Submitted by स्वाती_आंबोळे on 5 February, 2024 - 09:11
ललित कला केंद्रातील विद्यार्थी सादर करत असलेलं एक नाटक हिंदू देवदेवतांचा अपमान करत असल्याचं कारण देऊन अभाविपच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडलं. नाटकाशी संबंधित असलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांना अटक करण्यात आलं.
सोशल मीडिआवरच्या पोस्ट्स वाचून मला इतकंच कळलं.
मला खालील प्रश्न पडले, कोणाला यासंदर्भात माहिती असेल तर कृपया सांगा:
त्या नाटकात नक्की अपमानास्पद असं काय होतं?
या प्रसंगी मारहाण झाली का? कोणी सुरू केली?
अटक कोणत्या कायद्याखाली झाली?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुण्यातल्या एखाद्या रस्त्याचे
पुण्यातल्या एखाद्या रस्त्याचे नाव प्रभू रामचंद्र पथ ठेवले आणि त्यावर खड्डे पडले किंवा सिग्नल तोडले, अतिक्रमण केले तर हिंदूंच्या भावना दुखावल्या जातील. आणि पै मुहम्मद रास्ता ठेवले तर मुसलमानांच्या. प्रयत्न करून पाहायला पाहिजे.
निव्वळ बोलण्यातून आणि शांततेत
निव्वळ बोलण्यातून आणि शांततेत विषय मिटला असता. सादरीकरण करणारी पोरं चुकली आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर वैधानिक मार्ग वापरून त्यांना समज देता आली असती. राडा घालण्याची काहीही आवश्यकता नव्हती. >> मी तर याच्याशी सुद्धा पूर्ण सहमत नाही. सरकारी यंत्रणा सोडून इतरांना या मुलांना "समज" देण्याचा अधिकार कोणी दिला? त्यांनी कोणता कायदा मोडला आहे असे विद्यापीठातील इतरांना वाटले तर आधी पोलिसांना गाठायचे? विद्यापीठाची पोलिस चौकी कॅम्पस मधे कोठूनही गाडीने पाच मिनिटावर आहे.
पूर्वी देशद्रोही ई. काँग्रेस सरकारने काही केले नसते पण आता तर केंद्र, राज्य, शहर सगळीकडे आपलेच सरकार आहे ना?
मी १००% अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने आहे हे वेगळे सांगत नाही. वरती इतर सगळी "त्यांची" उदाहरणे आहेत तेथेही माझे हेच मत आहे. त्याला मर्यादा/अपवाद आहेत हे मलाही माहीत आहे. पण या मर्यादा/अपवाद कोणीही उठून स्वतःचे लॉजिक वापरून ठरवायचे नसतात. कोणते "स्वातंत्र्य" आहे आणि कोणता "स्वैराचार" हे रॅण्डम लोकांनी ठरवायचे नसते. किंवा स्वतःपुरते खुशाल ठरवावे पण इतरांवर बंदी आणायची नसते. कायद्यात असली काही मुभा नाही.
अजून एक महत्त्वाचे. त्यांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य मान्य आहे म्हणजे ते करतात ते मान्य आहे/आवडते असे नव्हे. सीतेच्या वेषातील व्यक्ती बिडी फुकताना मलाही आवडणार नाही. पण त्यांना त्यांचे मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे. सर्वांचे स्वातंत्र्य अबाधित असावे म्हणून अशा गोष्टीही दुर्लक्षित कराव्या लागतात.
अशा घटनांवर तीन प्रकारच्या प्रतिक्रिया येतातः
१. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या बाजूने जे कायमच असतात, कसलाही धर्म/समूह स्पेसिफिक कॅव्हिअॅट न लावता. मी स्वतःला यात समजतो.
२. प्रत्येकाची होली काऊ वेगळी असते. कोणाचा सपोजेड अपमान केला आहे त्यानुसार राग येणारे वेगळे असतात. मग अशा वेळेस "स्वातंत्र्य वगैरे सगळे ठीक आहे, पण..." असे पालूपद लावून अशा हल्ल्यांचे समर्थन केले जाते. आज राम, सीता असल्याने भाजपवाले आहेत. उद्या दुसरी दैवते असतील तेव्हा हीच टेप इतर वाजवतील. इव्हन त्यात आज अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा पुळका आलेलेही बरेच असतील. यांचा आजचा पुळका फेक आहे.
३. कोणाच्याच दैवतांची निंदा नको म्हणणारे. हे अती इनोसंट लोक आपणहून आपली स्वातंत्र्ये काढून द्यायला तयार आहेत. त्याची त्यांनाच कल्पना नाही. यांना नीट सांगायची गरज आहे. पण हे लोक फेक नाहीत. निदान त्यांचा राग कन्सिस्टंट आहे.
तुम्ही इस्लाम तर सोडाच, दूरच
तुम्ही इस्लाम तर सोडाच, दूरच राहू दे- इव्हन पुरोगामी महापुरुषांबद्दल जराही लिबर्टी घेतल्यास लीगल कारवाई, हिंसक जमावाचा हल्ला, शाइफेक असं काहीही होऊ शकतं.
>>>>>>
हे फक्त भारतातच होते.
पाश्चात्य देशात नाही होत.
काही जण जे इथे अभिव्यक्ती
काही जण जे इथे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू घेता आहेत तेच दुसरीकडे त्याच्या विरोधात दिसतील.
ॲनिमल किंवा तत्सम चित्रपटात जे दाखवले जाते ते सेन्सॉर ने मान्य केले आहे. मग तरीही त्या कलाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला बोल करून त्या चित्रपटावर टीका करणे हे प्रकार फक्त भारतातच होतात. भारतीयांना प्रत्येकाचे विचार वेगळे असतात हे स्विकारता येत नाही.
टीका करणे म्हणजे
टीका करणे म्हणजे स्वातंत्र्यावर घाला नाही.
सिनेमा करू नका म्हणणे किंवा बंद पाडणे हा स्वातंत्र्यावर घाला.
अभिव्यक्ती स्वतंत्र आणि
अभिव्यक्ती स्वतंत्र आणि स्वैराचार ह्या मधील सीमारेषा अदृश्य आहे त्याची कोणतीच व्याख्या अस्तित्वात नाही.
ही सीमारेषा कुठे चालू होते आणि कुठे संपते ह्याची जाणीव प्रत्येकाची वेगळी असते.
त्या मुळे गैर समजातून वाद होतात असा अर्थ घ्यायचा का?
म्हणजे त्या मुलांनी जी कलाकृती सादर केली ते त्यांचे अभिव्यक्ती स्वतंत्र होते त्यांनी सीमारेषा ओलांडून स्वैराचार केला नाही.
असं समजायचं का?.
कायद्यात अभिव्यक्ती स्वतंत्र कुठे संपत आणि स्वैराचार कुठे चालू होतो ह्याची व्याख्या नाही कायदेशीर कारवाई पोलिस नक्की कोणत्या आधरवरून करणार .
आमच्या भावना दुखावल्या अस लोकांनी व्यक्त केले नाही तर.
इथे पण एकदुसऱ्या व्यक्तीच्या भावना दुखवल्या असतील तर जास्त गंभीर कोणी घेत नाही.
समाजाच्या खूप मोठ्या भागाच्या भावना दुखावल्या असे दिसले पाहिजे .
म्हणून मोर्चे,घोषणा, निषेध एकत्र येवून केला जातो.
तेव्हा पोलिस ना कारवाई करायला कारण मिळते.
त्या मुळे वैधनिक मार्ग निवडायची स्थिती पाहिली निर्माण करावी लागते.
असा विचार त्या ग्रुप च्या लोकांच्या मनात असतो.
असे मला वाटत
तरुण पिढीतील मुले animal
तरुण पिढीतील मुले animal सारखे चित्रपट बघून शिट्ट्या आणि टाळ्या मारत आहेत हे काहीना चिंतेचे कारण वाटते.
चिंता आपल्या जागी योग्य असेलही. पण कोणी काय बघावे आणि कोणाला काय आवडावे हे आपण नाही ठरवू शकत ना..
लोकांनी काय बघायला हवे यासाठी सेन्सॉर बोर्ड बनवला आहे. त्यांनी जर एखादा चित्रपट पास केला तर मग त्या चित्रपटावर किंवा त्यातील कलाकारांवर, दिग्दर्शकावर टीका करायचा आपल्याला काही हक्क उरत नाही.
म्हणून मी काल विचारले होते की हे जे काही नाटक होते ते सेन्सॉरने पास केलेले होते का?
तर उत्तर मिळाले नाही. तशी तरतूदच नव्हती.
माझ्या आठवणी प्रमाणे असाच एक सनी देओलचा चित्रपट होता. ज्यात भगवान शंकरच्या गेट अप मधील कलाकार शिव्या देताना दाखवला म्हणून वाद झाले होते. पुढे काय झाले कल्पना नाही.
चित्रपटाचे नाव बहुतेक मोहल्ला अस्सी. कोणाला काही कल्पना काय केले त्या सीनचे?
हक्क उरत नाही हे कोणी ठरवले
हक्क उरत नाही हे कोणी ठरवले आणि सांगितले? प्रत्येक कलाकृतीवर टीका होऊ शकते, व्हावी.
टीका करण्याचा हक्क नसणे हा पुन्हा स्वातंत्र्यावर घाला आहे.
वरचे तीन ही लोक स्वतः विचार
वरचे तीन ही लोक स्वतः विचार करतात हे काय कमी आहे! याहून एक प्रचंड मोठा गट फक्त
4. शेफाली वैद्य, कोण ते सहा अक्षरी नाव वाले काका इ. ना झटकन पाठिंबा देऊन मोकळा होतो.
५. आणखी एक गट काय मिळेल ते पुढे ढकलतो. वाचायचे कष्ट ही घेत नाही. हे लोक माझे फेवरेट आहेत.
टीका करणे म्हणजे
टीका करणे म्हणजे स्वातंत्र्यावर घाला नाही.
>>>>>
बरोबर आहे. पण ही व्याख्या सोयीची नसावी.
बरेचदा लोकं कलाकृतीवर नाही तर कलाकारांवर देखील वैयक्तिक टीका करतात. अश्या कलाकृती जे बघतात त्यांच्यावर सुद्धा टीका करतात. आपल्या 18 वर्षाच्या सज्ञान मुलाने काय बघायला हवे हे देखील तेच ठरवतात आणि दुसऱ्यांच्या सज्ञान मुलांनी काय बघायला हवे याचीही उठाठेव करतात. बॉयकॉट बॉलीवूड यातूनच आले आहे.
त्यांना काय हवं ते करू द्या,
त्यांना काय हवं ते करू द्या, तुम्ही लोकांना टीका करण्याचा हक्क नाही, हा समज मनातून काढून टाका.
>>त्यांनी जर एखादा चित्रपट
>>त्यांनी जर एखादा चित्रपट पास केला तर मग त्या चित्रपटावर किंवा त्यातील कलाकारांवर, दिग्दर्शकावर टीका करायचा आपल्याला काही हक्क उरत नाही.>> अरे असं कसं! टीका करायचा हक्क कायमच असतो. आणि असलाच पाहिजे. ते कोण लागून राहिले?
तो बंद पाडायचा हक्क नाही. पण लक्तरे काढायचा हक्क का बरं नाही?
अहो टीका करणे म्हणजेच अश्या
अहो टीका करणे म्हणजेच अश्या कलाकृतींना विरोध करत त्या बंद पाडायला बघणे. त्या साठी हातात दगड घेऊन जायची गरज नाही. हल्ली बॉयकॉट ट्रेण्ड चालवणारे सुद्धा यातच आले.
माझा अजून एक प्रश्न आहे
माझा अजून एक प्रश्न आहे
जिथे हे नाटक दाखवले गेले तेथील सर्व प्रेक्षक वर्ग सज्ञान होता का? 18 वर्षे पूर्ण होता का? तसे चेक केले होते का?
प्रश्न अडचणीचा वाटला तर पास करू शकता..
हा हक्क प्रत्येकाला आहे.
नाटक थोडं पाहिलं.कंटेंट
नाटक थोडं पाहिलं.कंटेंट म्हणून फार खास वाटलं नाही.
यापूर्वी असे प्रयोग यदा कदाचित आणि वस्त्रहरण मध्ये झालेत.नरम गरम(जुना) मध्ये शत्रुघ्न सिन्हा लक्ष्मणाला मारहाण करताना दाखवला आहे.घरोन्दा मध्ये राम नाटक थांबवून गॅस बत्ती ला हँडल मारताना दाखवला आहे.पण सगळे काही तितके चांगले कंटेंट रायटर आणि दिग्दर्शक नसतात.हे शिवधनुष्य आहे.
एक विषय म्हणून पौराणिक नाटकातले कलाकार असं काही सामान्य आयुष्यातलं करताना दाखवणे ही कल्पना फार विनोदी आणि कोणालाही मोह पडण्या सारखी आहे.पीके मधला सीन थोडा खटकला होता.मुळात चित्रपटात हल्ली उठसूट पुरुष युरिनल्स मधले सिन दाखवतात काहीं करून(शेजारी उभं राहून विधी उरकत गप्पा) ते अतिशय डोक्यात जातात.
या मुलांनी नक्की एक नवा विषय म्हणून नाटक केलंय का बिग बॉस स्ट्रॅटेजी ने वादग्रस्त कंटेंट वापरून जास्त लवकर प्रसिद्धी मिळेल या उद्देशाने केलंय हा विचार करण्याचा मुद्दा आहे.सध्याचे विचार प्रवाह माहीत असताना, सोशल मीडिया मुळे पटकन भावना भडकणे हे सर्व माहीत असताना मुद्दाम परीक्षेत असे नाटक सादर का करावे?
सर्वच प्रकारच्या झुंडशाहीपुढे
सर्वच प्रकारच्या झुंडशाहीपुढे सरकार झुकते याचा हा परिपाक आहे. मग ते सरकार कुठ्ल्याही पक्षाचे असो आणि झुंड कुठल्याही धार्मिक, जातीय, सामाजिक, आर्थिक वर्गातील घोळक्याची असो. त्यामुळे हे प्रकार माजले आहेत आणि त्यांना मिळणारे देशव्यापी समर्थनही. आधी सरकार एका झुंडीपुढे झुकते. न्याय आणि यंत्रणा झुंडीपुढे फिके पडतात. मग ज्यांना 'आपल्याला झुंडीत काही प्रतिनिधित्व नाही आणि त्यामुळे आपल्याला न्याय नाही' म्हणून फोमो येतो, असा समाज त्याच्या बाजूच्या झुंडीचे समर्थन करतो. यात आधीच्या झुकणार्या सरकारला दोष द्यावा तर नवीन सरकारने त्यात काही सुधारणा केली आहे का? तर ते ही नाही. सगळीकडे झुंडीच झुंडी झाल्यामुळे प्रशासनालाही काय करायचे कळत नाही. प्रशासन त्या झुंडीतूनच आलेले असते. लोकांनाही त्यांच्या बाजूची झुंड म्हणेल तोच निर्णय 'न्याय' म्हणून मिळावा असे वाटते. हवी कशाला न्यायपालिका? तशीही ही कूर्मगतीनेच चालते, त्यापेक्षा झुंड झट की पट निर्णय देऊन न्यायनिवाडा करते. आत्ता घटना घडली, पुढल्या क्षणाला झुंडीने निर्णय दिला, शिक्षा सुनावली आणि अमलात पण आणली. कमी झालेला अटेन्शन स्पॅन हा न्यायनिवाडा बघत बसण्यालाही लागू झाला असावा.
उपाय एकच वाटतो - सर्वच प्रकारची झुंडशाही कायद्याने मोडून काढावी. कागदोपत्री ते करणे अवघड नाही. पण सरकारला 'लोक(झुंड)शाही' व्यवस्थेत स्वतःचाच पाया डळमळीत होण्याची शक्यता असल्यामुळे ते शक्य दिसत नाही. मला तर वाटते की झुंडशाहीचा विरोध करणारा मी असेन तर या झुंडशाहीने शासित जगात जगायलाच नालायक आहे!
त्यांनी जर एखादा चित्रपट पास
त्यांनी जर एखादा चित्रपट पास केला तर मग त्या चित्रपटावर किंवा त्यातील कलाकारांवर, दिग्दर्शकावर टीका करायचा आपल्याला काही हक्क उरत नाही.>> फारएण्ड, पायस वगैरे लोकांच्या पोटावर पाय आणणारी कमेंट आहे ही
सर्वच प्रकारच्या झुंडशाहीपुढे
सर्वच प्रकारच्या झुंडशाहीपुढे सरकार झुकते याचा हा परिपाक आहे.
मी तर त्या पुढे जावून असे म्हणेन झुंडशाही केल्यावर च न्यात मिळतो.
नाहीतर तुमचे कोणी ऐकत नाही असा अनुभव लोकांच्या मागे असतो म्हणून झुंडशाही करण्याची वृत्ती बळावत आहे.
मराठा आरक्षणाचे बघा कायदेशीर मार्गाने कुणबी दाखले मिळणे आणि त्या नुसार आरक्षण मिळणे हा कायदेशीर मार्ग होता .
पण सरकार ल स्वतः हुन हा मार्ग अवलंबावा असे वाटले नाही.
जेव्हा लाखो चे मोर्चे निघाले तेव्हाच सरकार जागे झाले म्हणजे झुंडशाही समोर झुकले की झुंडी मुळे न्याय मिळाला .
नक्की काय अर्थ घेणार
मी कलेवरच्या किंवा
मी कलेवरच्या किंवा कलाकृतीच्या टिकेबद्दल बोलताच नाहीये.
तर असे चित्रपट बनालेच नाही पाहिजेत, कोणी बघितलेच नाही पाहिजेत म्हणून त्याला विरोध करून बॉयकॉट ट्रेण्ड चालवणे याबद्दल बोलत आहे.
त्यांना काय हवं ते करू द्या,
त्यांना काय हवं ते करू द्या, तुम्ही लोकांना टीका करण्याचा हक्क नाही, हा समज मनातून काढून टाका.>> चपखल.
बायकॉट बॉलिवूड ट्रेंड्स हे हे टीकेचे स्वातंत्र्य आहे म्हणुन आलेले नाहीत. तर दाखवण्याचे स्वातंत्र्य मान्य नाही यातुन आलेले आहेत.
सोशल मीडिया मुळे पटकन भावना
सोशल मीडिया मुळे पटकन भावना भडकणे हे सर्व माहीत असताना मुद्दाम परीक्षेत असे नाटक सादर का करावे?
>>>>
हाच तो खोडसाळपणा ज्याची शक्यता मी पहिल्याच पोस्ट मध्ये नमूद केली आहे.
बहुधा हा स्टंट कसा घडेल हेच अपेक्षित असावे.
किंवा ठरवून सुद्धा घडवला गेला असेल.
मला वाटते हेतू काय आहे हे मॅटर करते..
ABPच्या एका क्लिपमध्ये ‘ नाटक
ABPच्या एका क्लिपमध्ये ‘ नाटक करणाऱ्यांना अटक झाली. आता यापुढे काय घडणं तुम्हाला अपेक्षित आहे?’ असा प्रश्न अभाविपच्या कार्यकर्त्यांना विचारला गेला. त्यांना उत्तर देता आलं नाही. इतका दूरगामी आणि सम्यक विचारच या कृतीमागे नव्हता, फक्त गोंधळच घालायचा होता असं दिसलं.
सोशल मीडिया मुळे पटकन भावना
सोशल मीडिया मुळे पटकन भावना भडकणे हे सर्व माहीत असताना मुद्दाम परीक्षेत असे नाटक सादर का करावे?
-
का करू नये?
मुद्दाम केले का निष्कर्ष का?
>>> सध्याचे विचार प्रवाह
>>> सध्याचे विचार प्रवाह माहीत असताना, सोशल मीडिया मुळे पटकन भावना भडकणे हे सर्व माहीत असताना मुद्दाम परीक्षेत असे नाटक सादर का करावे?
बरोबर आहे. बोटचेपेपणाचं ट्रेनिंग सर्वांनीच आपण होऊन घ्यायला हवं आहे, नाहीतर ते असं जबरदस्तीने मिळेलच.
मुद्दाम केले का निष्कर्ष का?
मुद्दाम केले का निष्कर्ष का?
>>>>
निष्कर्ष नाही शक्यता
दोन्हीत फरक आहे.
तशी शक्यता वर्तवण्याचा हक्क आहे ना इथे
पण कुठल्याही प्रकारचे
पण कुठल्याही प्रकारचे सेन्सॉरच नव्हते हे काही पटले नाही.
तसेच प्रेक्षक वर्ग 18 वर्षे पूर्ण सज्ञानच होता का याबद्दल सुद्धा कोणाला इथे खात्रीने सांगता येत नाहीये.
कुठल्या इयत्तेची मुले होती?
परीक्षेला सेन्सॉरची गरज असते
परीक्षेला सेन्सॉरची गरज असते का? हे म्हणजे आपले इयत्ता दहावीचे पेपर (पोरांच्या उत्तर पत्रिका) कॉपीराईट कायद्याअंतर्गत तपासून आणि सेन्सॉर पास करून मगच
तपासण्यापैकीलिहू देण्यापैकी आहे.सर्व सज्ञान होती.
सर्व सज्ञान होती.
हे म्हणजे आपले इयत्ता दहावीचे
हे म्हणजे आपले इयत्ता दहावीचे पेपर कॉपीराईट कायद्याअंतर्गत तपासून
>>>>
नाटक म्हणजे प्रश्न पत्रिका नाही उत्तर पत्रिका झाली ना..
सर्व सज्ञान होती.
सर्व सज्ञान होती.
..
ओके. नोटेड
Pages