Submitted by स्वाती_आंबोळे on 5 February, 2024 - 09:11
ललित कला केंद्रातील विद्यार्थी सादर करत असलेलं एक नाटक हिंदू देवदेवतांचा अपमान करत असल्याचं कारण देऊन अभाविपच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडलं. नाटकाशी संबंधित असलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांना अटक करण्यात आलं.
सोशल मीडिआवरच्या पोस्ट्स वाचून मला इतकंच कळलं.
मला खालील प्रश्न पडले, कोणाला यासंदर्भात माहिती असेल तर कृपया सांगा:
त्या नाटकात नक्की अपमानास्पद असं काय होतं?
या प्रसंगी मारहाण झाली का? कोणी सुरू केली?
अटक कोणत्या कायद्याखाली झाली?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>> सिता सिगारेट ओढते आणी
>>> सिता सिगारेट ओढते आणी लक्ष्मण ती पेटवुन देतो अशी दुष्य आहेत.
नाही, सीतेचा रोल करणारी नटी बॅकस्टेजला सिगरेट ओढते आहे अशी दृश्यं होती - तेच लक्ष्मणाबद्दल.
जाने भी दो यारों वगैरे सिनेमे
जाने भी दो यारों वगैरे सिनेमे आता बनले तर ?
सिता सिगारेट ओढते आणी लक्ष्मण
सिता सिगारेट ओढते आणी लक्ष्मण ती पेटवुन देतो अशी दुष्य आहेत. >>> मग सिगारेट ओढली ती सीता या पात्राने की सीतेचे काम करणार्या नटाच्या पात्राने?
हो ना, जाने भी दो यारो मधे खून झालेल्या माणसाला ( प्रेताला) साडी नेसवून सती द्रौपदी नाटकात द्रौपदी बनवून आणतात असे होते. लोकांनी मस्त एंजॉय केले ते सीन्स! हल्ली लोक आधीच ठरवतात आता आमच्या भावना दुखणार म्हणजे दुखणार.
नाही, प्रयोग पाहायला आलेले
नाही, प्रयोग पाहायला आलेले वसतिगृहातले विद्यार्थी असं दिसतंय - काहीतरी गोंधळ होणार याची त्यांना कल्पना असावी.>>>
दोन वेगळी स्टेटमेंट्स आहेत.
वसतीगृहातल्या विद्यार्थ्यांना निमंत्रण कशासाठी?
परिक्षेला विद्यार्थी बॅट्स, काठ्या घेउन कसे येतात?
लेखिका घटनास्थळी उपस्थित होत्या असे वाटत नाही. तेव्हा नक्की कोण लाठ्या काठ्या घेउन आले होते हा प्रश्न आहेच.
'आपण सादर करत असलेली संहिता
'आपण सादर करत असलेली संहिता ही प्रश्न उपस्थित करणारी व आक्षेपार्ह आहे, याची कल्पना संबंधितांना होती. म्हणूनच ते लाठ्या, काठ्या इ. घेऊन आले होते' असं म्हटलंय ना?
सीता आणी ते पात्र सादर करणारे
सीता आणी ते पात्र सादर करणारे कॅरॅक्टर यातला फरक कळत नही का? असेच लोक्स मग अरुण गोविल विमानतळावर दिसला तरी पाया पडतात.
भोळे आणि गँग नी हिंदू धर्मीय
भोळे आणि गँग नी हिंदू धर्मीय लोकांच्या आदर्श श्रद्धा स्थानावर आधारित नाटकात बॅकस्टेज गोंधळ सादर केला तसाच ,तीच थीम घेवून.
बाकी धर्मीय आणि इतर ह्यांच्या श्रद्धा स्थान असणाऱ्या chracter वर नाटक सादर करावे तेव्हा त्यांच्या कलागुणांना खरे समजले जाईल .
नाही तर फक्त विद्वेशातून च त्यांनी हिंदू धर्माचा अपमान केला आहे असे कोणी ही समजेल
स्वाती, हो, पुढे तसे स्पष्ट
स्वाती, हो, पुढे तसे स्पष्ट लिहिलंय. माय बॅड.
सीता आणी ते पात्र सादर करणारे
सीता आणी ते पात्र सादर करणारे कॅरॅक्टर यातला फरक कळत नही का? असेच लोक्स मग अरुण गोविल विमानतळावर दिसला तरी पाया पडतात.
नवीन Submitted by vijaykulkarni on 6 February, 2024 - 02:38
सगळं मान्य आहे. फक्त तुम्ही अशी एक imaginary एकांकिका इथे लिहून दाखवू शकता का जिथे एखाद्या नाटकाच्या backstage ला सावित्रीबाईंच्या गेटअपमधील अभिनेत्रीला डॉ आंबेडकरांच्या किंवा फुलेंच्या गेटअप मधला अभिनेता सिगरेट पेटवून देतोय, ते तिघे घाणेरड्या शिव्या देत एकूण cheap पणे वागत आहेत. आणि मग त्या प्रयोगातले फक्त छोटे क्लिप किंवा फोटो व्हायरल केले जात आहेत त्यात जगभरातील audience ला इतकंच दिसतंय की हे महान व्यक्ती असं असं करताना दाखवले आहेत कारण ते पूर्ण नाटक बघत पण नाहीयेत.
काही महापुरुषांवर memes पण केले तरी कायदेशीर कारवाई होते.तिथे dark humor, अभिव्यक्ती वगैरे लागू नसतं. सर से तन जुदा झाल्यावर कोण काय जोक करणार. हिंदु समाजाचं objection या एकांगीपणाला आहे. की तुम्ही कोणाच्या श्रध्दास्थानाला दुखवायचं नाही पण ते लोक तुमच्या भावना दुखावतात ते सहन करा. असं नाही होत ना. It has to be a two way street. You can make fun of me if I am allowed to make fun of you, too.
इथे बरेच जण सीतामाईची भूमिका
इथे बरेच जण सीतामाईची भूमिका करणारा कलाकार बॅकस्टेजला सिगारेट ओढत होता वगैरे वगैरे मुद्दे काढून त्याची बाजू उचलून धरत आहेत.
जर त्याला सिगारेट ओढायचीच होती तर अंगावरून सीतामाईचा वेष उतरवून साध्या कपड्यात काय हवे ते धंदे करावे ना! जर तुम्ही एखाद्या पौराणिक/ ऐतिहासिक पात्राची वेशभूषा करता तर ते केवळ कपडे नाहीत, त्यासोबत खूप मोठी जबाबदारी असते त्या व्यक्तिमत्वाचा योग्य तो मान राखण्याची.
यानिमित्ताने काही महिन्यांपूर्वी लोकसत्ता ऑनलाइन मध्ये वाचलेली एक बातमी आठवली
अभिनेता श्री. चिन्मय मांडलेकर हे शिवराज अष्टक मालिकेतील चित्रपटांत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतात. त्यावेळी एकदा का महाराजांचा पोशाख अंगावर परिधान केला की ते सेटवर कोणालाही त्यांच्यासोबत फोटो / सेल्फी काढू देत नाहीत. हा आहे त्या व्यक्तिमत्वाचा योग्य तो आदर!
>>> जगभरातील audience ला
>>> जगभरातील audience ला इतकंच दिसतंय की हे महान व्यक्ती असं असं करताना दाखवले आहेत कारण ते पूर्ण नाटक बघत पण नाहीयेत
पण हाच प्रॉब्लेम नाही का? एकतर हा प्रयोग जगभरातल्या ऑडियन्ससाठी मुळातच नव्हता - आता अभाविपमुळे झाला. आणि अभाविपनेदेखील पूर्ण नाटक आणि कॉन्टेक्स्ट समजून न घेताच आक्षेप घेतला?
सीता आणी ते पात्र सादर करणारे
सीता आणी ते पात्र सादर करणारे कॅरॅक्टर यातला फरक कळत नही का? असेच लोक्स मग अरुण गोविल विमानतळावर दिसला तरी पाया पडतात.
Submitted by vijaykulkarni on 6 February, 2024 - 02:38
हाच तो त्या पात्राचा आदर! आणि अरुण गोविल यांना तो आदर मिळतो कारण त्यांनी देखील त्या भूमिकेला योग्य तो न्याय दिला, या मुलांसारखा थिल्लरपणा नाही केला.
या नाटकातली नटी ही 'सीतेचं
या नाटकातली नटी ही 'सीतेचं काम करणार्या नटीचं' काम करत होती.
स्वाती आंबोळे तुम्ही विनाकारण
स्वाती आंबोळे तुम्ही विनाकारण युक्तिवाद करत आहात.
.
राम आणि सीता ही दोन्ही पात्र हिंदू धर्मीय लोकांसाठी अतिशय पवित्र आहेत.
त्या पात्रांचा खिल्ली उडवणाऱ्या लोकांचे समर्थन करणारा कोणताही युक्तिवाद कोणताही हिंदू मान्य करणार नाही.
तुमचा युक्तिवाद हा गुन्हेगार लोकांना वाचवण्याचा हास्यास्पद प्रयत्न आहे
दीपिका चिखलियाने रामायणात
दीपिका चिखलियाने रामायणात सीतेची भूमिका केल्यानंतर बी ग्रेड सिनेमात कमी कपड्यात काम केले तेव्हा भावना दुखावण्याची फॅशन आली नव्हती, जाने भी दो यारोही लोकांनी सहज स्वीकाराला. आता लोकांनी जुन्या काळातील वगनाट्ये बघितली तर त्यांना फेफरे येईल. कलेच्या मंदिरात जाताना पूर्वी भावनेचे जोडे बाहेर काढले जायचे आणि मनोरंजनाचा आनंद घेतला जाई.
अभाविप चं माहीत नाही पण इन
अभाविप चं माहीत नाही पण इन जनरल लोकांची जी संतप्त प्रतिक्रिया आहे ती reactionary आहे. तुम्ही इस्लाम तर सोडाच, दूरच राहू दे- इव्हन पुरोगामी महापुरुषांबद्दल जराही लिबर्टी घेतल्यास लीगल कारवाई, हिंसक जमावाचा हल्ला, शाइफेक असं काहीही होऊ शकतं. आणि ठीक आहे, we respect their feelings. पण मग सेम deorum आमच्याही icons बद्दल पाळा ना.
चार मित्र एकमेकांना डार्क ह्यूमर म्हणून यथेच्छ रोस्ट करत असतील तर ते चालतं. पण त्यातल्या एकाचंच रोस्टिंग होतंय, बाकीच्या तिघांना जरा काही बोललं तर कायदा, जेल, शाइफेक ते शिरच्छेद यातलं काहीही होऊ शकतं- ते तो चौथा मित्र पण नाही ना सतत ऐकून घेणार.
आग्या १९९०.
आग्या १९९०.
कला म्हणून कोण व्यंग करते आणि खिल्ली उडवण्यासाठी पवित्र आदर्श पात्रांच कोण अपमान करते ह्याची जाणीव लोकांना असते
मच्छिंद्र कांबळे ह्यांनी पण हिंदू धर्मीय पूज्य स्थानांवर व्यंग केले होते लोकांना ते समजत होते म्हणून कोणी विरोध नाही केला .
>>> बाकीच्या तिघांना जरा काही
>>> बाकीच्या तिघांना जरा काही बोललं तर कायदा, जेल, शाइफेक ते शिरच्छेद यातलं काहीही होऊ शकतं- ते तो चौथा मित्र पण नाही ना सतत ऐकून घेणार.
मग त्यावर उपाय कोणालाच गोंधळ घालू न देणं हा आहे की सर्वांना गोंधळ घालायला उत्तेजन देणं हा?
गोंधळ घालून काही होणार नाही
गोंधळ घालून काही होणार नाही हे हिंदू समाजालाही हळूहळू कळतंय की. कारण नंतर शिस्तीत लीगल कारवाई झाली, भोळे म्हणून कोण आहे त्याला अटक झाली असे वाचले.
आता तुम्ही म्हणाल की अटक तरी कशाला, हे अति होतंय वगैरे. तर त्याबद्दल इतकाच मुद्दा की हे reactionary आहे. समोरच्या बाजूने कायदे वापरले जातात तर आम्ही का नाही वापरायचे टाइप.
समोरच्या बाजूने आपल्या महापुरुषांची characters घेऊन हीच संहिता हवं तर घ्यावी adapt करून. टाका युट्युबवर. दाखवा तर हिंदूना की सहिष्णुता क्या चीज होती है. सतत हिंदूना 'तू मोठा ना , तू शहाणा ना ,मग तू गप्प बस' असं समजावत दुसऱ्या भावंडाना पाठीशी घालण्याचे दिवस नाहीयेत आता.
"संहिता ते प्रयोग" या लालित
"संहिता ते प्रयोग" या लालित कला केंद्र पुणे विद्यापीठातील पोरांच्या प्रॅक्टिकल परीक्षेत काही पोरांनी रामलीलेवर आधारित म्हणजे रामलीलेच्या पडद्यामागे काय गोष्टी घडत असतील यावर आधारित एक 20 मिनिटांचं सादरीकरण करण्याचा प्रयत्न केला. या परीक्षेला audience पण असतो. मी 2-3 वर्ष "संहिता ते प्रयोग" ला audience म्हणून गेलेलो आहे. माझा अनुभव असा आहे की, आठ सादरीकरण असतील तर एखाद दुसरं चांगलं असतं बाकी सो सो असतात. यापेक्षा पुरुषोत्तम मध्ये होणाऱ्या एकांकिका जास्त चांगल्या असतात. किमान मी पाहिलेले तरी असे होते आत्ताचे माहित नाही. यात बरेच सादरीकरण हे त्या त्या विचारांच्या, आर्ट फॉर्म च्या romanticism आणि कुलपणा मधून होत असतात. त्यात खूप काही विचारधारा, आशय, प्रगल्भता नसते किमान माझा तरी असा अनुभव आहे. त्यात वावगं काही नाही. कारण ते करण्याऱ्या पोरांची समज पण तितकीच असते. ही सगळी पार्श्वभूमी सांगायचं कारण असं, की ज्यावर इतका वितंडवाद होतो आहे त्याचं स्वरूप आणि आवाका एका विद्यापीठाच्या परीक्षेसाठी फायनल इयर च्या पोरांनी केलेलं 20 मिनिटांचं सादरीकरण इतकाच होता. पण तो आता राज्य पातळीवरील विषय बनला आहे.
ज्या सादरीकरणाबद्दल वाद सुरू आहे जेवढा मी व्हिडिओ पहिला त्यात पोरं गडंले कुठं? माझ्यामते सीतेचे पात्र आणि ते पात्र साकारणाऱ्या कलाकाराचे पात्र या दोन गोष्टींची भेळ करून त्यात symbolism वापरून उगचच सोशल मेसेजिंग देण्याचा प्रयत्न त्या सादरीकरणात केला गेला. तुम्ही ह्यूमर सीतेचे पात्र साकारणाऱ्या कलाकाराच्या पात्रासोबत पाहिजे तितका करू शकता. पण जेव्हा तो सीतेच्या पात्रात येतो तेव्हा तुम्ही त्याच पद्धतीचा ह्युमर करत असाल तर मग गडबड होणार ना!
पण या निमित्ताने पुन्हा एकदा मुद्दा समोर आला की, नाटक किंवा कुठल्याही तत्सम अभिव्यक्तीतून करोडो लोकांची मान्यता असणाऱ्या देव देवतांची टिंगल करणे योग्य आहे का?! बरं या अगोदर हे घडत नव्हतं का? तर होतं. आता कुठलाही तमाशा घेतला तर त्यात कृष्णाचं आणि पेंद्याचं पात्र असतं त्यावर अनेक विनोद असतात. लोकं त्यावर हसतही असतात. फारसं कुणी त्याला सिरीयसली घेत नसतं.
पण मग आताच का लोकं ऑफेंड व्हायला लागले?! त्याचं कारण असं आहे की, विनोद हे केवळ आपल्याच धर्माच्या देव देवतांवर होत आहेत हे आमच्या लक्षात आणून दिलं गेलं. इतर धर्मियांच्या देवतांवर, त्यांच्या प्रेषितांवर विनोद, चिकित्सा करायला गेलं की काय होतं त्याचं प्रात्यक्षिक लोकांनी पाहिलं. मग या प्रसंगामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कैवार घेणारे शांत बसले किंवा ज्यावर अन्याय होत होता त्यालाच नावं ठेवली गेली. तेव्हा लक्षात असं येत गेलं की, आपल्याच देवी देवतांचं विडंबन होतंय, त्यांच्यावरच विनोद होतोय, त्यांचीच चिकित्सा होते आहे बाकी धर्माच्या देवतांवर हे अजिबातच होत नाही. आपण या गोष्टींना विनाकारण नॉर्मल करून ठेवलं असल्याची भावना आता हिंदूंमध्ये निर्माण होत आहे. अडचण देवतांची चिकित्सा किंवा त्यांच्यावरील विनोदाची नाहीये, अडचण "आमच्या'च' का?" ही आहे. सध्या ही भावना अधिकाधिक वाढत आहे. आता हळूहळू अशा स्वरूपाची प्रत्येक गोष्ट हिंदूंच्या मायक्रोस्कोपखाली येत आहे. त्याला जबाबदार कोण हे ठरवत असताना तीव्र हिंदुत्ववाद्यांकडे बोट दाखवताना तथाकथित पुरोगामी मंडळींनी आपल्या दुटप्पीपणाकडे लक्ष द्यायला हवं! कारण तुम्ही फट सोडली म्हणून हिंदुत्ववादी हात घालत आहेत. बहुसंख्य हिंदूंच्यामध्ये ही असुरक्षिततेची भावना नेमकी का येते? त्याला सपशेल नाकारण्याऐवजी याचा विचार स्वतःला सेंटर टू लेफ्ट म्हणवणाऱ्या लोकांनी करणं गरजेचं आहे. त्यानुसार नवी मांडणी होणं आवश्यक आहे.
आता पुन्हा मूळ घटनेकडे येऊया. अभाविप च्या पोरांनी ललितच्या पोरांना किंवा ललितच्या पोरांनी अभाविपच्या पोरांना मारहाण करणं हे अजिबात समर्थनीय नाही. निव्वळ बोलण्यातून आणि शांततेत विषय मिटला असता. सादरीकरण करणारी पोरं चुकली आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर वैधानिक मार्ग वापरून त्यांना समज देता आली असती. राडा घालण्याची काहीही आवश्यकता नव्हती. जो विषय एका चिल्लर सादरीकरणापुरता होता त्याला राज्यस्तरीय स्वरूप आलं. यामुळे ललित, विद्यापीठ परिसर यावर गरजेपेक्षा जास्त बंधने घातली जातील. जे एफ. टी. आय. आय. चं होतंय तेच इथही होईल... राजकारणाची पोळी भाजनारे भाजून निघतील आणि नुकसान मात्र पोरांचच होईल!
त्यामुळे किमान आतातरी हे लक्षात घेतलं पाहिजे की, रामायण, महाभारत ही तुमच्यासाठी काल्पनिक गोष्ट किंवा मायथोलॉजी किंवा बोधकथा असली तरी अनेकांसाठी तो इतिहास आहे आणि त्याच्याशी त्यांच्या भावना जोडल्या आहेत. जेव्हा आपण स्वतःला "लोककलावंत" म्हणवतो तेव्हा "लोकभावना" काय आहे हे देखील समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. त्या लोकभावनेचा तुम्ही अकारण उपमर्द करत असाल, त्याला नाकारत असाल तर मग होणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्याची देखील तुम्ही तयारी ठेवली पाहिजे. पण याचा अर्थ असाही नाही की "लोकभावना" आमच्या बाजूची आहे म्हणून आम्हीही काहीही करू. जसं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आधार घेऊन कलाकारांनी स्वैराचार करू नये ही अपेक्षा असते तसच भावनेचा आधार घेऊन प्रेक्षकांनीही गुंडगिरी करू नये ही अपेक्षा आहे. असो!
- आनंद कुलकर्णी
फक्त तुम्ही अशी एक imaginary
फक्त तुम्ही अशी एक imaginary एकांकिका इथे लिहून दाखवू शकता का जिथे एखाद्या नाटकाच्या backstage ला सावित्रीबाईंच्या गेटअपमधील अभिनेत्रीला डॉ आंबेडकरांच्या किंवा फुलेंच्या गेटअप मधला अभिनेता सिगरेट पेटवून देतोय, ते तिघे घाणेरड्या शिव्या देत एकूण cheap पणे वागत आहेत. >>>>Whiteheat, तुम्ही लिहा की. तुम्हाला त्रास झाल्यास आम्ही सगळे तुमच्या पाठीशी उभे राहू.
अहो कंसराज, माझा वैयक्तिक
अहो कंसराज, माझा वैयक्तिक विरोध जिथे त्या मूळ नाटकाला आहे तिथे कोणतीही characters घेऊन तसं लिखाण करण्याला माझा विरोधच राहील त्यामुळे मी तर लिहूच शकणार नाही.
ज्यांना मूळ संहिता harmless वाटते त्यांच्यासाठी तो rhetorical प्रश्न आहे.
>>> अभाविप च्या पोरांनी
>>> अभाविप च्या पोरांनी ललितच्या पोरांना किंवा ललितच्या पोरांनी अभाविपच्या पोरांना मारहाण करणं हे अजिबात समर्थनीय नाही. निव्वळ बोलण्यातून आणि शांततेत विषय मिटला असता. सादरीकरण करणारी पोरं चुकली आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर वैधानिक मार्ग वापरून त्यांना समज देता आली असती. राडा घालण्याची काहीही आवश्यकता नव्हती.
हे कोणीतरी म्हणावं असं मला मनापासून वाटत होतं! धन्यवाद, हे शेअर केल्याबद्दल.
>>> माझ्यामते सीतेचे पात्र आणि ते पात्र साकारणाऱ्या कलाकाराचे पात्र या दोन गोष्टींची भेळ करून त्यात symbolism वापरून उगचच सोशल मेसेजिंग देण्याचा प्रयत्न त्या सादरीकरणात केला गेला.
हे मात्र पटलं नाही. 'फार डोकं वापरावं लागेल असं काही दाखवू नका बॉ!' असं म्हटल्यासारखं वाटतंय. असो.
>>> जिथे एखाद्या नाटकाच्या
>>> जिथे एखाद्या नाटकाच्या backstage ला सावित्रीबाईंच्या गेटअपमधील अभिनेत्रीला डॉ आंबेडकरांच्या किंवा फुलेंच्या गेटअप मधला अभिनेता सिगरेट पेटवून देतोय, ते तिघे घाणेरड्या शिव्या देत एकूण cheap पणे वागत आहेत.
अहो, फुल्यांचं पात्रच का, खुद्द फुल्यांवरच चिखलफेक केली होती की लोकांनी! त्यांना त्यासाठी सिगरेटसुद्धा ओढावी लागली नाही!
सुधारक तेव्हाही नकोसे होतेच आणि आताही असतात.
आणि तुम्ही ही दोन नावं का घेताहात सारखी? फुले आणि आंबेडकर रामकृष्णांइतकेच, किंबहुना अधिक पूजनीय आहेत माझ्यासाठी. मला शिक्षण घेता आलं आहे ते सावित्रीबाईंनी चिखलाचे गोळे झेलले म्हणून, आणि माझ्या जन्मभूमीची राज्यघटना आंबेडकरांनी लिहिली होती. ते 'त्यांचे' आणि रामकृष्ण 'माझे' असं काही वर्गीकरण नाही करता येत मला.
वरच्या आनम्द कुलकर्णींच्या
वरच्या आनंद कुलकर्णींच्या लेखात पण मग आताच का लोकं ऑफेंड व्हायला लागले?! ची दिलेली कारणमीमांसा खोटी आहे. 'सैय्य भये कोतवाल' हेच खरे कारण आहे. तसे नसते तर हुल्लडबाज मुलांच्या आदेशावरून पोलिसानी अटक वगैरे केली नसती.
गाडे फिरून फिरून आंबेडकर व फुलेंवरच का अडतेय ? फुले आंबेडकर आवडणारे आणी राम आवडणारे अशी बायनरी विभागणी करायची आहे का ? कैच्यकै !
मी फुले, सावित्रीबाई आणि डॉ
मी फुले, सावित्रीबाई आणि डॉ आंबेडकर या महान व्यक्तींच्याबद्दल बोलत नाहीये काहीच. नाटकात त्यांची भूमिका करणाऱ्या व्यक्ती backstage ला त्या गेटअप मध्ये काहीही वाटेल ते करताना दाखवणं योग्य नाही तसेच तो कायदेशीर गुन्हा ही कदाचित असेल.
राम सीता यांच्या गेट अप मधील कलाकार यांच्या बाबतही तसाच विचार होतोय इतकाच माझा मुद्दा होता.
वरच्या आनम्द कुलकर्णींच्या
वरच्या आनम्द कुलकर्णींच्या लेखात पण मग आताच का लोकं ऑफेंड व्हायला लागले?! ची दिलेली कारणमीमांसा खोटी आहे. //
मलाही माफ करा. उगाचच इथे काही बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. समोरची पूर्ण बाजू खोटी आणि मी म्हणतो ते खरं इतकं black and white असेल तर काय पाहिजे.
>>> नाटकात त्यांची भूमिका
>>> नाटकात त्यांची भूमिका करणाऱ्या व्यक्ती backstage ला त्या गेटअप मध्ये काहीही वाटेल ते करताना दाखवणं योग्य नाही तसेच तो कायदेशीर गुन्हा ही कदाचित असेल.
या बाबतीत कायदा कसा इन्टरप्रीट केला जातो ते पाहण्यास मी उत्सुक आहे.
बाकी राम, सीता, सावित्री, जोतिबा, भीमराव, मोहम्मद, येशू, मोझेस यांतलं आणि यांपलीकडचं कुठलंही नाव आलं तरी माझे मुद्दे तेच असणार आहेत.
कायदा माहीत नाही पण तुम्ही वर
कायदा माहीत नाही पण तुम्ही वर जी सर्व नावं लिहिली आहेत त्या सर्वांच्या बाबतीत आदर आणि सन्मान सर्वांनी दाखवायला हवा. आणि त्यात pushing the boundary किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे देखील सर्वच नावांच्या बाबतीत सारखं हवं. तिथे मर्यादाही सारखीच हवी. आम्ही बाकीच्या नावांच्या बाबतीत आदराचा पूर्ण प्रोटोकॉल पाळतो पण फक्त राम सीतेच्या बाबतीत काहीही लिबर्टी घेतो असं नको. सर्वांना आदर द्या.
एका प्रसंगावरून काही ही घडतं
एका प्रसंगावरून काही ही घडतं नाही काही तरी पार्श्व भूमी असते.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा होता आणि त्या विषयी कार्यक्रम कॅम्पस मध्ये करण्या ल डाव्या पक्षांच्या student युनियन नी विरोध केला होता.
सरकारी आदेशाने सोहळा साजरा होत होता,किंवा सुट्टी जाहीर केली गेली होती त्याला हे डावे पक्षीय union's विरोध करत होती.
मध्ये व्हेज , नॉन व्हेज वरून पण दोन गट पडले .
विषय कोणता ही असो पण जे दोन गट पडतात त्या मधील एक उजव्या विचाराचा असतो तर दुसरा डाव्या विचाराचा .
विरोधी विचाराच्या व्यक्ती न च्या पण कामाचे कौतुक करावे गरज पडली तर त्या मध्ये सहभागी पण व्हावे असा प्रगल्भ पना नष्ट होत चालला आहे आणि कट्टर पना वाढत आहे.
महापुरुष न च्या वर किंवा देव देवता न वर चुकून किंवा चुकीची कॉमेंट कोण करत आहे त्या वर त्याचा विरोध करायचा की दुर्लक्ष करायचे हे ठरत.
उजव्या विचाराच्या राजकीय पक्षांनी किंवा स्टूडेंट युनियन किंवा लोकांनी कोणताही धार्मिक कार्यक्रम घेतला की त्याचा अर्थ .
भारताच्या धर्म निरपेक्ष पना ल धोका.
हिंदू राष्ट्र बनवायचा कट.
संविधानाचा अपमान असा च प्रचार डावे किंवा तत्सम विचाराचे पक्ष आणि लोक करतात .
त्या उलट डाव्यांनी काही कार्यक्रम केलं की तो हमखास हिंदू विरोधी असतो.
Pages