Submitted by स्वाती_आंबोळे on 5 February, 2024 - 09:11
ललित कला केंद्रातील विद्यार्थी सादर करत असलेलं एक नाटक हिंदू देवदेवतांचा अपमान करत असल्याचं कारण देऊन अभाविपच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडलं. नाटकाशी संबंधित असलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांना अटक करण्यात आलं.
सोशल मीडिआवरच्या पोस्ट्स वाचून मला इतकंच कळलं.
मला खालील प्रश्न पडले, कोणाला यासंदर्भात माहिती असेल तर कृपया सांगा:
त्या नाटकात नक्की अपमानास्पद असं काय होतं?
या प्रसंगी मारहाण झाली का? कोणी सुरू केली?
अटक कोणत्या कायद्याखाली झाली?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चिनूक्स, इतक्यातच वाचलं.
चिनूक्स, इतक्यातच वाचलं.
ललित कला केंद्रात परीक्षकांपुढे कला सादर करण्याचा कायक्रम होता हा. हे काही व्यावसायिक / प्रायोगिक नाटक नाही सर्वत्र प्रयोग चालू असलेले. अर्थात काय आणि कसे शिकवावे याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी शिक्षकांना करावे असे दिवस नक्कीच आहेत.
Students were supposed to
Students were supposed to write and direct the play. सेन्सॉर प्रमाणपत्र गरजेचे नाही.
परीक्षेत गोंधळ घातला तर शिक्षेची तरतूद आहे. इथे उलट झालं.
ह्या कलाकार ना मुल,किंवा
ह्या कलाकार ना मुल,किंवा विद्यार्थी हा शब्द पण वापरणे चुकीचं वाटत आहे.
चिनूक्स, धन्यवाद. अपर्णा
चिनूक्स, धन्यवाद. अपर्णा यांच्या लेखाचा दुवा देता येईल का? मी इ-पेपरमध्ये शोधायचा प्रयत्न करते आहे, पण जरा अवघड दिसतंय.
थोड्या वेळात. बाहेर आहे.
थोड्या वेळात. बाहेर आहे.
> ललित कला केंद्रात
> ललित कला केंद्रात परीक्षकांपुढे कला सादर करण्याचा कायक्रम होता हा. हे काही व्यावसायिक / प्रायोगिक नाटक नाही
थोडक्यात अभाविप ने नेहेमीप्रमाणे खाजवून खरूज काढली.
तुम्ही लोक्स गावाकडे तमाशा गण गवळण वगैरे पहात नाही का? नुसतेच मटार उसळ ?
चिनूक्स धन्यवाद माहिती बद्दल
चिनूक्स धन्यवाद माहिती बद्दल, आणि दसा लिंक्स बद्दल.
ते एक प्रोफेसर म्हणत आहेत नटांनी कसे वागू नये याबद्दलच हे नाटक होतं, ते आधी तो व्हिडीओ पाहिला तेव्हा नीट कळले नव्हते. परिक्षकांपुढे विद्यार्थी सादर करत होते हे वाचल्यावर लक्षात आले.
आता हा काही जाहीर प्रयोग नव्हता हे कळल्यावरही तेच मत आहे का लोक हो - 'बरं झालं पोलिसांनी अटक केली' असं?
Students were supposed to
Students were supposed to write and direct the play. सेन्सॉर प्रमाणपत्र गरजेचे नाही.
>>>>>>>
ओके.. तरी कोणीतरी जबाबदारी घ्यायला हवी. काय सादर केले जाणार आहे हे तपासले पाहिजे.
आमच्या ऑफिसच्या फंक्शनला सुद्धा आधी काय सादर करणार आहे ते दाखवावे लागते. नियम हवेतच.
सेन्सॉर बोर्ड असून सुद्धा animal सारखे चित्रपट बनतात मग सेन्सॉर बोर्डच नसेल तर काय होईल विचार करा.
पण हिंदू धर्मावर आधारित च
पण हिंदू धर्मावर आधारित च विषय का?
बाकी विषय काय ह्यांना सुचत नाहीत का..
आणि सादर करणारे ठराविक विचार श्रेणी चेच का?
त्यांना नेहमी हिंदू धर्माचा अपमान करण्याची सवय च असते.
(No subject)
अपर्णा यांच्या लेखाचा दुवा देता येईल का?>>> स्वाती ! अपर्णा याचा लेख!
(No subject)
धन्यवाद, प्राजक्ता.
मला ही एक एवढीच सापडली:
यातही गोंधळ घालणार्यांवर काही कारवाई झाली की नाही काही समजत नाही.
आता हा काही जाहीर प्रयोग
आता हा काही जाहीर प्रयोग नव्हता हे कळल्यावरही तेच मत आहे का लोक हो - 'बरं झालं पोलिसांनी अटक केली' असं?
>>>>
अटक नव्हती करायला होती.
पुढील चौकशीपर्यंत हा प्रयोग कुठे करू नये असे सांगायला हवे होते.
वर कोणीतरी म्हटले तसे यामागे राजकारण असू शकते.
स्टंट असू शकतो.. किंवा आणखी काही...
त्यांना नेहमी हिंदू धर्माचा
त्यांना नेहमी हिंदू धर्माचा अपमान करण्याची सवय च असते.
>>>>>>>
असे नसावे. हिंदू जास्त म्हणून हिंदू विषय जास्त असे समीकरण आहे.
पाश्चात्य देशात इतर धर्मीय बद्दल असे सादर केले जाते की बिनधास्त...
वरचा लेख अगदीच बालिश आहे.
वरचा लेख अगदीच बालिश आहे. सातवी ड मधल्या मुलिने लिहिलेला वाटतो. रावणाचा रोल करणार्याने महिलांचे अपहरण करावे काय ?
विद्यापीठ ना सरकारी अनुदान
विद्यापीठ ना सरकारी अनुदान देणाऱ्या भारत सरकार च्या संस्थेने विद्यापीठ नक्की काय उद्योग करत आहे हे बघूनच सरकारी अनुदान द्यावे.
अशी मागणी हे असले उद्योग बघून उद्या कोणी ही करू शकते.
त्या मुळे बाकी विद्यार्थी मुलांचे पण नुकसान होईल
अपर्णा याचा लेख वाचुन अस
अपर्णा याचा लेख वाचुन अस समजतय की ज्यानी हे नाटक सादर केले त्यानाही विषयाच्या व्हॉलॅटिलीची कल्पना होती त्यामुळे त्यानी हॉकी स्टिक्,लाठ्या काठ्या सहित आपले सपोर्टर बसवलेले होते...म्हणजे आपण काय करतोय हे त्यानाही माहितीच होते.
स्टेजचे दोन भाग करु एकिकडे बॅकस्टेज ग्रिन रुम मधे काय चालु आहे ते स्टेजवरच दाखवलेले आहे ...सिता सिगारेट ओढते आणी लक्ष्मण ती पेटवुन देतो अशी दुष्य आहेत..सितेची भुमिका करणारी व्यक्ती आइ बहिण वरुन अत्यत खालच्या दर्जाच्या शिव्या देतेय...
स्टेजवर सिगारेट पिवुन ,अशा शिव्या देवुन कोणते नाटक नक्की हे सादर करत होते?
>>> वरचा लेख अगदीच बालिश आहे.
>>> वरचा लेख अगदीच बालिश आहे. सातवी ड मधल्या मुलिने लिहिलेला वाटतो.
हो ना, चिनूक्स या लेखाची लिंक देणार होता?
मला 'मुलं हत्यारं घेऊन 'तयारीत' होती' या आश्चर्यकारक माहितीपलीकडे काहीच संगती लागली नाही.
आता हा काही जाहीर प्रयोग
आता हा काही जाहीर प्रयोग नव्हता हे कळल्यावरही तेच मत आहे का लोक हो - 'बरं झालं पोलिसांनी अटक केली' असं?
>> होय.
काल मौलाना मुफ्ती सलमान अजहरी याला घाटकोपर येथे केवळ अटक केली तर त्याच्या समर्थकांनी ७-८ तास घाटकोपरला रस्ता बंद पाडून गोंधळ घातला. अश्या वेळी शांतता आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलिसांची तारेवरची कसरत असते. धार्मिक हाणामाऱ्या टाळण्यासाठी पोलिसांनी केले ते योग्यच केले.
त्यामुळे त्यानी हॉकी स्टिक्
त्यामुळे त्यानी हॉकी स्टिक्,लाठ्या काठ्या सहित आपले सपोर्टर बसवलेले होते.
>>>>>
अशी नवीं माहिती येत राहणार आणि लोकांची मते बदलत राहणार....
अर्थात बदलायची तयारी असल्यास.
उबो, मग गोंधळ घालणार्यांना /
उबो, मग गोंधळ घालणार्यांना / तोडफोड करणार्यांनाही अटक व्हायला हवी होती ना?
काय दर्जाचे लोक आता तिथे बसले
काय दर्जाचे लोक आता तिथे बसले आहेत हे दाखवायला लिंक देणार होतो. त्यातला बराच मजकूर खोटा आहे, असं विद्यार्थी सांगतात.
विंदा करंदीकरांचे पुत्र आनंद
विंदा करंदीकरांचे पुत्र आनंद करंदीकर यांचे मत ऐकले.
मॅक्स महाराष्ट्र वर आहे.
अश्या वेळी शांतता आणि
अश्या वेळी शांतता आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलिसांची तारेवरची कसरत असते
>>>>>
हो हे खरेय
अश्या सगळ्यात पोलिसांबद्दल वाईट वाटते.
कोणाचेही बाजू योग्य किंवा अयोग्य असो..
पोलिसांचा त्रास काही चुकत नाही
म्हणून खोडसाळपणा असेल तर जास्त चीड..
हल्ली अभिव्यक्ती स्वातंत्र्य मुद्दा उचलून हा मुद्दाम केला जातो.
त्यामुळे हे सुरुवातीच्या पहिल्याच पोस्ट मध्ये मी लिहिले होते.. अजून माहिती येऊ द्या.. उगाच एक बाजू घेत व्यक्त व्हायची घाई करू नका..
>>> काय दर्जाचे लोक आता तिथे
>>> काय दर्जाचे लोक आता तिथे बसले आहेत हे दाखवायला लिंक देणार होतो
हो, अवघड आहे खरंच.
हो ना, चिनूक्स या लेखाची लिंक
हो ना, चिनूक्स या लेखाची लिंक देणार होता? >> मला ही हाच प्रश्न पडला. हा लेख नक्की कशाकरता सुचवला चिनूक्स जाणुन घ्यायला आवडेल..तसेच लेखिका स्वतः घटनास्थळी उपस्थित होत्या असे लेखात कुठे नमुद केलेले नाही.
--
यावरील चिनूक्स यांचे उत्तर पोस्ट्स रिफ्रेश न झाल्याने आता दिसले.
उबो, मग गोंधळ घालणार्यांना /
उबो, मग गोंधळ घालणार्यांना / तोडफोड करणार्यांनाही अटक व्हायला हवी होती ना? >> होय, पोलिसांनी कधी, कुठे, कुणाला अटक केली ते इथे बसून आपल्याला कळणार नाही.
माझ्या मते या धाग्याला वाचनमात्र करणे योग्य राहील, अन्यथा इथे पण नेहमीप्रमाणे हाणामाऱ्या होण्याची दाट शक्यता आहे.
काठ्या, बॅट वगैरे घेऊन आलेले
काठ्या, बॅट वगैरे घेऊन आलेले लोक म्हणजे ज्यांनी प्रयोग बंद पाडला ते होते ना? मलाही हा प्रश्न पडला होता, की नाट्य वर्गाच्या अंतर्गत प्रयोगात हे त्याच्याशी संबंधित नसलेले लोक तयारीने आधीच पोहोचले कसे तिथे.
वरचा लेख काही च्या काही आहे. अमूक विषय कशाला दाखवायचे नाटकात तमूक का नाही याला काहीच अर्थ नाही.
हो ना, चिनूक्स या लेखाची लिंक
हो ना, चिनूक्स या लेखाची लिंक देणार होता?
हो ना ! मलाही तोच प्रश्न पडला. त्याच्या घरी ईडी ची धाड पडली की काय ? पडली तरी तिथे सोने वगैरे मिळणार नाही म्हणा. झरतृष्ट्र कालीन इराण मधील पाककलेची पुस्तके मिळतील फार तर !
>>> काठ्या, बॅट वगैरे घेऊन
>>> काठ्या, बॅट वगैरे घेऊन आलेले लोक म्हणजे ज्यांनी प्रयोग बंद पाडला ते होते ना?
नाही, प्रयोग पाहायला आलेले वसतिगृहातले विद्यार्थी असं दिसतंय - काहीतरी गोंधळ होणार याची त्यांना कल्पना असावी.
सिता सिगारेट ओढते आणी लक्ष्मण
सिता सिगारेट ओढते आणी लक्ष्मण ती पेटवुन देतो अशी दुष्य आहेत..सितेची भुमिका करणारी व्यक्ती आइ बहिण वरुन अत्यत खालच्या दर्जाच्या शिव्या देतेय...
इथे सीता,लक्ष्मण, राम यांच्या ऐवजी सावित्रीबाई, आंबेडकर, फुले ही नावं घेऊन असाच नाट्यप्रयोग होऊ शकतो का? इथे कोणी तसा एखादा नाटकाचा अंक लिहू शकेल का?
मायबोली admin ते allow करतील का हे त्यांनीही धागा वाचत असल्यास सांगावं.
म्हणजे फक्त हिंदू लोकांच्या भावनांशी खेळायचं कारण तुम्ही राम, सीता, हनुमान यांच्यात believe न करणारे भंपक नास्तिक आहात म्हणून.
Pages