'चांदोबा'तील हार, गजरे आणि माटुंगा मार्केट

Submitted by मामी on 14 November, 2014 - 22:49

'चांदोबा' मासिकातील चित्रे फारच भन्नाट असायची. एक अदभूत जग होतं ते. वेगळ्याच प्रकारचे पेहराव, दागिने, चेहर्‍याची ठेवण असलेली पात्रं त्या चित्रांतून दिसत. त्याचबरोबर देवादिकांनी घातलेले मोठ्ठे आणि विविध प्रकारचे फुलांचे हार असत. चित्रातल्या बायका भरपूर गजरे माळलेल्या दिसत. चांदोबातील या चित्रांवर दाक्षिणात्य ठसा होता.

तेच ते 'चांदोबा'तले हार माटुंग्याच्या बाजारात बघायला मिळतात. अतिशय आकर्षक आणि नक्षीदार रचना केलेले हे हार बघून त्या कलाकारांचं कौतुकच वाटतं. काही हार तर खास दाक्षिणात्य स्टाईलचे - हे भलेमोठ्ठे. माणसापेक्षाही जास्त उंचीचे.

नविन नविन शक्कल लढवून फुलांच्या अत्यंत सुरेख रचना करून किती सुंदर सुंदर हार बनवले आहेत पहा :

(सर्व प्रचि त्या त्या दुकानदारांची परवानगी घेऊनच घेतली आहेत.)

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

माणसापेक्षाही उंच हार :

प्रचि ७

ताडाच्या पात्यांपासून बनवलेले हे झुंबर :

प्रचि ८

हार, गुच्छं, झुंबरं आणि खाली पात्यांचीच बनवलेली चटई :

प्रचि ९

अजून झुंबरं. सुकलेल्या पात्यांपासूनही बनवली आहेत :

प्रचि १०

जरा जवळून बघुयात. हार कसे गुंफले आहेत ते बघा. गुलाबाच्या पाकळ्यांत मोगर्‍याची फुलं, फुलांच्या रंगांचा, गुलाबाच्या पाकळ्यांच्या शेडिंगचा खुबीनं वापर करून किती मस्त रंगसंगती साधली आहे. तीच फुलं घेऊन प्रत्येक हाराला वेगळं रुप दिलंय. कमाल आहे की नाही!

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

भरतनाट्यमच्या वेळी डोक्यात घालतात ती वेणी :

प्रचि १५

पात्यांपासून बनवलेले हार :

प्रचि १६

ही एक वेगळीच रचना - ताडाच्या पात्यांचीच आहे.

प्रचि १७

हे हातावर मोजून विकण्याचे गजरे. यातही किती छान रंगसंगती आहे.

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

माटुंगा मार्केटमधली दाक्षिणात्य भाजीचा स्टॉल :

प्रचि २३

प्रचि २४

टॅपिओका आणि केळीचे गाभे :

प्रचि २५

ही मुळं कसली ते माहित नाही. नाव सांगितलं त्या माणसानं पण कळलं नाही.

प्रचि २६

बाळ कांदे :

प्रचि २७

खाऊचा स्टॉल :

प्रचि २८

गोड अप्पम :

प्रचि २९

हलवा, पापड (अप्पलम) आणि वेफर्स :

प्रचि ३०

लाल उकडे तांदूळ :

प्रचि ३१

केरळी परकर पोलकं

प्रचि ३२

लेटेस्ट फेरीतून अजून काही

ताडपातींपासून बनवलेली अजून दोन डेकोरेशन्स

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्र्र्र!!! Happy Lol Lol
काहीजण ऑडिओफिल असतात मी प्रचंड व्हिज्युअल पर्सन आहे गं .

काही दिवसांपूर्वी या भागात गेले होते तर त्या जाडजूड हारांमध्ये अजून काही नवी डिझाईन्स दिसली. पुन्हा खास जाऊन फोटो काढले पाहिजेत.

सुंदर फोटो आहेत! बेंगळूरूमधल्या मल्लेश्वरम भागातल्या आठवणी जाग्या झाल्या. तिथे शहाजी महाराजांनी बांधलेलं (की जीर्णोद्धार केलेलं) काडु मल्लेश्वरम नावाचं मंदीर आहे, त्याच्या जवळ अगदी अशीच चांदोबातल्या हारांची दुकानं आहेत.

Pages