मुलाखत कशी वाटली.

Submitted by अस्मिता. on 28 June, 2023 - 21:16

हा मुलाखतींसाठी काढलेला स्वतंत्र धागा. वेबसिरिज धाग्यावर हे योग्य वाटत नव्हतं म्हणून काढला. मला मुलाखती बघायला अतिशय आवडतं. त्यातल्या गप्पा क्वचित समृद्ध करणाऱ्या काही नवीन विचार देणाऱ्या असू शकतात. तसंच कधी बढाया, थापाही असू शकतात. पण हे सगळंच मला रंजक वाटतं. इथे तुम्हाला आवडलेल्या-न आवडलेल्या, फिल्मी-नॉन फिल्मी, प्रमोशनसाठी असलेल्या किंवा नुसत्याच, गणित, विज्ञान, खेळ, इतिहास, पुरातत्व संशोधन, Astrophysics किंवा इतर कुठल्याही विषयावर आधारित देशी-विदेशी अशा अनेक मुलाखतींवर चर्चा करता येईल. स्वयंपाक व पाककृती संबंधित किंवा तत्सम मुलाखतीवर चर्चा नकोत. मी दिल के करीब, Tweak ,रंगपंढरी, David Letterman, BeerBiceps हे नियमितपणे बघते. मला रणवीर अलाहाबादीया फार फार आवडतो . His podcasts are my new found love.

तुम्ही बघितलेली मुलाखत तुम्हाला कशी वाटली , कुठं बघितली हे प्रतिसादात नक्की लिहा. Happy
धन्यवाद Happy
अस्मिता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो हो अमित, पण पाहुण्या असल्या तरी त्या मानसशास्त्राच्या अभ्यासक नाहीत ना? त्यांनी भाषा/साहित्य/संस्कृती या अनुषंगाने जरूर बोलावं - आणि ते जे त्या बोलल्या ते खरोखरीच चिंतनीय होतं, पण नाडकर्ण्यांचा जो अभ्यासाचा आणि कामाचा विषय आहे, त्यात अधिक्षेप करू नये, तो झाला असं मला वाटलं.
तरीही अर्थात एकंदर कार्यक्रम खरंच माहितीपूर्ण आणि मननीय होता.

अश्विनी भिड्यांचा एपिसोड बघते.

ओके समजलं.
अमृता सुभाषची मुलाखत इथे तुकड्या तुकड्यात टाकली आहे, त्यामुळे ते किती अधोरेखित होईल माहित नाही. पण नाडकर्णी कित्येकदा घरंगळणार्‍या विषयाला बांध घालुन तिला मुद्द्यावर, वेगळ्या पैलूवर आणायचा निष्फळ प्रयत्न करत होते. पण ऋजु स्वभावामुळे पुढच्या संधीची वाट बघत गळकी तोटी अजुन थोडी वाहु देत होते. Happy

धन्यवाद अमितव. आठवणीने मुलाखत बघेन.
अवांतर - मध्यंतरी धनश्री लेलेंचा मेघदूतावरील कार्यक्रम प्रत्यक्ष बघण्याची संधी मिळाली. अतीशय ओघवती भाषा आणि संस्कृतचा अभ्यास जाणवला.
मोह मोह के धागे' पाहिला आणि आवडला>>
मला खरं तर तो विषयच आवडला. त्यानुषंगाने होणारी चर्चा विचार करायला लावत होती. कधी कधी आपल्याला स्वतःच्या वागण्याचं मूल्यमापन त्रयस्थाच्या भूमिकेतून करणं आवश्यक असतं, ते त्यानिमित्ताने माझ्या बाबतीत झालं.

शास्त्रीय संगीत गुरू पद्धतीत गुरूच्या मर्यादा उघडपणे मान्य करणारे फार दुर्मिळ आहेत. जवळपास नाहीच. सगळे अंध भक्ती करतात असं वाटतं. हे त्या लोकांविषयी अपार आदर असूनही खेदाने म्हणतो आहे. अश्या वेळी अश्विनीताईंच्या त्या मुलाखतीबद्दल वाचून आश्चर्य वाटलं. बघायलाच हवी.

Atharv सुदामे ची मुला खात ऐकली.
बरच विचार त्यावेळी डोक्यात येऊन गेले...

प्रोफेशनल यू टूबर्स, influencers हे ह्या शतकातील एक वेगळच करिअर आहे...२०-२५ वर्षाची मुलं, त्यांचा स्टाफ..

पूर्वी कलावंतांना राजाश्रय लागायचा आता लोकाश्रय असेल तर त्यांचे दिवस चांगले असतील अशी परिस्थीती आहे..

अद्याप आलेली नाहीये.
अंधभक्ती आणि नखशिखांत काहीसे उबग आणणारे गुणगान हे कायम ऐकले आहे.
अश्विनी ताईंचे पहिले शिक्षण त्यांच्या मातोश्री माणिक भिड्यांकडे झाले. त्याबद्दल त्यांनी सांगितले की आई चीज असेल स्वरविस्तार/ रागविस्तार असेल तो करून दाखवायची आणि आता तू गा सांगायची. अश्विनीताई analytical माईड मुळे त्याचं नोटेशन काढून ते गायच्या. त्यांनी सांगितलं की आईला गाण्याचं नोटेशन अजिबात कळत नसे, ते करताही येत नसे. कोण शिष्य आपल्या गुरूला नोटेशन समाजत नाही हे सांगेल...
ते ऐकून आई म्हणायची, पण हे जे तू गात आहेस ते बरोबर नाही, आणि ते ' असं ' हवं हे त्या बरोबर सांगत. अगं पण तू गाते आहेत ते आणि मी गाते आहे ते एकच नोटेशन आहे... पण आई म्हणत असे .. पण ते 'तेच ' नाही.!!!
गाण्याचा रागाचा भाव कसा टिपायचा हे त्या तिकडे शिकल्या.

नंतर त्या रत्नाकर पै कडे शिकल्या. त्यांच्याकडे अनवट रागातील चिजांचा प्रचंड मोठा संग्रह होता. पण रत्नाकर पै ना राग ओळखता येत नसे... (हे मला नीट आठवत असेल तर.... मी गफलत करत असेन तर विनम्र माफी). इतक्या बुजुर्ग व्यक्ती, गुरू बद्दल त्या प्रेमाने, आदराने, विनम्रतेने सांगत होत्या. त्यांना विदुषी उगाच म्हणत नाहीत.
रच्याकने, त्यांची बतिया दौरावत, राग की तस्वीर, बंदिश की कहानी हे च्यानल ऐकत असालच. नसेल तर जरूर ऐका. लौकिक अर्थाने मुलाखत नाही म्हणून इथे लिहित न्हवतो, पण विषय निघालाच आहे तर...
किती सहज आणि सोपं करून अगदी प्रेमाने आपलं इंटरप्रिटेशन सांगतात. मी टोटल फॅन आहे त्यांचा.

मस्त लिहिलंय अमितव. त्या इथे काही वर्षांपुर्वी आल्या होत्या तेव्हा घरगुती कार्यक्रम झाला होता. कान तृप्त झाले ऐकुन. अगदी शांत व्यक्तिमत्व.
सांगायला लाज वाटते पण ती चॅनल नाही ऐकली कधी. आता नक्की ऐकीन. (आयुष्यात गाणं ऐकणं हा प्रकारच कमी झालाय हे लक्षात आलं).

अमितव,
संगीतास्वाद या विषयावर तू स्वतंत्रपणे आणि सविस्तर लिहावंस असं मला पुन्हा एकदा वाटलं.
(सर्वात पहिल्यांदा 'द डिसायपल'च्या धाग्यावर वाटलं होतं.)

(माझी गल्लत होत नसेल, तर) तू उत्तम कानसेन असावास असं वाटतं. त्याच अर्थाने म्हणतेय...

>>
नवीन Submitted by अमितव on 4 March, 2024 - 18:57>> किती नेमक्या शब्दात लिहिलयं!

दिल के करीब मध्ये गिफ्ट्स चा इतका भडिमार का करतात ? बिचारे मंगेशकर वैतागले होते. गोग्गोड बोलणेही जस्तच असते, माझ्या मॉनिटर मधून गुलाबजामचा पाक गळू लागला असा भास झाला.

iph काय ते !! परवा एकदा दुसरे काहीतरी search करताना हेच दिसले होते बहुतेक पण नंतर बघू असे म्हणून पुढे गेले तर नंतर काही केल्या जाम सापडेना आता बघेन नक्की!

अरुण, आयपी टिव्हीवर बघायचं तर टिव्हीसमोर बसावं लागेल. युट्युब फोनवर चालू असतं आणि कुठूनही कुठेही फिरत बघता येतं.
दिल के करीबमध्ये पहिली दहा पंधरा मिनीटं पाक गाळत अय्या इश्श करत गिफ्ट्सची देवाणघेवाण!!! सुलेखा तळवलकर मध्येच ब्लँक होते काय बोलावं हे न सुचल्यामुळे असं वाटतं. आलेले सगळे पाहुणे हे जनरली तिचे घट्ट मित्र मैत्रिणी असतात पण बर्‍याच वर्षांत भेटलेले नसतात. Wink

माझा कट्टावर भरत दाभोळकर आलेत. अ‍ॅज युज्वल मस्त मुलाखत. खांडेकरांनी त्यांची अकॅडमीक आणि एम्प्लॉयमेंट हिस्ट्री डीटेलवार विचारलीच. Proud
पण त्यांनी सांगितलेले अ‍ॅड वर्ल्डमधले कराटे/फाईटमास्टर, सिंह इ. बरोबरचे किस्से अफलातून हहपुवा. मी तरी याआधी त्यांच्या कुठल्या मुलाखतीत ऐकले नव्हते.

लल्लनटॉप वर समीर वानखेडेंची मुलाखत पाहिली. अत्यंत बोअर झाली. दर दुसऱ्या वाक्याला, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने मी काहीच सांगू शकत नाही, हेच सुरू होतं.

अजय पुरकरांनी घेतलेली आरती अंकलीकरांची मुलाखत सकाळ नावाच्या चॅनल वर आहे. माहिती नवीन नसली तरीही मुलाखतकारांचे तेच तेच चेहरे बघून कंटाळा आल्याने, जरा बदल बरा वाटला. आरतीताई तर नेहमीच आवडल्या आहेत.

राहुल देशपांडेची अमुक-तमुक वर मुलाखत आली आहे. https://www.youtube.com/watch?v=Z11jWh12i4o
छान बोललाय. आजच्या काळचं गातो, एक्सप्रिमेंट करतो, फेल होतो, न घाबरता काय काय करतो ते छान बोलला आहे. अजुन सगळी ऐकली नाहीये. सुस्पष्ट विचार आहेत, आणि पाय जमिनीवर घट्ट आहेत हे जाणवत होतं.
बालगंधर्वांच्या काळातलं गाणं फार वेळ नाही ऐकू शकत, संगीत नाटक करताना ते जसं ७० वर्षांपूर्वी करत तसंच आज करणे कंटाळवाणं आहे, हिडीस आहे. इ.इ. अनेक विचार अगदीच पटले.
परत एकदा गुरूचा डिसायपल न होता विचार करुन काय हवं ते घ्या आणि नको ते सोडा अशा थोडंफार अर्थांचं राहुल बोललाय. Happy

खूप वेगवेगळ्या विषयावरच्या मुलाखती ऐकायच्या असतील तर अजून एक चॅनल
Passionate pulse.

मराठी मुलगी आहे, सॉफ्टवेअर मधील नोकरी सोडून ती पूर्णवेळ पॉडकास्ट करते... One woman team आहे तिची..

आजच्या काळचं गातो, एक्सप्रिमेंट करतो, फेल होतो, न घाबरता काय काय करतो ते छान बोलला आहे. अजुन सगळी ऐकली नाहीये. सुस्पष्ट विचार आहेत, आणि पाय जमिनीवर घट्ट आहेत हे जाणवत होतं.
>>>
राहुल देशपांडे आजोबांच्या सावलीतून बाहेर येऊ शकलेला नाही असं मला कायम त्याचं गाणं ऐकताना वाटतं. पण तो माबुदो असू शकतो. मला त्यांच्या गायकीतला फरक ओळखता येत नाही असंही असू शकतंच.

आजोबांच्या सावलीतून बाहेर पडलेला नाही काहीसं वाटतं. पण टॉवरिंग पर्सनॅलिटी आणि जेन्युइनली ग्रेट आजोबा असल्यावर लेगसी ( किती ते इंग्रजी शब्द! Sad ) चं ओझं असलं तर नवल नाही.
त्याच्या पॅंंडेमिक मधल्या अनअब्रेज्ड विड्यू बद्दल छान बोललाय. लता, आशा, कुमार, भीमसेन इ.ची गाणी चिजा समजून त्याला 'दिसतील' तशा त्याच्या चौकटीत गायल्या आहेत. ही न घाबरता चुकत माकत प्रयोगशीलता मला भावते, आणि इथे त्याची कारण मिमांसा ऐकल्यावर ते जास्त समजलं.
मंद मठ्ठ प्रश्न विचारणारे असुनही खिंड लढवली आहे. मध्यांत याने एकदा मुकुल शिवपुत्रच्या भैरवीचे स्वर आळवल्यावर वातावरण आणि श्रोते कसे शांत स्तब्ध झाले आणि डोळ्यातुन पाणी घळघळू लागले असा अनुभव सांगितल्यावर विकटहास्यद्वयीला आणखी एक कौशिकीचा कार्यक्रम आठवला ज्यात पाच हजार लोक ते ही पुण्यातले ते ही सवाईला ते ही खाणं पिणं सोडून ते ही रडत होते ते ही टाळ्यावाजवत न्हवते असला काही तरी अचाट अतर्क्य नळ गळल्यागत किस्सा आठवतो. तिकडे मला सहन न झाल्याने पॉज घेतलाय.

अमितव शेवटच्या वाक्यासाठी Lol
मला आवडतो राहुल देशपांडे. तो जी वेगवेगळ्या प्रकारची गाणी गातो त्यातली काही आवडतात, काही नाही आवडत. पण तो प्रयोग करतो हे आवडतं. शिवाय गर्विष्ठ नाही वाटत.
मुलाखत बघायला हवी.

मला राहुल देशपांडे आवडतो, पण अमुक तमुक ऐकून माझी सुद्धा मुलाखत बघायची हिम्मत झाली नाही.
बाकी विकटहास्यद्वयीने चुणूक दाखवलीच म्हणायची.. Lol

मला राहुलचे unplugged "दिये जलते है" ओरिजनल पेक्षा सुद्धा खुप खुप आवडले.... रादर हे ऐकल्यानंतर ओरिजनल ऐकवतच नाही!!

Pages