मुलाखत कशी वाटली.

Submitted by अस्मिता. on 28 June, 2023 - 21:16

हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.

तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा. Happy
धन्यवाद Happy
अस्मिता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी वसंतरावांचं गाणं कधी समोर बसून ऐकलं नाही. राहुल देशपांडेचा आवाज त्यामुळे का काय फार आवडतो. काहीतरी वेगळीच गंमत त्याच्या आवाजात आहे. मुलाखत ऐकली. तो चांगलं बोलला आहे. भाईकाका आणि आजोबांचा उल्लेख जरा कमीवेळा केला असता, तर अजून आवडली असती.

मला राहूल देशपांडेंचे गाणे आवडते आणि त्यांचा प्रांजळपणाही. वसंतरावांचे गाणे हे देवाघरचे देणे म्हणावे तसे पण फार तपश्चर्येने मिळवलेले होते. ते गेले तेव्हा राहूल फार लहान होता त्यामुळे साहाजिकच जे भाग्य कधी वाट्याला आले नाही त्याबद्दलची हळहळ आहे आणि जोडीला वारसा डोळसपणे पुढे नेण्याच्या जबाबदारीची जाणीवही मात्र मी त्याला आजोबांच्या छायेत असे म्हणणार नाही. वारश्याचे भांडवल न करता स्वतःची वाट शोधणे, वेगवेगळे प्रयोग करायची रिस्क घेणे सोपे नाही.

>>>>>>>>> https://youtu.be/vOvLFT4v4LQ?si=fUzNrHveugeLSq6E
सेव्हिंगबाबत, एकूणच जीवनाबाबत वेगळा दृष्टिकोन - Morgan Housel
हा चॅनल सध्या आवडतोय - द डायरी ऑफ अ सीईओ

अवल हा चॅनल इथे उधृत केल्याबद्दल आभार. मस्त वाटतोय.

Morgan Housel म्हणजे सायकॉलॉजी ऑफ मनी पुस्तकाचा लेखक ना? हे पुस्तक माझ्या विशलिस्टला आहे.

ह्या मुलाखतीच्या निमित्ताने अमित आणि अमुक तमुकची मैत्री होतेय हे चांगलंय >>> Lol

'सायकॉलॉजी ऑफ मनी' पुस्तकातील पहीली ३-४ प्रकरणे वाचली. मला ते पुस्तक समजायला जरा अवघड वाटले. रोचक आहेच पण जरा अवघड आहे.

Majja pink या चॅनेल वर उत्तरा केळकर आणि त्यांची लेक यांची मुलाखत बघितली. खूप आवडली. कुठलाही आव न आणता एकदम नॉर्मल बोलत होत्या आणि तरीही एंगे्जिंग होती मुलाखत. त्यांची मुलगी पण खूप आवडली. ती पण एकदम साध्या ड्रेस (पुढे ओढणी घेऊन :D)आली होती मुलाखत द्यायला. तिने बोलायला सुरुवात केली आणि मनात आलं अरे हिचा आवाज husky आहे.(मला फार आवडतो husky voice )तिने लगेच पुढच्या क्षणी exactly husky हाच शब्द वापराला आणि त्याच कारण ही सांगितलं.
खटकल्या दोनच गोष्टी एक म्हणजे मुलाखत घेणारी सारखी struggle सांगा या अनुषंगाने clickbait काही मिळतंय का बघत होती जे की उत्तरा केळकर या सांगत होत्या की तसं काही नाहीये. तरी ही बाई struggle कडेच नेत होती सारखी तिची गाडी. आणि अक्खी मुलाखत भर कानाला खूप टोचल ते म्हणजे मुलाखत घेणारीच मान्सी, मान्सी म्हणणं : ( याला हिंदीचा प्रभाव धाग्यामध्ये टाकायला पाहिजे मान्सी, मेघ्ना अस म्हणणे

सायकॉलॉजी ऑफ मनी' पुस्तकातील पहीली ३-४ प्रकरणे वाचली. मला ते पुस्तक समजायला जरा अवघड वाटले. रोचक आहेच पण जरा अवघड आहे.>> Ok
४-६ आठवड्याची प्रतीक्षा यादी आहे वाचनालयात

>>>>>>४-६ आठवड्याची प्रतीक्षा यादी आहे वाचनालयात
इथे ई-बुक मिळालं.
तुला हवे असल्यास माझी लायब्ररी अकाऊंट ची यु आर एल व पास्वर्ड देउ शकते. Happy बघ जर नाही मिळालं तर कळव.

>४-६ आठवड्याची प्रतीक्षा यादी आहे वाचनालयात
इथे ई-बुक मिळालं>>> ebook आणि audiobook साठी..

तुला हवे असल्यास माझी लायब्ररी अकाऊंट ची यु आर एल व पास्वर्ड देउ शकते. Happy बघ जर नाही मिळालं तर कळव>> thank you.
पण मी वाट बघेन

मित्र म्हणे वर बिबट्यानवर अभ्यास करणाऱ्या स्वप्नील कुंभोजकर यांची मुलाखत पाहिली. छान वाटली. अक्ख्या youtube वर तेच तेच मुलाखत देणारे चेहरे पाहून कंटाळा आलेला त्यामुळे ही मुलाखत जास्त आवडली. त्यांच फिल्ड पण वेगळं आणि इंटरेस्टिंग आहे.

मी रजत शर्माच्या ‘आपकी अदालत‘ चे दोन तीन एपिसोड्स पाहिले आहेत पण तो होस्ट आहे ह्या शो चा ह्या पलिकडे काहीही माहिती त्याच्याबद्दल नव्हती. ही माहिती ऐकून त्याच्याबद्दल आदर वाटला. स्मिता प्रकाशचे पॉडकास्ट्स आवडतात. अभ्यासू असतात.

https://youtu.be/GNPQYcgmS_c?si=bIKtCFTCYVDsELzQ

Gastroentrologist and Neurologist chatting .>> पॉडकास्ट आवडला. बराच मोठा असल्याने दोन - तीन भागात ऐकला.

स्वप्निल कुंभोजकरांची IPH आवाहन वरील वर्ष - दोन वर्षांपूर्वीची मुलाखत सुद्धा चांगली आहे. शिवाय स्वयं talks वर सुद्धा त्यांच्या बिबट्यांव्यतिरिक्त निसर्ग संवर्धन किंवा तत्सम विषयांवरील मुलाखती आहेत.

सध्या मला जिकडे तिकडे धनश्री लेले दिसत आहेत. निष्कारण खळबळजनक वक्तव्य केल्याने आगामी काही दिवसात उषा नाईक सुद्धा सगळीकडे दिसतील असं वाटतंय.

अमुक तमुक वर डॉ. नंदू मुलमुलेंची तुम्ही व्यसनाच्या आहारी गेला आहात का? मुलाखत ऐकली.
चांगली वाटली. चांगले समजावून सांगितलंय.

परत अमुकतमुक बघायला लागणार आता.
नंदू मुलमुल्यांचा चार पाच वर्षांपूर्वी एका दिवाळी अंकातील लेख आवडलेला. त्यांना आवडलेल्या चित्रपटांचं रसग्रहणात्मक पुस्तक आणलेलं गेल्या खेपेला. ते ही आवडलेलं. आता परत त्या विकटहास्यद्वयीला बघणं आलं! Happy

मित्रम्हणे मध्ये कलाकार विद्याधर जोशी आणि त्यांच्या सौंची मुलाखत आहे. अशक्य प्रेरणादायी. One of the best. नक्की बघा.

लोकहो, मित्र म्हणे ने haircut केला
आता एपिसोड मध्ये तो दिसला तरी थोडा सुसह्य आहे.
विद्याधर जोशींचा नवीन एपिसोड आहे. त्यांच्या मोठ्या आजारपणाचा आणि बरे होण्याचा प्रवास सांगितलाय...
चांगली आहे मुलाखत

हेअरकट अपडेट Lol
अमुकतमुकने वेडगळ हसणं बंद केल्याचं कळलं की सुडोमि. Wink

सायो +1

अमुकतमुक साठी विकटहास्यद्वयी हे अगदीच परफेक्ट Biggrin

विद्याधर जोशींची मुलाखत पाहिली. सांगतानाही त्या दोघांना किती त्रास होत होता, आवाजावरून जाणवत होतं.
मित्र हेअर कट मुळे ओळखूच आला नाही. आवाजावरून ओळखला.

हेअरकट अपडेट
विकटहास्यद्वयी
दोन्ही लोल

Pages