ललित कला केंद्रात नक्की काय झालं?

Submitted by स्वाती_आंबोळे on 5 February, 2024 - 09:11

ललित कला केंद्रातील विद्यार्थी सादर करत असलेलं एक नाटक हिंदू देवदेवतांचा अपमान करत असल्याचं कारण देऊन अभाविपच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडलं. नाटकाशी संबंधित असलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांना अटक करण्यात आलं.

सोशल मीडिआवरच्या पोस्ट्स वाचून मला इतकंच कळलं.

मला खालील प्रश्न पडले, कोणाला यासंदर्भात माहिती असेल तर कृपया सांगा:

त्या नाटकात नक्की अपमानास्पद असं काय होतं?
या प्रसंगी मारहाण झाली का? कोणी सुरू केली?
अटक कोणत्या कायद्याखाली झाली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चकितचंदू च्या अफाट यशानंतर येत आहेत.
बाधितबंडू , थकितठकू, लज्जीतलाजू, रंगीतरघू

( चकलो होतो खरंच )

मामी, तू त्या पोस्टमधला मुद्दा समजण्याइतकी सूज्ञ नक्की आहेस, मग हा विपर्यास का? मी पुढे 'बाकी राम, सीता, सावित्री, जोतिबा, भीमराव, मोहम्मद, येशू, मोझेस यांतलं आणि यांपलीकडचं कुठलंही नाव आलं तरी माझे मुद्दे तेच असणार आहेत.' असंही स्पष्ट केलंय. >>> मला नाही वाटत मी कुठेही विपर्यास केला आहे. असो.

वर मैत्रेयी म्हणतेय तसं अपमान आणि भावना दुखावणे हे सब्जेक्टिव आहे त्यामुळे एखाद्या व्यक्तीला जे कलाविष्कार स्वातंत्र्य राम, सीता, सावित्री, जोतिबा, भीमराव, मोहम्मद, येशू, मोझेस या सर्वांच्या बाबतीत अपेक्षित आहे ते त्या व्यक्तीनं घेतलं तर ते एखाद्या गटाच्या पचनी पडलं नाही तर (वर कोणीतरी चपखल शब्द वापरला आहे तो वापरते) चकीतचंदू होऊ नये. शिवाय मला वाटतं कोणत्याही घटनेचं सरसकटीकरण करणं टाळायला हवं. उदा, आता सगळा हिंदू समाज उलटा प्रवास करू लागलाय इ फिअर माँगरिंगही टाळायला हवं.

या नाटकाच्या विषयाची निवड चुकली नाही तर वेळ चुकली असं मला वाटतं. मंदिर निर्माण झाल्यावर काही ठराविक आणि अपेक्षित गटांकडून समाज माध्यमांत ज्या प्रकारच्या निगेटिव्ह प्रतिक्रीया आल्या त्यामुळे आधीच लाकडं चुलीत घातली होती त्यात काडी टाकली गेली असं झालं असावं. बरं तर बरं छोट्या प्रमाणावर झालं. समाजाच्या भावना समजून घेण्याची कुवत, प्रगल्भता आणि समजुतदारपणा या नाटक मंडळींना हवा होता. वर म्हणे आपले लोकं लाठ्या काठ्यांसह बसवले होते. याचा अर्थ काय लावायचा?

मग मी आधी जो प्रश्न विचारला तोच पुन्हा विचारते - भारतात लोकशाही, कायदा आणि सुव्यवस्था उरलेली नाही, की लोकांचा त्यावर विश्वास उरलेला नाही? >>> हे तुम्ही कोणत्या बाजूनं बघता त्यावर अवलंबून आहे. आपल्याला अपेक्षित घटना घडल्या नाही तर लोकशाही, कायदा, सुव्यवस्था नाही असा अर्थ काढला जातो. ते तुमचं मत - जे तुमच्यासाठी बरोबरच असू शकतं आणि दुसर्‍या बाजूच्या लोकांना न पटणारं असतं. it is as simple as that. माझ्यामते भारतातली लोकशाही, कायदा, सुव्यवस्था आतापर्यंत एकदाच धाब्यावर बसवली गेली होती. बाकी सब चंगा जी!

शिवाय मला अजून तू किंवा कोणीही 'आमच्या देवांना सतत हास्यास्पद दाखवतात' याचंही उदाहरण दिलेलं नाही. जी उदाहरणं आली आहेत ती (वस्त्रहरण इ.) उभयपक्षी आवडलेल्या कलाकृतींची होती. >>> अगदी एकास एक उदाहरणं दिली तरी ती पटतीलच असं नाही याची मला कल्पना आहे आणि ते ठीकच आहे. एक लेख हाताला लागला जरा गुगलल्यावर तो देत आहे. जरा जुना आहे. कदाचित काही गवसेल तुला. नाही गवसलं तरी ठीकच. https://shivamrawat1995.medium.com/mocking-hindu-gods-and-deities-hindu-...

Lol स्वाती.

>>> आपल्याला अपेक्षित घटना घडल्या नाही तर लोकशाही, कायदा, सुव्यवस्था नाही असा अर्थ काढला जातो
नाही, न पटलेल्या गोष्टींवरून एकदम हाणामारी, तोडफोड झाली म्हणून तसा अर्थ काढला जातो.

नाही, न पटलेल्या गोष्टींवरून एकदम हाणामारी, तोडफोड झाली म्हणून तसा अर्थ काढला जातो. >> एका घटनेवरून एकदम संपूर्ण भारताकरता extrapolation? Well, that is fear mongering.

विरोध होईल म्हणून विद्यार्थी लाठ्या-काठया घेवून आले होते असे वाचले त्यावरुन मला पडलेला प्रश्न -
परीक्षेसाठी सादर केलेल्या नाटकाच्या तयारीच्या वेळीच याला विरोध होवू शकतो याची कल्पना आली असताना विद्यापिठाने परीक्षा सुरळीत पार पडावी म्हणून पोलीस संरक्षण मागितले होते का? मागितले असल्यास मिळाले का आणि मागितले नसल्यास का नाही?
कॉलेजमधील मुलांनी परीक्षेसाठी म्हणून बसवलेले नाटक, ते कसलाही गैर प्रकार न होता सादर करता येणे, त्याचे योग्य ते मूल्य मापन होणे हे गरजेचे होते. त्यासाठी योग्य ती पावले व्यवस्थापनाने उचलायला हवी होती. विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधींशी याबद्दल बोलणे, संहिता समजावून सांगणे वगैरे केले होते का कळायला मार्ग नाही.
भारतीय घटना आणि कायद्यानुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून जे मान्य आहे ते त्याचा विचार करुन मॅनेजमेंटला ही परीक्षा वेगळ्या पद्धतीने हाताळता आली असती का?

मामी, वरचा लेख अगदीच बाळबोध आहे.
भागवतात कृष्णाच्या ऑर्गीची वर्णनं वाचली की ग्रोन अप पोर्नॉग्राफी झक मारेल!
इतर एक पीकेचं उदाहरण सापडलं एक. मग सगळं जनरलायझेशनच जनरलायझेशन. असंच होतं... कुठे होतं कधी झालं? उत्तर: नेहेमीच तर होतं. बस्स!

>>> एका घटनेवरून एकदम संपूर्ण भारताकरता extrapolation? Well, that is fear mongering.

मान्य आहे, मी नीट लिहिलं नाही. हाणामारी/तोडफोड झाली हा एक भाग - पण सोशल मीडियावर आणि वर आलेल्या यूट्यूब व्हीडिओजवरही बहुतांश प्रतिक्रिया 'बरी खोड मोडली' (हा सभ्य अनुवाद आहे) अशाच दिसल्या. यात माझीच मित्रमंडळीही आहेत.
कोणीही 'अरे हाणामारी का करता' असं लिहिलेलं दिसलं नाही हे अधिक कन्सर्निंग वाटलं. असं वाटणार्‍या सर्वांना मुलांनी कायदा हातात घेतला यात काही गैर वाटलं नाही, याचा अर्थ सांसदीय मार्गांवरचा त्यांचा विश्वास उडाला आहे असं समजायचं का?

अभिव्यक्तीस्वातंत्र्य भारतात तरी अमर्याद नाही हे आधीही लिहीले आहे.
लोकांना कळते कुणाच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यामागे काय हेतू आहेत , असतात ते. फुले, शाहू, आंबेडकर यांनी त्यांच्या त्यांच्या काळात त्यांना त्रास झाला म्हणून प्रहार केले त्याचा राग ठेवून त्यांच्याबद्दल खोटे नाटे आम्हाला पसरवू द्या हा अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा अर्थ आहे काहींसाठी. बरेचदा त्रास झाला म्हणून हा भाग यांच्यासाठी सायलेण्ट /इरेज्ड असतो या लोभसवाण्यांसाठी.

आताच्या घटनेत कुणीही मुस्लीम नसताना उगीचच त्याबद्दल चर्चा कशाला ?
ज्या वेळी तशी घटना घडेल तेव्हां बघू. आताच्या लोकशाहीच्या राज्यात काही वास्तू पाडणे ही अभिव्यक्ती बजावता येतेय हे ही नसे थोडके.

मामी, वरचा लेख अगदीच बाळबोध आहे.
अगदी अगदी,
शंभर वर्षांपूर्वी अत्रेंनी लिहिलेल्या नाटकात श्री कृष्णाच्या १६००० बायकांचा विनोदी उल्लेख होता म्हणून अत्रे माटे वाद उफाळला होता. आजही असले वाद होतात, नवल आहे. हिंदू समाजाचे बाळबोधीकरण होत आहे. हा हंत हंत !

भागवतात कृष्णाच्या ऑर्गीची वर्णनं वाचली की ग्रोन अप पोर्नॉग्राफी झक मारेल! >>> असेल असेल. मी नाही वाचलंय. आपले देव सर्वमानवीगुणावगुणसंपन्न आहेत. Happy

त्या लेखात लिहिलेय त्याप्रमाणे दुसरा लेख फिरतोय सोमीवर, दोन एक वर्षांपासून. पिके, ओ माय गोडच नव्हे तर
बॉलिवूडने सतत हिंदु धर्मावर अन्याय केला, सुरवाती पासूनच व्हिलन नेहमी हिंदूच असतात आणि टिळा लावणारे दाखवले असतात वगैरे त्यात आहे.
पण त्या सगळ्यात हिरोही तर हिंदूच दाखवले आहेत ना.
त्या न्यायाने मग रामायणावर सुद्धा आक्षेप घेणार का रावणही तसा दाखवला म्हणुन.

आणि हिंदूंवर अन्याय झाला हे स्वातंत्र्यापासून म्हणत आहेत, त्यांनी कसे आपले मुस्लिम राष्ट्र घोषित केले, मग आपण हिंदुराष्ट्र का नाही? अनेक लोकांना हा अन्याय वाटतो.

बॉलिवूड अशा प्रकारच्या हिंदूंच्या धर्माची टवाळी करण्यात कायम पुढे असतो. आणि फक्त हिंदूंचीच. इतर धर्माला अगदी पवित्र सोज्वळ दाखवण्याची दक्षता घेतली जाते. हे विष हळूहळू भिनेल ह्याची काळजी घेतली जाते.
पारंपारिक, धोतर, टोपी घातलेला मारवाडी हा एक तर हलकट असतो किंवा आचरट विनोदी मूर्ख असतो. मात्र मुल्ला, फकीर हा कायम विचारी, अध्यात्म जपणारा, परमदयाळू असतो.
दुर्गा, काली, भवानी ह्या देवींची उपासना करणारा, भयंकर भडकलेले निरांजन घेऊन देवाची नित्य पूजा करणारा, प्रचंड आकाराचे गंध लावलेला अमरीश पुरी किंवा गुलशन ग्रोवर किंवा तत्सम माणूस हा भयानक क्रूर दाखवला जाईल ह्याची गॅरंटी आहे!
महेश भट ह्या हिंदू धर्माचा तिरस्कार करणारा, नाममात्र हिंदू वाटेल असा माणूस. त्याच्या सिनेमात काहीही कारण नसताना हिंदू देवतांची टवाळी केलेली आढळेल. जख्म सिनेमात लहानपणचा हिरो सिनेमाच्या स्टुडिओत मित्राबरोबर जातो तेव्हा मारूतीचे काम करणारे पात्र, शंकराचे पात्र ह्यांची अकारण टिंगल टवाळी करण्याचा प्रसंग घुसडला आहे. मूळ स्टोरीशी तसा काहीही संबंध नाही तरी.
शोले, दीवार ह्या सिनेमात हिंदू देवांची टिंगल किंवा त्यांच्या निष्क्रिय असण्याबद्दल तुच्छता, मात्र मुस्लिम ७८६ आकडा, इमाम ह्यांचे अशक्य उदात्तीकरण दाखवलेले आहे.
बहुतेक प्रेक्षक बाकी मनोरंजन होते आहे ना मग चालू दे असे म्हणत हे सगळे स्वीकारत आले आहेत आणि त्यातून काही पायंडे पडत आहेत.

मला वाटते अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे पूर्ण लेव्हल फील्ड असावे नाही तर प्रत्येक धर्माला आपल्या भावना दुखावल्या तर दाद मागण्याची सोय ठेवावी. निव्वळ काही लाडक्या लोकांनाच तो अधिकार देणे हे पटत नाही.

सोशलमिडीयावर तावातावाने वाद घालणारी बरीच जनता पुन्हा ढोंगी सेक्युलर आणि ढोंगी हिंदुत्ववादी यांच्या जाळ्यात फसत आहे.
विद्यार्थी त्यात फसले तर नवल नाही. पण दुख आहे.

भारतात अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि कायदा दोन्ही अबाधित आहे. ईतकेच नाही तर धर्म निरपेक्षता सुद्धा कायम आहे. दुर्दैवाने यातले काही नाहीये असे चित्र उभे केले जात आहे आणि लोकं एखाद्या घटनेवरून तेच गृहीत धरून चालले आहेत.

एखाद्या सकारात्मक धाग्याची आणि विचारांची गरज निर्माण झाली आहे.
कोणी काढेल का?

वरील ऋन्मेष ची पोस्ट म्हणजे प्रिव्हिलेज चे उदाहरण आहे.
मी अमेरिकेत सेटल आहे, माझ्याकडे प्रशस्त घर आहे, दोन कार्स आहेत म्हणजेच अमेरिकेत गरीबी वगैरे काही नाही.

हिंदूं ( मुबंईतील बर का!) ' गधेगळाची ' पूजा करतात. ते खटकत नाही संस्कृती रक्षकांना. देवीचे कोणी अनावृत्त चित्र काढले की ह्यांच्या भावना दुखावतात. गधेगळातील स्त्री सामान्य स्त्री असल्याने तिची पूजा केली जाते का?

शेरखान, रॉबर्ट, जॉन, लायन, मुख्तारभाई इ. इ. गाजलेली खलपात्रे हिंदू असल्यानेच त्यांची यथेच्छ बदनामी झाली.
तसेच अपुर्‍या स्कर्टमधल्या लिली,स्टेला, मेरी, मारिया, ज्युली इ.इ. स्टेनो, सेक्रेटरी या ही हिंदूच असल्याने मुद्दामच बदनामी केली असणार. या बॉलीवूडला सोरायसिस झालेला काळा घोणस चावावा.

चर्चा जोराते की.
जोवर डिटेल माहीत नाही तोवर काही बोलून फायदा नाही.
असो
ह्याच फॉरमॅट मध्ये ( म्हणजे अगदी असेच नव्हे, तर मोठ्या नेत्याचे काम करणारे कलाकार, त्यात झाशीची राणी, नेताजी असे स्वातंत्र्यवीर) मी लहान होतो तेव्हा एक "शोभायात्रा"नामक नाटक येउन गेले होते. दैनिक पुढारी मध्ये त्याचा रिव्ह्यू छान आलेला. कोणाला आठवतंय का?
सिमीलर फॉरमॅट मध्ये उपक्रम केलेला वाटतं मुलांनी.

यदाकदाचित युट्युब वर आहे.
जबरदस्त फार्सीकल विनोद आणि प्रचंड लवचिक डायलॉग होते त्यात. तत्कालीन राजकारणाची रेवडी उडवणारे नाटक. आता असले काही बहुतेक सादर करतात यायचे नाही मग. सर्वच पक्ष फार सेन्सिटिव्ह आहेत फार.

देवी देवतांचे वाजत गाजत पूजन केल्यानंतर लगेच कुण्या अभागी जीवाच्या नरड्याचा घोट घेणारा शेंडीधारी, धोतरधारी, टिळाधारी, नित्य काली मा, भवानी मा असल्या कुठल्या देवीचा जप करणारा खलनायक हिंदू धर्माची थोरवी वाढवतो का? ह्या देवींची उपासना हे एक पवित्र कार्य आहे असा संदेश देतो का?

तोकडे स्कर्ट घालणारी, क्या मॅन वगैरे बोलणारी ज्युली वगैरे चर्चमधे दुराचार करताना मी तरी पाहिलेली नाही. येशूच्या मूर्तीसमोर तू किती निष्क्रिय आहेस, तुझा काही उपयोग नाही म्हणून मी माझी इज्जन सरे आम निलाम करायला मजबूर आहे वगैरे संवाद मी तरी ऐकलेले नाहीत.
नमाज पढून झाल्यावर एखाद्या निरपराध बिचार्याच्या नरडीचा घोट घेणारा खलनायक मला दिसलेला नाही. उलट नमाज पढून झाल्यावर संबंधित व्यक्ती कमालीची कनवाळू, नेकदिल, रहमदिल वगैरे वगैरे बनलेली दाखवण्याची जवळ्जवळ गॅरंटी!

म्हणजे आम्हालाच का खलनायक दाखवता ? त्यांना का मानवतावादी दाखवता ?
हिंदू स्त्रियांचेच अंगप्रदर्शन का करता हे व्हिक्टीम कार्ड आता
ते जरी असे असले तरी येशू / जीझस / पैगंबराच्या समोर अमूक तमूक करत नाहीत , १०२ मजली इमारतीवर चढून आकाशाकडे बघत नाहीत, पाण्याखाली झिम्मा खेळून जलदेवतेचा अपमान करत नाहीत इथपर्यंत बदलले तर.
त्यात पुढेही बदल होतच राहतील.

इथल्या बहुसंख्यांचा धर्म हिंदू त्यामुळे ते रिलेट होत असल्याने, त्यातील खाचाखोचांतील अत्यचारांशी जवळीक असल्याने त्यावरचे पिक्चर.
विदेशांत चर्च, ख्रिश्चन धर्म, पोप, त्यांचा बाईलवेडे पणा, मायनर मुलांवरील अत्याचार यावर शेकडोंनी सिनेमे आहेत.
आता मुस्लिम उदाहरणे द्या म्हणाल. तर तो धर्म आणि आचरणार आणणारे व्होकल लोक, देश बुरसटलेले, लोकशाही नसलेले, परंपरावादी, मागास इ.इ. आहेत. मुस्लिमांच्या रांगेतच बसायचं आहे का तुम्हाला. तर बसा. सटॅनिक व्हर्सेसवर फक्त मुस्लिम आणि भारताने बंदी आणली होती. त्यात आपण मुस्लिम देशांना मागे टाकुन आधी बंदी घातली. सो काँग्रेसचा ही वारसा तोच आहे. तुम्ही मुस्लिम देशांसारखं स्टेटलेस यादीत बसावायचं त्यांचं काम पूर्ण करुन टाका!

एखाद्या सिनेमात पारंपारिक पूजाअर्चा करणारा खलनायक, विशेषतः पूजाअर्चा झाल्यावर खुनशी आणि क्रूर दाखवला तर समजू शकतो. पण हा एक पायंडा बनलेला आहे. कित्येक डझन सिनेमे मला आठवतात ज्यात असाच प्रसंग हमखास रंगवलेला आहे.
त्यामुळे ह्याला योगायोग म्हणणे अवघड आहे.
निदान ह्या बॉलिवुडी अजेंड्याबद्दल जागरुक होऊन संबंधित लोकांना प्रश्न विचारण्याइतपत धैर्य दाखवले तरी पुरेसे आहे. थिएटर जाळणे, मारहाण करणे असले काही करायची गरज नाही.
कदाचित हे सगळे बॉलिवूडच्या अंडर वर्ल्ड च्या प्रभावाखाली होत असेल ज्यात मुख्यतः मुस्लिम लोक आहेत. पूर्वी हा पूर्वग्रहदूषित विचार थोडा तरल पद्धतीने मांडला जायचा हल्ली जरा जास्त बटबटीत आणि उघड मांडला जातो आहे.

नाममात्र हिंदू वाटेल असा माणूस >> ही बघा गंमत.

ही नक्की काय भानगड असेल आता? 'नाममात्र' हिंदू काय असतं, आणि मग हे स्वतःला नक्की कोणते हिंदू समजतात? हे स्वतःला ज्या प्रकारचे हिंदू समजतात त्यासाठी काय करावं लागतं? यांनी काय असं वेगळं केलं आहे?
आणि हे 'वाटेल' काय असतं नक्की?

जन्माने हिंदू नसेल, पण वाटेल असा माणूस; वागण्यात कट्टर हिंदू असेल, पण दाखवणार नाही असा माणूस; बोलत काहीच नाही आणि वागण्यावरून पत्ताच लागत नाही, पण आमच्या साहेबांना 'नाममात्र हिंदू' वाटलेला माणूस; जन्माने आणि वागण्या-बोलण्याने हार्डकोअर हिंदू असलेला, पण तसं न दाखवणारा माणूस; धर्माशी घेणंदेणंच नसलेला, पण प्रथमदर्शनी हिंदू वाटलेला माणूस- असा नक्की कोणता माणूस त्या पलीकडच्या, ज्याला 'वाटेल' अशी अ‍ॅथॉरिटी आहे अशा माणसाला गुन्हेगाराच्या पिंजर्‍यात, आणि खरंतर कोठडीत, हवा आहे?

मैत्रेयी, स्वाती- तुमच्या प्रश्नाचं हे उत्तर आहे. हिंदू खतरेमे- ही घोषणा याच लोकांची आहे. हे स्वतःच बहुसंख्य हिंदू लोकांना खतरेमे टाकत आहे, आणि हे स्वतःला हिंदू म्हणवतात.
---

बाकी विषयावर माझा रुमाल आहे. खूप काही लिहायचं मनात आहे..

साजिरा, लिही खरंच. Happy
(पण तुला मृण्मयी कुठे दिसली? Proud Light 1 )

Pages