Submitted by स्वाती_आंबोळे on 5 February, 2024 - 09:11
ललित कला केंद्रातील विद्यार्थी सादर करत असलेलं एक नाटक हिंदू देवदेवतांचा अपमान करत असल्याचं कारण देऊन अभाविपच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडलं. नाटकाशी संबंधित असलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांना अटक करण्यात आलं.
सोशल मीडिआवरच्या पोस्ट्स वाचून मला इतकंच कळलं.
मला खालील प्रश्न पडले, कोणाला यासंदर्भात माहिती असेल तर कृपया सांगा:
त्या नाटकात नक्की अपमानास्पद असं काय होतं?
या प्रसंगी मारहाण झाली का? कोणी सुरू केली?
अटक कोणत्या कायद्याखाली झाली?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कुराण शिकवले नाही तरी सलमान
कुराण शिकवले नाही तरी सलमान रश्दीवरील फतव्यातून, शार्ली हेब्दोवरच्या हल्ल्यातून काय होऊ शकते याचा अंदाज येतो हो लोकांना## पुढील काळात हेच हिंदुबद्दल म्हटले जाईल.
अ) अभिव्यक्ती स्वातंत्र्यवादी
अ) अभिव्यक्ती स्वातंत्र्यवादी. ब)उजवे. क) डावे. ड) पुरोगामी. ) .. ईत्यादि... अशी वेगवेगळी घरे बनलेली आहेत मनात.
तेव्हा अ काही बोलला नाही. तेव्हा कसे ब तुटुन पडतात. क तर तीच बाजु घेणार. ड पहा कसे हिपोक्राईट. वगैरे सगळे ठीक आहे.
पण आपण कोण, आपल्याला काय हवंय, आपण कोणाचे आदर्श घ्यावेत, आपल्याला कुठे जायचे आहे आणि पुढच्या पिढीला काय दिशा द्यायची आहे याचा विचारही आपणच करायला पाहीजेना. नाहीतर कोण जास्त कट्टरवादी त्यांचे आदर्श घेउन सगळे त्याच मार्गाला लागायचे.
पण आपण कोण, आपल्याला काय हवंय
पण आपण कोण, आपल्याला काय हवंय, आपण कोणाचे आदर्श घ्यावेत, आपल्याला कुठे जायचे आहे आणि पुढच्या पिढीला काय दिशा द्यायची आहे याचा विचारही आपणच करायला पाहीजेना.
>>>>
मानव हे पटतेच. हे समाजाच्या सर्व थरात पोहोचणार कसे आणि जनरल अविश्वास कसा कमी व्हायचा हाच तर मुख्य प्रश्न आहे.
सध्या अगदी छोट्या छोट्या
सध्या अगदी छोट्या छोट्या कारणाने सुद्धा भावना दुखावून घेण्याचे प्रमाण वाढलेले आहेच.
विकुंनी लिहिल्याप्रमाणे सर्वसाधारण जनतेला सीता आणि ते पात्र सादर करणारे कॅरॅक्टर यातला फरक कळत नाही. असेच लोक्स मग अरुण गोविल विमानतळावर दिसला तरी पाया पडतात.
अशी माणसे बहुसंख्य होताहेत हे दिसत असताना, आजूबाजूला असे स्फोटक वातावरण असताना अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून पेट्रोल पंपावर काडी पेटवली तर भडका हा उडणारच. भले कोणी म्हणो अहो आम्हाला काही सिगरेट नव्हती फुंकायची. उदबत्ती लावायची होती. त्याचा उपयोग शुन्य.
कोणाला काहीही वाटो ही परिस्थिती वाईट आहे. जे घडते आहे ते चुकीचे घडते आहे. पण आहे हे असे आहे.
ठरावीकच वेळी / सोयीस्कररित्या उदारमतवाद आठवणार्या लोकांमुळे उदारमतवादाला / उदारमतवाद्यांना अजीबात उपयोग होत नाही किंबहुना उपद्रवच होतो.
अभिव्यक्तीस्वातंत्र्यांतर्गत पात्राच्या तोंडी आई बहीणी वरून दिल्या जाणार्या शिव्या ही त्या कलाकाराच्या कलेची अभिव्यक्ती असेल तर भडक माथ्याच्या पेहेलवानाने दिलेले दोन दणके ही देखील त्याची अभिव्यक्तीच मानायला हवी. ज्याला कला-बिला येत नाही तो काय नाटके लिहून प्रत्युत्तर देणार का
मुळात एक महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्यांच्यात हे झाले आहे ती सगळी मुले पदवी शिक्षण घेत आहेत. हे मोठे अडनिडे वय. म्हटले तर नुकतेच अठरा पुर्ण झाल्याने सज्ञान पण कमवायची अक्कल / जगरहाटीचा अनुभव शून्य. त्या वयात आपल्याला फार पोच असतोच असे नाही. ह्या वयात आपणच जग बदलू शकतो अशी आशा नव्हे खात्रीच वाटत असते. कॉलेजात राडे व्हायला कुठलेही फालतू कारण/ निमित्त पुरते. चुकाही होतात हातून. त्यांच्याकडे जरा सहानुभुतीच्या नजरेतूनच बघायला हवे. माझ्यामते मुलांमधे जे काही आपापसात झाले ते दोन्ही बाजूच्या मंडळीना टोकाची भुमिका न घेण्याबाबत समज देऊन त्याच ठिकाणी मिटवून टाकायला हवे होते. पण पोलीसांनी ह्याकडे सामाजिक सलोखा बिघडवणारे कृत्य म्हणून बघितलेले दिसते.
हे विसरू नये की नाटक सादर करणारी आणि बंद पाडणारी ही आपलीच मुले आहेत.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे बोलायला ठीक आहे पण आपल्या आयुष्याच्या पुढील वाटचालीस बाधा येईल असे कोणतेही कृत्य करण्याआधी विचार करायला हवा. आपल्या भावना किती कुरवाळत बसायच्या, उठ्सूठ दुखावून घ्यायच्या किंवा हक्क आणि स्वातंत्र्य आणि त्यासाठी किती किंमत मोजायची आपली तयारी आहे ह्याचा सारासार विचार हा करायलाच हवा. विद्यार्थीदशेत राजकारण करूच नये असे नाही पण आपण कोणत्या आगीशी खेळतो आहोत किंवा किती वहावत जायचे ह्याचे भान ठेवायला पाहिजे. अन्यथा राजकारणी लोकांना काय बरेच आहे विद्यार्थ्यांना वापरून घ्यायला मिळते आहे म्हटल्यावर.
अन्यथा राजकारणी लोकांना काय
अन्यथा राजकारणी लोकांना काय बरेच आहे विद्यार्थ्यांना वापरून घ्यायला मिळते आहे म्हटल्यावर.
>>>>>>>
तेच होतेय...
जे मोठ्यांना कळत नाही ते मुलांना आणि तरुणांना काय कळणार
निवडणूका तोंडावर आहेत. नुकतेच राम मंदीर झाले आहे. अश्या पार्श्वभूमीवर जगातले सर्व विषय संपल्यासारखे असे नाटक करायचे. मग लागलीच राडा. थेट अटक. वृत्तपत्रात बातम्या. मायबोलीवर ज्वलंत धागा...
https://www.facebook.com
https://www.facebook.com/BBCnewsMarathi/posts/pfbid0R2iK5EicXqWFZCbtjJve...
काही वर्षांपूर्वी 'मी नथुराम
काही वर्षांपूर्वी 'मी नथुराम बोलतोय' चे प्रयोग आव्हाड समर्थकांनी ठाण्यात (!) बंद पाडायचा प्रयत्न केला होता व मार खाला होता. तेव्हाही मला आवडले नव्हतेच. एखादे नाटक तुम्ही हुल्लडबाजी करून बंद पाडता तेव्हा त्या नाटकात जे दाखवले आहे ते खरे आहे हे मान्य करत असता व ते लोकांना समजू नये म्हणून दंगा करत असता हेच खरे.
एखाद्या विद्यापीठातील मुलांनी पन्नासेक मुलांसमोर सादर केलेल्या फडतूस नाटकात काहीबाही दाखवले तर रामाचा जितका अपमान होईल त्यापेक्षा १०००% जास्त अपमान 'जय श्रीराम' च्या घोषणात बलात्कार्यांचे स्वागत करणे, हिजाब वाल्या शाळकरी मुलींना हॅरॅस करणे, मॉब लिंचिंग करणे यामुळे होत असतो असे माझे मत आहे. आज 'रामाचा अपमान झाला हो' म्हणून गळे काढणार्या व शाळकरी बालीश लेख पाडणार्या सर्वांना वरील घटनांवर काहीही आक्षेप नसतो.
'राम के नाम' मध्ये रामाचा अपमान होईल असे काहीही नाही, पण तरीही ABVP वाले जिथे तिथे ही बंद का पाडतात ?
ए के रामानुजन यांचे '३०० रामायनास' हा निबंध शिकवला की ABVP वाले दंगा का करतात ?
हर्पेन, पोस्ट
हर्पेन, पोस्ट कानामात्रावेलांटी सकट पटली!
समाज म्हणून आपण कुठे जात आहोत, चुकीच्या रस्त्याची स्टेशन्स वेगाने जाताना दिसत असली तरी, अभिव्यक्तीस्वातंत्य इ. सगळ्याच्या पूर्णपणे बाजुने असुनही 'आपली मुलं' हा कोन आल्यावर किती वहावत जायचे आणि कुठे थोडं प्रवाहपतित होऊन योग्य संधीची वाट बघुन मग जोरात हात पाय मारुन आपल्याला हव्या त्या काठाला लागायचे हेच तर 'शिक्षण'! सर्वायवल!
सामान्य नागरिकांसाठी स्व विकास - आत्मकेंद्री विकास हाच शाश्वत विकास असतो. त्याला थोडी इकडे तिकडे मुरड घालुन समाजाला सामावुन/ घेऊन ग्रेटर गुड साठी काय करता येईल ते करायला सरकारने काम करायचे असते.
कोणी देश म्हणून आपण कुठे चाललो आहोत हे बघायची वेळ आलेली आहे, निघुन गेलेली आहे म्हटलं की म्हणुनच मला हसू येतं. देश गेला तेल लावत. शिवाजी महाराजांनी/ गांधींनी/ फुल्यांनी/ आंबेडकरांनी असे म्हटले असते तर चालले असते का? तर यातलं कोणी ही मला बनायचं नाही. जमेल तितकं फेअर राहायचं आहे, पण स्वार्थ साधुनच! बाकी संतमहात्मे म्हणून गेलेच आहेत, देअर इज नो सेल्फ लेस गुड डीड!
अर्थात आत्ता वेळ निघुन गेल्याने त्या मुलांनाच पाठिंबा. पण सबुरीचा सल्ला हा प्रॅक्टिकल आहे.
हिंदू देवदेवतांबद्दलच्या
हिंदू देवदेवतांबद्दलच्या अस्मितांची गळवं - टचकन फुटतात आणि मग अशी दुर्गंधी बाहेर पडते.
हा प्रकार आजकाल माजलाय हे खरे आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य
अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरेबद्दल वर वाचताना सखाराम बाईंडर आठवले आणि नथुराम गोडसेंवरचे शरद पोंक्षे यांचे नाटकही आठवले. सखाराम बाईंडरच्या बाजूने नाट्यवर्तुळात बोलणारे , लिहिणारे खूप असतात पण नथुराम गोडसेंवरचे नाटक सुमार, अगदी वाईट असले तरी ते करण्याचा त्यांना हक्क आहे हे एकाही नाट्यवर्तुळातल्या माणसाने किमान उघडपणे म्हटल्याचे ऐकिवात, वाचनात नाही, नाटकवाल्यांसाठी कडवे हिंदुत्ववादी असणं is not very cool.
केवळ दुर्दैवी घटना!
केवळ दुर्दैवी घटना!
आंधळ्या कट्टरतेची आणि असहिष्णुतेची वाट चालायची ठरवली तर हिंदू धर्माचा इस्लाम व्हायला वेळ लागणार नाही. किंबहुना ते घडायला सुरुवात झाली आहे.
आमचेच देव का? या पेक्षा आमचे देव किती भारी! अशा उलटसुलट कलाविष्कारांनी कधीच त्यांच्या देवत्वाला उणेपण आले नाही. हा युक्तिवाद का नाही?
असा सहिष्णू आणि लवचिक धर्म होता म्हणून तो मंदिरं उध्वस्त झाली तरी टिकला. त्याची काळानुरूप मांडणी करायची की कुठल्या गेल्या सहस्रकात अडकून पडलेल्या धर्माची बरोबरी करायला जायचे?
मी नथुराम बोलतोय नाटकाच्या
मी नथुराम बोलतोय नाटकाच्या वेळी अभिव्यक्तीस्वातंत्र्याबद्दल खूप जण बोललेले आहेत. माहिती करून घ्यायचे असेल तर सापडेल. ऑर्कुट कम्युनिटीजमधे सुद्धा अनेकांनी ( जे कट्टर हिंदुत्ववादी नाहीत) त्यांना त्यांची कला सादर करण्याचा हक्क आहे असे म्हटलेच होते.
माझे मत निराळे आहे.ऐतिहासिक तथ्यांवरच्या नाटकात जर इतिहासाची मोडतोड करून हाच इतिहास आहे असा कांगावा केला जात असेल तर त्यावर आक्षेप येणारच. गांधीजींना उडता येत होते, नथुरामाने मग आभाळाएव्हढे उंच होऊन त्यांचा वध केला असे सादरीकरण "ऐतिहासिक" तथ्य म्हणून सादर करता येणार नाही.
गोडसेने ते कृत्य का केले याबद्दल त्याचे काय म्हणणे आहे ते मांडण्याचा त्याला पूर्ण हक्क आहे. ते ऐकून घेऊन प्रतिवाद सुद्धा या मंडळींना ऐकता आला पाहिजे.
>>> स्वाती, तुझ्या या
>>> स्वाती, तुझ्या या प्रतिसादातच उत्तर आहे. जेव्हा कोणी केवळ आंबेडकर / फुले यांचं काम करणारे अभिनेते...
मामी, तू त्या पोस्टमधला मुद्दा समजण्याइतकी सूज्ञ नक्की आहेस, मग हा विपर्यास का? मी पुढे 'बाकी राम, सीता, सावित्री, जोतिबा, भीमराव, मोहम्मद, येशू, मोझेस यांतलं आणि यांपलीकडचं कुठलंही नाव आलं तरी माझे मुद्दे तेच असणार आहेत.' असंही स्पष्ट केलंय.
शिवाय मला अजून तू किंवा कोणीही 'आमच्या देवांना सतत हास्यास्पद दाखवतात' याचंही उदाहरण दिलेलं नाही. जी उदाहरणं आली आहेत ती (वस्त्रहरण इ.) उभयपक्षी आवडलेल्या कलाकृतींची होती.
'तुमच्यावर इतकी वर्षं अन्याय झाला आहे' असं कोणीतरी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी सांगितलं आणि सर्वांनी मान्य केलं असं झालंय का?
>>>>>व शाळकरी बालीश लेख
>>>>>व शाळकरी बालीश लेख पाडणार्या सर्वांना वरील घटनांवर काहीही आक्षेप नसतो.
दादा, आपण गोंधळलेले असू तर शहाण्यासुरत्यांचं ऐकावं. उगाच तोंड उघडून आपली दिवाळखोरी प्रकट करु नये, नये इतकं तरी समजायला हवे. कदाचित त्या लोकांना तितके समजत असेल.
जय श्रीराम' च्या घोषणात
जय श्रीराम' च्या घोषणात बलात्कार्यांचे स्वागत करणे, हिजाब वाल्या शाळकरी मुलींना हॅरॅस करणे, मॉब लिंचिंग करणे
>>>>>>
असे प्रकार जे करतात, किंवा या प्रकाराचे जे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष समर्थन करतात ते धार्मिक प्रवृत्तीचे किंवा रामभक्त नसतात. तर ते समाजकंटक असतात.
देव देवतांच्या अपमानाने ज्यांच्या खरेच भावना दुखावतात ते आणि हे यांना एकाच तराजूत ठेवू नका.
हे म्हणजे त्या हिंदू मुस्लिम दंगली सारखेच आहे. बदला घ्यायला कापाकापी करणारे वेगळे आणि कापले जाणारे निष्पाप वेगळे.
बाकी देव हाच मुळात श्रद्धेतून आला आहे. त्यामुळे त्याचे कुठलेही वंगाळ स्वरूप दाखवले तर भावना दुखावल्या जाणारच हे समजायला इतके अवघड आहे का?
>>>
>>> अभिव्यक्तीस्वातंत्र्यांतर्गत पात्राच्या तोंडी आई बहीणी वरून दिल्या जाणार्या शिव्या ही त्या कलाकाराच्या कलेची अभिव्यक्ती असेल तर भडक माथ्याच्या पेहेलवानाने दिलेले दोन दणके ही देखील त्याची अभिव्यक्तीच मानायला हवी. ज्याला कला-बिला येत नाही तो काय नाटके लिहून प्रत्युत्तर देणार का
खरंच? सीरियसली?!
मग मी आधी जो प्रश्न विचारला तोच पुन्हा विचारते - भारतात लोकशाही, कायदा आणि सुव्यवस्था उरलेली नाही, की लोकांचा त्यावर विश्वास उरलेला नाही?
अभिव्यक्तीस्वातंत्र्यांतर्गत
अभिव्यक्तीस्वातंत्र्यांतर्गत पात्राच्या तोंडी आई बहीणी वरून दिल्या जाणार्या शिव्या ही त्या कलाकाराच्या कलेची अभिव्यक्ती असेल तर भडक माथ्याच्या पेहेलवानाने दिलेले दोन दणके ही देखील त्याची अभिव्यक्तीच मानायला हवी
अच्छा! म्हणजे 'पुरुष', 'बाईंडर' वगैरे नाटकांचे प्रयोग सुरू असताना एखाद्या प्रेक्षकाने रंगमंचावर येऊन पात्राला दोन दणके दिले तर ते योग्य आहे ?
ऋन्मेष भाऊ, पुढच्या भारत भेटीत मी तुम्हाला अस्सल तमाशा (जर शिल्लक असेल तर) दाखवेन, दक्षिण मुंबई बाहेरही भारत आहे. भावना खरेच दुखावलेला देवभक्त आणी खाजवून खरूज काढणारे यात फरक आहे.
मी सहसा व्हिडिओ पहात नाही पण चिनूक्स ने वर दिलेला व्हिडिओ छान आहे.
अर्थात स्वाती उत्तर हो आणि हो
अर्थात स्वाती उत्तर हो आणि हो आहे. काही शंका आहे का?
बोटचेपेपणा हा नॉर्म ठेवा, काळ सोकावायचो तो सोकावुदे. माझ्या किंवा कोणाच्याच मुलांना थोबाडित बसू नये, क्रिमिनल केसेस त्यांच्या रेकॉर्डवर जाऊ नये वाटतं.
तात्विक आणि व्यावहारिक
तात्विक आणि व्यावहारिक मुद्दे यांची गल्लत नको.
>>>>>क्रिमिनल केसेस त्यांच्या
>>>>>क्रिमिनल केसेस त्यांच्या रेकॉर्डवर जाऊ नये वाटतं.
बाप रे!! हे त्या विद्यार्थी व एच ओ डी यांच्या रेकॉर्डवरती गेलेले असेल? हे भीतीदायक आहे.
चिनूक्स, बीबीसी न्यूजच्या
चिनूक्स, बीबीसी न्यूजच्या दुव्यासाठी धन्यवाद. प्राध्यापकांनी सगळेच व्हॅलिड मुद्दे कळकळीने मांडलेत.
(पण तिथेही बहुतांश कॉमेन्ट्स 'असल्या शिक्षकांनाही धडा शिकवला पाहिजे' अशाच प्रकारच्या आहेत. )
अमित
मागे कधीतरी जिज्ञासाने ही कविता शेअर केली होती, तिची पुन्हा आठवण झाली.
छत्रपती शिवाजी आणि
छत्रपती शिवाजी आणि जिजाबाईसाहेब यांच्याबद्दल नाटक असते आणि त्यातील जिजाबाईचे काम करणारे जर मेकप रुममधे बसुन गलिच्छ शिवीगाळ, तंबाखू, बिडीकाडी, मशेरी, दारु असे काही करताना दाखवले असते तर भांडारकर संस्थेवर झाला तसा हल्ला पुणे विद्यापीठावर झाला असता ह्याची मला पूर्ण खात्री आहे. संभाजी बीग्रेड वगैरे संघटना अस्तन्या सरसावून ह्या विधायक कार्यक्रमात उतरल्या असत्या.
शिवाजी महाराज याविषयी एक जरी गैर शब्द काढला तरी नेहमीच्याच यशस्वी संघटना आगी लावत सुटतात हे अनेक वेळा झालेले आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी बोंबाबोंब करणार्या लोकांना ह्या बाबतीत काहीही बोलायची हिंमत होत नाही.
मागे आम्ही हिंदूंच्या श्रद्धांचे ह्याहूनही भयंकर अपमान केले होते म्हणून हाही अपमान सहन केला पाहिजे हा युक्तिवाद पटत नाही.
'आमच्या देवांना सतत
'आमच्या देवांना सतत हास्यास्पद दाखवतात' >>> हे एक अर्ग्युमेन्ट बहुधा कोंणतेतरी अॅग्रेशन जस्टिफाय करण्यासाठी नेहमी कीवर्ड सारखं सतत येतं. ते परिस्थितीचा विपर्यास किंवा हेतूपूर्वक दिशाभूल करणारे वाटते.
अपमान आणि भावना दुखावणे हे सब्जेक्टिव आहे पण तरी स्टेटमेन्ट चा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करते:
भारतात ( आधुनिक भारतात) इतर धर्मीयांनी हिंदू देवांचा अपमान केला आणि हिंदूंना अन्याय सहन करावा लागला असे कॉमनली घडते का? ( मला चटकन उदाहरणे आठवली नाहीत. अस्तील तर सांगा)
मुळात सतत आमच्याच देवतांचा अपमान होतो असे म्हटले जाते तेव्हा अपमान इतर धर्मीयांनी केला हे गरजेचे आहे की हिंदूंनीच त्यांच्या धर्मातल्या गोष्टींवर लिहिले तरी त्यालाही "हिंदू धर्मावर हल्ला" असे समजले जाते? यावर "कोणी का करेना अपमान तो अपमान" असे अर्ग्युमेन्ट येईल पण फरक आहे ना ? म्हणजे एका रमेश ने सुरेश आणि सुनिल वर हल्ला केला तर त्याला "हिन्दूंवर हल्ला झाला" असे म्हणायचं का? तो विपर्यास झाला.
अजून एक वाटते ते म्हणजे कदाचित केवळ स्टॅटिस्टिक्स हेही कारणीभूत असू शकते. म्हणजे उदा. १०० माणसांत ७५ हिंदू आणि २५ इतर धर्मीय असतील तर त्यांच्यात कसलेही सर्व्हे करा, सर्व बाबतीत संख्येने हिंदूच जास्त आहेत असेच दिसणार! ( हिंदूच जास्त करून उच्च शिक्षित असतात, हिंदूच अपघातात जास्त मरतात, हिंदूंच्याच देवांचा जास्त अपमान होतो इत्यादि!) नंबर्स ट्विस्ट करून कोणीही पब्लिक ला चिथावू शकते.
>>>
>>>
मुळात सतत आमच्याच देवतांचा अपमान होतो असे म्हटले जाते तेव्हा अपमान इतर धर्मीयांनी केला हे गरजेचे आहे की हिंदूंनीच त्यांच्या धर्मातल्या गोष्टींवर लिहिले तरी त्यालाही "हिंदू धर्मावर हल्ला" असे समजले जाते? यावर "कोणी का करेना अपमान तो अपमान" असे अर्ग्युमेन्ट येईल पण फरक आहे ना ? म्हणजे एका रमेश ने सुरेश आणि सुनिल वर हल्ला केला तर त्याला "हिन्दूंवर हल्ला झाला" असे म्हणायचं का? तो विपर्यास झाला
<<<
हो अगदी नेमका प्रश्न! मलाही पडला. बहुधा उत्तर धार्मिक विरुद्ध लिबरल असं येईल आता.
'आमच्या देवांना सतत
'आमच्या देवांना सतत हास्यास्पद दाखवतात >>>
पटकन आठवत आहेत ती उदाहरणे - एम एफ हुसेन यांनी काढलेले सरस्वतीचे चित्र, फायर मधल्या कॅरॅक्टर्सची नावे राधा व सीता असणे, अगदी अलीकडेच काढलेले एका चित्रपटाचे पोस्टर ज्यात काली स्मोकिंग करत, हातात प्राईड फ्लॅग घेऊन आहे.
काही जणांना 'त्यात काय एवढे?' वाटू शकते, काही जणांना हा त्यांच्या श्रद्धेचा अपमान वाटू शकतो. ऑफ़ेन्ड होणाऱ्यांनी कायदेशीर मार्गाने निषेध करावा एवढीच माझी अपेक्षा.
>>> एम एफ हुसेन यांनी काढलेले
>>> एम एफ हुसेन यांनी काढलेले सरस्वतीचे चित्र
हो, यावरून झालेला गदारोळ माहिती/आठवतो आहे. हुसेन हिंदू नाहीत हा अॅडिशनल अॅन्गल तिथे होता.
>>> फायर मधल्या कॅरॅक्टर्सची नावे राधा व सीता असणे
हे नावांचं नवीन आहे. होमोफोबिया आठवतो आहे.
>>> काली स्मोकिंग करत, हातात प्राईड फ्लॅग घेऊन आहे
याबद्दल माहिती नव्हती, शोधते.
>>> ऑफ़ेन्ड होणाऱ्यांनी कायदेशीर मार्गाने निषेध करावा एवढीच माझी अपेक्षा.
अगदी नेमका हाच मुद्दा आहे! धन्यवाद!
हुसेनचं न्यूड पेंटिंग १९७६ चं
हुसेनचं न्यूड पेंटिंग १९७६ चं आहे... जवळ जवळ ५० वर्षे होतील त्याला.
फायर १९९६चा आहे. त्याला ही ३० वर्ष होतील.
काली स्मोकिंग विथ प्राईड फ्लॅग... ती काली टोरांटोचा केंझिंग्टन मार्केट मधली आहे. फर्स्ट नेशन, भारतीय, अफ्रिकन, आशियाई... याचं बेमालूम मिश्रण असलेल्या चायना टाऊन मधली आहे ती. लेखिकेच्याच शब्दांत
"In my film, Kali chooses me as a spirit, holds a Pride flag and a camera in her hands and meets the First Nations (indigenous people), the People of African, Asian, Persian descent, the Jews, the Christians, the Muslims and the mini-universe that one can capture across any cross-section of Canada," she added.
She stated that people often dress up as Kali and consume alcohol in village festivals in southern India.
She further said that poster portrays the goddess showing love as she "kindly accepts the cigarette from the working-class street-dwellers at the park around the Kensington Market".
She insisted that artists should not be stopped by the climate of fear and need to be louder and stronger. She wrote in a tweet in Tamil, "I have nothing to lose. Till the time I live, I wish to live with a voice that speaks what I believe without fear. If the price for that is my life, it can be given,"
रिस्पेक्ट!
वादासाठी हे एक उदाहरण धरू. आजच्या काळातील चटकन आठवलेलं फक्त फक्त एक उदाहरण! १.४ बिलिअन भारतीय लोकसंख्येतलं एकही उदाहरण नाही. तर कॅनडातील टोरांटोच्या दिग्दर्शिकेचं एकमेव उदाहरण!
मला दीपीकाची भगव्या रंगात ५-६ सेकंद दिसणारी बिकीनी अपेक्षित होती. आणि ती ग्राह्य धरणार होतो मी.
इथले प्रतिसाद वाचून काही मते
इथले प्रतिसाद वाचून काही मते पटली. इथे फार कोणी सेन्सॉरशिप किंवा हिंसेचे समर्थन करत नाहीये. फक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल मते सातत्याने लावा असे म्हणणे आहे, त्याबाबत सहमत आहे. भावना कितीही दुखावल्या तरी दुसऱ्यांची मुस्कटदाबी करणे कधीही चुकीचेच आहे. हे फुले, शाहू, आंबेडकर, शिवाजी महाराज, मुहम्मद, राम सगळ्यांबद्दल लागू होते.
फायर हा दीपा मेहतांचा होता ना
फायर हा दीपा मेहतांचा होता ना? म्हणजे बिगरहिंदूंनी केलेला हल्ला असे नाही.
कालीच्या पोस्टर्वाली बाई पण हिंदूच होती ना?
एम एफ हुसेन चे उदाहरण मलाही आठवले.
त्या वादग्रस्त प्रकरणाला किती वर्षे झाली? म्हणजे त्यापलिकडे ठळक उदाहरणे नाहीत? किंवा आठवत नाहीत. आणि हुसेन ना ( आणि वरच्या दोघांना) व्यवस्थित बॅकलॅश मिळाला त्याबद्दल. हुसेन च्या बाबतीत त्यांच्या बाकी कलेपेक्षा आता त्यांचे नाव त्यासाठीच आठवले जाते. म्हणजे हिंदूनी अन्याय सहन केला असे काही नाही. की त्यांना जीव मारले नाही म्हणजे अन्याय सहन केला असे काही आहे?
प्रश्न असा आहे की "सतत अपमान/ अन्याय होतो " म्हणणार्यांना सतत म्हणाजे किती अणि कसा अपमान होतो आहे हे माहित आहे की त्यांना तसे केवळ सांगण्यात येते आहे?
धन्यवाद, अमित.
धन्यवाद, अमित.
मैत्रेयी, संपूर्ण अनुमोदन.
Pages