ललित कला केंद्रात नक्की काय झालं?

Submitted by स्वाती_आंबोळे on 5 February, 2024 - 09:11

ललित कला केंद्रातील विद्यार्थी सादर करत असलेलं एक नाटक हिंदू देवदेवतांचा अपमान करत असल्याचं कारण देऊन अभाविपच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडलं. नाटकाशी संबंधित असलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांना अटक करण्यात आलं.

सोशल मीडिआवरच्या पोस्ट्स वाचून मला इतकंच कळलं.

मला खालील प्रश्न पडले, कोणाला यासंदर्भात माहिती असेल तर कृपया सांगा:

त्या नाटकात नक्की अपमानास्पद असं काय होतं?
या प्रसंगी मारहाण झाली का? कोणी सुरू केली?
अटक कोणत्या कायद्याखाली झाली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रामकथा / रामायण - हे हजारो वर्षांपासून आपल्या लोकसंस्कृतीतून पाझरत इथवर आलं आहे. हजारो गोष्टी आल्या आणि गेल्या, पण रामकथेचं आकर्षण आजही तेवढंच आहे, याला अनेक कारणं आहेत, त्यावर स्वतंत्र लिहू.

रामकथा हा भजन-कीर्तनाचा विषय झाला शेकडो वर्षं. यांतल्या घटनांच्या नाट्यमयतेने, यापुढची दहा हजार वर्षं होणार नाहीत अशा पात्रांनी आणि साधं सोपं करून सांगितलेल्या तत्त्वज्ञानाने लोकांवर गारुड घातलं. थोर आणि हुषार कीर्तनकारांनी रसाळ निरुपणाच्या मार्गाने ही कथा मग प्रबोधनासाठी निवडली, तिची अनेक रुपं सादर केली. संतांपासून शायरांपर्यंत शेकडोंनी रामकथेतले प्रसंग आपापल्या काव्यांत पेरले. पुढे यावर सिनेमे निघाले, नाटकं आली. यापुढे प्रहसनंही झाली.

या सगळ्यांपेक्षा महत्वाचं म्हणजे लोककलेत रामकथेचा फॉर्म, कथा आणि प्लॉट वापरला गेला. रामकथेसारखी करमणूक, शिकवण आणि तत्त्वज्ञान इतर कुठे नाही हे लोकांनीच पक्कं करून टाकलं. या भक्कम आधारावर उभी राहिली रामलीला, दशावतार आणि लोककलेचे शेकडो गावोगावी तनामनात रुजलेले हजारो प्रकार. त्यानंतर प्रहसनं झाली, व्यंगनाट्यांचे अक्षरशः हजारो प्रयोग होऊन ती सुपरहिट झाली. नर्सरीतल्या फॅन्सी ड्रेसपासून पॉलिटिकल कँपेनपर्यंत आजही ही कथा नजरेआड होत नाही, काहीनाकाही रूप घेऊन ती रोज माझ्यासमोर उभी ठाकतेच ठाकते.
---

ही कथा अशी माझ्या संस्कृतीत आणि पर्यायाने माझ्या आजच्या आणि रोजच्या जगण्यात पाझरली आहे, माझी इच्छा असो किंवा नसो, माझ्या जगण्यात उfunction at() { [native code] }अरली आहे. माझी श्रद्धा असो किंवा नसो, मी आस्तिक असो की नास्तिक, माझ्या अख्ख्या जगण्यावर एक सावली बनून माझ्याच बाजूला उभी आहे. मी माझ्या इथं असण्याचा, अस्तित्वाच्या प्रयोजनाचा आणि माझ्या मुळांचा शोध घेतो तेव्हा मला पुर्वजांच्या श्रद्धेच्या अंगाने जावंच लागतं. टाळण्याचा काही मार्ग असेल, तर कुणी सांगेल काय मला?
आणि अचानक या कथेच्या प्रताधिकाराचे हक्क सांगणारे अचानक माझ्या आजूबाजूला उगवू लागले तर मी काय करायचं?
___

माझ्या संस्कृतीतला सर्वात प्रसिद्ध प्लॉट आणि कथा त्या मुलांनी अर्थातच उसनी घेतली. लक्ष वेधून घेण्याचा प्रकार आहे, असं म्हणा पाहिजे तर. हे असे, लक्ष वेधून घेण्याचे प्रकार आजवर हजारो वेळा झाले आहेत. अशाच वेगवेगळ्या प्रकारे हजारो लोकांनी ही अशी उसनवारी केली आहे. ही उसनवारी कशी करावी यासंबंधीचे काही नियम होते किंवा आहेत का? आता नव्याने (तुम्ही) तयार केले असतील तर जुन्या उसनवार्‍यांनी अक्षरशः भव्य काम करून ठेवलं आहे, त्याचं तुम्ही काय करणार, आणि त्यांना कोणत्या पिंजर्‍यांत उभं करणार?

स्पष्ट असा, सर्वात पहिला विचार मनात येतो, आणि तो म्हणजे तुम्ही भेकड आहात. स्वतःला घाबरता, एकट्याने स्वतःशी बोलायची वेळ आली तर लेनेकेदेनेपडजायेंगे म्हणून तुम्हाला नाईलाजाने कुठच्या तरी झुंडीचा, आणि त्या झुंडीच्या प्रोफाईल फोटोचा आधार तुम्हाला घ्यावा लागतो. तिथं तुम्ही रामकथा, शाफुआ, शिवाजी अशा सार्‍यांचा बळी देता. इतकं करून शूर झालो आहोत असं समजता, पण इतकंच करून स्वतःला सुरक्षित समजता आलं तरी पुरे, अशी अवस्था आहे तुमची.

हे 'रामराज्य' आहे, आणि आता असं चालणार नाही, असं म्हणत असाल, तर तुम्ही फार छोटे आहात, क्षुद्र आहात. काळाच्या भव्य पटावर या पोरांची जितकी नोंद घेतली जाईल, त्याच्या सहस्त्रांश पटही तुमची तिथं असणार नाही. मात्र रामकथा हजारो वर्षं टिकली तशी आणखी हजारो वर्षं टिकेल. नक्की कशासाठी अट्टाहास करत आहात ? रामकथा बुडेल, आणि रामायण भ्रष्ट होईल याची काळजी करणारे तुम्ही कोण? आणि रामायण टिकून राहावं, रामकथेचं (तुमच्या दृष्टीने असलेलं) पावित्र्य टिकून राहावं यासाठी तुम्ही काय केलं आहे?
----

'शाफुआ' असा विकृत पद्धतीने उल्लेख करणार्‍या लोकांच्या प्रत्येक वाक्याला उत्तर द्यावंसं वाटतं. पण त्यांच्या पातळीवर स्वतःला उfunction at() { [native code] }अरवता येत नाही. हे अट्टल लोक विशिष्ठ कारस्थान आणि अजेंडा घेऊन वारंवार पुढे येतात. दुर्लक्ष केलं तर उfunction at() { [native code] }तम म्हणायचं.

बाकी सारे मुद्दे वर अनेकांनी लिहिलेत, आणि म्हणायचं होतं ते त्या बीबीसीच्या व्हिडिओत त्या प्राध्यापकांनी नीट सांगितलं आहे. विद्यापीठ हे त्यांचं घर आहे. प्राध्यापकच असहाय असतील तर मुलांनी तिथं जाऊन काय करावं अशी तुम्हा लोकांची अपेक्षा आहे? शिकणं अणि प्रयोग करणं, आणि मग त्यातून पुन्हा शिकणं सोडून दांडगाई, आणि दंडूक्याला दंडूका- असं?

मला तर लाज वाटतेय. तुम्हाला वाटते का बघा.

साजिरा,
मस्त पोस्ट, १००% पटली.

> 'शाफुआ' असा विकृत पद्धतीने उल्लेख करणार्‍या लोकांच्या प्रत्येक वाक्याला उत्तर द्यावंसं वाटतं.
नका चिखलात उडी मारू !

हिंदू देवदेवता, हिंदू समाजाला आपले वाटणारे महापुरुष यांच्या बाबतीत लिबर्टी, pushing the envelope , creative freedom घेतल्याची अनेक उदाहरणे या चर्चेत समोर आली.
तशीच दुसऱ्या बाजूची आहेत का? दुसऱ्या बाजूला आपली वाटणारी दैवतं, त्यांनी ज्यांच्यावर कॉपीराईट सांगितला आहे आणि आधुनिक देवत्वच बहाल केलं आहे ते महापुरुष यांच्या बाबतीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून काही बोल्ड/वादग्रस्त गोष्टी केल्या गेल्या, दाखवल्या गेल्या आणि त्या अनुयायांकडून हिंसाचार किंवा लीगल कारवाई न करता स्वीकारल्या गेल्या अशी उदाहरणे आहेत का? कोणी काही उदाहरणे देऊ शकेल?( गांधी किंवा पंडित नेहरु नाही- त्यांना आता दोन्ही बाजूना कोणी वाली उरला नाही, त्यांच्या नावावर votes मागता येत नाहीत. )

कुठली दुसरी बाजू? या प्रकरणात नाटक करणारे, गोंधळ घालणारे, पोलीस, आणि मायबोलीवर आत्ता यावरून ही चर्चा करणारे बहुतांशी हिंदूच आहेत ना?
लीगल कारवाईचा काय मुद्दा आहे आणि? ती करायला 'दुसर्‍या बाजूला'च फक्त मुभा आहे का? हिंदूंनाही आहे ना?

7 February, 2024 - 01:32
>>>
शाफुआ हा कीवर्ड मिसिंग आहे. तो आला तर नीट उत्तर देण्याची व्यवस्था करता येईल.

साजिरा, पोस्ट आवडली.
व्हाईटहॅटनी शाहु फुले आंबेडकर इतके वेळा लिहुनही त्याचा रोख मला मुस्लिम/ ख्रिच्शन ... थोडक्यात नॉन हिंदू वाटत होता. पण हिंदू म्हणजे त्यांना सवर्ण म्हणायचं आहे. रामायणावर सवर्ण हिंदूंची मक्तेदारी. आणि दुसरी बाजू म्हणजे जे सवर्ण नाहीत ते. अर्थात शाहु महाराज, महात्मा फुले आणि आंबेडकर यांना दैवतासमान मानणारे.
कॉपीराईट, आधुनिक देवत्त्व आणि साजिरा तुमची पोस्ट वाचुन मला उलगडा झाला.
किळस आली. हे सिक च्या ही पुढचं काही आहे!

लीगल कारवाईचा काय मुद्दा आहे आणि? ती करायला 'दुसर्‍या बाजूला'च फक्त मुभा आहे का? हिंदूंनाही आहे ना?//

ऑ! म्हणजे तुमचा आक्षेप फक्त त्या परिषद च्या पोरांनी मारहाण केली यालाच आहे का? लीगल कारवाई ओके आहे का? मग प्रश्नच मिटला!

बांगडू, तुम्ही माझाच मुद्दा थोडक्यात आधीच मांडला होता, हे आता नीट बघितल्यावर कळलं..

चकितचंदू छानाय. आवडलेय. घर्षण फाराय. पण ठीक.

एक्झॅटक्ली अमित! थँक्स..

>>> म्हणजे तुमचा आक्षेप फक्त त्या परिषद च्या पोरांनी मारहाण केली यालाच आहे का? लीगल कारवाई ओके आहे का? मग प्रश्नच मिटला!

हा बघा मी पहिल्याच पानावर प्रश्न विचारला होता, ज्यावर पुढची पोस्ट तुमचीच आहे :
>>>
भारतात न पटलेल्या बाबींबद्दल अभिव्यक्त होण्याचे काही सांसदीय मार्ग आता उपलब्ध नाहीयेत का? एकदम हाणामारी का करावी लागते? आता भारतात लोकशाही/ कायदा आणि सुव्यवस्था नाहीये का? किंवा त्यावरचा विश्वास उडाला आहे का?
<<<

>>
ही नक्की काय भानगड असेल आता? 'नाममात्र' हिंदू काय असतं, आणि मग हे स्वतःला नक्की कोणते हिंदू समजतात? हे स्वतःला ज्या प्रकारचे हिंदू समजतात त्यासाठी काय करावं लागतं? यांनी काय असं वेगळं केलं आहे?
आणि हे 'वाटेल' काय असतं नक्की?
<<
महेश भट हा माणूस धर्माने मुस्लिम आहे. कुठल्याशा अज्ञात कारणाने महेश हे नाव आणि भट हे आडनाव त्याने कायम ठेवलेले आहे. कदाचित त्याचा नेम ब्रँड ह्या नावाचा आहे म्हणून किंवा काही कायदेशीर कारण आहे म्हणून.
जेव्हा ह्याने दुसरे लग्न केले तेव्हा त्याने मुस्लिम धर्म स्वीकारला होता.

ह्या माणसाला अस्सल धार्मिक मुस्लिम कार्यक्रमात सश्रद्ध मुस्लिमाला शोभेल असे भाषण करताना ऐकलेले आहे. एकंदरीत ह्याची भूमिका ही टोकाची हिंदू विरोधी आणि मुस्लिम धार्जिणी राहिलेली आहे. पण अधिकृत माहिती असेच सांगते की ह्याने मुस्लिम धर्म स्वीकारला आहे. त्यामुळे त्याचे नाव सोडल्यास तो मुस्लिमच आहे.

नाममात्र हिंदू बनण्याकरता काय करावे लागते? सोपे आहे. अधिकृतरित्या इस्लाम स्वीकारायचा आणि नाव मात्र हिंदूच राखायचे.

>>> दुसरी बाजू म्हणजे जे सवर्ण नाहीत ते. अर्थात शाहु महाराज, महात्मा फुले आणि आंबेडकर यांना दैवतासमान मानणारे.
खरं की काय? खरंच रामाला किती अभिमान वाटेल आजच्या हिंदूंचा!

अमितव ,तुम्ही काहिही विकृत लिहिलंय. सवर्ण नॉन सवर्ण असं मला अजिबात अभिप्रेत नाहीए.
इथे असे अनेक लोक नाहीयेत का? जे अगदी जन्माने ऑन पेपर ब्राम्हण किंवा तत्सम आहेत. पण नास्तिक आहेत. ते राम मानत नाहीत. पण पुरोगामी icons ना मानतात. तर मग तिथे liberty, pushing the envelope करत नाहीत का? तशी उदाहरणे सांगता येतील का कट्टर हिंदू लोकांना दाखवता येतील की बघा- अशी असते सहिष्णुता.

सश्रद्ध मुस्लिमाला शोभेल असे भाषण
>>>
सश्रद्ध हिंदूला शोभेल असे भाषण करायला हवं होतं त्याने, बरोबर? ते कसं असतं, याचे काही नियम, नॉर्म्स, रेग्युलेशन्स? कुणी ठरवले? (तुम्ही ठरवले असतील याची खात्री आहे.)

हायला तुम्हा लोकांच्या नक्की श्रद्धा असतात की गायी? पाहिजे त्या दावणीला बरोबर वेळेला नेऊन उभ्या करायला??

कमाल आहे! कालपासून व्हाइटहॅट नी आमच्या देवतांचा या नाटकात अपमान झाला तसे एखादे नाटक "त्यांच्या" फुले आंबेडकर यांचे कपडे घालून कराल का असे ४ दा तरी लिहिले होते! त्यांच्या दृष्टीने "आम्ही वि. ते" म्हणजे "सवर्ण विरुद्ध नॉन सवर्ण" असेच म्हणायचे आहे असे वाटले मला तरी.
नाहीतर मग राम -सीतेऐवजी जीझस / पैगंबर वापराल का असे वगैरे लिहिले असते ना त्यांनी.

>>
सश्रद्ध हिंदूला शोभेल असे भाषण करायला हवं होतं त्याने, बरोबर? ते कसं असतं, याचे काही नियम, नॉर्म्स, रेग्युलेशन्स? कुणी ठरवले? (तुम्ही ठरवले असतील याची खात्री आहे.)
<<
उगाच वाकड्यात का शिरता? सश्रद्ध मुस्लिम म्हणजे कुराण, हदिस आणि सुन्नत ह्या तीन गोष्टी ज्या इस्लामच्या पाया समजल्या जातात त्याविषयीचे सखोल ज्ञान असलेला आणि श्रद्धा असणारा मुस्लिम.
जर कुठल्याशा हिंदू तत्त्वज्ञान, विचार, पंथ ह्याचे सखोल ज्ञान असणार्याला आणि त्यावर श्रद्धा असणार्याला मी सश्रद्ध हिंदू मानतो.
ह्या मांडणीत काय गैर आहे?

शिवाय महेश भट ने अधिकृत रित्या इस्लाम स्वीकारलेला आहे अशी माहिती उपलब्ध आहे. याउपर आणखी काय हवे?

कोणी सांगावं, रामराज्यात नाटकासिनेमांतले व्हिलन्स दुसर्‍या धर्मातलेच दाखवावेत आणि प्रोटॅगोनिस्ट सवर्ण हिंदूच असा फतवा निघेलही.

>>
कमाल आहे! कालपासून व्हाइटहॅट नी आमच्या देवतांचा या नाटकात अपमान झाला तसे एखादे नाटक "त्यांच्या" फुले आंबेडकर यांचे कपडे घालून कराल का असे ४ दा तरी लिहिले होते! त्यांच्या दृष्टीने "आम्ही वि. ते" म्हणजे "सवर्ण विरुद्ध नॉन सवर्ण" असेच म्हणायचे आहे असे वाटले मला तरी.
नाहीतर मग राम -सीतेऐवजी जीझस / पैगंबर वापराल का असे वगैरे लिहिले असते ना त्यांनी.
<<
डाव्या विचारांच्या लोकांनी फुले आंबेडकर शाहू आणि शिवाजी (त्यांचे गोब्राह्मणप्रतिपालक वगैरे वगळून, आणि ज्याच्या सैन्यात ९९% मुस्लिम सैनिक होते असला, मशिदी बांधणारा, कुराण वाचणारा शिवाजी ) आमचे आहेत असे ठरवले आहे. राम कृष्ण वगैरे बामणी लोकांचे म्हणून त्याज्य आहेत. तुकाराम आमचा पण रामदास नाही. अशी ही मांडणी आहे.
ह्या लोकांना राम कृष्ण, रामायण, महाभारत ह्यांची विटंबना केली तर ती चालते. अभिव्यक्तीस्वातंत्र्य वगैरे नावाखाली ती सगळ्यांनी स्वीकारावी असा त्यांचा आग्रह असतो. मात्र त्यांचे मानबिंदू मात्र पवित्र, त्यांची विटंबना, त्यांच्यावर टीका म्हणजे जातीयवाद, भटी बामणवाद असे मानले जाते. आणि त्यावर तुटुन पडायचे असते. मग अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे गेले तेल लावत. अशी रोखठोख भूमिका असते.
इथे सवर्ण आणि दलित अशी विभागणी नसून डावे आणि उजवे अशी विभागणी आहे.

त्यांच्या दृष्टीने "आम्ही वि. ते" म्हणजे "सवर्ण विरुद्ध नॉन सवर्ण" असेच म्हणायचे आहे असे वाटले मला तरी.//

बापरे! चला त्यानिमित्ताने clarify करता आलं. हे असं काहीही नाही. आता हे वरचे कुलकर्णी. ते स्वतः सवर्ण आहेत असं सांगतात पण "आम्ही" मध्ये म्हणजे रामभक्त हिंदू लोकांमध्ये मी त्यांना चुकूनही धरणार नाही. ते समोरच्या बाजूला. आणि जे रामाला मानणारे लोक आहेत ते सगळे एका बाजूला मग ऑन पेपर जात धर्म काहीही असला तरी काय फरक पडतो.
तर या समोरच्या बाजूच्या लोकांना प्रश्न आहे की तुमच्या icons च्या बाबतीत creative liberty घेऊन offensive content बनवलाय का तुम्ही? आहेत का उदाहरणे?का फक्त हिंदू देवता हेच तुमचं टार्गेट असतं?

स्वतः सवर्ण आहेत असं सांगतात पण "आम्ही" मध्ये म्हणजे रामभक्त हिंदू लोकांमध्ये मी त्यांना चुकूनही धरणार नाही.

रामभक्त हिंदू म्हणजे कोण हे gatekeeping कशाच्या आधारावर ? 'जय श्रीराम' च्या जयघोषात बलात्कारी लोकांचे स्वागत करण्याला मी विरोध करतो म्हणून 'रामभक्त क्लब' मधून माझी हकालपट्टी ? येस सरासर अन्याय है मिलॉर्ड !

>>> ते स्वतः सवर्ण आहेत असं सांगतात पण "आम्ही" मध्ये म्हणजे रामभक्त हिंदू लोकांमध्ये मी त्यांना चुकूनही धरणार नाही
तुम्ही कोणाला धरता यावरून कोण हिंदू हे ठरत नाही हे हिंदू धर्माचं सुदैव! Lol

तुम्ही पुरोगामी तर नक्कीच आहात ना? मग देवत्वच्या लेव्हलला असलेल्या पुरोगामी icons चं केलंय का offensive चित्रण तुम्ही? किंवा इतरांनी? मी इतक्या वेळा उदाहरणे मागीतली तर एकही उदाहरण दिलं गेलेलं नाहीये. Hence proved.

Hence proved >>> ??
इथे प्रूव्ह इतकेच होते आहे की :
"ते स्वतः सवर्ण आहेत असं सांगतात पण "आम्ही" मध्ये म्हणजे रामभक्त हिंदू लोकांमध्ये मी त्यांना चुकूनही धरणार नाही " >>> म्हणजे तुमच्या दृष्टीने रामभक्त हिंदू = सवर्ण !!

तुम्हीही 'सतत'च्या अन्यायाचं उदाहरण दिलेलं नाहीत अजून. मी पर्सनली म्हणाल तर रामाचंही ऑफेन्सिव चित्रण केलेलं नाही, आणि मला कोणाचंही ऑफेन्सिव चित्रण करण्यावरून हाणामारी करणं पटत नाही हेही स्पष्ट लिहिलं आहे.
पुरोगामी आयकॉन्स गेल्या काहीशे वर्षांतले आहेत - ते ताजा इतिहास आहेत, अजून आख्यायिका झाल्या नाहीत त्यामुळे त्यात तुलना होऊ शकत नाही हे तुम्हालाही कळायला अवघड असू नये.
मला पर्सनली पुलंवरचे सिनेमेसुद्धा ऑफेन्सिव वाटले होते. दारू पिताना दाखवल्यामुळे नव्हे, ओव्हरसिम्प्लिफिकेशन आणि वाईट अ‍ॅक्टिंगमुळे. पुलं माझं दैवत आहेत. मग मी त्यावरून हाणामारी करायची का?
हे सारखं 'त्यांनापण ऑफेन्ड करा ना' म्हणणं नाही म्हटलं तरी बालिशपणाचंच वाटतं बरं का!

हिंदू देवतांबद्दल काही आक्षेपार्ह सादर केलं म्हणून निषेध पेक्षा त्या इतरांच्या बद्दल असं काही नाही केलं म्हणूनच जास्त प्रॉब्लेम दिसतोय

नाही. या घटनेत अभिव्यक्तीस्वातंत्र्याबद्दल पुळका आलेले अनेक जण गेल्या काही वर्षांत जेव्हा इतर अशा घटना झाल्या तेव्हा सोयीस्कर मौन पाळत होते किंवा विक्टिम ब्लेमिंग करत हल्लेखोरांनाच पूरक भूमिका घेत होते असा त्यांचा मुद्दा आहे. शेंड्यांनाही बहुधा तेच म्हणायचे आहे.

आणि ते खरे आहे.

पण त्यावर हे त्यांनाच उद्देशून हे - हिंदू समाजात असा खुलेपणा पहिल्यापासून आहे. प्रत्येक वेळेस आवर्जून अपमान करणे या उद्देशाने या गोष्टी होत नसतात - ललित कला केंद्रातील विद्यार्थी तर असे करण्याची शक्यता फारच कमी आहे. पण एखादी कला सादर करताना असे स्वातंत्र्य घेता येणे हे फार महत्त्वाचे आहे. भारतात हिंदू व अमेरिकेत ख्रिश्चन हे दोन्ही समाज हे चालवून घेतात (ही दोन उदाहरणे देतोय कारण इतर ठिकाणचे मला इतके माहीत नाही). हा वीकनेस नाही. उलट ही चांगली गोष्ट आहे. इतर मागास समाज किंवा न्यूसन्स व्हॅल्यू असलेले लोक तसे वागत नाहीत म्हणून आपल्या चांगल्या गोष्टी का म्हणून बदलायच्या? त्यांना आपल्यासारखे व्हायचे असो वा नसो, आपण त्यांच्या लेव्हलला घसरायची काही गरज नाही. याचा अर्थ हे सगळे मान्य असावे, याचा रागच येऊ नये असे नाही. पण त्यावर जे कायदेशीर मार्ग आहेत ते सोडून झुंडशाहीचे समर्थन करणे मलातरी पटत नाही.

Pages