Submitted by स्वाती_आंबोळे on 5 February, 2024 - 09:11
ललित कला केंद्रातील विद्यार्थी सादर करत असलेलं एक नाटक हिंदू देवदेवतांचा अपमान करत असल्याचं कारण देऊन अभाविपच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडलं. नाटकाशी संबंधित असलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांना अटक करण्यात आलं.
सोशल मीडिआवरच्या पोस्ट्स वाचून मला इतकंच कळलं.
मला खालील प्रश्न पडले, कोणाला यासंदर्भात माहिती असेल तर कृपया सांगा:
त्या नाटकात नक्की अपमानास्पद असं काय होतं?
या प्रसंगी मारहाण झाली का? कोणी सुरू केली?
अटक कोणत्या कायद्याखाली झाली?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
साजिरा , सविस्तर मांडणी
साजिरा , सविस्तर मांडणी आवडली.
पोस्टची दखल घेतल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
साजीरा, उत्तम पोस्ट.
साजीरा, उत्तम पोस्ट.
फारएण्ड उत्तम पोस्ट.
फारएण्ड उत्तम पोस्ट. शेंडेनक्षत्र यांचे मुद्दे योग्य आहेत.
ललित कला केंद्राने आता एक दुसर्या कोणा श्रद्धास्थानावर असंच नाटक बसवावे म्हणजे आता जे आक्षेप घेताहेत त्यांचा मुद्दाच खारिज होईल.
कलाअभिव्यक्ती स्वातंत्र्य मानणारे इतकं नक्कीच करतील अशी आशा बाळगून आहे.
ललित कला केंद्राने दुसर्या
ललित कला केंद्राने दुसर्या कोणा श्रद्धास्थानावर असंच नाटक बसवू नये, हिंसा होण्याची शक्यता आहे.केवळ नुपूर शर्मा ला पाठिंबा दिला म्हणून एका टेलर चा गळा कापला होता.
मुळात ते नाटक ललित कला
मुळात ते नाटक ललित कला केंद्राने नव्हे तर एका बॅच ने बसवले होते.
वर आलेले काली, हुसेन वगैरे उल्लेख पाहून एक जुनाच जोक आठवला.
एक महिला पोलिसात तक्रार करते की आमच्या समोरच्या बिल्डिंग मधाला मणूस उघडाबंब गॅलरीत बसतो, मला लाजल्यासारखे होते, त्याला समज द्यावी. पोलिस घरी येतात.
'तुमची खिडकी फारच उंच आहे'
'या स्टूल वर चढून बघा'
'ठीक आहे आता दिसतो तो , पण बिल्डिंग दूर आहे, अंधुक दिसते'
'ही दुर्बीण घेऊन बघा'
साजिरा, पोस्ट चांगली आहे.
साजिरा, पोस्ट चांगली आहे.
फारएन्ड, मामी, शेंडे यांनी
फारएन्ड, मामी, शेंडे यांनी व्यवस्थित मुद्दे लिहिलेले आहेत.
अजूनही दुसऱ्या बाजूच्या सहिष्णुतेचं एकही उदाहरण सापडलेलं दिसत नाही.
काय लिहिलं आहे इतकंच कुणी लिहिलं आहे हेही मॅटर करतं. आता शरद पवार प्रणित संघटनांचे गुंड अभिव्यक्ती स्वातंत्र्य न मानता हिंसाचार करत आल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यांचे राजकीय समर्थक - फेसबुकवर पवारांच्या भेटीची भरावलेली वर्णने (फोटोसहित) लिहिणारे लोक- इथे या धाग्यावर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुळका दाखवत आहेत. म्हणजे एनसिपीचे गुंड मारहाण करतात तेव्हा "पहले तो जुलमी ने पकडी कलाई , जोराजोरी चने के खेत मे" म्हणत त्या गुंडांच्या आक्रमकतेवर हे कोमल हृदयी elite liberals भाळलेले असतात आणि परिषदेची पोरं राडे करतात तेव्हा एकदम पावसाळ्यातल्या बेडकांसारखे मायबोलीवर उगवतात कांगावा करायला. वेड्यांचा बाजार
वर्षभरापूर्वी इथे आलो तेव्हां
वर्षभरापूर्वी इथे आलो तेव्हां मायबोलीची पाटी पुसून लख्ख कोरी झाली होती. म्हणून आता जे सफेदटोपी किंवा इतर आयड्यांचे मुद्दे आहेत त्याचीही दखल घ्याविशी वाटत होती. पण लवकरच त्यांचे सततचे एकसुरी प्रतिसाद वाचून हिंदी चित्रपटात याददाश वापस आ गयी होतं तसं झालं. हे आयडी पढवलेले असतात. अनेक गोष्टी गृहीत धरून लिहीत असतात.
उदाहरणार्थ - महाकाव्यांच्या तीनशेहून अधिक आवृत्त्या निघालेल्या आहेत. यात प्रचंड फरक आहे. तसेच अनेक ठिकाणच्या आदिवासी लोकगीतांमधे रावण सीतेचा पिता आहे. इशानेकडच्या राज्यातले रामायण वेगळे आहे. एका लोकगीतात रावण हा सीतेचा पती आहे, त्याला सोडून ती वडलांकडे आली आहे. इतके रामायणामधे फरक आहेत.
ऐतिहासिक तथ्ये पाहिली तर रामाचा जन्म नेमका कधी झाला हे सांगता येत नाही. रामायणाची कथा तसा इंटरनॅशनल प्लॉट आहे. होमर ने इसवी सन पूर्व नऊशे वर्षे लिहीलेले इलीयड हे महाकाव्य रामायणाच्या प्लॉटशी साधर्म्य दाखवते. यावर खूप घमासान चर्चा झालेल्या आहेत.
थोडक्यात रामायण घडलेले आहे ही आस्था आहे असे मानणारा एक वर्ग आहे, तर रामायण हा साहित्यिक सांस्कृतिक ठेवा आहे असे मानणारा दुसरा वर्ग आहे. उलट काल्पनिक असल्याने ते जास्त जवळचे वाटू शकते. जर काल्पनिक असेल तर तो संस्कृतीचा भाग झाला. संस्कृती प्रदेशाशी संबंधित असते. त्यामुळे इथे असणार्या कुठल्याही धर्मियाचा रामायणावर तेव्हढाच हक्क आहे. पूर्वी असेच होते.
अन्य धर्मिय सुद्धा इथलेच होते जे जाचामुळे धर्म बदलून गेले. त्याकडे डोळेझाक करून धर्म बदलला ना ? आता का टीका करता हा टोन एका आयडीचा सातत्याने असतो. मूळ कारण सामाजिक दर्जाचे आहे. त्या दर्जामुळे असलेला द्वेष ,अमानवी वागणूक आजही तशीच आहे. धर्म बदलला म्हणून ओळख बदलली नाही. एखाद्याला हात पाय बांधून १०० मीटरची रेस खेळायची आणि जिंकल्यावर आम्ही श्रेष्ठ हा दंभ बाळगायचा, तसे बोलून दाखवायचे हे फक्त इथे होते. त्याचे हात पाय बांधलेले होते यावर बोलायचेच नाही. सतत हातपाय बांधून ठेवल्याने शरीराच्या स्नायूंची ताकद कमी झालेली असेल ती सुटका केल्यावर लगेच येत नाही.
अशा अनेक गोष्टी माहिती असून त्या नाहीतच असे गृहीत धरून एक ते एक टेप लावणे आणि सतत व्हिक्टीम कार्ड खेळत रहायचे यामुळे गेल्या काही दिवसात अॅडमिन अशा गोष्टींना आळा का घालत नाही असे एक दोनदा लिहीले. हे असे लिहायला हवे होते कि नाही माहिती नाही. पण या आयडीचे लक्ष्य प्रथमपासून कोण आहेत हे उघड आहे. आता सत्ता आल्याने टोन थोडा मुजोर आहे. उद्या सत्ता गेल्यावर असहाय्यतेचा टोन येईल.
दुर्लक्ष तरी किती करायचं याला मर्यादा आहेत.
कुठेही गेलं तरी बहुसंख्यांकांच्या संस्कृतीचे वर्चस्व त्या त्या प्रदेशावर असते. इतरांच्या संस्कृतीची फक्त दखल घेतली जाते. जी संस्कृती त्या प्रदेशाची आहे त्यावर प्रहसनं होत राहतात. बहुसंख्यंकांचा अपमान असता तर अपमान करणारे मागच्या काळात शिल्लक राहिले नसते. रामायणाच्या इतक्या आवृत्त्या झाल्या नसत्या. स्पष्टच सांगायचे तर भारतात बाराव्या शतकात सुद्धा राम,कृष्ण हे सार्वत्रिक नव्हते. रामचरितमानस या ग्रंथामुळे रामायण घरोघरी पोहोचले. त्या आधी रामकृष्णाची देवळे अपवादाने असत. चौदाव्या शतकापासून ती भारतभर व्हायला लागली.
राम आणि कृष्ण हे देव म्हणून मान्यता पावले. बहुजनांच्या जगण्यात आले. यामुळे राजकारण त्यांच्याभोवती फिरते. इंद्र, ब्रह्मदेव, विष्णू यांच्या अपमानाचा मुद्दा कट्टर हिंदुत्ववादी करत नाहीत.
छान निरिक्षण आणि उत्तम विवेचन
छान निरिक्षण आणि उत्तम विवेचन फिबां.
तुमच्या आणि साजिरा यांच्या पोस्टमुळे मला तरी अजुन एक दॄष्टिकोन मिळाला या सगळ्याकडे बघण्याचा.
ललित कला केंद्र (गुरुकुल)
ललित कला केंद्र (गुरुकुल) माजी विद्यार्थी, कला शिक्षक, व्हिजिटिंग फॅकल्टी आणि नाट्य-चित्रपट कलाकार यांचे निवेदन
आम्ही विविध वैचारिक, सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक आणि भौगोलिक पार्श्वभूमी असलेले संवेदनशील कलाकार आणि भारताचे नागरिक या नात्याने एकत्रितपणे हे जाहीर करत आहोत. आम्ही सर्व धर्म, जाती, पंथ, संप्रदाय ह्यांचा आदर करतो. आम्हाला आमच्या समृद्ध भारतीय संस्कृती आणि परंपरांचा अभिमान आहे.
ललित कला केंद्र (गुरुकुल), ज्याला सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स म्हणूनही ओळखले जाते. हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा एक विभाग आहे, जो पारंपारिक भारतीय गुरुकुल प्रणालीमध्ये नृत्य, संगीत आणि नाटक ह्यांत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण देतो. ललित कला केंद्र (गुरुकुल) द्वारे चालवले जाणारे सर्व अभ्यासक्रम UGC मान्यताप्राप्त आहेत. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, पद्मश्री सतीश आळेकर (ज्यांनी 2009 पर्यंत एचओडी म्हणूनही काम केले होते), पंडिता रोहिणी भाटे यांसारखे परफॉर्मिंग कलांमधील अनेक मान्यवर कलाकार या विभागाशी जोडले गेले आहेत. अनेक दिग्गज विभागाच्या अभ्यासक्रम मंडळाशी संलग्न आहेत. हे दिग्गज विद्यार्थ्यांना वेळोवेळी आवश्यक मार्गदर्शनही करतात. गेल्या काही वर्षांमध्ये, ललित कला केंद्राने (गुरुकुल) अनेक प्रतिष्ठित माजी विद्यार्थी घडवले आहेत जे आजही नाट्य, संगीत, नृत्य, कलाशिक्षण, दूरचित्रवाणी मालिका आणि सिनेमा या क्षेत्रांमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. अशा प्रकारे हा विभाग कलेच्या जगात प्रवेश करण्याची एक अमूल्य पायरी आहे यावर आमचा उत्कट विश्वास आहे.
संगीत, नृत्य, नाटक ह्यांना प्रयोग कला म्हणतात कारण त्यात नवनवीन प्रयोग करणे अभिप्रेत असते. प्रयोगकलांच्या विद्यार्थ्याने शरीर, आवाज, विचार, आपली मते ह्याच्यांवर विविध अंगांनी काम करणे गरजेचे असते. दरवर्षी नाट्य विभागाचे विद्यार्थी प्रात्यक्षिक परीक्षेअंतर्गत विविध विषयांवर नाट्यप्रयोग सादर करतात. विद्यार्थी लिखित नाटके ते उस्फुर्त नाटके, प्रस्थापित दिग्दर्शकांनी आणि विद्यार्थी दिग्दर्शकांनी रचलेली नाटके, आहार्य (शारीर) अभिनयआधारित ते वाचिक अभिनयाआधारित नाटके, लोककला ते अभिजात नाटके अशी विविध नाटकांचे प्रकार हाताळून बघतात. ही वैविध्यपूर्ण स्वरुपाची, आशयाची, पारंपारिक आणि आधुनिक अशी नाटके सादर करणे ही चालत आले आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःतील कलाकार शोधताना आपली सर्जनशीलता आणि तंत्र घालत कला कशी जोपासता येईल? ह्याचे शिक्षण ललित कला केंद्र देते आहे, हेच ह्या विभागाचे दुर्मिळ सौंदर्य आहे. ही परंपरा जतन करायला हवी, त्याचे समर्थन करणे आवश्यक आहे असे आम्हाला वाटते.
ललित कला केंद्र (गुरुकुल) विद्यापीठाच्या नियमांनुसार लेखी तसेच प्रात्यक्षिक परीक्षा घेते. दरवर्षी, त्यांच्या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून नाटकाचे विद्यार्थी त्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा म्हणून विविध विषयांवर नाटके सादर करतात. आपण असे म्हणू शकतो की अशा परीक्षांच्या वेळी, रंगमंच हाच प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका असतो. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाच्या मूल्यमापनासाठी अंतर्गत आणि/किंवा बाह्य परीक्षक/तज्ञ उपस्थित असतात. या परफॉर्मन्समध्ये तोंडी परीक्षा (Viva) हा पण मूल्यमापन प्रक्रियेचा एक भाग असतो. या सादरीकरणांमध्ये कोणत्याही धर्माचा, जातीचा, पंथाचा, संप्रदायाचा अपमान करण्याचा किंवा कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू असत नाही.
संहिता ते प्रयोग (स्क्रिप्ट टू परफॉर्मन्स) हे नाटक अभ्यासक्रमातील एक महत्त्वपूर्ण मॉड्यूल आहे. ह्यामध्ये विद्यार्थी स्वतःचे 15 मिनिटांचे नाटक लिहिण्याचा आणि सादर करण्याचा प्रयत्न करतात. हा उपक्रम साधारण 1990 पासून चालू आहे. ह्या उपक्रमाच्या निमित्ताने आजपर्यंत अधिक नाटके सादर केली गेली आहेत. ललित कला केंद्र येथे 2 फेब्रुवारी 2024 रोजी संध्याकाळी संहिता ते प्रयोग परीक्षेला उपस्थित असलेल्या एका गटाला एका संहितेच्या सादरीकरणाचा चुकीचा अन्वयार्थ लागला. त्या गटाने विभागाचे विद्यार्थी, प्राध्यापक, परीक्षक आणि प्रेक्षक ह्यांना अडथळा करत चालू प्रयोग थांबवला. विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींना मारहाण करण्यात आली, शिक्षकांना धमकावण्यात आले आणि शिवीगाळ करण्यात आली. हे वर्तन अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह आहे आणि कायदेशीर कारवाईयोग्य आहे. आम्ही ह्या झाल्या प्रकाराचा तीव्र निषेध करतो.
चर्चेतून वादविवाद करत नवनवीन कल्पनांना जन्म देण्याच्या समृद्ध परंपरेचा अभिमान बाळगणाऱ्या आपल्या देशात हा गट धमक्या- गैरवर्तन- हिंसाचार करतो हे लज्जास्पद आहे. हे कृत्य आमच्या विद्यापीठाच्या परीक्षाप्रणालीचे विचित्र उल्लंघन आहे आणि जे दहशत वाढवणारे आहे.
त्या संध्याकाळी सादर झालेल्या कोणत्याही नाटकाच्या सादरीकरणाबाबत जर कुणा प्रेक्षकाला आक्षेप असेल, तर ती व्यक्ती औपचारिकपणे विभागप्रमुख किंवा विद्यापीठ प्रशासनाकडे त्यांचे आक्षेप नोंदवू शकते. तशी तरतूद आहे. पण तसे झाले नाही. उलट विद्यापीठातील विद्यार्थी आणि विभागप्रमुख ह्यांच्या विरोधात थेट पोलिस तक्रारी नोंदवल्या गेल्या. हे अत्यंत दुःखदायक आहे. आणि त्यावेळी विद्यार्थ्यांना/विद्यार्थिनींना झालेल्या धक्काबुक्कीची दखल घेतली गेली नाही. तक्रार नोंदवून घेतली गेली नाही. हे अनाकलनीय आहे. विभाग, त्याचे विद्यार्थी आणि विभागप्रमुख हे या घटनेचे खरे बळी आहेत. त्यांना आता अन्यायकारकपणे लक्ष्य केले जात आहे. त्यांची जाणूनबुजून बदनामी केली जात आहे. जे व्हिडिओज प्रसारित (व्हायरल) केले जात आहेत, ज्या गोष्टी बोलल्या आणि लिहिल्या जात आहेत (सोशल मिडिया तसेच इतर ठिकाणी) त्यातून चुकीची माहिती देऊन संस्थेबद्दल गंभीर गैरसमज निर्माण झाले आहेत. सध्याचे विभागप्रमुख प्रविण भोळे हे गेली अनेक वर्षे नाट्यशिक्षक, अभ्यासक आणि रंगकर्मी आहेत. ते ह्या विभागाशी गेली अनेक वर्षे सबंधित आहेत. विद्यार्थ्यांच्या नाटक ह्याविषयीच्या जिज्ञासेमध्ये ते आनंदाने भर घालत असतात. त्यांच्या बद्दल अत्यंत हीन पातळीवर जाऊन केलेली शेरेबाजी ही अस्वस्थ करणारी आहे.
आम्ही सर्वांना आवाहन करतो की कृपया ही अनुचित निंदा आणि बदनामी थांबवावी. आम्ही विनंती करतो की विद्यापीठ प्रशासन आणि पोलिसांनी आमच्या सर्व प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना पुरेसे संरक्षण द्यावे.
हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे. आम्ही सर्व गट, संस्था, विद्यार्थी, कलाकार आणि कलाप्रेमी मंडळींना आवाहन करतो की त्यांनी भारतीय राज्यघटना आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा आदर करावा.
आम्ही ललित कला केंद्राच्या (गुरुकुल) विद्यार्थी, विभागप्रमुख आणि प्राध्यापकांसोबत एकजुटीने उभे आहोत.
जय हिंद!
कोणत्याही नाटकाच्या
कोणत्याही नाटकाच्या सादरीकरणाबाबत जर कुणा प्रेक्षकाला आक्षेप असेल, तर ती व्यक्ती औपचारिकपणे विभागप्रमुख किंवा विद्यापीठ प्रशासनाकडे त्यांचे आक्षेप नोंदवू शकते. तशी तरतूद आहे. पण तसे झाले नाही. उलट विद्यापीठातील विद्यार्थी आणि विभागप्रमुख ह्यांच्या विरोधात थेट पोलिस तक्रारी नोंदवल्या गेल्या. हे अत्यंत दुःखदायक आहे.
>>>>
निवेदन समयोचित आहे. फक्त वरचा परिच्छेद खटकला.
विभागप्रमुख/विद्यापीठ प्रशासनाकडेच का तक्रार करावी? पोलिसांकडे का करू नये याचं काय संयुक्तिक कारण आहे? जोपर्यंत कुठलाही हिंसक मार्ग न वापरता कायदेशीर मार्गाचा वापर होतो आहे तोवर कुणाचा आक्षेप असू नये.
आणि स्वतःलाच संवेदनशील म्हणून घेणे हेही गंमतीशीरच आहे. पण असो…
पहिले काही परिच्छेद त्यांच्या
पहिले काही परिच्छेद त्यांच्या मार्केटिंग ब्रोशरमधून घेतलेले वाटतायत.
कोणी साईन केलंय हे निवेदन? ती
कोणी साईन केलंय हे निवेदन? ती नावं झाली नाहीयेत पोस्ट. व्हाइट मनी देऊन नाटकाची तिकिटे काढणाऱ्या हिंदू जनतेला कळू दे की अजिबात दिलगिरीदेखील व्यक्त न करणारे आणि "अमच्याविरुद्ध पोलीस तक्रार करण्याचा हक्क हिंदूना नाही" असं special privilege असलेले कलाकार कोण कोण आहेत?
बाकी अकोल्यातील कोणी आहे का इथे? एबीपी माझा ची बातमी, मागच्या महिन्यातील आहे.
Akola : अकोल्यामध्ये अफझलखानाचा वध दाखवल्यानं मागायला लागली माफी, होमिओपॅथी महाविद्यालयातील प्रकार
अकोल्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्यात अफझलखानाच्या वधाचं दृष्य साकारणार्या विद्यार्थ्यांना माफी मागायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अकोल्यातील होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात हा प्रकार घडलाय. अफझलखानाच्या वधाचं दृष्य दाखवल्यानं आपल्या भावना दुखानल्याचा आरोप एका विशिष्ट धर्मीय विद्यार्थ्यांनी केला होताय. त्यानंतर नाट्य सादर करणार्या विद्यार्थ्यांना माफी मागण्यास भाग पाडण्यात आलंय. दरम्यान, अकोल्यातील हिंदुत्ववादी संघटना आणि काही राजकीय पक्षांनी आक्रमक होत दोषींवर कारवाईची मागणी केलीये.
हिंदूंव्यतिरीक्त इतर कोणाच्या
हिंदूंव्यतिरीक्त इतर कोणाच्या भावना अश्या दुखवू नयेत हो श्याम.
हा हा मामी.
हा हा मामी.
अफजल खान वध दाखवण्यात काहीच चुकीचे नाही.
इथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य पाहिजे म्हणणाऱ्यांचे त्याबद्दल काय मत आहे असे विचारायचे असेल, तर माझे तरी हेच म्हणणे आहे. माफीची मागणी योग्य नाही आणि बळजबरीने मागायला लावली असेल तर त्या विरुद्ध तक्रारही योग्य आहे.
तिकडे तसे झाले म्हणुन इकडले योग्य ठरत नाही आणि व्हाईस या व्हर्सा.
तिकडे तसे झाले म्हणुन इकडले
तिकडे तसे झाले म्हणुन इकडले योग्य ठरत नाही आणि व्हाईस या व्हर्सा.
Submitted by मानव पृथ्वीकर on 7 February, 2024 //
तिकडे झाल्यावर पुरोगामी प्रतिक्रिया ही गप्प बसणे ते ओपन समर्थन करणे अशी असते. अगदीच त्यांना confront केलं आणि troll केलं तर कदाचित 'नाही हे पण चुकीचं आहे' असं कसंबसं बोलतील.
पण या अशा राम सीतेच्या वादात एकदम घरचं कार्य असल्यागत उत्साहात असतात. काय लिहू काय नको असं झालेलं असतं. बाबा बर्वे आता कोणत्याही क्षणी उपोषणाला बसणार असा एकूण सीन असतो.
(No subject)
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/sampadkiya/features/what-exactly-happened-in-pu...
अफजलखानाचा वध दाखवला म्हणून
मानव +१
धन्यवाद.
अफजलखानाचा वध दाखवला म्हणून माफी मागायला लावली. खरेच असे झाले असेल तर धिक्कार असो. पण ज्या आयडीने हे सांगितले आहे त्यांचा इतिहास बघता संपूर्ण माहिती घेऊन व्यक्त होणे शहाणपणाचे ठरेल.
रत्नांग्रीच्या समस्त म्हशी
रत्नांग्रीच्या समस्त म्हशी तूर्तास गाभण काय रे झंप्या
महाराष्ट्राचे समस्त पुरोगामी सानेगुरुजी या अशा घटनांच्या वेळी तूर्तास गायब असतात काय रे झंप्या
सानेगुरूजी हा उल्लेख हेटाळणी
सानेगुरूजी हा उल्लेख हेटाळणी करण्यासाठी आहे का?
त्या निवेदनातीलही सुरवातीचे
त्या निवेदनातीलही सुरवातीचे परिच्छेद पाल्हाळ लावणारे वाटले खरे.
पण माझेमन, मुळात या प्रकारात मारहाण झाली आणि लगेच पोलीस तक्रार होऊन विद्यार्थी-प्रोफेसर्सना अटक झाली हेच तर बहुतेकांना धक्कादायक वाटले. त्यामुळे आधी कुठे तक्रार न होता सरळ पोलीस तक्रार होते हे दुःखदायक म्हटले आहे असा मला अर्थ लागला. यातुन पोलिसात तक्रार करण्याचा हक्क नाही असा अर्थ निघत नाही.
ऑफिसमध्ये कसली वादावादी झाली आणि लगेच पोलीस तक्रार झाली पोलीस आले कुणाला अटक करून घेऊन गेले. यात जर अरे एवढे काय झाले, वाद इथेच मिटवता आला असता, एवढ्यासाठी पोलीस तक्रार केली म्हणजे आश्चर्य आहे/ वाईट वाटले म्हटले तर त्याचा अर्थ पोलिसात तक्रार करण्याचा अधिकार नाही असा होत नाही.
अधीकाराच्या दृष्टीने पोलीस तक्रार, अनेक ठिकाणी पोलीस तक्रार , खटला, सरळ सुप्रीम कोर्टात याचिका यात काही चूक नाही.
आणि आपसात वाद मिटवता आला असता एव्हढ्याची गरज नव्हती, हे दुःखदायक आहे असे म्हणणे ही चूक नाही.
विद्यापीठाच्या आवारात कारवाई
विद्यापीठाच्या आवारात कारवाई करण्यासाठी कुलगुरुंची परवानगी लागते. त्याशिवाय पोलीस कारवाई करू शकत नाहीत हा नियम आहे.
आणि आपसात वाद मिटवता आला असता
आणि आपसात वाद मिटवता आला असता एव्हढ्याची गरज नव्हती, हे दुःखदायक आहे असे म्हणणे ही चूक नाही.//
इतकं सगळं झाल्यानंतरही "आमचा दुखावण्याचा हेतू नव्हता पण तरी कोणी दुखावलं गेलं असल्यास आम्ही दिलगीर आहोत" इतकंही म्हणायची त्यांची तयारी नाहीये. थोडक्यात- "आमचं काही चुकलं नाहीये, we regret nothing, तुमच्या दुखावलेल्या भावना हा सर्वस्वी तुमचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही चुकीचा अन्वयार्थ लावलाय" असा attitude दिसतोय.
याला सामोपचार म्हणत नाहीत. जर पोलीस तक्रार न करता नुसतं भोळेला निवेदन दिलं असतं तर त्याने "तुमचंच चुकतंय, तुम्ही हे सगळं स्वीकारलं पाहिजे" असं म्हणून उडवून लावलं असतं.
फिबां नियमाबद्दल खात्री आहे
फिबां नियमाबद्दल खात्री आहे का? माझाही आधी असा समज होता पण काही वर्षांपूर्वी कुठल्याशा (बहुतेक दिल्लीत कुठल्या कॉलेजमध्ये पोलीसांनी कारवाई केली त्या) घटने नंतर यावर उलट वाचायला मिळाले तेव्हा शंका आहे.
हर्पेन, पोस्ट
हर्पेन, पोस्ट कानामात्रावेलांटी सकट पटली!
>>>
धन्यवाद अमित.
मग मी आधी जो प्रश्न विचारला तोच पुन्हा विचारते - भारतात लोकशाही, कायदा आणि सुव्यवस्था उरलेली नाही, की लोकांचा त्यावर विश्वास उरलेला नाही? >>>
सॉरी स्वाती एका वर्गातल्या दोन गटांमधल्या मुलांमधे नाटक बंद पाडण्यासंदर्भात झालेल्या कथीत धक्काबुक्की / मारहाण प्रकरणामुळे असे वाटत असेल तर ह्याला सुतावरून स्वर्ग गाठणे म्हणावे लागेल. मी म्हटले तसे कॉलेजात राडे व्हायला कुठलेही फालतू कारण/ निमित्त पुरते.
बंद पाडणार्या लोकांनी ( भले चोराच्या उलट्या बोंबा असो) पोलीसात तक्रारी केल्यात म्हणजे भारतात अजूनतरी कायदा आणि सुव्यवस्थेवरचा विश्वास उडलेला नाही की शाळेच्या वर्गातल्या मुलांना बंदुकीने अंदाधुंद गोळीबार करून मारत सुटण्याइतकी कायदा आणि (सु?)व्यवस्थेची बोंब झालेली नाहीये.
अच्छा! म्हणजे 'पुरुष', 'बाईंडर' वगैरे नाटकांचे प्रयोग सुरू असताना एखाद्या प्रेक्षकाने रंगमंचावर येऊन पात्राला दोन दणके दिले तर ते योग्य आहे ? >>>
विकु माझ्या तोंडी शब्द घुसवू नका. मी योग्य आहे असे कुठेही म्हटले नाहीये. मी फक्त अभिव्यक्ती म्हटले आहे.
कोणाकोणाला शिव्या म्हणजे शाब्दीक हिंसा असेही वाटते (हो सध्याच्या युगात देखील).
अवांतर - हिंसेचे तीन प्रकार मानले जातात मानसिक (क्रोध द्वेष मत्सर ) शाब्दीक (शिव्या शाप ) शारिरीक (मारामारी खून)
तात्विक आणि व्यावहारिक मुद्दे यांची गल्लत नको. >>>
इथे फक्त तात्विक चर्चा करायची आहे का ? मला वाटले होते इथे ललित कला केंद्रात नक्की काय झालं? हे जाणून घ्यायचे आहे.
म्हणून मी आपले अडनिड्या वयातली मुले आहेत, होतात चुका, कॉलेज मधले राडे आपलीच मुले आहेत कोणाचे नुकसान व्हायला नको वगैरे लिहित होतो.
बट यु आर म्हणिंग राईट इथला एकंदरीतच सूर बघता मला पटले आहे की इथे काहींना हा मुद्दा पॉलिटीसाईझ करायचा असावा असे वाटते आहे तर बहुतेकांना तात्वीक चर्चेत रस दिसतो आहे.
उगाच वेळ वाया घालवला मी
असो चालायचंच.
मानव काल बीबीसी ने केलेल्या
मानव काल बीबीसी ने केलेल्या रिपोर्ताज मधे लकें च्या माजी विभाग प्रमुखांनी ऑन कॅमेरा सांगितले आहे.
माझ्या माहितीप्रमाणे गंभीर गुन्हे अपवाद असतात. वॉरंट असेल तर झडती घेता येते.
म्हणून मी आपले अडनिड्या
म्हणून मी आपले अडनिड्या वयातली मुले आहेत,..
>>>>>
मुले सज्ञान होती.
बाई दवे रात्री ते सकाळ फारच
बाई दवे रात्री ते सकाळ फारच पोस्ट झाल्या आहेत. त्या देखील मोठमोठ्या. वाचणे अवघड आहे लगेच. पण विषय फार दूर गेला नसेल असे वाटते..
भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही किंवा त्याची गळचेपी होते असे मोजक्या प्रसंगावरून सरसकट म्हणने चुकीचे ठरेल.
पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य सोबत जी जबाबदारी येते ती झेपणे गरजेचे आहे. ही केस (जर हा खोडसाळपणा नसेल तर) त्यातली आहे
कुठल्याही वादात इतरांच्या
कुठल्याही वादात इतरांच्या भावना, पॉईंट ऑफ व्ह्यू तुमच्यापेक्षा वेगळा असू शकतो हे मान्य करणे ही सामोपचाराची पहिली पायरी असते.
पण आम्हीं जे काय करतोय तेच उदात्त/समाजाला वेगळी दिशा दाखवणारे/समाजाच्या भावना जपणारे/ तुमचे विचारच संकुचित/आगाऊ/अपमानजनक असा अटीट्युड असेल तर मग सामोपचाराचा तिथेच निकाल लागतो.
या प्रकरणाचा गवगवा झाल्याने आता सामोपचाराची शक्यता दुरापास्त झाली आहे. पण संबंधित सर्वानीच पुनरावलोकन करून धडा घेण्याची गरज आहे.
हेमाशेपो
Pages