीच हौशी लेखकछाप. प्रादेशिक चित्रपटासाठी कदाचित आगळा वेगळा असू शकेल. गाजावाजा आणि बेंडबाजा अशीच गत आहे. ट्रेलर पाहून वेगळाच चित्रपट डोळ्यासमोर आला होता.
फारएण्ड>>>
फारएण्ड>>>
स्नॉबिशनेसपणाच्या विरोधातली 'रिव्हर्स- स्नॉबरी' म्हणून
इथून पुढे उच्चभ्रू पार्टीतल्या खुनाचा संदर्भ असलेल्या कुठल्याही 'हाय-फाय' सिनेमाची चर्चा सुरू झाली की 'गरीब जन्तेच्या मिथुन' टाईप 'मर्डर मुबारक' मधे पण अस्सच होतं म्हणायचं. कुणी 'भाकरी नसेल तर शिरापुरी खा' म्हटलं की तुम्हाला 'काय कळणार ठेचा भाकरीची किंमत' अशी उलट ट्रेन पकडायची. फजिती झाली हे कबूल करायचंच नाही, हेच आमचं लेजेन्ड लेव्हल
चुप/ हुश्श नोटेड.
कारण घाबरण्याचा जो अभिनय त्यांनी केलाय त्यामुळे इतका वेळ जमवून आणलेला तणाव क्षणात नाहीसा झाला.>>>>
बरेली की बर्फी छानच आहे, माझेमन.
फा आणि अस्मिता,
फा आणि अस्मिता,
कारण घाबरण्याचा जो अभिनय
कारण घाबरण्याचा जो अभिनय त्यांनी केलाय त्यामुळे इतका वेळ जमवून आणलेला तणाव क्षणात नाहीसा झाला. >>>
रिव्हर्स- स्नॉबरी >>> ही आयडिया आवडली. शैतानी इलाका, आमदनी आठ आना खर्चा रुपिया, देशद्रोही, गंगा जमुना सरस्वती ई. पिक्चर मस्त आहेत अशा ठिकाणी संदर्भ द्यायला.
Manjumel Boys कोणी पाहिला आहे
Manjumel Boys कोणी पाहिला आहे का इथे? मल्याळम विथ इंग्लिश सबटायटल आहे.. थिएटरला आहे सध्या. एक मल्लू मित्र सोबत येतोस का म्हणून विचारत आहे..
अन्वेशिपीन कांदेथूम या नावाचा
अन्वेशिपीन कांडेथूम ( या शब्दाचा अर्थ शोधा म्हणजे सापडेल असा आहे ) या नावाचा मल्याळी सिनेमा नेटफ्लिक्सवर पाहिला. बऱ्याच दिवसांनी एक मस्त थ्रिलर पाहायला मिळाला . शेवट इतका अनपेक्षित आहे की ज्याच नाव ते .
ह्याचे श्रेय पटकथाकार आणि दिग्दर्शकाला. चित्रपट कुठेही भडक होणार याची पुरेपूर काळजी घेतली गेलिये . कलाकारांनी कामेही उत्तम केलीत .
नयनरम्य स्वछ केरळी गावांचे दर्शन हा एक बोनस
इकडे धमाल सुरुय की !!!!
इकडे धमाल सुरुय की !!!!
हसवून मारताय
पण पल्लवी परांजपेनं तर 'दिल
पण पल्लवी परांजपेनं तर 'दिल छू लिया!'
>> पल्लवी पर्यंत पोचवली ही कमेंट
पल्लवी पर्यंत पोचवली ही कमेंट
पल्लवी पर्यंत पोचवली ही कमेंट ->>
पोचली पोचली.. आभारी आहे
आज पुन्हा एकदा (आता count
आज पुन्हा एकदा (आता count विसरलो) घरात "बाहुबली 2" बघणे सुरू आहे. पिंडारी पुन्हा एकदा देवसेनेच्या राज्यात शिरले आहेत
यावेळी कदाचित ते जिंकतील.
यावेळी कदाचित ते जिंकतील.
बघा नक्की.
अन्वेशिपीन कांडेथूम >>>
अन्वेशिपीन कांडेथूम >>> कुठल्या ओटीटी वर आहे? अर्थ शोधू पण तुम्ही स्पेलींग सांगा, म्हणजे सिनेमा शोधता येइल.
किल्ली
किल्ली
माधव , Anweshippin Kandethum
माधव , Anweshippin Kandethum नेटफ्लिक्सवर आहे .
अर्थ कंसात दिलेला आहे .
किल्ली
किल्ली
अर्थ कंसात दिलेला आहे >>> त्यांनी सलग वाचलं, माझी पण पहिल्यांदा गडबड झालेली, दुसऱ्या वेळी कळलं.
मेरी ख्रिसमस पाहिला
मेरी ख्रिसमस पाहिला
ठीक होता. राघवन कडून बेटर हाताळणी ची अपेक्षा होती.
मूळ फ्रेंच सिनेमा Le-Monte Charge (सर्विस लिफ्ट) द पॅरिस पिक अप नावानी डब होऊन आला होता. तो बघायला लागणार
https://archive.org/details/1962-paris-pick-up
इथे उपलब्ध आहे
इच्छुकांनी लाभ घ्यावा
मर्डर मुबारक -
मर्डर मुबारक -
टेक १ - उत्साहाने सुरु केला. एक खून झाला एवढे आठवते. कुणाचा ते आठवत नाही. कारण मग केव्हा तरी झोपच लागली.
टेक २ - असं कसं. बघू तर खरं. इतके नामचीन लोक आहेत. रिवाइंड. पुन्हा बघू मग बोलू. पण छ्या पुन्हा झोप लागली.
टेक ३ - दिवस दुसरा- आता नीट फ्रेश होऊन बसले. नेटाने शेवटपर्यन्त पाहिला. हुश्श.
थोडक्यात सांगायचे म्हणजे गोष्ट, प्लॉट चांगला होता. पण इन्टरेस्ट टिकवणे फार अवघड गेले. एन्गेजिंग नाहीये मुळीच. त्यामुळे मज्जा नाही आली .
बाकी कॉफी का जिस्म के डीके से
बाकी कॉफी का जिस्म के डीके से क्या वास्ता?
मध्यंतरी सफरचंदाच्या बियांत सायनाईड असतं समजलं आहे. ते पक्कं लक्षात ठेवलं आहे. अजून वापरायची वेळ आलेली नाही. कॉफीत टॅनिन नावाचं विष ' नसतं ' इतकं ज्ञान आहे. ती पिऊन अनंतात चटकन विलीन होतो का?
आजचा चित्रपट - हाथी मेरे साथी
आजचा चित्रपट - हाथी मेरे साथी (२०२१ चा). राणा दुगबत्ती, पुलकित सम्राट, श्रिया पिळगावकर कलाकार असलेला. छान कथानक, उत्तम डबिंग
नक्की बघा
Pages