लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.
माझ्या काही पेट पिव्हज -
- आय अॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.
- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.
- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.
- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.
अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.
मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.
अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?
अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे.
आठवेल तसे संपादित करत जाइन.
सगळ्यांकडे तसंच असतं रे. हे
सगळ्यांकडे तसंच असतं रे. हे बाहेर कोणाकडे गेलो तर विचारायचा प्रश्न आहे.
मी जास्त चहा पित नाही त्यामुळे माझ्या एकटीची चहाची सवय माहेरी वेगळी आहे आणि मी सासरी जास्त न राहुनही ती सासरशी मिळती जुळती आहे सेम माझ्या नवर्याबाबत. माझ्या नवर्याने बनवलेला चहा आम्हला कोणालाच आवडत नाही आणि त्याला कोणाचाच चहा आवडत नाही. तो मोजुन २५ मिनिटं उकळतो चहा. सगळ्यांनी ओरडून झालं त्याला पण काही फरक पडला नाही.
गाऊन/ नाईटी किंवा नाईट ड्रेस
गाऊन/ नाईटी किंवा नाईट ड्रेस घालून स्त्रिया आणि बॉक्सर घातलेले पुरुष बाहेर अगदी वाण्याकडे खरेदीला आलेले पाहून अक्षरशः डोक्यात जातात.
तो पर्वा इल्ला म्हणाला तर
तो पर्वा इल्ला म्हणाला तर मनात यायचं की अरे पर्वा नाही काय, पर्वा कर जरा आमच्या कामाची >>> वावे, एक्झॅक्टली हेच विचार माझ्या डोक्यात यायचे. एक ऑफिस कलीग होता तमिळ. तो थँक यू ला उत्तर म्हणून पर्वा नाय का असे काहीतरी म्हणायचा. मला वाटायचे की तो हिंदी बोलतोय
सगळ्यांकडे तसंच असतं रे. हे
सगळ्यांकडे तसंच असतं रे. हे बाहेर कोणाकडे गेलो तर विचारायचा प्रश्न आहे.
>>>
तेच तर.. बाहेरच्यांना देखील चहात साखर चालते की नाही इतकाच प्रश्न. किती वगैरे विचारून नंतर देत नाहीत. मुळातच कमी असल्याने कोणाला जास्त दिली जात नाही ते ही आहे म्हणा..
लहानपणी एकीकडे मी पाहुणा म्हणून गेलेलो तेव्हा त्यांनी विचारलेला हा प्रश्न.. त्यावर मी कन्फ्युज, कारण चहात किती साखर टाकली जाते हेच मला माहीत नाही
उलट पण असतं बरं का.
उलट पण असतं बरं का.
आमच्याकडे तशीही कमीच असते साखर, घे पी. काही काही शुगर वाढत नाही एवढ्याने, घे, वाटल्यास गोळी जास्त घे.
मग कोणीतरी सांगतं त्याला नाही शुगर, तिला आहे. मग त्यावर डोळे विस्फारून लबाडी करतोय का आवेशात आता तर मुकाट्याने घेच म्हणणे.
यात मग कुठल्याही वयाचे जोडपे असो आणि प्रसंग कुठलाही असो जणु काही कॉलेजमधले नुकतेच प्रेमात पडलेले जोडपे आहे असे समजून कॉमेंट्स करण्याची सवय असणारे असले की झाले. बाई बाई बघितलं का केवढं प्रेम बायकोवर, तिला शुगर आहे म्हणून तू पण साखर सोडली!
अरे शिष्टाचारातिरेक्यांनो, तिला मधुमेहातला म सुद्धा झाला नव्हता तेव्हा पासून मला बिनसाखरेचा चहा प्यायची सवय आहे. साखर बंद नाही केलीय.
अर्थात या काही पेट पीव्ह्ज नव्हेत, वरील गप्पांच्या ओघात आठवले.
नाईट ड्रेस घालून स्त्रिया आणि
नाईट ड्रेस घालून स्त्रिया आणि बॉक्सर घातलेले पुरुष...
>>>>
हे वाद आमच्याकडे नेहमी असतात. कारण लेकीला (वय वर्षे नऊ) नाईट सूट हा प्रकार फार आवडतो. रात्री तसेच बाहेर फिरायचे. सकाळी उठल्यावर कुठे जायचे असेल तर त्यावरच बाहेर जायला बघायचे. इतकेच नाही तर नवी मुंबई ते मुंबई हा ट्रेन ट्रॅव्हल सुद्धा पहाटे किंवा रात्रीच्या वेळी नाईट सूटवर करायला आवडते. घरी बायकोला हे आवडत नाही. तिच्याही डोक्यात जाते. पण माझा स्टँड वेगळा असतो. कोणाच्या घरी किंवा फंक्शनला जायचे नसेल तर रस्त्यावरच्या लोकांची पर्वा का करावी. तिची लाईफ तिची चॉईस. राहू द्यावे तिला तिच्या कम्फर्टने..
नऊ वर्षांच्या मुलीचं काही
नऊ वर्षांच्या मुलीचं काही नाही ऋन्मेष. मोठ्या बायकाही नाईट गाऊन घालून फिरतात बाहेर त्याबद्दल आहे वर लिहिलेलं. मलाही ते बघायला आवडत नाही. डोक्यात वगैरे नाही जात अर्थात. एकेकीचा चॉईस.
फारएण्ड>> तमिळमध्येही असं म्हणतात हे माहिती नव्हतं.
तमिळमधे 'चुम्मा' म्हणजे सहज, असंच वगैरे. आणि हा शब्द ते खूप वापरतात. आपण दोन तमिळ लोकांचं संभाषण ऐकत असू तर विचित्र प्रकारे हसू येतं.
असो. आता हे अति अवांतर व्हायला लागलं.
'धागा वाहवत नेणे' हे पेट पीव्ह असू शकतं
मोठया बायका नाईट गाऊन वर ओढणी
मोठया बायका नाईट गाऊन वर ओढणी वर सहमत.
बहुतेक घरी वेस्टर्न नाईटसुट/शॉर्ट कुर्ता पॅन्ट रात्री/घरात पण चालत नाही/साडी आंघोळी नंतर फ्रेशच नेसायला काढणार अशी सांस्कृतिक गुंतागुंत आहे यात.त्यामुळे जाऊदे बापड्या. जी ले अपनी जिंदगी.पण पुरुष बॉक्सर्स वर हे फारच .
अर्थात आता बऱ्याच सेलर्स ने मॅचिंग ओढणी वाले गाऊन्स विकायला काढून याला मान्यता दिलीय अगदी चिकनकारी चे, 2000 वगैरे किंमत असलेले अति रिच क्लासि गाऊन्स घरी घालायला पण मिळतात.
“तो पर्वा इल्ला म्हणाला तर
“तो पर्वा इल्ला म्हणाला तर मनात यायचं की अरे पर्वा नाही काय, पर्वा कर जरा आमच्या कामाची” - ह्याचं रिव्हर्स उदाहरण म्हणजे, ‘I don’t care’ - ज्याचा लाक्षणिक अर्थ, कसंही चालेल असा आहे. पण भारतात ते अनेकांना उर्मटपणाचं लक्षण वाटतं (चूक नाही तसं वाटण्यात).
मॅचिंग ओढणी वाले गाऊन्स हे
मॅचिंग ओढणी वाले गाऊन्स हे नवीन आहे. ऐतेन.
मोठ्या बायकाही नाईट गाऊन
मोठ्या बायकाही नाईट गाऊन घालून फिरतात बाहेर
>>>>>>
हो ते लक्षात आले. पण आमच्या घरात लहान मुलीने हे केले तरी त्यांना प्रॉब्लेम आहे आणि मला मोठ्या बायकांनी केले तरी त्यात काही वावगे वाटत नाही. म्हणजे मला तरी पर्सनली कुठे अशी बाई दिसली की काही ऑड वाटत नाही.. ऑफिसला आले काही वेगळेच घालून तर वेगळे वाटू शकते.. पण रस्त्यावरच्या बायका पुरुषांनी काय घालावे याची पंचाईत आपल्याला कश्याला असे वाटते.
अर्थात हे पेट पीव्हज असू शकतेच त्यात वाद नाही. शेवटी पेट पीव्हज म्हणजे वैयक्तिक आवडी निवडी मतेच आहेत. आणि आमच्या घरातल्यासाठी हे पेट पीव्हज आहेच. ज्यात मुलगीही सुटत नाही
तसेही कोणी काय घातले आहे याकडे बायकांची नजर जास्त जाते. पुरुषांना तितके पडले नसते. म्हणजे लग्नाला म्हणा, पिकनिकला म्हणा, कोणी काय घातले आहे हे जसे बायका न्याहाळतात ते पुरुष मंडळीना पडले नसते.
हे बघ गं विशाखा, मॅचिंग ओढणी
हे बघ गं विशाखा, मॅचिंग ओढणी वाले नाईट गाऊन्स
धिस हियर इज सन अँड धिस हियर इज किंग जयद्रथा.
https://www.amazon.in/JISB-Womens-Cotton-Nighty-NIGHTY/dp/B09J2LRVGZ/ref...
बॉक्सर घालून हे फारच झालं.
बॉक्सर घालून हे फारच झालं.
परवा इल्ले हे मला पण तामिळ मित्रानेच शिकवलं होतं.
बाकी चहात कोणी चार चमचे साखर हवी सांगितलं तर मी एक चमचा घातली आहे, आणि हा साखरेचा डबा घ्या आणि हा चमचा. ओता किती हवी ती. असच सांगतो. माझ्याच्याने चार चमचे घालवत नाही.
मला ऑल द बेस्ट आठवला
मला ऑल द बेस्ट आठवला
"चाय मे शक्कर 2 चम्मच?"
"नही, चम्मच एक ही, उससे शक्कर 2 बार."
का बरं? दोन चमचे वापरुन
का बरं? दोन चमचे वापरुन प्रत्येकी एक एक वेळा घातली तर चवीत फरक पडतो का?
सन अँड किंग जयद्रथा
सन अँड किंग जयद्रथा
गाऊन बघून खरोखरच ऐतेन.
पण मी म्हणतो
गाऊन बघावे
पण मी काय म्हणतो
नवल वाटावे इतकं विचित्र का गावे
जोके हो मानव तो
जोके हो मानव तो
ते पात्र खूप अतरंग असतं.सगळे डायलॉग हहपुवा आहेत त्यातले.
बाय द वे त्यात संजय दत्त जातो तो लुशोतो देश काल्पनिक आहे असं वाटत होतं.परवा नकाशा बघत असताना चक्क तो खरा आहे असा शोध लागला बाकीच्यांना हे माहीत असेल, मलाच नव्हतं.
हो, मी म्हटले तो त्या जोक
हो, मी म्हटले तो त्या जोक वरील जोक आहे, रादर, विद्या भूतकर यांच्या भाषेत जोक मारणे आहे.
बापरे गाऊ आणि मॅचिंग ओढणी टू
बापरे गाऊ आणि मॅचिंग ओढणी टू मच ऑफ इंडियनिझम इन ड्रेसिंग.
गाऊनवर कुणीतरी विनोद करेल असं
गाऊनवर कुणीतरी विनोद करेल असं वाटलं होतं आधी. पण मग वाटलं आता हा विनोद तसा जुना झालाय, त्यामुळे नाहीसुद्धा करणार
कोणत्याही ठिकाणी उदा. क्लिनिक
कोणत्याही ठिकाणी उदा. क्लिनिक, मंदिर वगैरे च्या बाहेर चप्पल स्टॅन्ड असते. लोक ते स्टॅन्ड सोडून बाहेरच चप्पल काढून आत जातात.
अगदी उंबरठ्याच्या बाहेर कोणीतरी अडखळून पडेल अशी अवस्था होईल अशा पद्धतीने अस्ताव्यस्त ठेवलेल्या असतात चपला. ते डोक्यात जाते माझ्या.
प्रवासात (स्वतः वाहन चालवताना
प्रवासात (स्वतः वाहन चालवताना, ट्रेन, बस पकडताना) किंवा एकंदरीतही धोका असणारी (ओढणी / पदर अडकणे, पेटणे वगैरे) कपड्यांची फॅशन थांबायला हवी.
हेहे.गाऊन जोक वाचला.मी अमेझॉन
हेहे.गाऊन जोक वाचला.मी अमेझॉन लिंक शेअर केल्याने आता या धाग्यावर हजारो गायक तयार होतील
बऱ्याच सेलर्स ने मॅचिंग ओढणी
बऱ्याच सेलर्स ने मॅचिंग ओढणी वाले गाऊन्स विकायला काढून याला मान्यता दिलीय >>>>
आं ओढणीवाले गाऊन? आता सुडोमी.
एक भाबडा प्रश्न : ओढणीवाले गाऊन वापरायच्या ऐवजी विथ ऑर विदाउट ओढणी सलवार सूट घातलेले काय वाईट?
@ऋन्मेष : सौ.ला सांग की मुलगी ट्रेंड सेटर आहे. तिने Co-ord सेट मेनस्ट्रीम मध्ये आणले.
जोक्स अपार्ट, लहान मुलांना हवे तसे कम्फर्टेबल कपडे घालू द्यावेत. हवे तर बाहेर जाण्यासाठी राखीव नाईट सूट/होजिअरीचे टी शर्ट आणि लेगिंग्स ठेव मुलीसाठी.
मानव आणि दक्षिणा,सहमत.ओढणी
मानव आणि दक्षिणा,सहमत.ओढणी वाले ड्रेसेस दुचाकीवर खूप त्रास देतात.दरवेळी बांधता पण येत नाहीत.पलाझो/हाफ पतियाळा सलवार मुख्य स्टँड लावताना स्टँड च्या आकड्यात सलवार बॉटम अडकून खूप जोरात भुई सपाट व्हायला होतं.(अनुभव आहे.कुठे आणि किती जोरात लागतं हे तर्काने कळलंच असेल.)
माझे मन, टेक्निकली पूर्ण सहमत.पण काही लोकांना पायात लेगिंग घालून झोप येत नाही.को-ऑर्ड ची फॅशन फारच यो आहे.वागळे की दुनिया आठवतं, एकाच ताग्यात सर्व.कोव्हिड मध्ये 2 पीस बिकिनी, हातमोजे आणि मास्क सेम ताग्यातून अशी पण फॅशन आली होती.
घरात नुसता गाऊन. बाहेर जाताना
घरात नुसता गाऊन. बाहेर जाताना वरून ओढणी. कायच्या काय आहे. हा प्रकार अजिबात चांगला दिसत नाही.
पकडताना) किंवा एकंदरीतही धोका
पकडताना) किंवा एकंदरीतही धोका असणारी (ओढणी / पदर अडकणे, पेटणे वगैरे) कपड्यांची फॅशन थांबायला हवी.
स्त्रियांची खूपच काळजी आहे . मानव पृथ्वी कर ह्यांना.
स्त्रिया न कुठे कोणते कपडे परिधान करावेत ह्याचे ज्ञान नसते
हे सुचवत आहात का आड मार्गाने.
कपिल शर्मा शो मध्ये पण ह्या वर जोक आहे.
भयंकर थंडी पडली आहे ,बर्फ पडत आहे आणि आपल्या सिनेमाच्या नायिका पातळ साड्या ,आणि स्लीवलेस घालून वावरत असतात.
आणि नायक फुल अंगभर गरम ची कपडे घालून
महोदय, मी सामान्य माणुस आहे.
महोदय, मी अतिसामान्य माणुस आहे. आपल्या एवढी प्रगल्भ्ता माझ्यात नाही.
पिव्ह्ज लिहा लोकहो
पिव्ह्ज लिहा लोकहो
Pages